Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
जोजिवसि

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » ललित » जोजिवसि « Previous Next »

Swasti
Thursday, April 19, 2007 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्लीच एका रविवारी , कुठल्यातरी TV channel वर ' जो जीता वही सिकंदर ' पहिला . तसा या पुर्वीही अनेकदा बघितला होता पण बरेच वर्षांनी दुपारच्या वेळी निवांतपणे बसुन , अथ पासून इति पर्यंत नीट पाहिला .
पिक्चर आलेला तेंव्हा आम्ही शाळेत शिकत होतो . परवा बघताना तेंव्हाच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या .

जो जीता वही सिकंदर !!! जोजिवसि म्हणायचे त्यावेळी .
मुळातच मी आमिर खानची पंखा , त्याचे सारे चित्रपट मी बघितले नव्हते ( त्या काळी आमच्या घरी केबल लावलं नव्हतं आणि anyways भरमसाट movie channels ही नव्हती . आणि वारंवार theatre ला जाऊन सिनेमे बघण्याचं धाडस नव्हतं ) पण कालंतराने केबल वगैरे लागल्यावर हा 'मी आमिर खान चा सगळ्यात जास्त वेळा पाहिलेला चित्रपट' ठरला ( एकुण सहा वेळा) मात्र अजूनही आठवतो आम्ही पहिल्यांदा पहिला तेंव्हा.

घरच्याना मस्का मारून theatre ला जाऊन पहायचा अस आम्हा मैत्रिणींच ठरलं . पण छे ! house full च्या पाट्या पाहुन दु:खी मनाने परतलो . तेन्व्हा मदतीला आल्या आमच्या बिल्डिंगमधल्या एक भाभी ज्या काळी इतर पिक्चरच्या cassates १० रुपये भाड्याने मिळायच्या , जोजिवसि आम्ही आणला २५ रुपयाने सुट्टिच्या एका दुपारी बिल्डिंगमधली सगळी कच्ची बच्ची भाभीकडे व्हिडियो पहायला जमलो .

खोडकर पण प्रेमळ संजु , त्याची मित्र मंडळी , आज्ञाधारक आणि तितकाच साधा सरळ रतन एकदम best friend अंजु , solid कडक शिस्तीचे पिताजी रामलाल आणि आगाऊ शेखर . सगळी पात्र कशी आजही डोक्यात एकदाम फ़िट्ट बसली आहेत .

आमिर खानचा संजु ---- mmmmwaaaah !! . ( हा SRK ही काय एक एक सवयी लावतो लोकांना ) संजुची इतकी निरनिराळी रुपं पहायला मिळली .
शेखरला जळवण्यासाठी देविकाशी जवळीक करता करता खरच तिच्या प्रेमात पडणारा संजु , अंजलीला आपली सगळ्यात जवळची मैत्रिण मानणार आणि तिला आपल्या मनातलं सगळं सांगणारा संजु , वडिल आपल्यापेक्षा मोठ्या भावावर प्रेम करतात या विचाराने दुखावणारा संजु , मोठ्या भावावर मात्र मनापासून प्रेम करणारा , त्याच्या प्रेमाची गाडी रुळावर यावी म्हणून प्रसंगी उचापत्या करणारा , भावाच्या अपघाताला आणि पर्यायाने त्याच्या स्वप्नभंगाला आपणच कारणीभूत आहोत या अपराधी भावनेने जळणारा आणि शेवटी कहीही झाल तरी रेस जिंकुन आपल्या वडिलांच आणि भावाचं स्वप्न पुर्ण करायचं या इरेला पेटलेला संजु .
त्या charactor च ( आणि पर्यायने आमिर खनच ) कौतुक करयाला माझे शब्द अपुरे पडतात .

संजुची best friend - अंजली . आपल्या बाबांना गॅरेजमध्ये मदत करणारी , स्वप्नात रंगणारी , आपल्या मित्रंना , त्यांच्यावरील प्रेमापोटी नेहमी साथ देणारी , बिनधास्त . जोजिमध्ये आयेशा झुल्का जितकी क्युट दिसली तितकी नंतर कुठेच नाही ( अपवाद : हल्लीच्या ' सोचा न था ' मधली नम्रता भाभी ) आठवा पहला नशा गाण्याच्या अगोदरचा प्रसंग जेंव्हा ती आणि आमिर चौथर्‍यावर बसुन बोलत असतात . ती ज्या निरागसतेने आणि आशेने त्याच्याकदे बघते - वाह !!!
Jeans,full shirt, त्यावर जकेट आणि स्कार्फ़ने सैलसर बंधलेले केस -- आम्हाला tomboyish अंजु अगदी trendy वाटायची .
( थोडस विषयांतर , मी माधुरी fan वगैरे कधीच नव्हते . पण आताच्या कचकड्याच्या बाहुल्या पाहुन पाहुन , पुनरागमन करणारी माधुरी खूप सुंदर वाटायला लागली आहे )


" तु बॅंक जा , डबल रोटी मैं बनाता हूं " अस संजुने म्हणताच कावराबावरा होणार रतन . जोजि मधल आनखी एक lovable charactor. त्याला कल्पना बद्दल वटणारं ( सुरुवातिला ) अव्यक्त प्रेम , वडिलांच्या अपल्याबद्दल असणर्या अपेक्षंची आणि आपल्या जबाबदारीची जाणिव , मोठ्या भावाच्या नात्याने संजुबद्दल वाटणारी काळजी , लहान भावाच्या खोड्यांना पाठीशी घालणं , शेखरबद्दल मनात प्रतिस्पर्धी भावना असतानाही त्याचा संयम . सार्‍याच गोष्टी खर्‍या वाटायच्या .

पूजा बेदीची देविका . पूजा बेदी त्याकळी फ़ार प्रसिद्ध होती . त्यामुळे भाभींना ती screen वर आली की आम्हां लहान मुलांचं फ़ार tension यायच . पण एकंदर ती मोठ्या घरच्या देविकासाठी चांगली निवड होती .

त्यावेळी आम्ही सगळे शाळेतले विद्यार्थी होतो . काॅ लेजमधले आयुष्य , आपापसातली खुन्नस , प्रेमप्रकरणं या सगळ्याबद्दल आम्हाला फ़ारशी महिती नव्हती . माहिती होती ती दोन मित्रांमधली निखळ मैत्री , मोठ्या भावाची वडिलकी , वडिलांची शिस्त आणि स्पर्धा ज़िंकण्यासाठी करावी लागणारी मेहनत .

चित्रपट बघतान आम्ही सगळे इतके involve झालो होतो की विचारता सोय नाही .

संजुच्या खोड्यानी हैराण झालेला रतन आम्हाला एकदम बिचारा वाटायचा . दिवाळीच्या रात्री हातात लाल गुलाबाचं फ़ुल घेउन रतन मैदानात येताच आम्ही सगळे इतके पोट धरुन हसलो . पहला नशा गाण्याच्या शेवटी कानामागे केस नीट करत , रतनल भेटायल येणार्‍या कल्पनाला पाहुन सगळ्यनी सुटकेचा निश्वास सोडत टाळ्या वाजवल्या .
dance competetion मध्ये जेव्हा संजुच काॅलेज हरतं तेंव्हा त्या एका jugde ने चीटींग केली म्हणुन आम्ही वैतागलो .
त्याने ८ खोडुन ६ दिले नसते तर " राजपुत " जिंकलेच नसते अस आमचं परखड मत आम्ही आरडाओरडा करुन प्रदर्शीत केल होत .
४ हजार रुपये हरवले म्हणून संजुला घराबाहेर कढल जात तेंव्हा , रतन मारहाणीमुले हाॅस्पिटलमध्ये जातो तेंव्हा , रूठकर हमसे कभी या गाण्याच्या वेळी ; प्रत्येक प्रसंगी आम्ही हळहळलो , रडलो ( काय म्हणतात ते - senti झालो ) .

आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेवटची रेस !!! ती सुरु झाल्यापासून सगळे श्वास रोखुन बसले होते . म्हणजे निकाल काय लागणार याची कल्पना सगळ्यांनाच होती तरीही ती १० मिनिटे म्हणजे भारत पकिस्तान क्रिकेट मचचया शेवटच्या ३ ओव्हर्स सारख वातावरण .
जे कोचावार बसले होते ते खाली जामिनीवर उड्या मारायला आले .
" अरे , जा लवकर "
" जोरात चालव जोरात "
" अरे बाप रे तो जवळ आला बघ "
" देवाऽऽऽऽऽऽ plz plz plz"

शेवटी संजुने ती रेस जिंकल्यावर जो आनंदाचा चित्कार उडाला म्हणता .

त्यानंतर इतका समरूप होउन पाहिलेला दुसरा चित्रपट मला आठवत नाही

साधना सरगम ने " चाहे तुम कुछ ना कहो .." असा सुर लावताच मनात उठणार्‍या तरल भावना ,
" जो सब करते है यारो वो हम तुम क्यों करे " म्हणताना नकळत बेफ़िकिरीत उडवली जाणारी मान ,
" ... ये ना सोचा थ कभी इतने याद आओगे तुम " ऐकताना भरुन आलेले डोळे ,
" जवां हो यारों ये तुमको हुआ क्या " अस विचारताच हटणारे मनावरचे मळभ ,
शेवटच्या १० मिनिटांचा थरार
आणि शेवटी "जो जीता वही सिकंदर" म्हणताच आपसुक ताठ होणारी मान

परवा दुपारी सगळ परत नव्याने आठवलं

????????????????????????????????????????????????????????????????????????

तळटीप : या लेखात मांडलेली मते ही व्ययक्तिक आहेत . आमिर खान न आवडणारे समीक्षक , आयेशा झुल्का आणि माधुरी दिक्षीत यांचे fans किंवा समीक्षक , भारत पाकिस्तान सामन्याचे क्रिकेट प्रेमी आणि सगळ्यात महत्त्वाचे जोजिवसि मनापासून न आवडणारे सिनेप्रेमी या कोणालाही दुखावण्याचा हेतु या मागे नाही .
( काय आहे ना , आज काल मायबोलीवर लोक अगदी संवेदनशील झाले आहेत . कोणाच्या भावना कधी , कुठे , कशा , कशामुळे दुखावल्या जातील आणि वादाला तोंड फ़ुटेल काही सांगता येत नाही )


Princess
Thursday, April 19, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति, same pinch मी काही आमिर खानची fan नाही. पण हा पिक्चर खुप म्हणजे खुपच आवडता आहे माझा. आणि तु खुप सुंदर लिहिलेय... खुप आवडले.
जो जीता TV वर जितक्या वेळी दाखवतील त्या प्रत्येक वेळी पाहते मी. माझे आवडते गाणे "रुठकर हमसे कभी". मी पण ढसाढसा रडली होती या गाण्याच्या वेळी. एक गम्मत आठवली. हा पिक्चर मी दिवाळीच्या सुट्टीत सगळ्या भाऊ आणि त्यांच्या मित्रांबरोबर पाहिला होता. अजुनही चिडवतात सगळे मला :-)


R_joshi
Thursday, April 19, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति जोजिवसिच्या सर्व आठवणि जागा केल्यास. तुझा लेख वाचताना संपुर्ण चित्रपट पुन्हा एकदा बघितल्यासारखे वाटले.
लहान होतो तेव्हा आमिर खान आणि आयेशाच्या नकला आम्हि हि खुप मारायचो. कॉलेज जीवनात तर याची गाणि म्हणजे आपल्यासाठीच रचलित असा आविर्भाव असायचा. आणि आजही हि गाणि मनाला तेवढिच मोहवतात.
खरच जोजिवसि हा खरच "सिकंदर"आहे.

प्रिति:-)


Nandini2911
Thursday, April 19, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहला नशा पहला खुमार
नया प्यार है नया इन्तजार
कर लू मै क्या अपना हाल
ए दिल ए बेकरार तू ही बता....

अत्यंत रोमेंटीक गाणं... काय picturisation आहे...


Srk
Thursday, April 19, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति, पुन्हा 'जो जिता वही सिकन्दर' बघितल्यासारखं वाटलं. संजु आवडुनसुद्धा जेव्हा तो 'बिचार्‍या' आयेशा झुल्काला सोडुन त्या 'वाईट आणि बिघडलेल्या' पूजा बेदीवर प्रेम दाखवतो तेव्हा त्याचा थोडा वेळ राग पण आला होता.

Lukkhi
Thursday, April 19, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमिर खान मला खास काही आवडत नाही, आयेशा देखिल. पण 'जो जीता' was class apart . हा लेख वाचून मलाही शाळेत असताना घरी video cassette आणून JJWS बघितला त्यावेळेसच्या आठवणी ताज्या झाल्या. एवढं involve होऊन अगदीच थोडे सिनेमे पाहिले आहेत.

पुढे काही वर्षांनी राहूल talkies ला लागला तेव्हा black ने तिकिट काढून पाहिला... त्यावेळीही तितकाच आवडला... असे movies फारच कमी बनतात.

स्वस्ति, तु लिहिलेले खूप आवडले (अगदी अचानक ९६ विश्वचषकाच्या भारत पाक सामन्याची क्षणचित्रे अनपेक्षितपणे बघायला मिळाल्यावर जसे वाटेल तसे वाटले).


Chinnu
Thursday, April 19, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति, डिट्टो ग! ... ...

Disha013
Thursday, April 19, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति,आधी 'जोजिवसि' नाव वाचुन मला वाटले की अंगाईगीतांवर लेख आहे! :-)

छान लिहिलेयस. आ. खानची fan मीपण नाही. पण हा movie directer चा आहे. मी तर अगणित वेळा बघितलाय.


Farend
Thursday, April 19, 2007 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति छान लिहिले आहे. 'सिकंदर' एकदम फ्रेश वाटला होता. आणि जतिन्-ललित (बहुधा) चे संगीत हे सुद्धा त्या वेळेला यायला लागलेल्या सगळ्या गज़लछाप गाण्यांपेक्षा वेगळे वाटले होते.

मला वाटते याच चित्रपटात पहिल्यांदा फ़राह खान ने नृत्य दिग्दर्शन केले होते त्यामुळे काही काही actions एकदम वेगळ्या वाटल्या. उदा: आमिर खान पहला नशा गाण्यात.


Gs1
Friday, April 20, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


स्वस्ती, जुन्या आठवणी जाग्या केल्यास. ऍपमेकचा पेपर जेमतेम टाकून लगेच बाईकला टांग मारून गावातल्या गल्लीबोळातून अपोलो [ पहिल्यांदा आणि शेवटेचेच गेलो त्या भयाण थेटरात ] गाठल होत.

आम्हाला वाटल होत की अजून दोन पेपर शिल्लक असतांना येणारे आमच्यासारखे उनाड आम्हीच, पण जवळ जवळ अर्ध पब्लिक इंजिनिअरींगचच होत.

जो जिता मधल्या सबसे आगे लडके कौन ... वगैरे घोषणा अगदी जोरात असायच्या त्यावेळेला फिरोदिया, पुरोषोत्तम, इनसिंक ला.

मला अस वाटत की तो कॉलेजचा काळ आणि ते स्पिरिट एकदम चपखल पकडल होत जोजिवसि मध्ये.




Sanghamitra
Friday, April 20, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति सही. अगदी. शाळेत असताना दोनदा टॉकिजमधे जाऊन पाहिलेला हा एकच चित्रपट. धम्माल आलेली. तुझ्या अगदी प्रत्येक वाक्याला मी मान हलवत होते वाचताना. :-)
(जोजिवसि टायटल पाहून तान्ह्या मुलावर लिहीलेय की काय असे वाटले आधी )
त्यातला पैजामा छाप हा अपशब्द(खवचट, उपरोधिक काय असेल ते) आम्ही वापरायला लागलो त्यानंतर.
मला वाटतंय तू पाहिलास त्याच रविवारी मी पण पाहिला कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा आणि असाच एंजॉय केला. मुव्ही पण आणि शाळेत असताना मैत्रिणींबरोबर जाऊन पाहिला तेंव्हा केलेली मजा आठवून पण :-)


Dhumketu
Friday, April 20, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टायटल वाचल्यावर पहिल्यांदा मला बाळाला जोजवतात त्याबद्दल काहीतरी लिहिले आहे असे वाटले.
जोजीवसि हा shortform पहील्यांदाच ऐकला. नाहीतर फ़क्त "जो जिता" येवढाच short form वापरत असू आम्ही.


Hems
Friday, April 20, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति, " पहला नशा .." या गाण्यानं वेड लावलं होतं ! हा सिनेमा म्हणजे केवळ " तरुणाई " होती ना !

Apurv
Friday, April 20, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप म्हणजे! .. खूप म्हणजे! .. खूप म्हणजे! ... खूपच छान लिहिले आहे! :-)

Savyasachi
Saturday, April 21, 2007 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एकच मूव्ही मी सलग २ वेळा पाहीला. ३ ते ६ बघून प्रचंड भारावून बाहेर पडत होतो तर दुसरे मित्र ६ ते ९ चा बघायला आले होते. म्हणाले येतोस का, मी परत आत :-) काही आवडल नाही अस आठवतच नाही या मूव्हीत. पण तरी माझा जास्त आवडलेला आणि पाहीलेला आहे, QSQT .

Swasti
Saturday, April 21, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद !
मी अगदी सगळ्यांशी सहमत आहे :-)


Saee
Saturday, May 05, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त गं. मित्रमंडळींना तेव्हा वाढदिवसाची भेट म्हणुन 'जो जिता'च्या कॅसेट द्यायची मी:-)
आज आठवल्यावर गंमत वाटते.

मला आमीर आवडतो. पण परवा making of Lagaan वाचल्यापासुन त्याच्याबद्दल आदरही वाटायला लागला. ममिक एवढी छान भूमिका मिळून आणि ती करुनही गायब झाला त्याचं वाईट वाटतं आणि आयेशा फक्त त्याच पिक्चरमधे आवडली होती. पूजा बेदी भुरळ पडेल अशीच दिसली आणि आवडलीही. एकुणच 'जो जिता' धमाल होता. मन्सूरनं सलग दुसरा उत्तम चित्रपट देऊन अपेक्षा वाढवल्या होत्या. आणि संगीत अगदी catchy होतं, अजुनही ती गाणी आवडतातच. कितीही ऐकली तरी कंटाळा येत नाही.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators