Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 13, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » झुळूक » Archive through April 13, 2007 « Previous Next »

Jo_s
Saturday, April 07, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणीक प्रश्ण छान....

कधी कधी उत्तरा ऐवजी
प्रश्णच इतकी साथ देतात
की कोणी उत्तरा ऐवजी
प्रश्णांच्याच प्रेमात पडतात


Meghdhara
Saturday, April 07, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो अगदी खरय. नी उत्तरही नाही सापडलं तरी चालेल असं वाटतं. प्रश्णाच्या निमित्तने त्या अनुभुतीत रहाता तरी येतं. :-)

मेघा



Gobu
Saturday, April 07, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो,
सुन्दर!!!
अतिशय सुन्दर लिहीलय
जोशी,
फ़ारच छान!


Jo_s
Saturday, April 07, 2007 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, गोबू धन्यवाद

जिंकण्यात माझी
कुठे जीत होती
जिंकविलेस मला तू
ती, खरी हार होती


Gobu
Sunday, April 08, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो,
अहा!
काळजाला स्पर्शुन गेली रे तुझी चारोळी...
आणि हो,
तुझ्या सगळ्या चारोळ्या लिहुन ठेव नीट,
पुस्तक छाप नन्तर त्यान्चे
मला तर वाचायला नक्कीच आवडेल
जोशी आणि माणक्या,
हे तुमच्यासाठी पण बर का


Gobu
Sunday, April 08, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो,
हे द्यायचे राहीलेच रे बाबा...


Jagu
Monday, April 09, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमात काय सामंजस्याने वागायचं
कधी रागवायच, रुसायच
आणि एकमेकांना मनवून
एकमेकांच्या मिठीत शिरायच


R_joshi
Monday, April 09, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु धन्यवाद:-)
जो :-)

मी एक गुढ प्रश्न
उत्तर तु होशिल का
उधाणलेल्या सागराचा
शांत किनारा तु होशिल का?

प्रिति:-)


Mankya
Monday, April 09, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती काही मिळवतो
कसली सलते ही उणीव
चिमुटभर प्रकाशही देतो
उरलेल्या अंधाराची जाणीव !

माणिक !


R_joshi
Monday, April 09, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक:-)

चिमुटभर प्रकाशाची साथ
अंधारलेल्या रात्रित मौलाची वाटते
जिंकले जग जरी मी सारे
तुझ्याशिवाय मी अपुरीच राहते

प्रिति:-)


Mankya
Monday, April 09, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येकाच्यात जागते
पुर्णत्वाची ओढ उरी
तुझ्याविना कुठे मी उरते
सरीता सागरावीना अधुरी !

माणिक !


R_joshi
Tuesday, April 10, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक सुंदरच:-)

माझ अपुरपण
तुला कस कळणार
तु शिशिरातील इंद्रधनु
नेहमीच कसा नजरेस पडणार...

प्रिति:-)


Mankya
Tuesday, April 10, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या अगतिक आठवांना
सांग कुठे दवा आहे
जर जाणारा प्रत्येक क्षणच
तुझा माझ्यातील दुवा आहे !

माणिक !


R_joshi
Wednesday, April 11, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षणिक आठवांचा आनंद
किती मोलाचा असतो
तु कितीही दुर असलास
तरी माझ्याजवळ असतो

प्रिति:-)


Mankya
Thursday, April 12, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्यापासून मी दूर
जाईन फक्त तेंव्हा
प्राण कायेची वेस
ओलांडेल जेंव्हा !

माणिक !


Shree_tirthe
Thursday, April 12, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु कितीही नाही म्हणालीस तरी
तुझं माझ्यावर प्रेम आहे
जशी नदी सागराला
भेटण्यासाठी आतूर आहे.

--- श्री


Gobu
Thursday, April 12, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,
इतक्या सुन्दर रचना इथे होत आहेत
तुम्ही सर्व जण कौतुकास पात्र आहात
तुम्हाला कल्पना नसेल पण मराठी भाषेतील सुजन्शीलता इथे बहरतेय!!!
नवनिर्मीती होतेय आणि ती ही प्रचन्ड गुणवत्ता असलेली!!!
आणि हा बहर दिवसेदिवस फ़ुलतोय!!!
मला तुमच्यासारखे लिहीता येत नाही, पण नशीबवान आहे की मी हा अविष्कार अनुभवतोय!!!
मानक्या, जोशि, श्री, जो, जगु,...
मनापासुन अभिनन्दन!


Jagu
Friday, April 13, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेल आणि फ़ुल यांचे
एकमेकांशी नाते आहे
ते टिकवण्यासाठी
कमानीचा आधार आहे.


R_joshi
Friday, April 13, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु माझ नाव प्रिति आहे. अभिनंदनाबद्द्ल धन्यवाद :-)

मनाने बहरायचे ठरवले
मग वैशाख वणवा तो काय
प्रेमात जिंकायचे ठरवले
कायेची हद्द ती काय...

प्रिति:-)


R_joshi
Friday, April 13, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु फुलवलस तर
मला फुलायला आवडेल
लाजुन का होइना
गाल गुलाबी करायला आवडेल

तु ऊडायला शिकवलस तर
मला ऊडायला आवडेल
स्वप्नांच्या संसारात का होइना
तुझ्याबरोबर राहायला आवडेल

तु जगायला शिकवलस तर
मला जगायला आवडेल
चार सुखाचे क्षण
तुझ्याबरोबर जागायला आवडेल

तु साथ देशिल
हे मला सांगायला आवडेल
माझ जीवन तुझ्यासाठी
अर्पण करायला आवडेल.

प्रिति:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators