|
आफताब... पाहिले,श्वापदे,लाभले,लाकडे,माणसे हे शब्द काफिया म्हणून वापरणे योग्य आहे काय? केवड्यांमधे साप पाहिले वेळोवेळी सज्जनांतही पाप पाहिले वेळोवेळी हे वाचल्यावर मला वाटले की 'पाहिले वेळोवेळी' हे रदीफ असेल आणि 'साप','पाप' हे काफिये असतील. आणि हे मीटर कोणते आहे? चू.भू.दे.घे.
|
Aaftaab
| |
| Monday, April 02, 2007 - 11:31 am: |
| 
|
मयुर वेळोवेळी हा जर काफ़िया मानला तर ए ही अलामत होउ शकते का? आणि मीटर हे असे आहे.. गालगालगा गालगालगा गागागागा तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.. माणिक.. मला 'हिंस्त्र श्वापदे' हा शब्द समूह गालगालगा असा वाटला. म्हणून पाहिला तर तसाच वाटतोय अजूनही... I may be wrong..
|
"वेळोवेळी हा जर काफ़िया मानला तर ए ही अलामत होउ शकते का?" 'वेळोवेळी' हा काफिया कसा असू शकेल? 'गालगालगा गालगालगा गागागागा ' हे मीटरही मी पहिल्यांदाच पाहतोय.
|
Pulasti
| |
| Monday, April 02, 2007 - 4:49 pm: |
| 
|
आफ़ताब, तुझ्या मतल्याने जी जमीन बनवलीये ती अशी .. रदीफ़: पाहिले वेळोवेळी काफ़िया: प अलामत: "आ" त्यामुळे पुढील सर्व शेरांमधे गडबड होते आहे. "पाहिले वेळोवेळी" हाच रदीफ़ का, फ़क्त "वेळोवेळी" का नाही असा फार तर्कशुद्ध आणि त्रासदायक प्रश्न पडतो.. मी हा सर्व त्रास स्वत: अनुभवलेला आहे पण इलाज नाही. गझलेच्या चौकटीचा हा भाग आहे. मतल्यातला सानी मिसर्यासाठी काही विकल्प - सज्जनांतही पाप दर्वळे वेळोवेळी सज्जनांतही पाप वळवळे वेळोवेळी असे काहीसे केले तर रदीफ़: वेळोवेळी काफ़िया: स्वर-काफ़िया "ए" अलामत: not applicable मग श्वापदे, लाकडे, लाभले, माणसे हे चालेल. माणसाळती,| हिंस्त्र श्वापदे|वेळोवेळी गालगालगा | गालगालगा| गागागागा मीटर परफ़ेक्ट आहे! -------------------- गझल धारदार आहे!! लाकडे शेर थोडा अस्पष्ट वाटतोय. पण बाकी सर्व शेर मस्तच! मतला आणि मक्ता तर तीरासारखे थेट आहेत!! प्रांत, धर्म, वा रंग, कारणे काहीबाही मधे "रंग" ऐवजी "वर्ण" कसे वाटेल? -- पुलस्ति.
|
पुलस्ति तुमचे विश्लेषण छान आहे... तरी पण काही शंका... जर काफिया केवळ 'स्वर काफिया' म्हणून गझलेत येणार असेल तर गझल लिहिताना नेहमीची काफिया निवड करताना होणारी खटपट बरीच कमी होईल असे वाटते. मीटर सोबत नुसते ई,ए इत्यादी स्वर सांभाळले म्हणजे गझल तंत्रशुद्ध आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे ह्यावर तुम्ही थोडासा प्रकाश टाकावा ही विनंती. केवळ स्वरकाफिया म्हणजे गझल उर्दूच्या अंगाने जाईल असे मला वाटते.
