Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 07, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » झुळूक » Archive through April 07, 2007 « Previous Next »

R_joshi
Saturday, March 31, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,माणिक,मनोगत:-)

ऋतुसंगे बदलणारे
ऋतुसारखेच असतात
क्षणात हसविणारे
जन्माच दु:ख देऊन जातात

प्रिति:-)


R_joshi
Saturday, March 31, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निष्पर्ण वृक्षाचे दु:ख
गळणा-या पानांनाच ठाऊक
ऊन्हात तापताना पोळणा-या
त्याच्या शाखांनाच ठाऊक

प्रिति:-)


Gobu
Saturday, March 31, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्क्या,
खुप छान लिहीतोस रे!!!
कसे सुचते तुला हे?!
जगु,
वास्तवादी आहे हो चन्द्र!!!
श्री,
तुझे बरसणे अप्रतिम आहे!!!
एक छान झुळुक्:
सगळ तुला देवुन पुन्हा
माझी ओन्जळ भरलेली
पाहील तर तुझी ओन्जळ
तु माझ्या ओन्जळीत धरलेली

(सदर चारोळी चन्द्रशेखर गोखले या कवीची आहे, माझी नाही)


Giriraj
Saturday, March 31, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रयत्न तुज विसरण्याचा
पण तीही एक याद असते,
घेतो आडवळणे मग मीही,
तरी पोचती तुजपास हे रस्ते!


गिरीराज


Jo_s
Saturday, March 31, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रस्ता जात नाही कधीच कुठे
आपणच जातो इथून तिथे
तो कुणास आडवत नाही
आडणाऱ्याना नेत नाही
जाणतो नेमके स्वत:चे काम
जाणाऱ्याना जाऊ देणे,
बाकी वेळात करावा आराम


Mankya
Monday, April 02, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरा आहे मी एकाकी
सुखविता मज कशाला
मनाची चिता पुर्वीच पेटली
मृत मनाचा अता दुखवटा कशाला !

माणिक !


R_joshi
Tuesday, April 03, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक उत्तम:-)

मी न सुख पाहिले
मज न त्याचे दु:ख काही
वेदनेच्या सुरांमध्ये
जीवनाचे मी गीत गाईन

प्रिति:-)


Manogat
Tuesday, April 03, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षितिजाच्या उंबरठ्यावरुन,
नभ गाठायचे आहे,
जिवनात सुख सुद्धा,
असेच एकदा उपभोगायचे आहे...


Manogat
Tuesday, April 03, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरांचे संगती
वेदनांचे गान आहे,
दु:ख माझे,
माझ्या कलेचे प्राण आहे.


Mankya
Tuesday, April 03, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनःपुर्वक आभार ... प्रिति, गोबू ( कस सुचत वगैरे काही नाही रे, ईथेच तर शब्दांचा गाव आहे, ईथूनच घ्यायचे अन ईथेच द्यायचे ! )

तारुण्याच्या क्षितिजावरती
नभांगणात हजार तारे जळती
काही डोळ्यास दिपवती
तर काही मनात सलती !

माणिक !


Jo_s
Wednesday, April 04, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणीक छान आहे चारोळी, पण अशी केली तर कशी वाटते पहा?

तारुण्याच्या क्षितिजावरती
नभांगणात हजार तारे
डोळ्यांस काही दिपवती तर
मनात काही सलती कारे


Shree_tirthe
Wednesday, April 04, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद गोबु!

हजार दु:खं भोगले
एकच सुख पाहिले
तिच्या डोळ्यांतून आज
आनंद अश्रू वाहिले


Manogat
Wednesday, April 04, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उजेडा साठि झगडतो,
प्रत्येक दिशेस आहे आंधार,
आज जीवनात पुन्हा शोधतो आहे,
दिशा दाखवणारा तो आधार.


Mankya
Wednesday, April 04, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jo_s.. मनात येतं तसच उतरवतो, कुठलाच बदल करत नाही ! ते सुचतं ही तर गुरुकृपाच ! तूझी सूचनाही छान आहे बरं !

अवचित काही घडलं तर
न्याय मागतो दैवाकडं
पण दैवानच केला वार तर
करू फिर्याद कुणाकडं ?

माणिक !


Shree_tirthe
Wednesday, April 04, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा एकमेकांच्या सोबतीने
आपण आभाळ गाठायचं
असं अवचित घडल्यामूळे
तू नाही गोठायचं

आलेल्या संकटांना
धीटपणे लढायचं
ऊगाच घाबरून
नाही रडायचं

मित्रा एकमेकांच्या सोबतीने
आपण आभाळ गाठायचं...


Gobu
Wednesday, April 04, 2007 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणक्या आणि श्री
फ़ारच सुरेख!!!
मनोगत,
तुमची "वेदना" आवडली
अप्रतिम!
सुन्दर!
अफ़लातुन!

मित्रानो,
लिहित जा...
आणि हो हे घ्या....


Mankya
Friday, April 06, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हारलो या प्रश्नापुढे
का सापडत नाही उत्तर
प्रयत्नांती परमेश्वर
का दैव बलवत्तर ?

माणिक !


Meghdhara
Friday, April 06, 2007 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक
त्या प्रश्णाबाहेर येऊ शकलास तर
त्याला तुझं आयुष्या व्यापू दिलं नाहीस तर
नक्की दिसेल मार्ग स्वच्छ
नी येईलही पाठोपाठ उत्तर.

मेघा


R_joshi
Saturday, April 07, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळुक बहरतेय हळुहळु. अशीच बहरत राहु दे:-)

प्रश्न निर्माण झाले
कि उत्तर हि मिळणार
प्रश्नांच्या गर्द काळोखात
जीवनाचे उत्तर दिसणार

प्रिति:-)


R_joshi
Saturday, April 07, 2007 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधाचा गोडवा चाखताना
मधमाशीचे श्रम विसरु नकोस
मी जिंकलो हे सांगताना
माझी हार विसरु नकोस

प्रिति:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators