Chaffa
| |
| Tuesday, April 24, 2007 - 8:01 pm: |
|
|
थोडा आचरट प्रयत्न पण समजुन घ्याल ही आपेक्षा. ********* आत्ता लिहीत असताना चौथ्यांदा रशिद ईथे डोकावुन गेला, यार हा म्हणजे एक वैतागच आहे स्वत काही करणार नाही आणी मी काही करत असलो तर दहावेळा तिथे डोकावेल मी कधी कधी त्याच्यावर भडकतो ते उगिच नाही! पण काय करणार त्याची नव्या गोष्टी शिकायची तयारी आजिबात नसते आर्थात यात त्याचा काहीच दोष नाही म्हणा ती घटनाच अशी होती की बरेचजण आजुनही तो विषय काढला की शहारतात पण एकंदरित ईतके घाबरुन तर कोणीच रहात नाही पुन्हा सगळे मौजमजेत गर्क होवून जातात पण हा आजिबात नाही. आता त्या दिवशीचीच गोष्ट घ्या ना! आम्ही सगळे तिकडे एस्सेलवर्ल्डमधे मजा करत होतो तर हा तिकडे एका कोपर्यात एकटाच खुळ्यासारखा उभा. आता याच्यासारखे शांततेच्या शोधात असलेले काही कमीजण नाहीयेत आमच्या टोळक्यात पण वेळेनुसार सगळेच आपला गंभिरपणा सोडून देतात आणी आमच्या दंगामस्तीत मिसळून जातात. रशिद मात्र कधिच नाही हां पण चिडला की मात्र काय करेल याचा भरवसा नाही मग सगळ्यांनाच त्याच्यापासुन सांभाळून रहावे लागते पण बाकीवेळेस मात्र स्वारी एकदम गप्प कदाचित खेड्यातुन आल्यामुळे असेल पण नविन काही करायचे म्हंटले की याची तयारी बिलकुल नसते.सगळे मिळुन सिनेमाला जायचं रशिद येतो का रे? नाही, आज मुड चांगला आहे कुठेतरी बारमधे जाउ येतोस का? नको! अश्यावेळी हाच नको असे वाटायला लागते पण काय करणार याला टाळता येणे तर शक्य नाही ना! मग चालवुन घ्यायचं झालं. पण नविन काही शिकायचं म्हणजे याचा आळस ओसंडून वहातो आता याचं ईंग्रजी एकदम नाही च्या बरोबर ( त्याच्या न के बराबर चे स्वैर मराठी भाषांतर ) म्हणुन याला म्हणालो चल कुठल्यातरी चांगल्या ईंग्रजिच्या क्लासला जाउयात तर याचे ठोकळेबाज उत्तर ठरलेलं यार अभी क्या करनेका सिखकर? आता आम्ही ईतकेजण आहोत त्यात यालाच एकट्याला ईंग्रजी येत नाही हे बरं दिसतं का पण नाही म्हणजे नाही. बरं बाबा तिकडे मस्त वाचनालय आहे तिकडे जाउया का? जरा वेळ बरा जाईल. तर मै नही आता तुम्हे जाना है तो जाओ म्हणणार आणी बघाव तर माझ्या मागे तिथेही हजेरी लावणारच पण वाचणार नाही तर कुठल्यातरी कपाटा आड भिजलेल्या मांजरीसारखा उभा रहाणार. सायबर कॅफ़ेतही हाच प्रकार मी कंप्युटरवर बसलेला असलो कि सारखा डोकावत रहाणार पण कधी जरावेळ प्रयत्न करुन पाहील असे कधिच नाही त्याचा स्वभावच नाही तो. आपण नव्या गोष्टी नेहमीच शिकत रहातो. आज माझे ईंग्रजी चांगले आहे,रोज नव्या वेबसाईटना मी भेट देत असतो, चांगले चांगले काहीतरी वाचत असतो एकदम एन्जॉय करत असतो. यार ते एकाकीपणं आपल्याला नाही आवडत.झाल्या गोष्टीसाठी कुढत बसणे आपल्याला कधीच जमायचे नाही आता पहा ना! रशिदबरोबर त्या ९३ सालच्या बॉम्बस्फ़ोटात मी ही मेलोच की पण आत्ताही ईथे लिहितोयच ना?
|
Sakhi_d
| |
| Wednesday, April 25, 2007 - 3:25 am: |
|
|
चाफ़ा.... माणसाने किती आचरटपणा करावा??....
|
थोडा आचरट प्रयत्न पण समजुन घ्याल ही आपेक्षा. हा थोडा अचरटपणा होय रे?
|
चाफ़्या... उजवल्यापसून तू इब्लिसपणावर कमी आणि गुलमोहोर वर जास्त दिसत आहेस क्या बात है? आणि आचरटपणा तर जबरदस्त आहेच...
|
Srk
| |
| Wednesday, April 25, 2007 - 9:18 am: |
|
|
चाफ़्फ़्या काय हे! अजुन मुक्ती मिळाली नाही?
|
Ultima
| |
| Wednesday, April 25, 2007 - 2:47 pm: |
|
|
चाफ़्या...किती रे तु आचरट!!... तुझा हा आचरट पणा पाहुन माझा "मेंटल ब्लाॅक" आलाय. आणि मी "निश्चल" झालेय. आता बहुतेक सगळ्याच लाईन्स सिल्वर होणार.
|
Disha013
| |
| Wednesday, April 25, 2007 - 7:26 pm: |
|
|
भयकथा सुरु केल्यात, आता आचरटकथा का?
|
Chaffa
| |
| Wednesday, April 25, 2007 - 7:42 pm: |
|
|
हो जाता जाता काहीतरी नविन नको का?
|
Disha013
| |
| Wednesday, April 25, 2007 - 10:21 pm: |
|
|
पण कथा बेस हं! यापेक्षा भारी कोण लिहुच शकणार नाही..
|
Kashi
| |
| Thursday, April 26, 2007 - 5:40 am: |
|
|
हो जाता जाता काहीतरी नविन नको का?..........कुठे चालला आहेस रे बाबा???? ए.भा.प्र.
|
Saee
| |
| Friday, April 27, 2007 - 7:44 am: |
|
|
चाफ़ा, जरा चुकलं.. गेल्यावर काहीतरी नविन नको का, असं म्हणायला पाहिजेस तु
|
Zakasrao
| |
| Sunday, April 29, 2007 - 4:38 am: |
|
|
हो जाता जाता काहीतरी नविन नको का>>>>>>>> चाफ़्फ़्या काय हे! अजुन मुक्ती मिळाली नाही>>>>>> म्हणजे तुला मुक्ती मिळणार तर. फ़क्त जायच्या आधी सर्वाना सांगायला आलास काय? आचरटपणा सोड आता.
|
Chaffa
| |
| Sunday, April 29, 2007 - 10:10 am: |
|
|
अरे, हो!हो! दोस्त कंपनी मी आचरटपणा सोडला तर मी जगणार कसा????
|