Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 25, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » कथा कादंबरी » दोन ओंडक्यांची होते... » Archive through March 25, 2007 « Previous Next »

Marhatmoli
Saturday, March 17, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझि M.SC. चि परिक्शा नुकतिच संपलि होति, 'आता पुढे काय?' हा प्रश्न आवासुन नाहि पण उभा राहिला. तसा आतापर्यंत ह्यावर विचार केलाच नव्हता अस नाहि पण काहि ठरवल नव्हत. 'एकदा Degree हाति आलि कि ठरवुया कय ते' असाच प्रत्येक विचारमंथनाचा शेवट व्हायचा. तस मला Biochemistry related एखाद्या विषयात Ph.D. करायला आवडल असत, पण यापुढे ३४ वर्षे शिक्शणासाठि आई आणि मुख्य म्हणजे बाबा लग्न लाबंणिवर टाकु देणार नाहित याचि खात्रि होति. 'मुलिंचि लग्न लवकरात लवकर उरकुन टाकावित' हे बाबांच मत, आणि त्यामगचि कारण (आजोबा नसल्यामुळे दोन आत्यांचि लग्न ठरवताना त्याना आलेले अनुभव) या बद्दल मला पूर्ण कल्पना होति. अश्या परिस्थितित Ph.D. मुद्द्यावर त्यांच काय उत्तर असणार हे कळायला त्यांना विचारायचि गरजच नव्हति. अर्थात तेन्व्हाचा आणि आजचा काळ....' वगैरे कारण नक्किच देता आलि असति पण त्यांचा काहिहि उपयोग होणार नाहि हे पण ठावुक होत. तसा माझा लग्नाला विरोध नव्हताच पण 'बघायला येणदाखवायला नेण' याचि कुठल्याहि मुलिला असते तशि मला हि चीड होति. अर्थात माझ्या कल्पना आणि वास्तव यातला फ़रक जाणवत होताच त्यामुळे मनाचि तयारिहि होत होति.

पण काहिच न करता लग्नाचि वाट बघत बसायच नव्हत मला. काय करायच नाहि हे जरि नक्कि होत तरि काय करायचय याबद्दल उजेडच होता. आठवडाभर हे सगळे विचार सुरुच होते पण निर्णय काहि झाला नव्हता. meanwhile बाबांनि एक दोन विवाह मंण्ड्ळात माझ नाव नोंदवल होत.

त्या दिवशि अचानक विद्या मामिचा phone आला. मला म्हणालि आता मोकळिच आहेस तर इथे (दिल्लिला) ये ना.


Dhoomshaan
Sunday, March 18, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hey, मला पण basically ते दाखवणं वगैरे प्रकार अज्जिबात आवडत नाहीत..............

anyways, good start!

Marhatmoli
Wednesday, March 21, 2007 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Amruta ,

हि माझि पहिलिच कथा आहे, ती कोणितरि वाचतय हे वाचुन बर वाटल.


Marhatmoli
Wednesday, March 21, 2007 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विद्या मामी फ़ारतर आईहुन एखाद्या वर्षानेच लहान असेल पण तिच्याशि बोलताना generation gap कधि जाणवलिच नाहि. त्या काळि तिच्या आणि मामाच्या प्रेम विवाहाने बरिच खळ्बळ माजवलि होति म्हणे. आंतरजातिय विवाह आजहि कितपत स्विकारले जातात मला खात्रि नाहि. मग हि तर २० वर्षांपुर्विचि गोष्ट. मामा front वर होता तेंव्हा ती जवानांच्या बायकान्साठि 'स्वयंपूर्णा' वर्ग चालवायचि. फ़क्त आर्थिकच नाहि तर त्याना भावनिक द्रुष्ट्या सक्शम बनवण हे ह्या project च ध्येय होत. पण दरम्यान एका accident मध्ये ममाचि गुड्घ्याचि वाति गेलि आणि त्याला लष्करातुन निव्रुत्ति घ्यायला लागललि. मग मामा दिल्लिला एका multinational मध्ये रुजु झाला आणि मामिने 'महाभारतातिल व्यक्तिरेखांचे possible anthrapoligical origins ' हा topic घेवुन Ph.D. साठि register केल.

मामि great वाटायचि नक्किच पण आतापर्यन्त तिच्याशि कधि निवांत बोलायला मिळालच नव्हत. २३ वर्षात कधितरि ८१५ दिवस मामा, मामी यायचे, त्यांच्या घरि (म्हणजे आसाम किंवा काश्मिर border च्या जवळ) जाण कधि जमलच नाहि, त्यामुळे लहान्पणि तरि मामिशि अशि खास जवळिक नव्हति. त्यामुले ति संधि मी आता घ्यायच ठरवल. शिवाय 'पुढे काय करायच, होणारा नवरा' इत्यादि विषयांवर तिच्याशि बोलता हि आल असत.


