Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 18, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » झुळूक » Archive through April 18, 2007 « Previous Next »

Jagu
Friday, April 13, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु तू केलेल्या अभिनंदना बद्द्ल धन्यवाद.
प्रिती अग फ़ारच सुंदर रचना केलीस. मला खुपच आवडली.


Mankya
Friday, April 13, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या सहवासात
सुखदुःखाचे चार क्षण
पुसलं कोणी ' काय जगलास ?'
आनंदे उत्तरतो ' चार क्षण !'

माणिक !


R_joshi
Friday, April 13, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद जगु:-)
माणिक:-)

तुझ उत्तर माझ जीवन आहे
ह्या जगण्यालाच खरा अर्थ आहे
मेघांच्या बरसण्यानेच
हि धरती तृप्त होणार आहे

प्रिति:-)


Mankya
Friday, April 13, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वस्व अर्पिल्यावर
आपले असे काय उरते
म्हणूनच कि काय
आत्महत्या पातक ठरते !

माणिक !


R_joshi
Saturday, April 14, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्मा हे सर्वस्व मानल
तर त्याची हत्या रोजच होते
रोज आत्महत्या करुनही
मी कशी जिवंत राहते?

प्रिति:-)


Gobu
Saturday, April 14, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रीती,
हाय हाय!!! कलेजा खल्लास!!!
काय लिहीलेस!!!
तु फ़ुलवलस तर...
सुन्दर!!!!
मानक्या,
अरे बाबा मी केलेले कौतुक आवडले नाही का रे?
तु छान लिहीतोस रे


R_joshi
Saturday, April 14, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद गोबु:-)
आपल्याहि चारोळ्या येऊ देत:-)


Gobu
Saturday, April 14, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे!
मी लिहायला सुरु केल्यावर हा बिबि बन्द करावा लागेल
कविता लिहीण्याइतकी बुद्धी मिळाली नाही
(मागच्या जन्मी खुप पाप केले होते!)
पण ईश्वरकृपेने कविता समजतात आणि वाचायलाही आवडतात!!!
आणि हो,
भगीनी मला आहो जाहो करु नकोस,
कुवैतच्या बिबिवर पाहशील सगळे कशी थट्टा करतात माझी, लहान आहे म्हणुन!!!


Manogat
Monday, April 16, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण काय वेगळे आहोत,
हे तुझेच वाक्य आहे,
आज तुझ्या "आपण" मध्ये,
हा पण का वेगळा भासतो आहे.


Mankya
Monday, April 16, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू .. तसं काही नाही रे मित्रा .. मनःपुर्वक आभार !

आज तूझ्या शब्दाने
काळजाचा ठाव घ्यावा
जन्मजन्मांतरी जपेन
उरी असा घाव द्यावा !

माणिक !


Mankya
Monday, April 16, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कुशीत तुझ्या
घ्यावा क्षणिक विसावा
स्पर्शच देईल ग्वाही
हरेक श्वास पुरावा !

माणिक !


R_joshi
Tuesday, April 17, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक:-)


फक्त एका नजरभेटित
दोघे बांधले जातो
प्रेम हे असे असते
ज्याचे आपण गीत गातो

मिलन दोघांचे
चांदण्या रातीत व्हावे
तु माझ्यात मी तुझ्यात
संपुर्ण विलिन व्हावे

प्रिति:-)


Gobu
Tuesday, April 17, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानक्या,
आज तूझ्या शब्दाने...
आता कुशीत तुझ्या...

वरील २ रचना अतिशय सुन्दर आहेत!
(तुझ्या या कवितानी माझ्या काळजाचा ठाव घेतला, माझा तत्काळ प्रतिसाद याचीच ग्वाही देतोय)
मित्रहो,
आणखी येवु द्या


Mankya
Tuesday, April 17, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुजरुपे स्पर्शिलं चांदणं
ते मनात जपावं .. साठवावं
स्पर्श निमित्त फसवं आठवाचं
त्या ओघात पून्हा तूलाच स्मरावं !

माणिक !


Meghdhara
Tuesday, April 17, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊस असा दुष्ट
दुरूनच म्रुद्गंध देत
ओंजळी हातांच्या
पुन्हा पुन्हा जोडून घेत.

मेघा


Meghdhara
Tuesday, April 17, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोधतेय मनात
जुनं बहरणं तरी दिसावं
बाकी मनाला समजावतेय
आता तरी मला मनावर घ्यावं.

मेघा




Meghdhara
Tuesday, April 17, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू फुल ना?
फुलाने नेहमीच हसायचं
गजर्‍यात, हारात, तुर्‍यात, समाधीवर
देठापासून तुटूनच जायचं.

मेघा


Chinnu
Tuesday, April 17, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा फुलांचे कर्तव्य छान आहे. दुष्टच आहे ग पाऊसपण! :-) दोनही झुळुका सुंदर.

Giriraj
Wednesday, April 18, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊस असा हा दुष्ट
बरसे मी बाहेर पडता
अन् बघतो तिरपिट माझी
मी मजला झाकून घेता


गिरीराज






Princess
Wednesday, April 18, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊस असा दुष्ट,
तुझी सय घेउन येतो...
अंगणात बरसायचे सोडुन
डोळ्यातुन वाहु लागतो





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators