मित्रांनो , " मला गज़ल जमणार नाही " ते " माझी गज़ल नकोच पोस्ट करायला " असा प्रवास करणार्या प्रिंसेस ची गज़ल वाचून वाटेल तरी का, की हे ती म्हणाली असेल ?
स्वतःवर अपेक्षांचं जास्त ओझं न लादता सहज जे लिहीलं जातं ते दिसतंच दिसतं . आधी प्रेमाचा विषय म्हणत म्हणत त्याच लहज़ामध्ये प्रिंसेस जेव्हा सामाजिक विषयाकडे वळते तेव्हा कौतुक वाटल्यावाचून रहात नाही . असो . प्रिंसेस ऋतू येत होते , ऋतू जात होते तुझे भास माझ्या निसर्गात होते कुठे लागला नेम माझा कळेना कुठे राहिले तीर ताब्यात होते मुखाने जरी लाख नाही म्हणाली इशारे तिच्या त्या बहाण्यात होते सुनी भिंत माझ्या घराची विचारे कुणी सांडले रंग व्योमात होते खुळ्याने तिच्यावर उगा वार केले जिचे प्राण त्याच्याच हृदयात होते सभोवार माझ्या पशू हिंडणारे कुठे मानवी अंश माझ्यात होते ?
|
Bee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 5:34 am: |
| 
|
सभोवार माझ्या पशू हिंडणारे कुठे मानवी अंश माझ्यात होते ? >> वा अप्रतीम केला आहे शेवट.. संपूर्ण गझल सुंदर आहे..
|
Desh_ks
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:11 am: |
| 
|
प्रिंसेस, सुंदर झाली आहे तुमची गझल. मतला आणि मक्ता ही छान! विशेषत: मक्त्या मधे इतरांचे दोष पाहातानाच निर्देशित झालेली अंतर्मुखता लक्षणीय आहे. असं स्वत:कडेही परीक्षकासारख पाहाणार्यात जरी पशुत्वाचा अंश असेल तरी तो पूर्ण नियंत्रणात असेल अस वाटलं. आणि हे शेर तर फारच सुंदर आहेत कुठे लागला नेम माझा कळेना कुठे राहिले तीर ताब्यात होते सुनी भिंत माझ्या घराची विचारे कुणी सांडले रंग व्योमात होते खुळ्याने तिच्यावर उगा वार केले जिचे प्राण त्याच्याच हृदयात होते अभिनंदन! -सतीश
|
Jayavi
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:41 am: |
| 
|
पूनम तुझी गझल खूप खूऽऽऽप आवडली. मतला तर एकदम लाजवाब ! कुठे लागला नेम माझा कळेना कुठे राहिले तीर ताब्यात होते सगळ्यात जास्त आवडला हा शेर! व्योम म्हणजे काय गं? मक्ता तर अप्रतिम!! मजा आ गया दोस्त!
|
Zaad
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:45 am: |
| 
|
झक्कास!! सगळेच शेर आवडले!! मनापासून अभिनंदन, असेच लिहीत रहा.
|
Jo_s
| |
| Wednesday, April 04, 2007 - 7:08 am: |
| 
|
प्रिंसेस, ग्रेट आवडली गझल, खास करून हे शेर जास्तच आवडले कुठे लागला नेम माझा कळेना कुठे राहिले तीर ताब्यात होते खुळ्याने तिच्यावर उगा वार केले जिचे प्राण त्याच्याच हृदयात होते सभोवार माझ्या पशू हिंडणारे कुठे मानवी अंश माझ्यात होते ?
|
Daad
| |
| Wednesday, April 04, 2007 - 7:19 am: |
| 
|
पूनम, अप्रतिम गज़ल. सगळीच्या सगळी गज़ल आवडली. त्यातही नेम, सुनी भिंत, पशू चे शेर खास करून आवडले. जया, व्योम म्हणजे आकाश (पूनम, बरोबर आहे?). मस्तच आहे.
|
Psg
| |
| Wednesday, April 04, 2007 - 7:42 am: |
| 
|
वाह प्रिन्सेस! हे शेर विशेष आवडले, पण एकूणात पूर्ण गजलच मस्त! कुठे लागला नेम माझा कळेना कुठे राहिले तीर ताब्यात होते सुनी भिंत माझ्या घराची विचारे कुणी सांडले रंग व्योमात होते खुळ्याने तिच्यावर उगा वार केले जिचे प्राण त्याच्याच हृदयात होते अजून येऊदे
|
Princess
| |
| Wednesday, April 04, 2007 - 9:36 am: |
| 
|
बी, सतिश, जयु, झाड, सुधीर, दाद आणि पूनम खुप खुप धन्यवाद. जयु, व्योम म्हणजे आकाश. दाद, बरोबर आहे तुझे पूनम, अजुन येउ दे ... प्रयत्न नक्कीच करेन.
|
Meghdhara
| |
| Wednesday, April 04, 2007 - 10:16 am: |
| 
|
प्रिन्सेस वाह! अगदी भिडते गज़ल. कुठे लागला.. क्या बात है. खुळ्याने..सुंदरच. मक्ता प्रश्णचिन्हाशिवायही वेगळाच अर्थ देऊन जातो. मेघा
|
Mankya
| |
| Wednesday, April 04, 2007 - 10:25 am: |
| 
|
प्रिंसेस .. विषय छान निवडलेत अन मांडलेत .. एकंदरीत मस्त आहे प्रवास मतल्यापासून मक्त्यापर्यंत .. गजलेची विविध विषय हाताळण्याची ताकद दिसून आली या गजलेत ... अभिनंदन गं ! मतला .. खूप वेगळा अन मस्तच ! राहिले तीर .. जमूनच गेलाय अगदी ! इशारे .. गोड वाटला ! सुनी भिंत .. आशय खूप आवडून गेला .. शेरही खूप दमदार ! उगा .. भिडला मनाला हा तर ! मक्ता ... शब्दरचना अन मांडणी अप्रतिम ! माणिक !
|
प्रिन्सेस... वा... लय भारी... सर्वात आवडलेले शेर... मुखाने जरी लाख नाही म्हणाली इशारे तिच्या त्या बहाण्यात होते दोन टोकाचे भिन्न अर्थ आहेत या शेर मध्ये! वा... खुळ्याने तिच्यावर उगा वार केले जिचे प्राण त्याच्याच हृदयात होते काय कातिल शेर आहे हा!.. हळूवार घाव घालून जाणारा... आता थोडं न कळलेलं.. सुनी भिंत माझ्या घराची विचारे कुणी सांडले रंग व्योमात होते .. समजावून सांगा ना! मक्ता फारच जबरदस्त आहे... लिहीत रहा.. शुभेच्छा..
|
Ashwini
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:05 am: |
| 
|
प्रिंसेस, छान आहे गझल. आवडली.
|
Princess
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:34 am: |
| 
|
पुन्हा एकदा सगळ्याना धन्यवाद. आनंदयात्री, मला अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे- सुनी भिंत हे एकाकी पणाचे, दु:खाचे रुपक आहे. सदैव दु:ख मिळालेली व्यक्ती जेव्हा इतराना मिळणारा आनंद, सुख पाहते तेव्हा तिच्या मनात काय येते ते मला यातुन सांगायचे होते. अजुन एक अर्थ माझ्या नवर्याला सापडलेला तो असा की, अगदी गरीबीने गांजलेला माणुस जेव्हा अतोनात पैसा असणार्याकडे पाहतो त्यावेळी त्याला हे वाटु शकते. शब्दश: सांगायचे तर सुनी भिंत म्हणजे मला रिकामी भिंत, जिची सजावट झालेली नाही अशी भिंत म्हणायचे होते.
|
प्रिन्सेस, प्रत्येक शेर भिडतो आहे. >>कुठे लागला नेम माझा कळेना कुठे राहिले तीर ताब्यात होते कुठेची पुनरावृत्ती सुद्धा खटकत नाहीये इतका छान. हा प्रेमातला हताशपणा जेंव्हा कवी व्यक्त करतात ना तेंव्हा ते फार क्यूट दिसतात >>मुखाने जरी लाख नाही म्हणाली इशारे तिच्या त्या बहाण्यात होते साधी कल्पना पण किती गोड शब्द. >>सुनी भिंत माझ्या घराची विचारे कुणी सांडले रंग व्योमात होते फुल मार्क्स.
|
Chinnu
| |
| Wednesday, April 04, 2007 - 2:40 pm: |
| 
|
पुनम कुठे लागला नेम? माझी गाडी त्या शेरावरुन पुढे हलत नाहिये! लयी आवडेश. सुनी भिंत फार फार सुंदर. मी जरा 'जास्त'च विचार करत असेन बहुदा, पण मला मतला रुचला नाही. तुझे भास माझ्या निसर्गात? त्यापेक्षा तुझे भास माझ्या असण्यात, दिसण्यात किंवा फुलण्यात नाही का चालणार? अर्थाचा प्रॉब्लेम नाहीये. काहितरी खटकतयं एवढच. दिवे आधिच घेवुन ठेवले आहेत!
|
वा... प्रिन्सेस... समजावून सांगितल्यावर कळला अर्थ... तुम्हा दोघांनाही जाणवलेले अर्थ योग्यच आहेत...
|
Mrinmayee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 3:01 pm: |
| 
|
गझल खूपच आवडली. कुठे लागला नेम माझा कळेना कुठे राहिले तीर ताब्यात होते... क्या बात है!
|
Paragkan
| |
| Wednesday, April 04, 2007 - 4:27 pm: |
| 
|
wah .. khaasach! shewatach sher class!
|
Pulasti
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:23 pm: |
| 
|
प्रिंसेस - गझल खूप आवडली! मतला जरा सपाट वाटला. भिंत - उला मिसरा मस्तच आहे पण सानी मिसरा -- अर्थ वाचूनही -- अजून स्पष्ट होऊ शकला असता असे वाटते. नेम - फारच छान! वार - वाह! वाह!! मक्ता - अप्रतिम! मेघाची सूचनाही आवडली. ? काढले तर शेरातली तर्कशुद्ध प्रामाणिक अंतर्मुखता अधिकच गहिरी होइल असे वाटते. -- पुलस्ति.
|
Princess
| |
| Thursday, April 05, 2007 - 2:19 am: |
| 
|
अभिप्रायाबद्दल सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद. चिनु, पुलस्ति तुमच्या सुचना आवडल्या. पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन.
|
Princess
| |
| Thursday, April 05, 2007 - 2:42 am: |
| 
|
गझल कार्यशाळेत भाग घ्यावा की न घ्यावा, यासाठी मी खुप द्विधा मन:स्थितीत होते. गझल मला एक खुप क्लिष्ट प्रकार वाटायचा. त्याचा अनुभवही मी गझल लिहिताना घेतला. आपल्या मनातील भावनासाठी चपखल शब्द सापडणे खुप कठिण आणि नंतर त्या शब्दाना गझलेच्या नियमात बसवणे अतिकठिण. माझ्या गझलसदृश रचनेला गझल बनविणार्या गुरुजीना साष्टांग दंडवत. वैभव, मी खरोखर खुप आभारी आहे तुझी. गझल लिहिता येइल की नाही हे नक्की माहित नाही मला पण गझल समजेल हे नक्की.तू दिलेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शन अनमोल आहे. आपली सदैव ऋणी राहिन.
|
सुनी भिंत माझ्या घराची विचारे कुणी सांडले रंग व्योमात होते .... वा वा खरच अगदि उत्तम लिहलय तुम्ही पण ही प्रश्णार्थक ही वाटतात
|
प्रिन्सेस... खरंच खुप मस्त शेर आहेत सगळे,, वेगवेगळ्या अर्थाचे आणि तरी धमाल.. अजून येऊ दे...
|