|
सगळ्याचे बोलून झाले की सांगा.. मग मी कथेचा पुढचा भाग टाकते...
|
Jhuluuk
| |
| Monday, April 16, 2007 - 11:11 am: |
| 
|
कोण काय बोलत आहे? नंदिनी, तुझ्या मागच्या पोस्ट नंतर कोणतीही पोस्ट दिसत नाहिये. पुढचा भाग टाक नं!!
|
नंदिनी अग आम्ही वाट बघतोय पुढच्या भागाची. तुझ लिखाण थांबवू नकोस बघ. छान लिहित आहेस.
|
Nandini... if there are few people making comments about ur story, there are many who are anxiously waiting for the next part so please post it soon.. I loved all your stories so far .... Ethe US madhye kharatar marathi stories navin navin vachata yena tumha sarkhya lekhakanmulech shakya hota so thank you for that
|
Mansmi18
| |
| Monday, April 16, 2007 - 8:10 pm: |
| 
|
नन्दिनी, तुझ्या कथेवरुन सॉलिड मारामारी सुरु आहे. तुला माहित असेलच. सिरिअसलि, तु तुझे लिहिणे इतरान्च्या प्रतिक्रियामार्यामार्यासठी थाम्बवु नकोस. मला पुढे काय झाले (कथेत) ते वाचायची उत्कन्ठा आहे. सवडीनुसार अप्डेट करत जा. धन्यवाद.
|
Yog
| |
| Tuesday, April 17, 2007 - 4:53 am: |
| 
|
nandini, प्रसन्ग चान्गले फ़ुलवले आहेस.. पण कथा पुढे जायला हवीये. तेव्हा पुढचे लवकर पोस्ट कर. (प्रतिक्रीया आणि चर्चा इथे होतच असतात, त्यात नविन काही नाही, तू फ़क्त लिहीत रहा) 
|
Giriraj
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:37 am: |
| 
|
मी सहसा अर्धवट अवस्थेतल्या कथा वाचत नाही.. पूर्ण व्हायची वाट पाहणे मात्र या वेळेला जमले नाही ज्या रेजॉर्टचं वर्णन केलं आहेस तिथे कधी गेली होतीस का? खूपच छान परीसर आहे तो सगळा. जर गोव्याकडे उतरायला लागशील तर सुंदर नागमोडी रस्त्याने एका धरणाच्याजवळ येऊन पोचशील. या भागातली शांतता खूप खोल उतरते असा माझा अनुभव आहे! लिखाण उत्कंठा वाढवत नेतंय.. लिहित रहा..!
|
PLease delete this story...
|
Giriraj
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:10 am: |
| 
|
अर्रे! नंदिनी, हे काय असे! मुळात वाद हा कथेवरून नसून कथेला दिलेल्या काही प्रतिक्रियांवरून आहे. त्यामुळे असा पवित्रा घेऊन तू वाचकांवर अन्यायच करत आहेस! असो!
|
Sakhi_d
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:25 am: |
| 
|
नंदिनी हे बरोबर नाही.... असे करुन जे तुझ्या कथेची आतुरतेने वाट बघताहेत त्यांच्यावर अन्यायच करत आहेस.....
|
Pendhya
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:39 am: |
| 
|
नंदिनी, तु आधी कथा आणी ईतर लिखाण ईथे केलेले आहेस. तसेच ईतरांचे लिखाण वाचलेही आहेस. तेव्हा, तुला हे नक्कीच माहित आहे की, अशा ठिकाणी चर्चा, ( मग ती कधी कधी ऊदभोदक ही होउ शकते ) , होत असते. तसेही, चर्चा आता ईथे सुरु नसल्याने, तुझं लिखाण पुढे सुरु ठेवयाला काहीच हरकत नाही. गिरी ने, वरती म्हंटल्या प्रमाणे, वाद हा प्रतिक्रियांवरुन होता. कथेची लेखिका म्हणून, तू कथा पुर्ण करणे, हेच योग्य होणार नाही का? कथा संपल्यावर मग, तू प्रतिक्रियांच्या suggestions वर, हवा तर, विचार करु शकतेस.
|
Meggi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:33 am: |
| 
|
नंदिनी, ज्यांना तुझ्या कथा आवडत नाहीत ते वाचणार नाहीत. तुझी कथा पूर्ण होण्याची देखिल वाट न बघता अश्या प्रतिक्रिया देणार्यांना इतके महत्त्व कश्यासाठी?
|
Sakhi_d
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:34 am: |
| 
|
पेंढ्याचे म्हणने बरोबर आहे.... तु आधी कथा पुर्ण करणे योग्य होईल... आणी पुढचा posting केल्यावर हा वादही थंबेल....
|
Daad
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:39 am: |
| 
|
नंदिनी, छे छे असलं काही मनातही आणू नकोस. जिथे क्रिया असते तिथे प्रतिक्रियाही असतेच. कुणाच्या प्रतिक्रियेने तू क्रिया करायचीच थांबवणं ही एक टोकाची आणि नकारात्मक प्रतिक्रियाच झाली, गं. अशानं इथे प्रतिक्रिया देणं वाचक बंद करतिल आपल्याला तेही नकोय. कारण त्यातून आपण बरंच काही शिकतो, नाही का? त्याही पुढे जाऊन सांगेन हे पळून जाणं होईल. तुझी कथा तू पूर्ण करच, कर.
|
Rajankul
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:50 am: |
| 
|
नन्दिनी अज्जुकाने दिलेली प्रतीक्रिया बरोबर होती ती खिलाडुपणे स्वीकार का नाही करत तु? तीने तुला फ़क्त सल्ला दिला तो मानणे अथवा सोडुन देणे तुझ्या हातात आहे. तुला negetive घ्यायचे असेल तर तो तुझा प्रश्न आहे!
|
Meggi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:01 am: |
| 
|
प्रतिक्रिया देतांना कथा पुर्ण होण्याची वाट बघू नये का? गायकाला गाताना मध्येच थांबवुन 'हा सूर जर असा लागला तर बरं होइल' अस सांगितलं तर सगळ्यांचाच रसभंग होतो.
|
Vidyaraj
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:07 am: |
| 
|
नंदिनी, तुझी कथा पुर्ण वाचली, आवडली. मला तर वाटते की कथा पुर्ण झाली आहे. जर कथा अजुन अपुर्ण असेल तर ती जरुर पुर्ण कर. आणि एव्हढंच लक्षात ठेव यश हे समुद्रासारखे शांत असतं त्याला कुठल्याहि समर्थनाची गरज नसते, करणमीमांसा होते ती पराजयाची. तेव्हा, तुझी बोटे परत एकदा की-बोर्ड वर सळसळु देत.
|
Ashwini
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:53 am: |
| 
|
नंदिनी, छान लिहीतेस तू. तू कथा पूर्ण करावीस असं मला वाटतं. चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रतिक्रिया लेखकाला उपकारक असतात. However , प्रतिक्रिया कथा पूर्ण झाल्यावर याव्यात असे माझे मत आहे. त्यामुळे पुढच्या कथेसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आणि चालू असलेल्या कथेवर त्याचे प्रेशर येत नाही. कथेची सहजता आणि उत्स्फूर्तता यांना बाधा येत नाही. 'कथा संपल्यावर discuss करू' हे तुझं उत्तर मला खूप संयमी आणि matured वाटलं. लिहीत राहा. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.
|
Supermom
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:19 pm: |
| 
|
नंदिनी, कथेची वाट बघत आहे. लिहायचे नाही असे करू नकोस.
|
Asmitaa
| |
| Tuesday, April 17, 2007 - 2:34 pm: |
| 
|
नन्दीनी, तुज़ी कथा छान आहे. मी वाट पहाते आहे, लवकर पुर्न कर. तु मनाची पकड घेतेस. लेख पुर्न केल्यावर मी मेल करेल.
|
|
|