|
Chafa
| |
| Friday, May 25, 2007 - 9:13 pm: |
|
|
माझे इथे लक्ष आता गेले. वर अनेकांनी माझ्या ID चा, चाफ़ा - Chafa चा उल्लेख केला आहे पण मला वाटते ते माझ्याबद्द्ल बोलत नसून चाफ़्फ़ा - Chaffa या id बद्दल बोलत आहेत. मॉडरेटर्स ना माझी विनंती आहे की या सर्व पोस्ट्स मधील माझ्या ID चा उल्लेख बदलण्यात यावा. माझा या विषयाशी संबंध नाही. तसेच ऍडमिन यांना विनंती की नामसाधर्म्यामुळे ही गल्लत अनेक लोक अनेक ठिकाणी करताना दिसतात. त्यावर योग्य उपाय सुचवावा. धन्यवाद.
|
Yog
| |
| Friday, May 25, 2007 - 10:10 pm: |
|
|
आजकाल (लघु)कथेपेक्षा त्यावरील प्रतिक्रीया (वाद) चा size मोठा असतो... असो. psg , कथा(?) ठीक आहे. एक अनुभव कथन या सदरात बसते. लिखाणात मात्र बोलीभाषेचा वापर जरा जास्त आहे. शिवाय एक परीपूर्ण कथा वाचल्याचे समाधान मिळत नाही. याची कारणे बरीच असू शकतील. मोठी कथा लिहा असा आग्रह नाही पण कथेत जरा प्रसन्ग विस्तार, पात्र परिचय, विषय मान्डणी, वैचारीक बैठक, अभिव्यक्ती, ही कथेची आवश्यक वैशीष्ट्ये नसतील तर वाचकाला अनुभूती-समाधान मिळत नाही. तसे काहीसे ही कथा वाचून वाटले. शेवटचा परिच्छेद कुणाचा? लेखक हे वाचकाला सान्गतो आहे का? की माईनी हे जयश्रीला सान्गीतले? माई कन्टाळल्या होत्या हे अनुमान लेखिकेने काढले का? केवळ "सुटका" असे शीर्षक दिले म्हणून हा परिच्छेद लिहावसा वाटला का? लिहीला नसता तरी त्या आधीच्या परिच्छेदातून व इतर वाक्यातून (माई मनाने निवृत्त झाल्या होत्या)ते subtly convey झाल आहे. शेवटच्या दोन ओळी सुध्धा आवश्यक आहेत का? असो. लिहीत रहा... चू.भू. दे. घे.
|
Psg
| |
| Saturday, May 26, 2007 - 5:02 am: |
|
|
योग, छान लिहिले आहे तुम्ही. ह्म्म. मी नक्कीच विचार करीन या मुद्यांचा. मनापासून आभार. आणि, मीनु, मयुरेश, नंदिनी, भ्रमर, राज्या, श्रद्धा तुमचेही शतश: धन्यवाद!
|
Ammi
| |
| Monday, May 28, 2007 - 9:38 am: |
|
|
aavadali katha...chaan hoti... carry on
|
Gobu
| |
| Monday, May 28, 2007 - 10:19 am: |
|
|
पुनम, तु बिनधास्त लिही ह! कोण काय प्रतिक्रीया देईल याचा विचार करु नकोस (पुनमबेन,बिन्दास लिखनेका! टेन्शन नाय लेनेका!! बोले तो एकदम नन्दिनी जैसा! ) आणि हो तुझी कथा आवडली मला
|
बाप रे! किती प्रतिक्रिया!! मला तर आवडली बुवा कथा. PSG जाऊ दे, अशी माणसं जगात असतातच. यांना स्वत्:ला काहीही लिहिता येत नाही. मास्तुर्यांचे profile पाहिले का? मराठी साहित्याचा अभ्यास आहे म्हणे ग. पु. लं. च्या व्यक्तिचित्रणातला टीकाकार परफेक्ट उतरलाय इथे. पु. लं. ना हे सहन करावे लागले, तिथे तुझी काय कथा? लिहायला या वृत्तींना जमत नाही, आणि दुसर्यांनी लिहिलेले खपत नाही, मग त्याचा असा टीकाकार बनतो. हा सर्व मला साहित्यातले सर्व काही कळते, हे दाखवण्याचा अट्टाहास आहे. कितपत कळते हे त्यांनाही कळत असतं. मास्तुरे, तुमचं चालू द्या, तुम्ही दिसेल ते छापील साहित्य वाचून त्याच्या चिंध्या करा. उत्तम `मर्मभेदी' टीकाकार म्हणून नाव कमवाल. `मायबोली'करांच्या वाटेला जावू नका, असा शाब्दिक मार खावा लागेल. इथे सर्वजण एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी वाचतात. उदा. पाहा `गझल कार्यशाळा'.
|
पुनम, कथा खुप छान आहे. मला तरी आअवडली लोकं काहीही म्हणोत... आणि हो मीही एसजी रोडवरची नाहिय... >>>>ही भाषा फ़ारच ओळखीची वाटत आहे. <<< मलासुद्धा...
|
Manjud
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:09 am: |
|
|
Psg , मला आवडली गोष्ट. मास्तुरे............. psg च्या कथेपेक्षाही अनेक सुमार कथा इथे गुलमोहर मधे प्रसिद्ध होत असतात. त्यावर तुमची एकही प्रतिक्रीया वाचली नाही. आणि मास्तुरे असुनही पूनमवैणी????... नाहीतर हल्ली मायबोलीवर कथापेक्षा वाद जास्त रंगत आहेत. व&C वर कथा लिहू या का? एक भा प्र. नन्दीनीच्या ह्या मताशी मी देखिल सहमत.
|
अरे, पण या प्रकरणाचा "मास्तुरे" कुठे गायब झाला?? कोणाला त्याच्याबद्द्ल काही माहिती आहे का? असल्यास सांगा. मी स्वत्: त्याला कोल्हापुरच्या गल्ली-बोळातुन हुडकुन काढेन. आणि पूनम, तु बिनधास्त लिही गं! अगं कोल्हापुरच्या लोकांचासुद्धा तुला पाठिंबा आहे. हा "उपटसुंभ" का आमच्या कोल्हापुरला बदनाम करायला निघालाय??
|
Abhijat
| |
| Wednesday, May 30, 2007 - 12:43 pm: |
|
|
ज्या लोकांना स्वत:चा id वापरून लिहायची हिम्मतही होत नाही अश्या लोकान्च्या प्रतिक्रीयांकडे लक्ष न देणे उत्तम नव्हे काय? काय हो मास्तुरे, उगाच तुमच्या सारख्या झारीतल्या शुक्राचार्याना महत्व देण्यात काही तरी अर्थ असतो का? तुम्हीच सांगा बरं? :P
|
Daad
| |
| Thursday, May 31, 2007 - 3:24 am: |
|
|
पूनम, मला आवडली कथा. संवादातून छोटं का होईना पण घटनाक्रम उलगडणं सोप्पं नाहीये. तुझी पात्रांना संवादातून "प्रगट" करण्याची शैली मला आवडली.
|
Ravisha
| |
| Friday, June 01, 2007 - 9:37 pm: |
|
|
हुश्श,कदाचित आता तरी ह्या वादविवादातून "सुटका" झाली म्हणायची...
|
Ladaki
| |
| Tuesday, June 12, 2007 - 9:00 am: |
|
|
पूनम टिका कधीही खेळकरपणे घ्यायच्या असतात त्या कोणी केल्यात ते महत्वाचे नसते पण आपली एखादी गोष्ट समोरच्याला का नाही आवडली याचा विचार नक्कि करावा त्यातुन आपल्यात काही सुधारक बदल करता येत असतिल तर ते जरूर करावेत आणि तसे काही बदल करायची आवश्यकता वाटत नसेल तर अश्या टीकांकडे लक्ष नाही द्यायचे आता तुझ्या कथेबद्दल... कथा खुप छान आहे पण तरिही काहितरी राहील्यासारखे वाटते म्हणजे नक्की काय ते नाहि सांगता येणार पण कथा जरी मनाल भावली तरि त्यात काहितरी कमी असल्याचा भास होत रहतो. तु कथा वाच परत म्हणजे काय कमी आहे हे तुझे तुलाच कळेल आणि पुढच्या वेळी तुला या गोष्टिची नक्कि मदत होइल पुढच्या कथेची वाट बघतोय आम्ही सगळे
|
Yashwant
| |
| Tuesday, June 12, 2007 - 9:50 am: |
|
|
पूनम कथा टचीन्ग आहे. आनखीन लिही.
|
पूनम कथा ठिक आहे. It was going good. पण मास्तुरेंनी घोळ घातला. एवढे सगळे अभिप्राय वाचून, आता मास्तुरेंनी लिहिलेली कथा वाचायची उत्सुकता वाटायला लागली आहे. Let's see How he writes?
|
Psg
| |
| Thursday, June 14, 2007 - 7:29 am: |
|
|
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. कथेतून 'परावलंबी वृद्धांची मन:स्थिती' दाखवायचा प्रयत्न केला होता.. पण ते इतकं प्रभावीपणे जमले नाही हे माझे अपयश. वेगळ्याच प्रश्नांवर चर्चा झाली! असो. मला सुधारणेस पुष्कळ वाव आहे.. तुमच्या शुभेच्छांच्या पाठींब्यावर प्रयत्न करीन. पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद.
|
|
|