Kashi
Wednesday, March 21, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vachtoy..vachtoy amhipan..fakta lavkarlavar post kara..

Manutai
Wednesday, March 21, 2007 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचा भाग मराठमोळी? मी पण वाचते आहे.

Disha013
Wednesday, March 21, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग,रश्मी,सगळे वाचत असतात बघ. सुरुवात छान झालिये आता पुढचे तु पटपट लिही.:-)


Runi
Wednesday, March 21, 2007 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी,
सुरुवात छान झालीये एकदम. पुढचे भाग लवकर टाक, आणि जरा मोठे मोठे टाक ना भाग म्हणजे अजुन मजा येइल वाचायला.
रुनि


Marhatmoli
Thursday, March 22, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सगळ्यांना,

पूर्ण झालि गोष्ट कि तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रिया अपेक्शित आहेत.


Marhatmoli
Thursday, March 22, 2007 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझि हि पहिलिच दिल्लि भेट होति त्यामुळे प्रत्येक गोष्टिचि नवलाइ होति. नागपुर मोठ असल तरि भव्य नव्ह्त. त्यामुळे सुरुवातिचे काहि दिवस तर भटकण्यात गेले. दिल्लि हाट, चांदनि चौक, India gate या आतापर्यंत फ़क्त ऐकुन माहिति असलेल्या गोष्ति बघताना खुप मजा आलि. तरि अजुन फ़त्तेपुर सिक्रि, आग्रा वगैरे होतच बघायच. पण सगळ्यांचाच सुरुवातिचा उत्साह (त्यांचा दाखवण्याचा आणि माझा बघण्याचा) थोड थंडावला, शौनक (मामेभाउ) त्याच्या मित्रमंण्डळित गुंतला आणि घरि माझ्या आणि मामिच्या गप्पा रंगायला लागल्या.भारतिय लष्कर आतापर्यंत फ़क्त बातम्यातुन माहिति होत मामिला ऐकताअना मला पहिल्यांदाच ति 'माणसांचि दुनिया' असते याचि जाणिव झालि. युध्दात प्राणार्पण करणार्या सैनिकाना दोन मिनिटांचि मुक श्रधांजलि वाहिलि कि लष्कराला आणि त्या सैनिकांनाहि विसरायला आपण सगळे मोकळे. फ़ारतर कारगिल मदत फ़ंडाला ५ रु. मदत करणार!

त्या दिवशि अश्याच मी आणि मामि बोलत बसलो होतो तेवढ्यात खुप गोड आवाजात हाक आलि, मामि म्हणालि स्निग्धा असणार. मग मामिनि तिला घरिच बोलावल माझि ओळख करुन द्यायला. स्निग्धा त्याच complex मध्ये रहायचि. वर्षा-दिडवर्षापुर्विच तिच लग्न झाल होत आणि आठ महिन्यांपुर्वि ते दिल्लिला आले होते. आमच्या जुजबि गप्पा सुरु होत्या तेवढ्यात स्निग्धाला तिच्या नवर्यानि आवज दिला आणि ती निघुन गेलि. मी गम्म्त म्हणुन मामिला म्हंटल, इतका handsome नवरा मिळणार असेल तर मीहि लग्न करिन म्हणते. पण मामि एकदम गंभिर झालि आणि एक दोन मिनिटांच्या शांततेनंतर म्हणालि नको जुई, पुन्हा कधिहि अस म्हणु नकोस.


Marhatmoli
Thursday, March 22, 2007 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अर्थातच काहि कळल नाहि. मी जास्तच बोलुन गेले कि काय या विचारात असताना मामिच म्हणालि, बेटा तुला सांगाव का नाहि या विचारत होते कारण हि त्यांचि खासगि बाब, पण तुलाहि आता लवकरच लग्नाचा विचार करायला लागेल म्हणुन सांगतेय तु इथे येण्याच्या काहि दिवस आधि मी आणि तुझा मामा kitchen मध्ये होतो (माच्या आणि स्निग्धा च्या flat चि kitchens एकमेकान्च्या पाठि येतात). तर आम्हाला दोघाॅहे चढलेले आवाज ऐकु यायला लागलेत, असेल काहितरि चहाच्या पेल्यातल म्हणुन आंहि तिथुन निघुन जाणार होतो पण तेवढ्यात तोल जावुन कोणितरि पडल्याचा आवज आला आणि पाठोपाठ स्निग्धाचे हुंदके आणि नंतर वेदनेने तिच विव्हळण ऐकु आल. म्हणुन आम्हि मग जावुन त्यांच दार वाजवल.

Suvikask
Thursday, March 22, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोष्ट चांगली चालली आहे... पण थोड शुध्द आणि विराम चिन्हांचा योग्य वापर करुन लिहिल्यास वाचताना लिंक तुटनार नाही. उदा. २३ वर्षे (२-३), ८१५ दिवस (८-१५)

Sanghamitra
Thursday, March 22, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रश्मी छानच वाटतेय गोष्ट पण सुविकस्क(हे नाव नक्की कसे उच्चारायचे?) म्हणतेय त्याप्रमाणे थोडे editing केलेस तर वाचायला जास्त छान वाटेल.


Kranti
Thursday, March 22, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरुवात फ़ार छान झाली आहे....पुढ्च्या भागाची आतुरतेने वाट पाहते आहे...लवकरच लिहिशिल अशी अपेक्षा आहे

Runi
Thursday, March 22, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा,
मला वाटते सुविकस्क हे बहुदा सुविकास के किंवा सुविकास क असे असेल.
रुनि


Marhatmoli
Friday, March 23, 2007 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्याना मनापासुन धन्यवाद. It feels really good to know that you guys are reading this.

सुविकास, संघमित्रा, मी या भागापासुन शुध्धलेखनाकडे लक्श देइन आणि weekend ला आधिचे भाग पण edit करिन.


Marhatmoli
Friday, March 23, 2007 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मामि सांगत होति आणि मी सुन्न होवुन ऐकत होते. सुशिक्शित आणि सुसंस्क्रुत हे शब्द जिथे समानार्थि वापरले जातात त्या पांढरपेश्या, मध्यमवर्गात वाढलेल्या मला हे सत्य पचवण खुप जड जात होत. 'मारझोड वगैरे झोपड्पट्तित होते' जणु काहि तिथलि माणस हि माणस नसुन कोणि तरि अप्रगत प्रजाति ( species ) आहेत. त्यांचि सुखदुख्ख हि काहि विचारात घेण्याचि गोष्ट वाटतच नाहित कधि कोणाला. जणु काहि तिथलि माणस हि माणस नसुन कोणि तरि अप्रगत प्रजाति ( species ) आहेत. डोळ्यांना दिसत असलेल वास्तव नाकारण्याचि कला इतकि विकसित झालिये कि जाणिवेच्या कक्शेथि येत नाहित या गोष्टि कधि.

दुसरेदिवशि सकाळि स्निग्धा मला balkani त दिसलि. तिच्या चेहर्यावरचे भाव बरच काहि सांगुन गेलेत. मामिनेहि बहुदा तिला बघितल असाव कारण दुपारि आपल्याला स्निग्धाच्या घरि जायचय अस ति मला म्हणालि.

मामिलाहि तशि स्निग्धाच्या problem चि पुर्ण कल्पना नव्हति. त्या दिवशिच त्यांच भाड़अण हे पहिल नव्ह्त. त्यान्च्या लग्नानंतर चार्-पाच महिन्यातच याचि सुरुवात झालि होति.

स्निग्धा नाशिकचि. कोणाच्यातरि लग्नात तिच्या नवर्याने आणि सासुबाईनी तिला बघितल आणि दोन्-महिन्यात स्निग्धाच लग्न झालहि.


मला सगळ चित्र स्पष्ट दिसत होत. पाठि एक बहिण म्हंटल्यावर सहाजिकच 'दोघींचिहि लग्न retirement आधि व्हावित' ही वडिलांचि इछ्छा असणार. अश्यात उच्च मध्यमवर्गातिल एकुलत्या एक मुलाच्या घरुन मागणि आलि म्हंटल्यावर सगळेच हर्खुन गेलेत. नाशिक्-मुम्बै अंतरामुळे लग्नाधिच्या भेटिगाठि मोजक्याच. आर्थिक परिस्थिति, शिक्शण, looks , जुजबि आवडिनिवडि आणि मुख्य म्हणजे पत्रिका (स्निग्धा कडुन ह! तिच्या बाबानि आधि जन्मवेळेनुसार पत्रिका बनवलि आणि ३२ गुण जुळल्यावर जावयावर पसंतिचा शिक्का उठवला) ह्या सगळ्या बाबि जुळल्या म्हंटल्यावर मग लग्नासंबंधि विचार म्हण्जे फ़क्त तपशिलांचा विचार


R_joshi
Friday, March 23, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी कथेची सुरवात उत्तम झाली आहे.:-)

Dhoomshaan
Sunday, March 25, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी,
कथा खरचं छान रंगतीय...............
पण तेव्हढं र्‍हस्व-दीर्घ यांचं जरा बघता आलं तर बघा की!!!!!!!!!!!!!!!

If you have any problems, you can tell us.........

Marhatmoli
Sunday, March 25, 2007 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद रुपल, अमृता,

मी गेल्या भाग edit केला होता. त्यात काहि चुअका रहुन गेल्यात का? आधिचे भाग weekend ला एदित करिन असा विचार केलेला पण it seems I can't edit any post after 72 hours after writing, only moderators can do that. आता त्यांआ एवध सगळ एदित करायला कस सांगु?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators