R_joshi
| |
| Friday, April 20, 2007 - 4:33 am: |
| 
|
एक तु... एक मी एक मी... निराशेच्या काळोखात ग्रासलेली एक तु.... आशेचा किरण आणणारा एक मी... स्वप्नाच्या जगात वावरणारी एक तु... वास्तवाच भान जपणारा एक मी... तुझ मन मोडणारी एक तु... मला सतत जपणारा एक मी... तुझ्यासाठी जगणारी एक तु... अर्ध्यावर साथ सोडणारा. प्रिति
|
Jagu
| |
| Friday, April 20, 2007 - 5:44 am: |
| 
|
प्रिती, एक तू, एक मी भावना छान उतरल्या आहेत.
|
Mansmi18
| |
| Friday, April 20, 2007 - 5:28 pm: |
| 
|
प्रिती, खुप छान. शेवटचे कडवे मात्र चटका देउन गेले.
|
Mankya
| |
| Friday, April 20, 2007 - 5:44 pm: |
| 
|
प्रिति .. आवडली ! माणिक !
|
Mansmi18
| |
| Friday, April 20, 2007 - 6:09 pm: |
| 
|
काही च्या काही कविता या सदराला सार्थ ठरणारी कविता देत आहे. माझ्या कॉलेजात एकदा क्रिअटीव रायटीन्ग स्पर्धा ठेवली होती त्यात काहीही लिहावे (कथा, कविता इ इ) पण पहिली ओळ "काल रात्री बारा वाजता" आणि शेवटची ओळ "नुकतीच पहाट झाली होती" अशी असली पाहिजे अशी अट होती. तेव्हा लिहिलेली ही (पहिली आणि शेवटची )कविता.(साधारण १५ वर्शापुर्वी) काल रात्री बारा वाजता काय गम्मत झाली होती जेव्हा माझ्या स्वप्नामधे ती नुकतीच आलि होती रात्रीचा तो दुसरा प्रहर तिच्या स्मिताने केल कहर तिच्या अस्तित्वाने तेव्हा रात्र धुन्द झाली होती ती आणि मीच होतो कोणी काहीच बोलत नव्हते कुणीही जागे नव्हते तेव्हा रात्र सुद्धा झोपली होती आपले साले असेच होते बरच काही बोलायचे असते जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा लाम्ब पळुन जातो शेवटी म्हटले जाउ दे यार घेतला पहिजे आपणच पुढाकार माझ्या मनातील गोष्ट तेव्हा ओठावरती आली होती पण माझ्या दुर्दैवाने सुद्धा तीच वेळ साधली होती जागा झालो स्वप्नातुन जेव्हा नुकतीच पहाट झाली होती
|
R_joshi
| |
| Saturday, April 21, 2007 - 5:45 am: |
| 
|
धन्यवाद मन्समि (नाव चुकल बहुतेक) कविता खरच छान आहे. पण त्यातिल एक कडव ऊमगल नाहि ते म्हणजे "आपले सारे असेच असते".
|
Manogat
| |
| Tuesday, April 24, 2007 - 7:02 am: |
| 
|
काय सांगु तुम्हाले इपरित घडल शहराच्या पोरि संग म्हाय बि सुत जुलल मित्राले भेटवाय पोरिले नेल तोंडावरचा तिचा रुमाल पाहुन त्याने वेगलच भाकित केल कोपर्यात बोलवुन म्हने अबे मुसल्मान हाय काय परद्या मधे लपवुन पोरगि दाखवाले आला काय त्याले म्हन्ल बुवा पोरगि हिन्दुच हाय तो तोंडावरचा रुमाल शहरातली फ़ॅशनच हाय तुटक्या फ़ुटक्या इंग्रजित त्यायच introduction केल त्यायन बि मुक्या वानि तिले अभीवादन केल शहरातलि पोरगि म्हन्जे म्हाया साठि प्रश्नच हाय थे बोलल्या वर कलत न्हाहि कारन इंग्रजि तीची म्हने मत्रुभाशाच हाय भांडनात तिन एकदा मले "u phool" म्हनल मराठितल फूल समजुन मि तीले थांकु म्हनल शेवटि मले त्रासुन ती सोडुन गेली म्हाया नाजुक दिलाले ती तोडुन गेली म्हाया नाजुक दिलाले ती तोडुन गेली
|
R_joshi
| |
| Tuesday, April 24, 2007 - 7:23 am: |
| 
|
मनोगत खुपच छान. कवितेच्या बिबिवर टाक.
|
R_joshi
| |
| Tuesday, April 24, 2007 - 7:39 am: |
| 
|
तुझ स्वप्न पडाव यासाठी आराधना मी करते स्वप्नात माझ्या येशील म्हणुन फोटो तुझा पाहते विचार तुझाच रात्रंदिनी मनी माझ्या असतो तुझ्याशिवाय मनी माझ्या ध्यास दुसरा नसतो जवळ येतोस माझ्या जेव्हा शब्द सुचत नाही लांब तुझ्यापासुन आता मला राहवत नाही प्रेम हे असच असत असे सारे म्हणतात ओठांची भाषा हे डोळ्यांनी कशी बोलतात स्वप्नात आज येशिल तेव्हा नक्कि तुला विचारेन 'प्रेम माझ तुझ्यावर आहे' आज तुला सांगेन प्रिति
|
Manogat
| |
| Tuesday, April 24, 2007 - 8:43 am: |
| 
|
धन्यवाद रुपल, कवीतेच्या BB वर पोस्ट केली,पहिले तिथेच करणार होते पण वाट्ल सगळे म्हणतिल की ही कवित या section ला पोस्ट करायला हवि होति.
|