मित्रांनो , बर्याच शेरांमध्ये एका विषयाचे विविध कंगोरे आलेली ही गज़ल . बाकी गिरीराजच्या लेखनावर मी काय बोलणार ... आपण आधी त्याच्या कविता व ललित लिखाण वाचलेलं आहेच गिरीराज ऋतू येत होते , ऋतू जात होते अभागी कहाणी जणू गात होते कशी आस ठेवू तुझ्या हासण्याची जिथे हुंदकेही पहार्यात होते किती वाकली ती दिसाच्या श्रमाने जरा सावरू लागता रात होते मला चेहरेही तुझ्या भावनांचे तुला जे हवे तेच डोळ्यात होते तुला सोसणे भाग अन्याय अजुनी इथे जन्म होताच सुरुवात होते कसा अंत नाही, ऋतू निर्दयी हे असे येत होते , असे जात होते
|
कशी आस ठेवू तुझ्या हासण्याची जिथे हुंदकेही पहार्यात होते वा!! खूप touching !
|
Vshaal78
| |
| Thursday, March 29, 2007 - 5:46 am: |
| 
|
गिरिराज, आसू हुंदके छान
|
Zakasrao
| |
| Thursday, March 29, 2007 - 5:48 am: |
| 
|
कशी आस ठेवू तुझ्या हासण्याची जिथे हुंदकेही पहार्यात होते आवडेश रे गिरि. पण पुर्ण गजल थोडी डोक्यावरुन गेली.
|
>> किती वाकली ती दिसाच्या श्रमाने जरा सावरू लागता रात होते वा झकास. >> तुला सोसणे भाग अन्याय अजुनी इथे जन्म होताच सुरुवात होते आवडला. बाकी गज़लही छान आहेच. पण हे दोन खास आहेत.
|
Zaad
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:42 am: |
| 
|
किती वाकली ती दिसाच्या श्रमाने जरा सावरू लागता रात होते प्रचंड आवडला हा शेर! केवळ सुंदर!!
|
Daad
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:48 am: |
| 
|
स्त्रीच्या जन्मजात "स्त्री" असण्याची कहाणी सांगणारी गजल. खूप खूप आवडली, गिरीराज. हर एक शेर प्रभावी आणि नेमक्या शब्दात (अपवाद मला चेहरे.... कळला नाही. please कुणीतरी मदत करा किंवा गिरिराज, तुम्हीच)
|
शलाका .. गिरीसोबत जी चर्चा झाली त्यावरून सांगतो ... माझा चेहरा हा समोरच्याच्या भावनांचं फक्त प्रतिबिंब आहे .. त्यांना शेवटी तो चेहरा त्यांना "हवा " तसाच दिसतो .
|
Nachikets
| |
| Thursday, March 29, 2007 - 7:18 am: |
| 
|
गज़ल आवडली, गिरी. सगळेच शेर छान!!
|
Mankya
| |
| Thursday, March 29, 2007 - 7:46 am: |
| 
|
गिरीराज ... अगदी वेगळाच विषय हाताळला आहेस रे अन तोही पुर्णपणे यशस्वी ! हुंदकेही पहार्यात .. मन भरून आलं वाचताना ! दिसाच्या श्रमाने ... खूपच बोलका, खूप भावला ! तुला सोसने ... किती खरंय ! मक्ता ... वेगळेपणा ईथही टिकवलास ! एका वेगळ्याच विषयात रंगलेली ग़जल, मक्त्यातही खूप वेगळेपणं आहे, त्यातही ऋतूंचा उल्लेख आल्यामुळे विषयाला पुर्णविराम मिळालाय, एक आवर्तन पुर्ण झाल्यासारखं वाटलं ! एकंदरीत विषय खूप सुरेख हाताळला आहेस ! माणिक !
|
किती वाकली ती दिसाच्या श्रमाने जरा सावरू लागता रात होते या शेराचं कौतुक करायला शब्द नाहीत... फ़ारच भारी...
|
Desh_ks
| |
| Thursday, March 29, 2007 - 9:27 am: |
| 
|
गिरिराज, किती वाकली ती दिसाच्या श्रमाने जरा सावरू लागता रात होते हा शेर अतिशय संयत, सूचक आणि तरीही मर्मस्पर्शी आहे. इतरही सारेच छान!
|
Psg
| |
| Thursday, March 29, 2007 - 9:31 am: |
| 
|
वा! मस्त गजल गिर्या..
|
Jayavi
| |
| Thursday, March 29, 2007 - 10:29 am: |
| 
|
अहा....गिर्या..... तुम तो गझल नवाज हो गये गझल खूप खूप आवडली. मतल्यापासूनच हळवं केलंस. हुंदक्यांवरही पहारा.... कल्पना अप्रतिम! किती वाकली ती दिसाच्या श्रमाने जरा सावरू लागता रात होते हा शेर.....शेरे बब्बर! Ultimate! कौतुक करायला शब्द अपुरे आहेत रे..! चेहर्याचा शेर मात्र अजूनही नीट कळला नाही. मक्त्यामधे ऋतूला आणल्यामुळे माणिक म्हणाला तसं आवर्तन पूर्ण झालंय. खूपच सुरेख!! आता तुला काय द्यावं बरं बक्षिस....! तुला जे जे हवेसे....ते ते मिळो
|
Mankya
| |
| Thursday, March 29, 2007 - 10:52 am: |
| 
|
चेहर्याच्या शेराबद्दल मला एक वैभवच्या दोन ओळी आठवतात, बघा काही मदत होते का ... चेहरा बोलेल तुम्हास हव ते डोळ्यात डोकावून पाहू नका ...! असं काहिसं ! मला वाटतं पहिल्या ओळीत आशय येतोय त्याचा बहुतेक ! तुझ्या मनात ज्या भावना आहेत तोच माझा चेहरा आहे असा काहिसा अर्थ लागतोय ! एक उदा. द्यायचा प्रयत्न करतो ... समजा एखादी Burnt case आहे, तर ती व्यक्ती जखमा बर्या झाल्यावर स्वतःला दुसर्याच्या नजरेतूनच बघते म्हणजे त्यांनी जर किळसवाणे अविर्भाव दाखवले तर ती स्वतःला तसच समजते आणि जर कोणी त्याला नेहमीसारखेच पाहिल्यावर जसे दिसतात तशेच अविर्भाव दाखवले तर ती व्यक्ति स्वतःला नेहमीसारखेच म्हणजे Normal समजते ! तसच चेहर्याचा संदर्भ घेता येइल नाही ! तुला जे हवे तेच डोळ्यात होते .. अर्थ स्पष्ट आहे ! माणिक !
|
Bee
| |
| Thursday, March 29, 2007 - 11:00 am: |
| 
|
जरा सावरू लागताच रात होते.. खूप सुंदर! खरे आहे पण स्त्रीपुरताच मर्यादीत का केला काहींनी..
|
Bairagee
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:29 pm: |
| 
|
कशी आस ठेवू तुझ्या हासण्याची जिथे हुंदकेही पहार्यात होते वा, किती वाकली ती दिसाच्या श्रमाने जरा सावरू लागता रात होते वाव्वा!
|
Ashwini
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:44 pm: |
| 
|
गिरी, मस्तच आहे रे, मतल्यापासून मक्त्यापर्यंत.
|
Maitreyee
| |
| Thursday, March 29, 2007 - 2:00 pm: |
| 
|
गिरी, सुरेख आहेत कल्पना! या गझलेत एकदम वेगळाच मूड वाटला. छानच!
|
Chinnu
| |
| Thursday, March 29, 2007 - 2:02 pm: |
| 
|
गिरी, पहार्यातले हुंदके सुंदर. मक्ता साधा सरळ आला आहे. कसा अंत नाही, ऋतू निर्दयी 'हे' च्या ऐवजी ऋतू निर्दयी 'ते' बरं राहील का? CBDG!
|