|
Aaftaab
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:25 am: |
| 
|
पुलस्ति.. तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.. स्वरकाफ़िया म्हणजे काय? काफ़िया आणि रदीफ़ एका शब्दात असू शकतात का? रंगाच्या जागी वर्ण चांगले वाटेल.. मॉड्स.. मला एडिट करता येत नाहिये पोस्ट. लाकडांच्या शेरमध्ये मला असे म्हणायचे आहे की तोडलेली झाडेच सरणातील लाकडे बनून त्यांचा सूड घेतात. मतल्यामध्ये असा बदल केला तर ही तंत्रशुद्ध होईल का? केवड्यामधे साप सापडे वेळोवेळी सज्जनांतही पाप पाहिले वेळोवेळी यातून बरंच शिकायला मिळतय हे नक्की..
|
आफ़ताब ... सही जा रहे हो .. पहिल्या गज़ल वर लिहायला वेळ झाला नाही पण इतर मित्रांनी सांगितल्याप्रमाणे " कळालेच नाही, वळालेच नाही " खटकले . पण किती काळजी 'काल' होती 'उद्या'ची कधी 'आज'चे सुख, मिळालेच नाही खूप आवडला . " वेळोवेळी " बद्दल थोडेसे .. वेळोवेळी रदीफ़ मस्त आहे . बर्याच जणांचा असा समज आहे की स्वरकाफ़िया वर based गझल उर्दूमध्ये सर्रास लिहीली जाते . पण स्वरकाफ़िया वर based गझल उर्दूमध्ये ही क्वचितच लिहीली जाते असं मी मा . इलाही जमादार यांच्याकडून ऐकलं आहे . शक्यतो टाळावं पण कल्पना आणि शेर महत्त्वाचे . आकृतीबंधाचा नंतर विचार करावा . केवड्यांमधे साप पाहिले वेळोवेळी सज्जनांतही पाप पाहिले वेळोवेळी केवड्यांत साप वेळोवेळी दिसणं ही आश्चर्याची बाब नाहीये पण कदाचित सज्जनांत पाप दिसणं हा sarcasm येण्यासाठी केवडा नसूनही साप पाहिले असं येणं गरजेचं होतं का ? विरोधाभास यायलाच हवा असं नाही पण मला असं वाटलं खरं ... compromise न करता लिहायची असेल तर " प " सांभाळून पाहिले वेळोवेळी चा रदीफ़ निभावून न्यावा लागेल . अवघड आहे असं वाटत नाही . कदाचित " पाहिले " मुळे अडचण येऊ शकते . मतल्यामध्ये " भेटले, व पाहिले " असं दोन मिसर्यांमध्ये वापरून पाय मोकळा करून घेता येईल लेकिन फिर लिखने में वोह मज़ा नही ..
आपण आणि शेर हा साप मुंगुसाचा खेळ असतो अस माझं अत्यंत आवडतं मत . ( तुझ्या साप वरून पुन्हा आठवलं ) जितकी कोंडी होईल तितकी मजा जास्त . भले वर्षभराने पूर्ण होईना पण " पाहिले वेळोवेळी " वर प्रयत्न कर . ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी अतीव समाधान देऊन जाईल ही रचना . शुभेच्छा .
|
Aaftaab
| |
| Tuesday, April 03, 2007 - 9:02 am: |
| 
|
thanks वैभव.. जरुर प्रयत्न करेन प्रॉपर रदीफ़ आणि काफ़िया वापरून पूर्ण करण्याचा... मला मतल्यामध्ये विरोधाभासापेक्षा दोन ओळीन्ची स्पर्धा अपेक्षित होती.. म्हणजे केवड्यात साप दिसणं जास्त obvious आहे की सज्जनांत पाप दिसणं जास्त common ? ते वाचकांनीच ठरवायचं.. प्रयत्न चालू आहे..
|
Chinnu
| |
| Tuesday, April 03, 2007 - 2:32 pm: |
| 
|
मयुरा, 'लढाई'तर जिंकलेलीच आहेस! मतला सहीच. अगदी टाळ्या वाजविल्या मी. शोकसभेला टाळून आलो वा! 'हिरवळ'? कोई है क्या? ;) हा शेरपण आवडला. चांदण्यांना आणि तू विजेचे काळीज सांभाळ हे दोन्ही शेर उत्तम आहेत, पण मला असे वाटले की त्यामुळे 'लढाईचे' महत्व कमी झाले. हे दोन्ही शेर यातुन वगळल्यास बरे. कमीतकमी चांदण्यांचा तरी. मला ते फ्लोच्या आड आलेत असे वाटले. CBDG! मक्त्यात उफाळून हा शब्द पटला नाही. उधळून आलो एकवेळ अर्थासाठी पुरक झाला तरी मात्रा जमत नाहीत. अर्थात हे झाले माझे मत. राहिलो ना स्मरणात आता तुझ्याही व्यर्थ का आठवणीस चाळून आलो! हा शेर खुप आवडला. सही जा रहे हो! लगे रहो. ..खरचटलं तर सावरून घ्या -नक्की कुणाला खरचटलं तर? आफताब, गुरुजनांचा वरदहस्त लाभल्यावर आम्ही पामरांनी काय बोलावं? Jeolous!
|
धन्यवाद चिन्नु.. 'उफाळून' च्या आधी मी असा विचार केला होता-- 'स्वाभिमानाचे रक्त गाळून आलो' ..मात्र हे फारच 'सपक' वाटलं म्हणून 'उफाळून' वापरलं नंतर... "चांदण्यांना आणि तू विजेचे काळीज सांभाळ हे दोन्ही शेर उत्तम आहेत, पण मला असे वाटले की त्यामुळे 'लढाईचे' महत्व कमी झाले." -- हे दोन्ही शेर गझलेच्या शीर्षकाला बाधा आणत असतीलही. पण शीर्षक 'लढाई' असे देण्यामागे वाचकाने 'आक्रमकतेच्या संवेदनांशी आत्मिक संवाद साधावा' असा काहीच हेतू नव्हता. आणि खरे म्हणजे 'चांदण्यां' आणि 'विजेचे काळीज' हेच शेर जरा ब-यापैकी बरे आहेत ह्या गझलेत. तेही काढून टाकल्यावर 'लढाई'ची 'तलवार' गायब होऊन नुसतेच 'म्यान' उरेल अशी भीती आहे असो. 'हिरवळ' 'तश्या' अर्थाने वापरण्याइतका भाग्यवान नाही मी अजुन. तशी 'हिरवळ' उगवून येईल तेव्हा आमच्या ख-या 'लढाया' चालू होतील. गुरुजनांचा वरदहस्त आहे म्हणूनच तर आपण सगळे लिहितोय . आता तुमचं पुढचं 'गोड गाणं' कधी येतंय
|
Chinnu
| |
| Tuesday, April 03, 2007 - 6:50 pm: |
| 
|
गोड गाणे आटले, त्याची बासुंदी झाली, शेजीबाईच्या शेतात पाउस पडला तहानल्या कोकराने सुस्कारुन मान टाकली, जंगलातल्या मोराचा नाच थांबला! ~D
|
Pulasti
| |
| Tuesday, April 03, 2007 - 10:00 pm: |
| 
|
अरे बापरे चिन्नु, हे काय भयंकर...ग्रेस, आरती प्रभु तबियतीची कविता वाटतेय.
|
खरंच भयंकर सुंदर... बासुंदी,शेजीबाई,कोकरू, मोर ह्या प्रतिमा पाहून मला complex mathematics आठवले!
|
आफताब.. स्वरकाफिया,अलामत इत्यादीच्या धांदलीत तुझी गझल निवांत पणे जाणून घेणे जमलेच नव्हते.म्हणून आता प्रतिक्रिया लिहितोय. प्रत्येक गझलेसोबत उंचावतोयस तू. keep it up 'वेळोवेळी' मधला मतला आणि मक्ता म्हणजे शाही-बते!! पुलस्तिंनी म्हटल्याप्रमाणे गझल धारदार आहेच,शिवाय सामाजिक मानसिकतेचे विविध कंगोरे समर्थपणे हाताळले आहेत तुम्ही वैभव ने म्हटल्याप्रमाणे 'पाहिले वेळोवेळी' हा रदीफ ठेवून नक्की प्रयत्न कर. पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा
|
Chinnu
| |
| Wednesday, April 04, 2007 - 3:03 pm: |
| 
|
पुलस्ति, कशाला हो गरिबाची थट्टा करता! मयुरा, तुझ्या कल्पनाशक्तीची धन्य. mathematics! जरा आपली गंम्मत.
|
Daad
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:51 am: |
| 
|
एक लडबडता प्रयत्न गज़ल लिहिण्याचा. दाखल्यावर का असेना आज माझे नाव आहे आज आनंदात मी, मृत्यूस माझा ठाव आहे मी उठवला हात, देण्या क्रांतिचा नारा कशाला? घ्या तुम्ही बोलून तुमच्या भाषणाला भाव आहे गाळते आभाळ आसू, अन भिजे माझे कलेवर भंगलेल्या काळजाने सोडलेला ठाव आहे वेस उघडी, ध्वस्त अंगण, मात्र जाग्या मसणवाटा पाळलेल्या श्वापदांनी राखलेला गाव आहे माणसा रे तू कशाला घालुनीया मान खाली तेच लुटती देव ज्यांचे भक्तिमार्गी नाव आहे आणती सौभाग्य विकण्या, लेक बोली लाविती ते राखती जल चाखुनी वर, मालकाचा आव आहे (आज ती नाही नजर, अन काजळाचे म्यान नाही आजही पण गंधगोरा, खोल जपला घाव आहे) जीवना रे, आंधळा होऊन खेळायास ये तू आंधळ्या कोशिंबिरीचा मांडलेला डाव आहे -- शलाका
|
वा!!वा!! दाद!! गझल सुंदर आहे. (आज ती नाही नजर, अन काजळाचे म्यान नाही आजही पण गंधगोरा, खोल जपला घाव आहे) मस्त आहे.'गंधगोरा' काय शब्द आहे!.फिदा ह्या शब्दावर!! छान मीटर... गालगागा*४. मक्ता खूप आवडला. सुंदर कल्पना जीवना रे, आंधळा होऊन खेळायास ये तू आज आनंदात मी, मृत्यूस माझा ठाव आहे इथे तेवढा यतिभंगाचा दोष आहे.बाकी perfect
|
Princess
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:54 am: |
| 
|
दाद, सही आहे... श्वापदांनी राखलेला गाव आणि आंधळी कोशिंबीर... आवडेश
|
Chinnu
| |
| Thursday, April 05, 2007 - 3:16 pm: |
| 
|
शलाका, लय भारी! ए गंधगोरा म्हणजे काय? मतला माझ्या डोक्यावरुन गेला. माझी उंची कमी आहे, हेच कारण असावे. (मी वेगळ्या प्रांतातली आहे, हे देखील कारण असावे असे विषण्णतेने नमूद करावे लागत आहे. ~D ) मतला सोडून प्रत्येक मिसरा एकदम झक्कास! मक्ता, बोले तो फुल्टू!
|
Desh_ks
| |
| Monday, April 09, 2007 - 5:37 am: |
| 
|
शलाका, वेस उघडी, ध्वस्त अंगण, मात्र जाग्या मसणवाटा पाळलेल्या श्वापदांनी राखलेला गाव आहे वंडरफ़ुल! सुंदरच आला आहे हा शेर! अगदी लक्षवेधी म्हणावं असा. आणि हा ही छानच आहे मी उठवला हात, देण्या क्रांतिचा नारा कशाला? घ्या तुम्ही बोलून तुमच्या भाषणाला भाव आहे अभिनंदन! तुम्हाला बहुतेक 'लडखडता' प्रयत्न म्हणायचं असावं. आणि ते तरी का असं वाटलं. छानच आहे की हे लिखाण. -सतीश
|
|
|