| | Mankya 
 |  |  |  | Thursday, April 12, 2007 - 7:55 am: |       |  
 | 
 शलाका ...  पहिल्या पावसात भिजल्यासारखं वाटलं  !
 कसले कसले शब्द वापरतेस गं  !
 काजळकाठ ..  मालवत्या ..  सयींचा पिंगा ..  वादळवीज ..  पाऊसछाया ..  पागोळ्यांनी ..  अश्रुस्नात ...  वाह  !  वाह  !
 छान शब्दप्रयोगामुळे वातावरणनिर्मिति किती अचूक साधलीयेस  !
 
 माणिक  !
 
 
 | 
| | R_joshi 
 |  |  |  | Thursday, April 12, 2007 - 8:00 am: |       |  
 | 
 शलाका अप्रतिम. तुझ्याजवळ मराठी शब्दांचे भांडार आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. खुपच छान कविता
   
 
 
 | 
| | Sumedhap 
 |  |  |  | Thursday, April 12, 2007 - 8:57 am: |       |  
 | 
 कधी आधाराची गार सावली असते
 कधी कर्तव्याची उष्ण वाफ असते
 पण हे सारंच फार हवंहवंसं असतं
 प्रेमात सारं असंच असतं...
 
 कधी एकटेपणी मनात भावनांची गर्दी दाटते
 कधी भल्या गर्दीतही मन दुसरेच विश्व गाठते
 मग मनाला थांबवणारं कुणी नसतं
 प्रेमात सारं असंच असतं...
 
 मनातले हे भाव डोळ्यात स्वप्न बनुन उतरतात
 मखमलावर गुलाबाच्या पाखळ्या समोर पसरतात
 स्वप्न आणी सत्यात मग फार अंतर नसतं
 प्रेमात सारं असंच असतं...
 
 मग कुणीतरी हळूच येऊन कानात काही सांगुन जातं
 मन बावरलं की आपसुकच चेहर्यावरती लाजणं येतं
 कितीही ठरवलं तरी लपवणं कठीण असतं
 प्रेमात सारं असंच असतं...
 
 आयुष्यात प्रत्येकाने एकदा हा सोहळा करावा
 आपल्यासाठी थांबलेल्याचा हात घट्ट धरावा
 मग पहा आयुष्य किती सुंदर दिसतं
 अहो, प्रेमात सारं असंच असतं...
 
 
 | 
| | Mankya 
 |  |  |  | Thursday, April 12, 2007 - 9:42 am: |       |  
 | 
 सुमेधा ..  भावना खूप छान व्यक्त झाल्यात गं  !  लाजण तर अप्रतिमच  !
 
 माणिक  !
 
 
 | 
| शलाका "घन भरून आले काही" अप्रतिम!!!
 
 एक काळ होता
 
 एक काळ होता
 ति रोज बागेत यायची
 हळूच चोरून मला बघायची
 
 एक काळ होता
 ति मंदिरात जायची
 माझ्यासाठी देवाला साकडे घालायची
 
 एक काळ होता
 ति फक्त माझ्याच नावाचा जप करायची
 ऊठता-बसता माझेच स्वप्न बघायची
 
 एक काळ होता
 तिचं माझ्यावर थोडसं प्रेम होतं
 काळजाच्या कोपर्यात कुठंतरी माझं नाव होतं
 
 पण आज,
 तिचं ते प्रेम कितीतरी पटीनं वाढत आहे
 कारण,
 तिचा मुलगा मला मामा-मामा म्हणत आहे.
 
 एक काळ होता
 
 
 | 
| | Daad 
 |  |  |  | Thursday, April 12, 2007 - 10:50 pm: |       |  
 | 
 सुमेधा, 'प्रेमात सारं' आवडली. मलाही 'लाजणं' आवडल.
 
 
 | 
| | Princess 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 5:09 am: |       |  
 | 
 सुमेधा, शेवटचे कडवे खुप छान आहे.
 श्री तिर्थे,
  ... खरे सांगायचे तर कुछ मजा नही आया.
 
 
 | 
| | R_joshi 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 7:58 am: |       |  
 | 
 सुमेधा 'प्रेमात सार' छान कविता केली. त्यातील भावना इतक्या सुंदर उतरल्या आहेत. अप्रतिम कविता
   श्री... खरोखरच मामा झालाय कि काय
   
 
 | 
| | Jagu 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 9:03 am: |       |  
 | 
 सुमेधा तुझी कविता छानच आहे.  श्री तुझा गेलेला काळही मस्त आहे.
 
 
 | 
| प्राजक्त
 
 
 गेले कित्येक दिवस  ...
 
 प्राजक्त नीट फुलत नाहीये
 प्रेमाने विचारून झालं ...
 रागाने गदागदा हलवून झालं
 पण नाही  ..
 सडा तर सोडाच
 साधं फूल सुध्दा ओंजळीत पडत नाहीये
 
 आज  ...
 
 ठरवूनच आलोय
 झाडच उखडून टाकायचं
 फुलणारच नसेल  ..
 तर काय फायद्याचं ?
 
 उद्या  ...
 जगाला नव्याने कळेल
 बहरणं  , फुलणं  ..  सगळंच मिथ्या
 उद्याची ठळक बातमी असेल
 "  एका प्राजक्ताची आत्महत्या  "
 
 
 | 
| | Smi_dod 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 9:27 am: |       |  
 | 
 वैभव...!!!....!!!....!!!
 
 न फ़ुलणार झाड उखडुन टाकायच....जगाचा नियमच आहे तो..
 
 पण आत्महत्या कशी?मला नाही समजले...
 
 
 
 
 
 | 
| | Aaftaab 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 9:32 am: |       |  
 | 
 अप्रतिम वैभव!!!
 just too good   as usual.....
 
 
 | 
| कवितेतला प्राजक्त कोण आहे त्यावर अवलंबून आहे ना स्मि ?
 
   
 बघ विचार करून  .
 
 
 | 
| | Smi_dod 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 9:39 am: |       |  
 | 
 ओ हो...खरच..कळाल आता... अन त्यामुळे आता जास्ती भावल...कुठेतरी खुप आत स्पर्शुन गेल..
 
 वैभव खुप सुंदर....ईतक अप्रतिम कस रे सुचत तुला?..
   
 खुप खुप दिवसांनी या आवडत्या बी बी वर यायला मिळाले आणी सलामीला ही सुंदर कविता....
   
 
 | 
| | Mankya 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 9:42 am: |       |  
 | 
 वैभवा ..  किती दिवस वाट पहायला लावलीस  !  अखेस प्राजक्त घेऊन आलास तर  !
 एकदम वेगळाच विषय घेऊन आलास  !
 विचार केल्यावर कळला रे अर्थ, अप्रतिम आहे रे अप्रतिम  !
 
 माणिक  !
 
 
 | 
| | R_joshi 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 9:43 am: |       |  
 | 
 वैभव नेहमीप्रमाणेच सुंदर कविता
   
 
 | 
| | Smi_dod 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 9:44 am: |       |  
 | 
 वैभवा .. किती दिवस वाट पहायला लावलीस ! अखेस प्राजक्त घेऊन आलास तर ! >>>माणीक हाच तर अर्थ नाही..
  बघ विचार करुन... 
 
 
 | 
| | Mankya 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 9:53 am: |       |  
 | 
 स्मि ...  खरंय तोच आहे अर्थ  !  झेपलच नाही गं क्षणभर ..  सुन्न झालो होतो  !  चालायचं, आपल्या चौकटी अन आपण कसं झेपणार  ?  अर्थ उलगडल्यावर मात्र विचारशुन्य झालो ... Toatally Blank !
 
 माणिक  !
 
 
 | 
| वैभवा... अप्रतिम...
 "एका प्राजक्ताची आत्महत्या" की "हत्या"???
 
 
 | 
| | Jayavi 
 |  |  |  | Friday, April 13, 2007 - 11:39 am: |       |  
 | 
 वाह........प्राजक्ताला घेऊन आलास होय... पण थोडा वेळ वाट पहायची असती रे फ़ुलायची.... असा आत्मघाती निर्णय घ्यायला घाई झाली असं नाही का वाटत तुला?
 बाकी.......सुरेखच झालीये.
 
 शलाका.......घन खूप छान बरसून गेलत गं.
 
 
 |