|
मित्रांनो, गज़लच काय, पण पद्य लिहायचा हा नंदिनीचा पहिलाच प्रयत्न आहे हे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का? ऋरु येत होते, ऋतु जात होते कळ्या लुप्त! काटेच बहरात होते कसा काळ सरला उमगलेच नाही कुण्या एक धुंदीत मी न्हात होते जरी झोंबल्या लाख जखमा मनाला हसू एक छापील गालात होते जरी तापले देह वणव्याप्रमाणे तरी चांदणे बाहुपाशात होते निखळली कशी पैंजणे आज माझी जरी बळ पुरेसे न पायात होते सजा भोगूनीही त्रिशंकू अवस्था? न स्वर्गात होते न नरकात होते ऋतू येत होते ऋतू जात होते जिणे मात्र एकाच श्वासात होते.
|
Daad
| |
| Monday, April 09, 2007 - 11:31 pm: |
| 
|
नंदिनी, पहिला प्रयत्न न वाटण्याइतकी छान उतरलीये गज़ल. कळ्या लुप्त, नंतरचा "विराम" मस्तच, अगदी सहज बोलल्यासारखं. मतला, सजा, मक्ता खूप आवडले. लिहित रहा हो, छान लिहिता. (तुम्ही चांगल्या कविताही लिहीत असणार.)
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:18 am: |
| 
|
नंदीनी.. छान आहे गझल..
|
Jo_s
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:12 am: |
| 
|
नंदिनी, उत्तमच आहे ही गझल खास करून ऋरु येत होते, ऋतु जात होते कळ्या लुप्त! काटेच बहरात होते जरी झोंबल्या लाख जखमा मनाला हसू एक छापील गालात होते आणि सजा भोगूनीही त्रिशंकू अवस्था? न स्वर्गात होते न नरकात होते हे शेर, क्या बात है.... कमीत कमी ५ शेर लागतात म्हणून नाहीतर् हेच सगळ बोलून जाताहेत. सुधीर
|
Princess
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:14 am: |
| 
|
हे नंदिनी, सुरेख लिहिलय... कळ्या लुप्त, छापील हसु आणि पैंजणे विशेष आवडले. तू नक्कीच छान लिहु शकशील, याची खात्री वाटते.
|
वा.. सारेच शेर आवडले..
|
Mankya
| |
| Tuesday, April 10, 2007 - 5:15 am: |
| 
|
नंदिनी ... हि गज़ल फारच वेगळी बरं ! जीवनक्रमानुसार लिहिलिये तू तर .. म्हणजे बघ जीवनाच कश्या उत्पत्ती, स्थिती अन लय अशा अवस्था असतात तशीच वाटली ! एकंदरीत मतल्यापासून मक्त्यापर्यंतचा प्रवास आवडला ! मतला ... लुप्त शब्दाचा वापर आवडला ! धुंदीत ... ईथे ही गज़ल तारुण्यात प्रवेश करतेय ! हसू छापील ... वाह ! चांदणे .. विरोधाभास उत्कृष्ठ साधलायेस ! त्रिशंकू .. मस्तच .. ईथे तारूण्य संपून लयाकडे वाटचाल ! एकाच श्वासात .. मक्ता अप्रतिम ... आवर्तन पुर्ण ... जीवनाचं अंतिम सत्य ! प्रयत्न ...???? अन तो ही पहिला ..??? वाटत नाही ! माणिक !
|
नंदिनी, तुझ्या कथे सारखीच गजलही छान उतरलीये. तुझ्याकडुन अपेक्षा वाढल्यात!
|
Chinnu
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:10 pm: |
| 
|
कळ्या लुप्त! काटेच बहरात होते जरी झोंबल्या लाख जखमा मनाला हसू एक छापील गालात होते जरी तापले देह वणव्याप्रमाणे तरी चांदणे बाहुपाशात होते सजा भोगूनीही त्रिशंकू अवस्था? न स्वर्गात होते न नरकात होते ऋतू येत होते ऋतू जात होते जिणे मात्र एकाच श्वासात होते. नंदिनी! वरील सर्व शेर आवडले. लिहीत रहा. पु.ले.शु.
|
Jayavi
| |
| Tuesday, April 10, 2007 - 3:58 pm: |
| 
|
नंदिनी........किती मस्त surprise दिलंस..... गझल फ़ार फ़ार आवडली. आता तुझ्या छान छान गोष्टींसारख्या तुझ्या कविता, गझल पण वाचायला मिळ्णार मतला एकदम आवडेश!! जरी झोंबल्या लाख जखमा मनाला हसू एक छापील गालात होते वा........क्या बात है! लिहित रहा गं....!
|
नंदिनी एक एक शेर सुंदर. आणि पहिलं पद्य? ग्रेट!!! मेघा
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 10, 2007 - 5:35 pm: |
| 
|
नंदीनी, मला खुप आवडली हि गझल. मला पैजणाच्या शेर मधे दुसर्या ओळीत, न नसावा, असे वाटतेय.
|
Pulasti
| |
| Tuesday, April 10, 2007 - 6:40 pm: |
| 
|
नंदिनी, गझल खूप आवडली! पहिलाच काय १००वा प्रयत्न असता तरी आवडावी अशी गझल आहे.. छापील हसू, पैंजणे, त्रिशंकू - मस्त शेर. पण मतला केवळ अप्रतिम!! तयार मिसर्यावर शेर लिहिणे खूपच कठीण असते.. निदान मला तरी फार अवघड जाते. पण तुझा "कळ्या-काटे" शेर .. वा! वा!! लिहित राहा. शुभेच्छा!! -- पुलस्ति.
|
नंदिनी मस्त झालीय. मतला तर सगळ्यात सहज आहे.
|
Zakasrao
| |
| Friday, April 13, 2007 - 4:22 am: |
| 
|
नन्दिनी मला गजल मधल बिल्कुल कळत नाही पण कार्यशाळेमुळे आता इकडे येवुन वाचायला सुरवात केली आहे. मागचे ३- ४ दिवस डोक शांत नव्हत म्हणुन आज परत गजल वाचली. गजल आवडली. १, ३ , ६ नं. चे शेर खुप आवडले. तुला ल गा गा शेवटी झेपल म्हणायच.
|
Pendhya
| |
| Friday, April 13, 2007 - 11:51 am: |
| 
|
बोहोत खूब! क्या बात है! माहित नव्हतं की तू गजल पण करत असशील. कुठला एक शेर निवडू? संपुर्ण गजलच अप्रतीम आहे. लिहीत रहा.
|
Shyamli
| |
| Wednesday, May 09, 2007 - 6:31 pm: |
| 
|
अभिनंदन ग, मतला जीवघेणा आहे अगदी आणि छापील हसू पण सहीच, वडलं
|
|
|