|
Srk
| |
| Wednesday, April 18, 2007 - 11:16 am: |
| 
|
सत्य घटनेवर आधारीत सिल्वर लाईन आणि आज अचानक तो मला दिसला. हे कधीतरी होणारच होतं. मला अगदी जवळुन ओळखणार्या माझ्या मैत्रिणीनं तो आल्याचं मला बर्याच दिवसांपूर्वी सांगितलं, तेव्हा मी जरा दचकलेच होते. तो इतक्यातच येईल असं कधी वाटलंच नाही. पण तिनं आधी सांगितल्यानं तशी मी सावरले होते. त्यामुळे त्याला पाहुन धक्का वगैरे बसला नाही. पण मनात विचारांच एक वादळ रोरावत आलं. आजवरच सगळं आयुष्य काही क्षणात फ्लॅशबॅक होउन गेलं. पण पुढच्या क्षणीच वर्तमानाची जाणिव झाली.खरं म्हणजे, तो आहे हे माहिती असल्यानं नजर नेहमीच त्याला शोधत राही. इतरांपेक्षा तो फार वेगळा नव्हताच. त्यामुळे तो नजरेत येणं जरा कठीणच होतं.पण आज मी त्याला नीट बघत होते, इतक्या जवळुन पहील्यांदाच! मला फारसा नाही आवडला तो. खरं तर रंग सोडला तर त्याच्यात न आवडण्यासारखं काहीच नव्हतं. पण स्वतचाच 'पांढरा केस’ कशाला कुणाला आवडेल?
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 18, 2007 - 11:23 am: |
| 
|
हि हि ही ही. मान गये उस्ताद. खुप कॉन्शस होवुन वाचत होतो. एक भो. प्र. इतक्या लहान वयात केस खरोखर पांढरे झालेत का? नाही, तुम्ही वरती लिहिलय कि सत्य घटना.
|
Supermom
| |
| Wednesday, April 18, 2007 - 1:50 pm: |
| 
|
मी पण अगदी उत्सुकतेने वाचत होते.
|
Disha013
| |
| Wednesday, April 18, 2007 - 4:33 pm: |
| 
|
काय हे??? काय एकाग्र होवुन वाचत होते,सत्यघटना आहे असं लिहिलस म्हणुन! आहे म्हणा ती सत्यघटना!
|
Suniti_in
| |
| Wednesday, April 18, 2007 - 5:28 pm: |
| 
|
ही ही ही काय छान गंमत केली सर्वांची. अजून किती सापडले?
|
Manuswini
| |
| Wednesday, April 18, 2007 - 7:50 pm: |
| 
|
जाम मजा आली......... काय सहि टीपी
|
Swa_26
| |
| Thursday, April 19, 2007 - 6:16 am: |
| 
|
srk .... मस्तच आहे.. जोर का झटका धिरे से...
|
Jhuluuk
| |
| Thursday, April 19, 2007 - 7:04 am: |
| 
|
swa_26 अगदी अगदी सही आहे!!!
|
Shrini
| |
| Thursday, April 19, 2007 - 7:29 am: |
| 
|
good one! .. .. 
|
Bee
| |
| Thursday, April 19, 2007 - 7:38 am: |
| 
|
एक प्रामाणिक प्रतिक्रिया.. मला काहीच गम्मत वगैरे वाटली नाही
|
Srk
| |
| Thursday, April 19, 2007 - 7:54 am: |
| 
|
झकासराव तुमचा प्रश्न मी कॉंप्लिमेंट म्हणुन घेतलाय. अहो केस रंगवु शकेन पण 'इतक्या लहान वयात' असं म्हणालात की! इश्श! हा हा हा. सुनिती, देवाशप्पथ खरं सांगेन. खोटं सांगणार नाही. अजुन (तरी) तो एकटाच दिसतोय. असो. झकासराव, सुपरमॉम, दिशा, सुनिती, मनुस्विनी, स्वाति, झुळुक तुम्हाला आवडलं याचा आनंद झाला. पांढरा केस परिपक्वतेनं आलेल्या शहाणपणाचं प्रतिक आहे असं (ज्यांचे केस आधीच पांढरे झालेत ते लोक) म्हणतात.
|
Srk
| |
| Thursday, April 19, 2007 - 8:04 am: |
| 
|
श्रिनि धन्यवाद. बी चालतं हो सगळ्यांनाच सगळं आवडतं असं नाही.
|
Badbadi
| |
| Thursday, April 19, 2007 - 8:18 am: |
| 
|
बी चालतं हो सगळ्यांनाच सगळं आवडतं असं नाही. >> Sःऋती, अगं असं कसं सोडून देतेस तू... विचार त्याला का नाही आवडली... मग तो काहितरी लिहिल...मग चार लोक अजून... मस्त सुखद धक्का होता सिल्वर लाईन
|
Princess
| |
| Thursday, April 19, 2007 - 8:46 am: |
| 
|
श्रु, मस्तच ग... मजा आली खुप. मी एवढ्या उत्सुकतेने वाचत होती.... म्हटले, मला माहिती नसलेला हा कोण सगळ्यांपेक्षाही जोरात धक्का मलाच लागला... वाटले होते आपल्या कॉलेजातल्या कोणाचेतरी एखादे प्रकरण उघडतेस की काय
|
Bee
| |
| Thursday, April 19, 2007 - 9:58 am: |
| 
|
पुर्वी पांढरे केस वय झाले की व्हायचे. हल्ली वय झालेले नसताना अकालीच पांढरे केस होतात. srk नक्की काय झाले आहे तुला
|
Sheshhnag
| |
| Thursday, April 19, 2007 - 1:39 pm: |
| 
|
हा हा हा. पहिल्यांदा काय वाचतोय हे कळालंच नाही. मग प्रतिक्रिया वाचल्यावर जाम हसू आले.
|
हा... हा... हा... एकदम झक्कास!!!!!!!!!!!!!!! ह. ह. पु. वा.
|
Athak
| |
| Thursday, April 19, 2007 - 2:56 pm: |
| 
|
good one , सिरिअसली वाचत होतो वा छानच , अजुन येवु दे , पुढे लवकर लिही , अशी प्रतिक्रिया लिहायला हात आवरता घ्यावा लागला जेव्हा काळ्याचे पांढरे झाले हे कळले
|
Arch
| |
| Thursday, April 19, 2007 - 3:32 pm: |
| 
|
अजुन येवु दे >> अथका, काय? पांढरे केस? इतका का राग तिच्यावर? 
|
good one... पण नेहमीप्रमाणे शेवट आधी वाचायची सवय असल्याने फ़ार मजा आली नाही
|
|
|