Chinnu
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:37 pm: |
| 
|
नकाशाचा शेर कुठेतरी वाचल्यासारखा वाटला! आहे छान.
|
नकाशा मी _ आनंद नकाशात उल्लेख नव्हता निराळा तुझे विश्व माझ्याच गावात होते सानी मिसर्यामध्ये (दुसर्या ओळीत) तिचे " विश्व " माझ्या गावात असण्यातच गंमत आहे . तिचे गाव माझ्याच गावात होते हे अगदी सहज लिहीता आले असते पण तो शेर सपाट झाला असता . परत " ते " गाव की " तो " गाव हा प्रश्न आहेच . त्याहूनही तिचे संपूर्ण विश्व माझ्या गावात म्हणजे माझ्याशी निगडित होते हा जास्त अर्थपूर्ण वाटला . चिन्नू ... वाचल्यासारखं " वाटलं " ह्याला काही अर्थ नाही . कुठे वाचलं आणि काय वाचलं हे ही लिहीलं असतंस तर बरं झालं असतं . तुझ्या वाचनात आलेलं असू शकतं पण माझ्या वाचनात असं काही नाही . just for information वाचनात आलं असतं तर एकतर पोस्ट करणे दूरच मी हा शेर लिहीलाच नसता किंवा अगदीच प्रेमात पडून तो शेर लिहीला असता जेव्हा जेव्हा जिथे जिथे पब्लिश केला असता त्या प्रत्येक ठिकाणी मूळ प्रेरणेचा स्त्रोत कोण आहे हे लिहीलं असतं . please make no mistake about it
|
Chinnu
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:01 pm: |
| 
|
वैभवा, जो शेर वाचला होता त्याला फार दिवस झालेत आणि तो तुम्ही लिहिल्याइतकापण सफाईदार नव्हता. त्यामुळे आठवणे शक्य नाही. मी कदाचित त्या शेराबद्दल पहील्या प्रतिक्रियेमध्ये उल्लेखण्यास विसरले, म्हणुन दुसरी पोस्ट टाकली. इतकच. विसराळूपणा बद्दल खेद आहे.
|
Ashwini
| |
| Wednesday, April 11, 2007 - 10:38 pm: |
| 
|
वैभव, प्रत्येक शेर भिडला. मतला सुरेख, मक्ता सुरेख. नकाशात उल्लेख नव्हता निराळा तुझे विश्व माझ्याच गावात होते अगदी... अगदी आरपार गेला. कशी वेळ पाळायची आसवांनी अवेळी तुझे गीत ओठात होते वा! शब्दच नाहीत. पुन्हा आज रेंगाळला प्राण माझा कुणी आपलेसे म्हणे आत होते केवळ अप्रतिम! इतक्या सुरेख उपक्रमाचा शेवट याहून सुंदर दुसरा कुठलाच होणे शक्य नव्हते. तुझे शब्द लेवून सजली प्रतिभा दुसर्या कुणाच्या न भाग्यात होते
|
Devdattag
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:10 am: |
| 
|
मस्तच आहेत सगळे शेर.. जर ही गज़ल तू लिहिली आहेस हे ध्यानात ठेवून वाचले तर मला तितकासा न भावलेला शेर.. 'कशी वेळ'.. कारण कल्पना फार वेगळी नाहीय.. अर्थात मांडणी सुरेखच सचिनने प्रत्येक सामन्यात निदान शतक झळकवावे हिच माफक अपेक्षा.. एक शंका, या गज़ल बद्दलच अशी नाही, पण एकुणातच.. काहि वेळा शेर वृत्तात बसून सुद्धा, लयीत बसत नाही उदा. तमासारखा राहिलो जन्मभर मी कधी सत्य आले उजेडात होते या वरच्या शेरात पहिली ओळ out of लय गेल्यासारखी वाटतेय, (निदान मला तरी) याचे कारण काय? यति भंग? मला यतिंबद्दल मला जास्त माहित नाहिये.. please explain
|
Pulasti
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:23 am: |
| 
|
वैभव, मस्त गझल! सर्वच शेर आवडले. उमगलो, श्वापद, शहर - हे विशेष!! पण मक्ता केवळ अप्रतिम आहे.. वाह वाह!! -- पुलस्ति.
|
अथपासून इतिपर्यंत अगदी वैभवाची गज़ल. बस्स इतनाही काफी है.
|
Zaad
| |
| Thursday, April 12, 2007 - 5:39 am: |
| 
|
वैभव, मला तुझ्या गझलांपैकी सगळ्यात ज्यास्त आवडलेली गझल आहे ही!
|
धन्यवाद मित्रांनो . देवा ... " कशी वेळ ... " हो कल्पना नवीन नाहीये . जस्टिफिकेशन म्हणून नाही पण एकतर कल्पनेत नाविन्य हवं किंवा मांडणी हवी . इथे मला वेळ , अवेळ चा खेळ आवडला . म्हणून तो मूळ गज़लेत ठेवला . लयीबद्दल म्हणशील तर एका गुरूला कुठले दोन लघू रिप्लेस करतायत यावर खूप काही अवलंबून असतं असं माझं मत आहे इथे तसं मला तरी वाटलं नाही . कधी प्रत्यक्ष बोलणं झालं तर चर्चा करता येईल
|
Devdattag
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:15 pm: |
| 
|
वैभव जरूर.. .. .. ..
|
Paragkan
| |
| Thursday, April 12, 2007 - 5:56 pm: |
| 
|
kya baat hai! khaasach! कुणी आपलेसे ... व्वा!
|
Zakasrao
| |
| Friday, April 13, 2007 - 4:24 am: |
| 
|
मास्तर तुम्ही तर मास्टर आहात. नकाशाची कल्पना खुप आवडली.
|
सही रे वैभव एकदम सही
|
Shyamli
| |
| Monday, May 07, 2007 - 2:28 pm: |
| 
|
जरा नीट सांगा कुणाला उमगलो कुणी पाहिले थेट डोळ्यात होते? वा वा नजर श्वापदाची, हसू माणसाचे, वसू लागले कोण कोणात होते उच्च!! कशी वेळ पाळायची आसवांनी अवेळी तुझे गीत ओठात होते आहा... शहर पेटलेले! कुणाला पुकारू? सखे सोबतीही जमावात होते! करावी कशी पाठ दुःखाकडे मी उभे हात जोडून दारात होते पुन्हा आज रेंगाळला प्राण माझा कुणी आपलेसे म्हणे आत होते वाह गुर्जी.. शहर पेटलेले आणि प्राण तर just !!! ही गझल वाचल्यावर आपण कायतरीच लिहीलय असं वाट्तय आज आधिच वाचलेली असती तर लिहील नसतं कदाचित.
|
Itsme
| |
| Tuesday, May 08, 2007 - 12:27 pm: |
| 
|
वैभव, सुरेख, सगळेच शेर खुपच छान ... ...
|