|
स्थळ- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, मूलांचे वसतीगृह, F Block रूम नंबर २०४ समोर जेमतेम अडीच फूट रुंदीची कित्येक पावसाळे सोसलेली GALARY , मागे जंगली महाराज रोड...भरधाव..., शिवाजीनगर, पूणे-५. काळ- सरत चाललेला क्षणाक्षणाला. वेळ- दुपार आणि संध्याकाळ ह्यांच्या सीमेवर रेंगाळलेली... वार,तारीख आजपासून साधारण एक वर्ष रिवाइंड आयुष्याची टेप... ...एक कुठलंस गाणं प्रशांत श्वासांसारखं संपूर्ण GALARY मध्ये पसरलेलं... हा आवाज किशोरचाच ना? हो किशोरचाच. मग एक अनपेक्षित थरथर काळीजभर स्वरांच्या पावलांनी वाजू लागते.मी जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐकू लागतो. 'चलते चलते मैरे ये गीत...' हं:! समजलं हं... हे असं कुठल्याही वेळेला 'सेन्टी' वगैरे होणं ह्या दगडी इमारतींना नवीन नाहीच. मी स्वत:लाच समजावतो.पण ही वेळ देखील 'कुठलीही वेळ' आहे का? नाही. हे गाणं,ही वेळ,ही नि:स्तब्ध GALARY , ह्या होस्टेलच्या इमारती, कित्येक पिढ्यांचे ठसे उमटलेली ही मैदानं... ह्या क्षणी हे सगळं नुसतं शब्दांसारखं शब्दांपुरतं उरलं नाहीये... पानापानांच्या सावल्या एकमेकांत बेमालूमपणे मिसळून जाव्यात आणि जमीनीवर झिरपत राहाव्यात नितांत... इतक्या सहजतेने ह्या सार्या गोष्टी आज माझ्या आयुष्याचा एक भाग बनून गेल्यात! का आणि कशासाठी? असा कोणत्या स्पर्शाचा हात फिरलेला असतो ह्या सगळ्या वास्तूंवर की अवघ्या जन्माची गुंतवणूक व्हावी इथल्या प्रत्येक कणाकणावर? इतक्या सहजासहजी मांडता येत नाही हे शब्दात... इथं जगलेलं सगळं पुन्हा आता डोळ्यांसमोर रिवाइंड होऊ पाहतंय. ऐडमिशन राऊंड, college ,प्रिन्सीपल एड्रेस, डिपार्टमेंट,पहिलं लेक्चर,ओळख,रूम,पार्टनर,परासाईट,तडजोडी, gathering,variety जल्लोष, प्रॅक्टीकल्स,सबमिशन, PL मधल्या डोळे तारवटलेल्या रात्री, एक्झाम्स,रिझल्ट,स्कोर, Backlog ... आणि ह्या सगळ्या अवजड बेधुंद धांदलीत कधीतरी दिसलेले तिचे डोळे...मग 'यमकं जुळविलेल्या' कविता वगैरे... पाठोपाठ डायरीत उतरलेली मोरपंखी मौनार्त शब्दकळा... गेल्या चार वर्षांचा हा मुक्काम... संपूर्ण चार तरी कुठे? तीन वर्षे सात महिने झालीत साधारण.उरलेत कसेबसे पन्नास दिवस फक्त. तेही सरले की आणखी एक सिमोल्लंघन माझ्या खात्यात जमा. एक पाऊल पुढे. पुढे म्हणजे कुठे?इथून पुढं हे नक्की पण नेमकं कुठल्या वळणावर?? नोकरी,नव्या जागा,नवी माणसं,नवे शिष्टाचार...सगळं काही चकचकीत काचेसारखं लख्ख आणि करिअरच्या नावाने काचेवर फासलेला बाजारू रंगाचा पारा... आपली प्रोफेशनल प्रतिबिंबं मग रोजचीच पुन्हा पुन्हा संसर्गजन्य ग्लोबलाईझ्ड...तेच तेच रूटीनबद्ध जगण्याचं रोटेशन अपरिहार्य. स्वत:लाच मागे वळून पाहण्याची आपली जन्मजात खोड अशीच वाढत जाणार. हात उंचावून स्वत्:चाच निरोप घेणं हा प्रकार जगात सगळ्यात जास्त भयानक सेन्टी! आणि आठवणींना सावल्यांची प्रतिमा द्यायला भाग पाडणारं एकटेपण आपल्या अस्तित्वाला चिकटत जाणारं अधिकाधिक चिवटपणे. वर्तमानाचा कितीही ध्यास घेतला तरीही भूतकाळ आपल्या खांद्यावर हात ठेवून चालतच असतो अथकपणे... कदाचित म्हणून जगण्याला अर्थ आहे... ........... ........... ........... आता सगळं मनात फुटलेलं आभाळ लिहून काढलंच पाहिजे... मी विचार करु लागतो न लागतो तोच सागर्याचा ( रूम पार्टनर ) हात मागून खांद्यावर पडला. 'लंक्या... चल बे अण्णाच्या टपरीवर मस्त चहा मारून येऊ कटींग. आलो की परवाच्या युनिक्स ओरल साठीची बोंबाबोंब चालू च्यायला! म्हणून पाताळेश्वर आणि दगडू शेठ ला पण सलाम करून आलं पाहिजे न चुकता! चल.. लवकर' मी तरीही माझ्याच तंद्रीत बुडालेलो... 'अरे भौ.. चल ना... असली किशोर-स्टाईल गाणी ऐकून तुला कोणत्या कविता होणार आहेत आता? हा साला घंट्यापण बीई ला आल्यापासून नेमका टेन्शन च्या दिवसात सेन्टी गाणी लावतो...' मी जरासा भानावर आलो. मलाही टेन्शन आलंच, म्हटलं, 'चहा पिलाच पाहिजे आता!' आणि काही क्षणापूर्वी GALARY च्या कठड्यावर हात ठेऊन उभ्या असलेल्या मलाच निरोप देऊन मी निघालो, अटळ जाणीवेंची समजूत घालून...किशोरचं तेच गाणं ओठांवर रेंगाळतं ठेऊन...
|
Sakhi_d
| |
| Thursday, April 26, 2007 - 10:42 am: |
| 
|
मयुर.... सहीच.. मस्त. काल पासुन मीही रिवाइंड स्टेज मधेच आहे...
|
Imtushar
| |
| Thursday, April 26, 2007 - 12:39 pm: |
| 
|
मयूर, माझाही रीवाईंड झाला रे.... 'चलते चलते मैरे ये गीत...' दर वर्षी variety ला खास बी ई च्या batch साठी हे गाणे व्हायचे (अजूनही होते का?) -तुषार
|
Amitv
| |
| Thursday, April 26, 2007 - 2:42 pm: |
| 
|
rewind .. sahich.. majha H/I/C/J cha prawas aathavala..
|
Daad
| |
| Thursday, April 26, 2007 - 10:08 pm: |
| 
|
अहा, मस्तच रे मयूर..... सगळाच rewind आवडला. आपण rewind करतो म्हणजे उगीच वाटत होतं की तो काळ आपण पुन्हा जगतो की काय? पण तुझा विचार एकदम tangent आहे.... हा आपल्यापरीने "त्या आपल्यालाच" दिलेला निरोप!! ह! वेगळाच आणि चपखलही! "ऐडमिशन राऊंड, college gathering,variety PL Backlog ... आणि ह्या सगळ्या अवजड बेधुंद धांदलीत कधीतरी दिसलेले तिचे डोळे...मग 'यमकं जुळविलेल्या' कविता वगैरे... पाठोपाठ डायरीत उतरलेली मोरपंखी मौनार्त शब्दकळा... " यातला शब्दन शब्द perfect .... सलाम, बाबा! (जियो)
|
Sas
| |
| Friday, April 27, 2007 - 1:19 am: |
| 
|
मयुर सही सही सही!!!
|
Bsk
| |
| Friday, April 27, 2007 - 6:24 am: |
| 
|
खुप छान! सगळं ईंजिनिअरींग आठवलं!! मस्त लिहीलय...
|
Sneha21
| |
| Friday, April 27, 2007 - 8:20 am: |
| 
|
कथा छान आहे ........पुढिल लेखनासाठी शुभेछा
|
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद... Snehaa ही कथा नाहीये पण..ललित लेख आहे...पण कथेसारखा वाटला असेल तरी हरकत नाही -मयूर.
|
Hems
| |
| Friday, April 27, 2007 - 3:40 pm: |
| 
|
वा मयूर, छान लिहिलयस ! वर्णनशैली खास आहे...खूप आवडला हा लेख !
|
Manogat
| |
| Wednesday, May 02, 2007 - 9:42 am: |
| 
|
मयुर, छान अगदि ह्रिदयाला भिडल, सगळ्या hostel च्या आठवणि तुझ्या लेखा मार्फ़त दोळ्या पुढुन गेल्या..मी पण काहि क्षण हरवले होते त्यात. मुख्य म्हण्जे सग्ळ्या होस्टेल च्या आठवनिंनच्या सोबत किशोर ही सगळिकडेच असतो
|
|
|