Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 10, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through April 10, 2007 « Previous Next »

Swaatee_ambole
Tuesday, March 27, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीशजींना पाठिंबा. :-)
   

Chyayla
Wednesday, March 28, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव जोशी व प्रसादच्या उपक्रमाबद्दल माझ्याही शुभेछा: ईकडे तर ईतक्या भयन्कर सुन्दर गजला लिहिल्यात सगळ्यानी की सगळ्यान्च्या गजला वाचुन वाSS वाSS लिहिताना हात दुखत आहेत.

तेन्व्हा ईथेच सगळ्यानाच वाSS वाSS म्हणुन घेतो.

गजल तरी माझ क्षेत्र नाही पण ईतक्या प्रतिभावान मायबोलिकरान्च्या गजला वाचुन धन्य झालो.


Meenu
Thursday, March 29, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीशजींना पाठींबा
च्यायला सगळ्यांच्या वतीने धन्यवाद ..!!


Meenu
Friday, March 30, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद च्या संदर्भात च्यायला कसं विनोदी वाटतय नं ..? वैतागुन धन्यवाद दिल्यासारखं ..

Pulasti
Saturday, March 31, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैतागुन धन्यवाद दिल्यासारखं ..
मीनु, ह. ह. पु. वा. :-) :-)

Chyayla
Tuesday, April 03, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसे का होईना धन्यवाद तर दीले त्यातच आपण खुष आहोत.. आभारी आहे.

Mayurlankeshwar
Tuesday, April 03, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्यशाळा संपली की काय? एवढा शुकशुकाट का? अजुन काही गझला येणे बाकी आहे असे वाटते.

Daad
Wednesday, April 04, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही, मी वरच्या पोस्टचा मालिक बघितलाच नाही त्यामुळे मीनूच्या पोस्टमधल्या सतीश"जीं" ना दिलेल्या विनम्र धन्यवादात, "च्यायला"ला अडखळले. आत्ता कळलं.(येडूच आहे मी तरी, च्या...)

Visunaik
Friday, April 06, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुक शुक कोणी आहे का इथे? पुढे काय झाले?निर्णय काय झाला तरही गज़ल स्पर्धेचा?

Nandini2911
Saturday, April 07, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची गझल कुठे हरवली?

Vaibhav_joshi
Saturday, April 07, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाचीही गज़ल हरवणार नाही . नंदिनी तुमच्या गज़ल वर विचार चालू आहे . तुम्हाला लवकरच मेल मिळेल. तसेच बी , योग जोशी व गणेश कुलकर्णी यांना मेल्स पाठवण्यात आल्या आहेत . त्यांनी शनिवार म्हणजे आजपर्यंत उत्तर पाठवायचे आहे .

स्पर्धेतील १० सर्वोत्कृष्ठ गज़ल सर्वांच्या पोस्ट झाल्याशिवाय किंवा " आता आम्हाला जमणार नाही " हे कळल्याशिवाय कश्या निवडणार ?

तरीही मंगळवार हा दिवस १० सर्वोत्कृष्ठ गज़ल मा. सुरेश वैराळकरांकडे घेऊन जाण्यासाठी निवडला आहे . कुठल्याही परिस्थितीत गुरुवारी निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न चालू आहेत . उर्वरित गज़लकारांनी सहकार्य करावे ही विनंती .

आतापर्यंतच्या गज़लवरती फक्त स्वाती आंबोळे यांनी त्यांच्या मतानुसार रेटिंग पाठवले आहे . आतापर्यंतच्या गज़लवरती माझे रेटिंग आज संध्याकळपर्यंत संपेल.इतर जाणकारांच्या अभिप्रायांची वाट पहात आहे


Bhramar_vihar
Monday, April 09, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुजी, निक्काल लवकर लावा. धीर धरवत नाहिये!

Meenu
Monday, April 09, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निक्काल भ्रमा निक्काल ..?

Yog
Monday, April 09, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा वैभव,
माफ़ कर रे. कामात असल्याने उशीर झाला. असो तुला गझल मेल gmail केली आहे. योग्य वाटली तर इथे कार्यशाळेत पोस्ट कर. मि केवळ प्रयत्न म्हणून आणि तुझे मार्गदर्शन मिळावे या हेतूने लिहीली होती.
आभारी.


Vaibhav_joshi
Monday, April 09, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग ,
गज़ल मिळाली . पोस्ट केली आहे वर . सुंदर गज़ल आहे .

मित्रांनो ...

ह्याबरोबरच आपल्या गज़ल कार्यशाळा संपन्न होत आहे . बी यांची सुधारित गज़ल सोमवार रात्री बारा वाजेपर्यंत आली नाही त्यामुळे घेता आली नाही .
अनिलभाईंच्या गज़लचा मतला व मक्ता त्यांनी बदलला आहे. तो ही आपण सर्वांनी वाचला नसल्यास आवर्जून वाचावा .

तसेच माणिक जोशी व गणेश कुलकर्णी यांच्या कल्पना सुरेख असूनही गज़ल वर काम करायला खूपच वेळ लागणार होता . त्यामुळे मी स्वतः विनंती करून त्यांना प्रवेश मागे घ्यायला सांगितला आणि त्यांनी मोठ्या मनाने ते मान्यही केले . या दोघांनाही मी एखाद्या शनिवारी एकत्र बसून गज़लेचे व्याकरण समजावण्याचे वचन दिले आहे . अर्थात माणिक ने
www.marathigazal.com च्या कार्यशाळेसाठी जवळपास निर्दोष गज़ल लिहीलेलीच आहे .

तसेच डॉ . गजानन व अपर्णा यांचीही सुधारित गज़ल वेळेत पूर्ण झाली नाही . पण ह्या सर्वांसाठी मी मेलवर सतत उपलब्ध असेन व लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न करेन . ( अपर्णा लवकरच मेल करतो . पुण्यात नसल्याने दिल्या वेळेनुसार मेल करणे जमले नाही )


कार्यशाळेच्या deadline मुळे तुम्हां मित्रांच्या गज़लवर वेळेअभावी काम करून इथे घेता आल्या नाहीत त्याबद्दल अत्यंत दिलगीर आहे . आणखी कुणाचे नाव चुकून राहिले असल्यास मला मेलवर कळवावे .

उद्या आपल्या कार्यशाळेतील १० सर्वोत्कृष्ठ गज़ल मा . सुरेशजी वैराळकर यांच्याकडे सोपवून येईन . गुरुवारी निकाल जाहीर केला जाईल .

तोपर्यंत बुधवारी सकाळी ह्या कार्यशाळेची मूळ गज़ल जी मी दीड एक वर्षापूर्वी लिहीली होती ती पोस्ट केली जाईल . त्या निमित्ताने माझेही नाव आपल्या सर्वांच्या फोल्डर्स सोबत येईल , यात मी ही भाग घेतला होता असं समाधान लाभेल इतकीच इच्छा .

या कार्यशाळेसाठी तुम्ही सर्व मित्रांनी दाखवलेला अभूतपूर्व उत्साह , माझ्या सर्व सहकार्‍यांनी केलेली मदत , मायबोलीच्या मा. ऍडमिन नी व मॉडरेटर्स ने दिलेले सहकार्य , फोल्डर्स तयार करण्यासाठी अमेरिकेत रात्री उशीरापर्यंत जागणारा समीर सरवटे यांचे आभार मान्ल्याशिवाय ही पोस्ट संपणारच नाही .

सर्वांना पुढील गज़ल लेखन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा
इतर बीबीं वरती जरी आपण भेटत राहू तरीही इथली आठवण येत राहील . i will miss u all कार्यशाळा सुरू असेपर्यंत मायबोलीवर इतरत्र काही लिहायचे नाही असा नियम घालून घेतला असल्याने खूप दिवस आपल्या मायबोलीवर काही लिहीणच झालं नाही
:-)
पण आज नाही . इथेच आधी इतरत्र पोस्ट झालेली माझी भुजंगप्रयातातली एक नज़्म पोस्ट करण्याह्चा मोह आवरत नाहीये आणि ती लिहील्यानंतर पुढे काही बोलण्यासारखं उरणार नाहीये . आपल्या संपलेल्या एका पर्वासाठी ......
:-)

पर्व


मनासारखे वागण्या बोलण्याचे
मनापसुनी मोकळे हासण्याचे
ऋतू लुप्त झाले कुठे सर्व माझे
कधी संपले पर्व ते जीवनाचे !
----
अनिर्बंध स्वप्ने नि दुर्दम्य आशा
क्षितीजे नवी गाठण्याचीच भाषा
सदा बेत आकाश जिंकावयाचे
धरा सोडुनी धावने पावलांचे
जणू वारियाशीच स्पर्धा मनाची
कशाला करावीच पर्वा कुणाची
कसा जोश होता , कसा वेग होता
उरी वादळाचाच आवेग होता
कसे ना समजले मला एवढेही
ललाटापुढे हारती वादळेही
असे वाटले आत्मविश्वास होता
अता जाणवे की अहंकार होता
जगाहून मी श्रेष्ठ आहे म्हणोनी
पुढे एकटा मीच गेलो निघोनी
कसे भान नव्हते मला संकटांचे
किती जीवघेणे जिणे एकट्याचे
नवी वेस ना सापडे पावलांना
जुनी वेस ना आठवे पावलांना
त्रिशंकूपरी हे जिणे होत नाही
धरेला , नभाला दया येत नाही
मनासारखे हासण्या बोलण्याचे
अता सोबतीला ऋतू आठवांचे
अता सर्व अस्तित्व भासांत आहे
म्हणावे उगी श्वास श्वासात आहे
....
म्हणावे उगी श्वास श्वासात आहे

लगागा लगागा लगागा लगागा
:-)




Swaatee_ambole
Monday, April 09, 2007 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, नज्म सुंदर आहे. :-)

मुळात अश्या online कार्यशाळेची कल्पना सुचणं, आणि ती इतक्या उत्तम प्रकारे तडीला नेणं, याबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हा एक वस्तुपाठच घालून दिला आहेस तू.
व्यक्तिशः मला या अनुभवातून खूपच शिकायला मिळालं.
मनापासून आभारी आहे. :-)


Daad
Monday, April 09, 2007 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सुंदर नज़्म.
असे वाटले आत्मविश्वास होता.. अता जाणवे की अहंकार होता.
किती सहज, सोप्पं पण अर्थपूर्ण लिहितोस.
स्वाती म्हणतेय ते खरंय. अपार मेहनत घेऊन तू ह्या कार्यशाळेचा एक सुंदर विचार "अंमलात" आणलास, खूप जणांची मदतही झालीये. पण मुळात मोट बांधणारा तूच.
तुम्हा सर्व गुरूजनांना एकच "गुरूदक्षिणा" देऊ शकतो आम्ही गज़लेला आपली म्हणायची, आपल्या परीने तिचा संसार फुलवायचा.


Meenu
Tuesday, April 10, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुजी पर्व सुंदर ..

Nandini2911
Tuesday, April 10, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरूजी... क्या बात है..
खरंच खूप शिकायला मिळालं या कायशाळेत..


Meghdhara
Tuesday, April 10, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव..!
शलाका आणि स्वातीला अनुमोदन.
शलाका अगदी खरं.. आपल्या परीने..!

मेघा





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators