|
Anilbhai
| |
| Wednesday, June 06, 2007 - 7:43 pm: |
|
|
नमस्कार मंडळी, शलाकाच्या वतीने हे पोष्ट टाकतो आहे. ' नक्ष वर बरीच छान चर्चा चालू आहे. आणि मलाही काही म्हणायचय. पण वीकेंडला वेळ मिळाला नाहीये. घरून मला पोष्टता येत नाहीये. तसंच आजच सकाळी गाडीचा अपघात झाल्याने थोडी इजा होऊन समोर फार वेळ बसता येत नाहीये. त्यामुळे आत्ता इतक्यात चर्चेत भाग घेता येणार नाहीये. - शलाका
|
Fulpari
| |
| Thursday, June 07, 2007 - 9:43 am: |
|
|
शलाका, अप्रतिम कथा. अपघात कसा काय झाला गं? सर्व ठिक ना? hoping that काळजी करण्यासारख काही नाही. Pls do take care
|
Alpana
| |
| Thursday, June 07, 2007 - 10:27 am: |
|
|
मी दादचे लिखाण पहिल्यान्दाच वाचले... खरे तर का कोण जाणे पण मी ईथल्या कोणत्याच कथा पुर्वी वाचल्या नव्हत्या...आणी ललित किन्वा कविता मी एरवी पण कमीच वाचते... मायबोलिच्या होमपेजवर नक्श ची लिन्क होती म्हणुन सहज वाचले...आणी त्यानन्तर मी दादचे जुने लिखाण शोधुन वाचतेय... त्याचवेळी मी बाकी बर्याच जणांच्या कथा पण वाचल्या... बर्याचश्या आवडल्या... मी बर्यापैकी वाचत असले तरी मला त्यातले खुप काही कळत नाही...फक्त एखादी कथा आवडते एखादी नाही आवडत.... नक्श वाचल्यानंतर मला सगळ्यात जास्त लक्षात राहिली ती लेखिकेची शैली....
|
Ksha
| |
| Friday, June 08, 2007 - 12:40 am: |
|
|
दाद, अतिशय सुंदर लिहिलं आहेस. सुरेख मांडणी आणि तुझी रुपकं वापरण्याची शैली तर झकास! तुझ्यात story telling चा गुण आहे, त्याचा चांगला उपयोग कर! बी, टीका करावी पण तिच्यामुळे आपले हसे होईल अशी करू नये. मेघना पेठेंबरोबर एकदा रामदासांनी सांगितलेली मूर्खाची लक्षणे पण वाच. बराच फायदा होईल.
|
Bee
| |
| Friday, June 08, 2007 - 3:37 am: |
|
|
क्ष, मी वाचलीत ती लक्षणे. केशव विष्णु बेलसरेंनी लिहिलेल्या दासबोधात देखील वाचलेली आहेत. तुझ्यात ती मला पुर्णपणे आढळली आहेत. कुणी संत महात्म्यामी महामुर्खाची लक्षणे लिहिलीच तर तीही तुझ्यात आढळतील ह्यात संकोच नाही.
|
Ksha
| |
| Friday, June 08, 2007 - 4:18 am: |
|
|
उत्तम. असेच डोळे / कान उघडे ठेवून वागत जा म्हणजे झालं. खूप फरक पडेल दाद. तुझ्या bb वर विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व. पण चांगल्या कथेवर गरळ ओकलेलं जरा खटकलं. असो.
|
Bee
| |
| Friday, June 08, 2007 - 4:26 am: |
|
|
माझी प्रतिक्रिया वाचून तिला काय वाटले हे मला जास्त महत्त्वाचे वाटते. तिची विचारसरणी, प्रतिक्रिया स्विकारण्याची क्षमता नक्कीच निराळी आहे हे मला ठाम माहिती आहे म्हणून मी तिला, तिच्या विनंतीनुसार, तशी प्रांजळ प्रतिक्रिया दिली. जर दादनी मला चांगल्याच प्रतिक्रिया हव्यात असा सूर काढायला सुरवात केली तर ती देखील 'क्ष' सारख्या महामुर्ख्याच्या गटात सामिल होईल. पण सुदैवाने ती तशी नाही.. बाकी क्ष तू आता ओकलास ते कोण सावरेल.. एकदा नाही नेहमीच ओकतोस म्हणून 'खटकले'
|
Bee
| |
| Friday, June 08, 2007 - 4:37 am: |
|
|
दाद, तुझ्या कविता मी खूप मिस करतो आहे. आता गद्याकडून पद्याकडे परत वळ पाहूस :-)
|
Daad
| |
| Tuesday, June 12, 2007 - 1:11 am: |
|
|
पहिल्या प्रथम सगळ्यांचे खूप आभार. (अनिलभाई, माझ्या वतीने पोस्टल्याबद्दल thanks ) मला जे म्हणायचं होतं ते इतक्या चपखल anology सह आणि सुंदर शब्दांत सईने म्हटलय की मला काही लिहायलाच नको. पण जित्याची खोड म्हणतात ना.... ;) बी म्हणतात तसं थोडं एखाद्या लेखकाचं आपल्याला आवडलं ना, की आपण थोडे त्याला "सन्मुख" होतो. तसं थोडं माझ्या बाबतीत झालं असण्याची शक्यता नाही असं नाही. मला वाटतं की, माझ्या "कथा" ह्या त्यातल्या घटनांपेक्षा त्यातल्या माणसांचे मनोव्यापार जास्तं दाखवतात. "नक्ष....." ही कथा अशी अगदी काही तासांत घडते. पण त्यातल्या मोजक्या (दोनच) पात्रांची मनोभूमी स्पष्टं करण्यात खर्चं झालीत बरीच पानं. धूमकेतू म्हणतायेत तसं काही ठिकाणी पसरलीये गोष्टं (मी पुनर्लेखनाचा प्रयत्नं करूनसुद्धा). पण त्या फापटपसार्याचीही गरज वाटली मला. एखादा सुज्ञ लेखक, सुज्ञ वाचकासाठी संदिग्धपणे हे सगळं सांगून गेलाही असता. पण ती त्याची लकब. एक सरळ, खरतर थोडा स्वत्: sensitive पण आपल्या मनाच्या या कंगोर्याला (सेन्टीपणाला) स्वत:च सामोरं जायला घाबरणारा आपला नायक. विचाराने पुढारलेला वगैरे पण ह्याच सेन्टी कारणासाठी लग्नापर्यंत "पोरीत न अडकलेला". लग्नानंतर त्याच्या लक्षात येतं की "अरे, आपण आपल्या बायकोच्या प्रेमात पडलोय"..... खरतर ही एक गृहित धरण्यासारखी गोष्टं (बायको आहे, मग तिच्यावर प्रेम आहेच वगैरे वगैरे).... पण पडदा उघडल्यावर उजळणार्या खोलीसारखा हा "साक्षात्कार" होतो नं, तेव्हा बायको प्रेयसी म्हणून दिसायला, कळायला लागते. प्रेमात पडल्यावर होणारी जीवाची घालमेल, insecure , possessive feelings , सगळं सगळं घडतं...... हो, लग्नं झालेलं असूनही आणि प्रेयसी दुसरी तिसरी कुणी नाही, बायकोच असूनही. या insecure feeling मधूनच आपल्यातले बरेचजण preamptive attack करतात.... आपल्या नायकासारखेच. rational thinking वगैरे पार पल्याडच्या गोष्टी होतात त्या नेमक्या क्षणी. असो.... तुमच्या प्रतिक्रियांमधून मला खूप शिकायला मिळतय my strenghts, weaknesses , माझं भरकटणं, वहावणं.... सगळं. लेखिका म्हणून शिकण्यासाठी सगळ्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या आहेत माझ्यासाठी. त्यातल्या कोणत्याही प्रतिक्रियेमुळे फार चढून किंवा उतरूनही न जाता त्याचा माझ्या विकासासाठी वापर हा दृष्टीकोन माझा जोपर्यंत असेल तो पर्यंत फायदा नाहीतर तोटाच! तेव्हा प्रतिक्रिया महत्वाच्या.... thanks heaps, again .
|
|
|