Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अनोळखी तपस्वी

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » अनोळखी तपस्वी « Previous Next »

Devdattag
Tuesday, May 22, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनोळखी तपस्वी
गेल्या चार दिवसापासून पद्मनाभ सतत चालत होता. चार दिवसांपूर्वी त्याने पाहिलेल्या स्वप्नाने त्याला पूर्णपणे चक्रावून सोडले होते.
अष्टमीच्या रात्री देवळातली आरती आटपून पद्मनाभ त्याच्या घरी आला. हातपाय धूवून आणि देवाला नमस्कार करून तो जेवायला बसला. तो येताच सरस्वतीने पानं वाढायला घेतली होती. त्याच्या आवाडीची म्हणून तीने जेवणात आज खास खीर केली होती. खीरीचे भांडे जवळ जवळ पूर्ण रिकामे करून तो झोपायला गेला. दिवसभरात घडलेल्या घटना आठवत आणि खिडकीतून दिसणार्‍या अष्टमीच्या चंद्राकडे बघत त्याचा कधी डोळा लागला कळलंही नाही.
"आज फार लौकर झोप लागली नाही", सरस्वती सतरंजीवर बसत म्हणाली."दहा दिवसापासून म्हणत होते खीर कर म्हणून पण घरात साखर नसल्याने योग काही येत नव्हता. काल कोण्या भाविकाने देवळात प्रसाद म्हणून साखर वाटली होती, ती घेऊन आले तेंव्हा कुठे आज खीरीचे जमले. पण हे मात्र खीर न खाताच झोपले. आता ह्यांनी नाही खाल्ली म्हंटल्यावर आपण सुद्धा कशी खावी? जाऊ देत, झोपावं झालं. तसंही उद्या सकाळी उठून यांच्या बरोबर पश्चिमेला जायचंय. यांच्या स्वागताची फार जंगी तयारी चालु आहे असं ऐकलंय." देवाचे नामस्मरण करत जरा वेळानं सरस्वतीही झोपेच्या अधीन झाली.
-------------------------------------------
कसल्याश्या आवाजाने पद्मनाभला जाग आली तेंव्हा सूर्य चांगलाच वर आला होता. त्याने आजूबाजूला पाहिलं सरस्वती स्वयंपाक घरात काही करत असल्याची जाणीव त्याला झाली.ठोद्या वेळाने उठू असा विचार करून तो तसाच जागेवर पडून राहिला. अचानक त्याला रात्रीचा घटनाक्रम आठवला आणि तो चपापला. "ते स्वप्नच असावं, हो स्वप्नंच, हे खरं असंणच शक्य नाही. नाही तर आपण खीर खाऊनही सरस्वती असं का म्हणाली की मी खीर खाल्ली नाही म्हणून?"."सरस्वती म्हणाली???, नाही!!! कसं शक्य आहे??? मुकी सरस्वती बोलूच कसं शकते?". पद्मनाभच्या सर्वांगातून वीज चमकून गेली. घाबरलेला पद्मनाभ धावत स्वयंपाक घरात गेला, तेंव्हा खीरीचे तुडूंब भरलेलं पातेलं चुलीवर ठेवलेलं त्याला दिसलं. आणि त्याच्या समोर फुंकणीने चुलीची ज्योत वाढवत असलेली सरस्वतीही.
क्रमश:



Sahi
Tuesday, May 22, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त सुरुवात ज़ाली आहे....लवकर पुढचा भाग येवु दे

how to write za? za zablyatla?

Marathi_manoos
Tuesday, May 22, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jhaa झा .......asa lihi hya pudhe

Meenu
Wednesday, May 23, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा देवा interesting start .. पण इतके छोटे छोटे भाग नको टाकुस .. थोडे मोठे टाक ..

Devdattag
Wednesday, May 23, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आज जेवणात खीर केलीये", सरस्वती खुणेनेच म्हणाली. गेल्या ५ वर्शांच्या संसारात सरस्वतीची खुणेची भाषाच पद्मनाभला जवळची वाटू लागली होती. "अगं पण काल रात्रीच्या जेवणातही खीरच होती ना? मग आज परत खीर?". सरस्वतीच्या चेहर्‍यावरच आशचर्य साफ दिसत होतं. सरस्वतीने त्याला आठवण करून दिली की, गेले दोन आठवडे ती माहेरी गेली होती आणि काल रात्री उशीराच ती परत आपल्या घरी आली होती. हे सगळंच काहिसं विचित्र आणि गोंधळात टाकणारं होतं. पद्मनाभ जरा वेळ शांत बसला. या क्षणी आपण जागेच आहोत याची खात्री त्याने करून घेतली. सरस्वतीच्या गोंधळलेल्या चेहर्‍याकडे पाहून त्याने तिला घडलेली(?) सर्व हकीकत कथन केली. सरस्वतीने नीट सगळी गोष्ट ऐकून घेतली आणि त्याला यावर जास्त विचार न करण्याचा सल्ला दिला. पद्मनाभही अतिथकव्यामुळेच आपल्याला असे काहिसे भास झाले असतिल असा विचार करून आपल्या कामाला लागला.
उशीरा उठला असल्याकारणाने प्रात्यान्हाची कामे उरकायला आज मध्यान्ह उलटून गेली होती. त्यामुळे त्यादिवशी जरा लगबगीनेच तो देवळाकडे जायला निघाला. गावात एक प्रकारचा उत्साह त्याला दिसत होता. बहुदा कुठल्यातरी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. पद्मनाभच्या मनात कुतुहल चाळवलं गेलं. त्याने बाजूने जाणार्‍या एका माणसाला थांबवून विचारले," माफ करा, पण आज गावात काही विशेश घटना घडलीये का? हा उत्सव कसला? आज तर कुठलाच सण नाही."
"घ्या पंत, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? अहो आज पूर्वेकडून एक मोठे ऋषी गावात आले आहेत. ऋषीवर्य भद्राचार्य, ऋषी पत्नीही आहेत सोबतीला."
भद्राचार्यांची किर्ती खरंतर फार दूरवर पसरली होती. वेदांचा गाढा अभ्यास आणि ज्योतिष विद्येतील त्यांचे पारंगत्व जगजाहीर होते. आज त्यांचे गावात आगमन होणार आहे ही बातमी आपल्यापर्यंत कशी पोहोचली नाही याचे पद्मनाभला राहून राहून आश्चर्य वाटत होते. स्वत:शीच विचार करत पद्मनाभ देवळाच्या दिशेने चालु लागला.
"गुरूजी, गुरूजी, अहो पंत" मागून कोणीतरी आपल्याला हाक मारतंय असं वाटल्याने पद्मनाभने मागे वळून पाहिले. मागून गावातलाच एक माणूस त्याच्या दिशेने धावत येत असल्याचे त्याला दिसले.
"गुरूजी, तुम्हाला ऋषीवर्यांनी बोलावलय."
"काय? मला? मला ऋषीवर्यांनी बोलावलय???"
"होय, ते म्हणाले शंकराच्या देवळातल्या पुजारींना बोलावून आणा म्हणून."
"ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे, मी देवळात दिवा लावून आलोच." पद्मनाभचा निरोप घेऊन तो माणूस लगेच माघारी वळला.
पद्मनाभ मंदिरात गेला. मंदीराचा गाभारा साफ करून त्याने समई लावली आणि पिंडीला मनोभावे नमस्कार करून तो ऋषीवर्यांच्या दर्शनाला गेला.
"ये पद्मनाभा, बस" भद्राचार्यांनी पद्मनाभाचे हसतमुखाने स्वागत केले. पद्मनाभ बाजूच्या चौरंगावर बसला. "खीर खाऊन झाली तुझी?"झाली असेल तर तेवढी बाजूला ठेवलेली वाटीभर साखर सरस्वतीला देऊन येतोस का? बिचारी वाट पाहतेय रे तुझी". पद्मनाभ हे ऐकताच काही न बोलता सरळ उठला आणि ऋषीवर्यांना नमस्कार करून ती वाटी हातात घेत तडक घराच्या दिशेने चालु लागला. एक क्षणही त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला नाही की आपल्याविषयी भद्राचार्यांना एवढे कसे ठाऊक. घरी जातांनाही त्याच्या मनात ती साखरेची वाटी आणि सरस्वती यांच्या व्यतिरिक्त अजून कुठलाही विचार नव्हता.


Zakasrao
Thursday, May 24, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता इंटरेस्टिंग. जरा भरभर टाकत रहा.

Kmayuresh2002
Thursday, May 24, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा,अरे वा तू कथा लिहितोयस.. सहीच..

सुरूवात छान झालीये रे.. पण सलग लिहीत जा रे


Sneha21
Friday, May 25, 2007 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त, कथा एक्दम वेगली आनि छान आहे

Manogat
Friday, May 25, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव्दत्त,
सुरेख कथा आहे. पुढच्या भगाची अतुरता वटत आहे....लवकर लवकर posting करा....


Devdattag
Monday, May 28, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का, कोण जाणे पण आजची संध्याकाळ पद्मनाभला बरीच शांत आणि मनातलं काहूर दूर करणारी वाटत होती. मावळतीचं आजचं रूप कुणा योग्याच्या चर्येप्रमाणे भासत होतं. दूरवर पसरलेल्या दोंगररांगा, आपापल्या घरट्याकडे परतणारे ते पक्षी, ते निरभ्र आकाश आणि डोंगराच्या पाठीमागून येणारी ती केशरी प्रभा. त्या तांबूस केशरी प्रकाशात पद्मनाभाची थकलेली पण करारी मुद्रा त्याला एका विलक्षण अनुभवाची प्रचिती घडल्याची जाणीव करून देत होती.
आज चार दिवसांनंतर पद्मनाभाने विसावा घेतला होता. आपण गेले चार दिवस सतत चालत होतो, याची जाणीव त्याला आत्ता झाली. आपण ऋषीवर्यांच्या आश्रमातून निघालो खरे सरस्वतीला साखर द्यायला, पण चार दिवस होउनही आपण घरी पोहचलो नाही आहोत. हे काय चाललय, आपण सध्या कुठे आहोत ह्याची माहिती करून घ्यायलाच हवी, नाहितर जे घडतंय त्याचा विचार करून करून आपल्यावर वेड लागायची पाळी येइल.
आपल्याला इथे कोणी मदत करू शकेल का हे जाणून घेण्यासाठी पद्मनाभाने आजूबाजूला पाहिले. गेले चार दिवस आपण भ्रमितासारखे चालतोय,आपल्याला स्थलकालाचे भानही उरलं नव्हतं याचं पद्मनाभाला वैषम्य वाटलं. तो एका लांबवर पसरलेल्या मैदानावर उभा होता, आसपास त्याला लोकांची वस्तीही दिसत नव्हती. नाही म्हणायला उत्तरेच्या दिशेला दूरवर थोडा प्रकाश दिसत होता खरा, पण तिथपर्यंत चालण्याची शक्ती मात्र पद्मनाभामध्ये नव्हती. त्यामुळे त्या रात्री तिथे जवळच असलेल्या एका आम्रवृक्षाचा आसरा घेण्याचे त्याने ठरवले. त्याच झाडावरचे काही आंबे खाउन पद्मनाभाने आपली भूक शमवली. आणि त्याच झाडाच्या बुंध्याशी तो आडवा झाला. हातात असलेली साखरेची वाटी, नजरेसमोर ठेउन तो विचार करू लागला,"या साखरेचा आणि घडणार्‍या घटनांचा काही संबंध तर नसेल?", त्या रात्री पाहिलेल्या स्वप्नात सरस्वतीही साखरेचाच उल्लेख करत होती. आपण सरस्वती कडे खरेतर खीरीचा आग्रहही केला नव्ह्ता. मग हा साखरेचा प्रसाद? साखर, खीर आणि आपलं हे असं भ्रमितासारखं फिरणं, याचा निश्चित काहीतरी संबंध आहे."
क्रमश:


Devdattag
Monday, May 28, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या release मध्ये गुंतलो असल्याने पोस्टणे जमत नाही. जसा वेळ मिळेल तसा पोस्टेनच..

Mankya
Tuesday, May 29, 2007 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा ... एकदम अलग विषय ! मस्तच !

माणिक !


Kmayuresh2002
Tuesday, May 29, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा,ठिक आहे रे.. पण खूप वेळ लावु नकोस.. लिंक तुटत जाते नाहीतर

Dhoomshaan
Wednesday, May 30, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, एकदम interesting दिसतेय.........
देवदत्ता, we can understand your problem!
But try it faster...

Devdattag
Wednesday, June 06, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अहाहा, काय गुलाबी हवा आहे", पद्मनाभ स्वत:शीच म्हणला. पहाटेच्या दवाने मैदानभर पसरलेल्या गवताला तरतरी आली होती. सुर्याची कोवळी किरणं त्या दवावर पडल्याने ते लोलकासारखे चमकत होते. दूर क्षितिजावर उगवतीचं रूप अगदी नव विवाहीतेसारखं मनोहारी दिसत होतं. ते भाळी केशरी बिंब, बगळ्यांचा तो पांढरा शुभ्र गजरा आणि ती गालावरची लालीमा आणि धरेने पांघरलेला हिरवा गर्द शालू. अहाहा.
"चला, आता निघायला हवं," पद्मनाभ.
पद्मनाभने सुर्याला नमस्कार केला आणि आपली झोळी आणि ती साखरेची वाटी उचलून तो उत्तरेकदे चालु लागला. चालता चालता त्याला एक गुराखी आपल्या शेळ्यांना चरण्यास निघालेला दिसला. पद्मनाभला त्या शेळ्यांच विलक्षण कौतुक वाटलं. गुराखी चालला होता आपल्याच नादात, त्याच्या हातात ना काठी ना काही दुसरी वस्तू जी शेळ्यांना वाट दाखवेल. त्याच्या पाठोपाठ ह्या सगळ्या शेळ्या एका रांगेत चाललेल्या. पण एक शेळी मात्र घाबरल्यासारखी सतत त्या गुराख्याच्या मागे पुढे करत होती. गुराख्याच्या नजरेत मात्र त्या शेळीविषयी फार कौतुक जाणवले. पद्मनाभने त्या गुराख्याकडून आपल्यालाअ काही मदत मिळते का हे पहाण्यासाठी त्या गुराख्याला हाक मारली.
"गुराखीबाबा, गुराखीबाबा,थांबता का जरा?". पद्मनाभची हाक ऐकताच गुराखी थांअबला. पद्मनाभ गुराख्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलु लागला."गुराखीबाबा, मी पद्मनाभ. ब्रम्हनगराहून आलोय. तिथल्या शीव मंदीराचा मी पुजारी. रस्ता चुकलोय. तुम्ही मला काही मदत करू शकता का? हे दूरवर दिसतंय ते गाव कुठलं? ब्रम्हनगराकडे जायचा रस्ता कुठला?".
गुराख्याने थोड्या विचित्र नजरेनेच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला," भल्या माणसा, फार लांबून आअलेला दिसतोस. ब्रम्ह नगर नावाचे गाव ह्या पंच्क्रोशीत तरी नाही. ते गाअव दिसतंय ना, ते विशालनगर. बघ त्या गावात जाउन तुला काही मदत मिळते का ते."
"धन्यवाद" पद्मनाभ म्हणाला. "गुराखीबाबाअ एक विचारु जर राग येणार नसेल तर?"
"विचार की, मला कसला राग येतोय"
"नाही, मी मगासपासून तुमच्या शेळ्यांकडे पहात होतो. या सगळ्या निमूटपणे तुमच्या मागे येताहेत तुमच्या मागे आणिही घाबरट शेळी तुमच्या मागेपुढे करतेय सतत आणि तरी तुमच्या नजरेत तिच्याबद्दल कौतुक दिसतंय.ते का?"
गुराखी हसला आणि म्हणाला," फार बारीक निरीक्षण करतोस. तुझं निरक्षण काही अंशी थीक आहे पण बरचसं चुकीचं आहे. या सगळ्या शेळ्या माझ्यामागे नाही मी त्यांच्या पुढे चाललो आहे आणि ही शेळी भित्री नाही तर सर्वात शूर आहे." एवढं बोलून गुराख्याने पद्मनाभाच्या हातातल्या वाटीतील चिमुटभर साखर उचलली आणि पद्मनाभकदे ओळखीचे स्मित करून पुढे चालू लागला.
क्रमश:





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators