|
नचिकेत... yahooooooooooooooooooooooo मी तुझी गझल पोस्ट झाल्यावर दिलेली प्रतिक्रिया मला अजुनही लक्षात आहे... 'तू गझलेच्या राज्याचा अनभिषिक्त सम्राट होणार' ... तेव्हा असंच सुंदर संपन्न लिहित रहा... माझ्यातर्फे तुला ही ई-भेट 
|
कार्यशाळा संपल्याने गंभीर मुखवटा उतरवून लिहीतो
किती सहज आणि किती आशयसंपन्न ...... मला आठवतंय नचिकेतची गज़ल डिस्कस करत असताना मी कार ड्राईव्ह करत होतो . किती तरी वेळ चर्चा झाली . he was so sorted out on what he wanted to say and more importantly HOW he wanted to say it म्हणाया तुझे आटणेही अकाली तुझे दाटणेही अकस्मात होते हा शेर चर्चेत आला आणि काटा आला अंगावर . छ्या ... कैच्याकैच करून टाकलं त्या शेराने . जाणवलं ... " दम है " लगे रहो दोस्त ... मराठी गज़ल बीबी वाट पहात आहे .
|
वावावा!!!!!!! नचिकेत, हार्दिक अभिनंदन!!!!!!! गझल पुन्हा वाचायला मिळाली आणि नव्याने आस्वाद घेता आला. त्यातच बक्षीस मिळवून तुम्ही गझलेचे सौंदर्य द्विगुणित केलेत. पुढील लेखनासाठी मन्:पूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!! त्याचबरोबर कार्यशाळेत सहभागी झालेल्या सगळ्यांना या कार्यशाळेतून खूप काही शिकायला, अनुभवायला आणि एंजॉय करायला मिळालं असेल, अशी खात्री आहे. सहभागी झालेल्या सगळ्यांचे आणि आयोजकांचे सुद्धा अभिनंदन!!
|
Imtushar
| |
| Wednesday, April 18, 2007 - 1:06 pm: |
| 
|
नचिकेत, हार्दिक अभिनंदन... -तुषार
|
Ashwini
| |
| Wednesday, April 18, 2007 - 1:10 pm: |
| 
|
नचिकेत, अभिनंदन!!! .. ..
|
नचिकेत अभिनंदन. आणि त्यात आश्चर्य काय? आहेच त्याची गज़ल तशी. शिवाय आठवतंय का त्या ' मीटर ओळखा ' मधे सुद्धा याचीच सगळी उत्तरे बरोबर आलेली. अर्थात बाकीच्या गज़लांमधलेही उत्कृष्ट शेर लक्षात रहातील कायमच.
|
नचिकेत अभिनंदन! आता छान छान गजला येउंदेत!
|
Pulasti
| |
| Wednesday, April 18, 2007 - 1:45 pm: |
| 
|
हार्दिक अभिनंदन नचिकेत!! गझल पुन्हा वाचली.. खरतर पुन्हा अनुभवली! अप्रतिम!! -- पुलस्ति.
|
अर्रे व्वा!!! अभिनंदन, नचिकेत!!
|
Paragkan
| |
| Wednesday, April 18, 2007 - 3:11 pm: |
| 
|
wah ... abhinandan Nachiket !!
|
Yog
| |
| Wednesday, April 18, 2007 - 3:32 pm: |
| 
|
नचिकेत अभिनन्दन! आगाज ये है तो अन्जाम होगा हसी.. 
|
Chinnu
| |
| Wednesday, April 18, 2007 - 3:46 pm: |
| 
|
सन्मीला मोदक. अभिनंदन नचिकेत. मला सहभागीं मध्ये आवडलेली सांगणे कठीण असले तरी, आवडलेली गजल मीनुची होती. कदाचित सुरुवातीला आलेल्या गजलांमध्ये जास्त आवडलेली ती. मग लक्षात राहिले ते दादचे पिश्या चांदण्यांचे दंश, गिर्याची दिवस ते रात्र श्रमणारी ती, मुक्या अंगणातले हाका ऐकणारे आणि स्वत:शी मुलाकात करणारे प्रसाद मोकाशी, उपासची उपरोधिक वेगळी गजल, झाडाची ओंजळीला सलणारी फुले, सन्मीची चंद्रस्नात गजल, एका तुषारात प्रेम मानणारे तुषार, आफ़ताब यांची एका कटाक्षात तबाही करणारी गजल, बैरागींची फोनवर लाजणारी गजल, जयुची पौर्णिमेची मुजोरी, श्यामलीचा जोगिया, हेम्सने दिलेल्या दिशांच्या स्वैर मशाली, मेघधाराचे अरूपी पुरावे, शब्द गांडीवधारी देव, अनोखे आभाळ डोळ्यात मिरविणारा मयुर, अभिजीतचे जुने वादळ उकरु पाहणारे स्पर्श, मिल्या यांची प्रेममय गजल आणि हजल, भाईंच्या दिलाची देखणी तिजोरी! नंदिनीचा पहिला स्तुत्य प्रयत्न अभिनंदनीय आहे. मनिषाचे स्वप्नात भंगणे, सुमतीचे जगाचे गणित, अश्विनीचे रक्तातले वेड हे ही आवडलेत. जाणकार गझलेत तुलना अशक्य आहे. सगळ्याच आवडल्या. सारंग आणि स्वातीची जास्त आवडली. योग यांच्या गजलेत नक्की काय आवडले सांगणे कठीन आहे! धुके शिंपणार्या गाठीभेटी, जुनी ओल, नवे पोत, वळीवातले बांध? उरी काजवे की भास सावल्यांचे! एकाहून एक कल्पना वेचतांना आधीच विरलेली मनाची झोळी फाटेल की काय अशी भीती वाटते आहे. का कोण जाणे शाळेतली निरोप समारंभाची भाषणे आठवत आहेत! बोट धरुन इथवर चिन्नुला गजल प्रांतात हिंडायला शिकविल्याबद्दल सर्वांचेच आभार.
|
Anilbhai
| |
| Wednesday, April 18, 2007 - 3:49 pm: |
| 
|
म्हणाया तुझे आटणेही अकाली तुझे दाटणेही अकस्मात होते ये तो सुनामी है. अभिनंदन.
|
Peshawa
| |
| Wednesday, April 18, 2007 - 4:22 pm: |
| 
|
अभिनंदन नचिकेत लगे रहो!
|
Mrinmayee
| |
| Wednesday, April 18, 2007 - 6:09 pm: |
| 
|
इथे कोणती लाट घेऊन आली ? मला हे किनारे कुठे ज्ञात होते.. एक काटा येतो अंगावर, सर्रकन! मन:पूर्वक अभिनंदन नचिकेत!
|
Desh_ks
| |
| Wednesday, April 18, 2007 - 7:51 pm: |
| 
|
नचिकेत, मनापासून अभिनंदन! पुन्हा पुन्हा असंच लिहीत राहा. -सतीश
|
Hems
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:05 pm: |
| 
|
वा ! वा ! नचिकेत, अभिनंदन ! अप्रतिम आहे तुझी गज़ल ! बक्षीसपात्र खरंच !! आणि चिन्नू , तुझंही कौतुक वाटतं ! या कार्यशाळेत पहिल्यापासूनच तू सगळ्यांची मनापसून दखल घेतलीस. त्याबद्दल आभारी आहे असं नाही म्हणत पण खूप बरं वाटलं हे मात्र सांगतेच ! गुरुजींचा तर प्रश्नच नाही ! लोकांना गज़लचा आनंद घेता यावा म्हणून इतका वेळ देणं आणि इतके श्रम घेणं केवळ ग्रेट ! ... मग, पुढचा धडा चालू करताय ना !!!
|
Pulasti
| |
| Wednesday, April 18, 2007 - 10:07 pm: |
| 
|
चिन्नु - कार्यशाळेचा आढावाच घेतलास अगदी! छानच... -- पुलस्ति.
|
Daad
| |
| Wednesday, April 18, 2007 - 10:22 pm: |
| 
|
नचिकेत, मनापासून अभिनंदन! हर एक शेर भिडतो अगदी गळाभेटच! वा! परत एकदा अभिनंदन!
|
Bee
| |
| Thursday, April 19, 2007 - 2:36 am: |
| 
|
चिन्नुचे वरील पोष्ट खूप छान आहे. नचिकेत अभिनंदन!
|
|
|