|
Arch
| |
| Monday, May 21, 2007 - 5:10 pm: |
|
|
छान ग supermom . स्वातीशी सहमत. मला वाटत अर्चना जोगळेकर सई परांजपे आणि अरुण जोगळेकरची मुलगी
|
Sashal
| |
| Monday, May 21, 2007 - 5:18 pm: |
|
|
सुमॉ, छान लिहिलीये गोष्ट .. आर्च, सई परांजपे आणि अरुण जोगळेकरची मुलगी विनी परांजपे .. अर्चना जोगळेकर नाहि ..
|
सुमॉ छान लिहीलय. ..
|
Saee
| |
| Tuesday, May 22, 2007 - 11:32 am: |
|
|
छान लिहीली आहेस गोष्ट. मला योगिनी जोगळेकर आणि ज्योत्स्ना देवधरांच्या कथा आठवल्या. शाळेत असताना वाचलेल्या.
|
Supermom
| |
| Tuesday, May 22, 2007 - 11:53 am: |
|
|
सगळ्या मित्रमैत्रिणींचे आभार. अंगठीचे काय झाले, ती सापडली असेल किंवा नसेलही. पण ते या कथेत मला महत्वाचे वाटले नाही. आयुष्यात कित्येकदा ऐकीव अथवा प्रत्यक्ष दिसलेल्या गोष्टी खर्याच असतात असे नाही. पण त्यावरून बरेचदा जीवघेणे गैरसमज होतात. अन मनू म्हणते तसे परस्परांशी न बोलताच संबंध तुटतात. नाती दुरावतात. खरेतर समोरासमोर बसून, बोलून, गैरसमज दूर करणे हा उत्तम उपाय. पण तसे न करता कुढत राहून,मनात झुरत राहून लोक परिस्थिती आणखीच स्फ़ोटक बनवतात.
|
Bhagya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 11:54 pm: |
|
|
अगदी खरे. सुंदर गोष्ट लिहिलयस sm . बरेचदा आपल्याला दुसर्याची खरी भावना, खरी परिस्थिती माहिती नसते आणि लोक न बोलताच दुरावतात.
|
Maasture
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:20 am: |
|
|
थोडासा भाबडेपणा जाणवला तरी कथा एकंदर चांगली जमली आहे. मनाला बरं वाटलं वाचून. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. दिनेशभौ, राग मानू नका. पण तुम्हाला इतरांच्या चांगल्या लिखाणाला प्रतिक्रिया देतांनही दर वेळेला मला किती माहिती अशी एक टिमकी वाजवायचा मोह होतो ते ठीक आहे, पण त्यासाठी ओढुनताणून कुठलीतरी असंबद्ध माहिती दिली तर त्यामुळे मूळ लेखनात रस असलेल्यांचा रसभंग होऊ शकतो. इथेही रांगांची माहीती, नट्यांची माहीती ईत्यादि अस्थानी वाटल.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:30 pm: |
|
|
प्राध्यापक महाशय, मनापासुन माफी मागतो. शक्यतो अनोळखी लोकांच्या लिखाणावर मी प्रतिक्रिया देतच नाही. या कथेशी साम्य असलेल्या एका कथेचा उल्लेख केला. त्यातल्या अभिनेत्रीचे नाव पण तेच होते हा योगायोग सांगितला आणि पारंपारिक ठुमरीत, हे नाते कसे रंगवले आहे तेच लिहिले. यात काही असंबद्ध असले तर सुपरमॉमने लिहिले असतेच. असो. माझी प्रतिक्रिया लेखन संपल्यावरच दिलेली होती. त्यामूळे रसभंग कसा काय होवु शकतो ? आपण खरोखरच प्राध्यापक असाल, आणि खरोखरच असाल, असे गृहित धरलेय. ( एरवी अश्या बुरख्या आडच्या आयडीजच्या नादी मी लागत नाही. ) आणि अगा जे मूळातच नाही, त्याची टिमकी मला कशी वाजवता येईल ?
|
Mansmi18
| |
| Monday, June 04, 2007 - 9:25 pm: |
|
|
सुपरमॉम, अभिनन्दन. एक छान कथा लिहिल्याबद्दल. माझ्या डोळ्यासमोर सुलोचना, जयश्री गडकर, चन्द्रकान्त गोखले इ असलेला कृष्णधवल काळातला चित्रपट उभा राहिला. मला साहित्यिक मूल्यमापन वगैरे प्रकारात फ़ारशी गती नाही पण तुमची कथा एक चांगली कथा या सदरात मोडते असे वाटले. तुमची दुसरी कथा पूर्ण व्हायची वाट पाहत आहे.
|
Jayavi
| |
| Tuesday, June 05, 2007 - 3:14 pm: |
|
|
सुमॉ.........खूप खूप आवडली गं.....नात्याची गुंफ़ण अतिशय सुरेख गुंफ़तेस तू
|
Ladaki
| |
| Saturday, June 16, 2007 - 12:00 pm: |
|
|
सुमॉ कथा खुपच छान आहे प्रत्येक पात्राच स्वभाव आणि त्यांच्यात असलेले नाते अगदी सहज शब्दात रेखाटले आहे तुम्ही...
|
|
|