|
मित्रांनो, ही गज़ल काही अगदी जुजबी फेरफारांतच निर्दोष झाली होती. नचिकेत जोशी ऋतू येत होते ऋतू जात होते भरावे स्वत:ला मला ज्ञात होते जरी धावलो भूवरी वास्तवाच्या ठसे पावलांचे खगोलात होते सले वेदना काळजाशी तरीही हसू लोचनी, गीत ओठात होते तमाची तमा मी न केली कधीही सडे तारकांचे प्रवासात होते उभा सूर्य झालो नभाच्या उराशी कुठे सत्य सारे उजेडात होते? न मी भेटलो कोणत्याही गुरूला हरी सावळे रूप ध्यानात होते
|
Giriraj
| |
| Friday, March 23, 2007 - 7:08 am: |
| 
|
शेवटचे दोन्ही शेर अप्रतिम!
|
नचि.. पूर्ण खगोल पायांखाली तुडविलंस की!! Great गझल जरी धावलो भूवरी वास्तवाच्या ठसे पावलांचे खगोलात होते क्या बात है मित्रा!! कल्पना आणि वास्तव ह्यांच्यातलं अनादी relation जबरदस्त प्रकट झालंय! तमाची तमा मी न केली कधीही सडे तारकांचे प्रवासात होते वाहवा!! उभा सूर्य झालो नभाच्या उराशी कुठे सत्य सारे उजेडात होते? काहीतरी प्रचंड तूला सांगायचं आहे ह्यातून.. मला ह्या शेराचा आवाका झेपला नाही. जबरदस्त गझल
|
Zaad
| |
| Friday, March 23, 2007 - 8:46 am: |
| 
|
उभा सूर्य झालो नभाच्या उराशी कुठे सत्य सारे उजेडात होते? हा शेर खूप सही उतरलाय!! असे अजून येउ दे आता...
|
Desh_ks
| |
| Friday, March 23, 2007 - 9:53 am: |
| 
|
नचिकेत, छान आहे गझल. "उभा सूर्य होतो..." हा शेर लिहिताना शायराच्या कल्पना काय होत्या ते सांगणार का? मला ते समजून घ्यायला आवडेल.
|
Jo_s
| |
| Friday, March 23, 2007 - 10:56 am: |
| 
|
नचिकेत, सुंदर गझल, आवडली
|
गिरिराज, मयूर, झाड, सुधीर, सतीश, सर्वांनाच धन्यवाद. "स्वताला भरावे मला ज्ञात होते"! इथे तुंबडी भरणे या अर्थी "स्वताला भरणे" नव्हे तर "परिपूर्ण करत जाणे" या अर्थी भरणे आहे. उभा सूर्य झालो नभाच्या उराशी कुठे सत्य सारे उजेडात होते? यातून मांडावीशी वाटणरी भावना अगदी सरळ आहे.... नभाच्या "उराशी" म्हणजे भर दुपारी प्रखरपणे तळपणारा सूर्य दाखवायचा आहे- अस्ताला टेकलेला नव्हे! आणि एखादी प्रखर भावना जेव्हा उरात पेटते, तेव्हाच कुठे गोष्टी वास्तवात उतरतात.. थोड्क्यात म्हणजे, सत्य बाहेर आणायला मी (माथ्यावरचा) प्रखर सूर्य बनून उभा झालो.. चर्चेसाठी सदैव तयार! चुभूद्याघ्या..
|
Pulasti
| |
| Friday, March 23, 2007 - 1:37 pm: |
| 
|
नचिकेत, उत्तम गझल! "सूर्य" वाचला तेव्हा अर्थ पूर्ण न लागताही आवडला होता. तुम्ही अर्थ समजावून सांगितल्यावर मात्र थोडा मनातून उतरला.. interesting हम्म्म्म.. CBDG तारका, खगोल आवडले. मक्ता तर अप्रतिम!! -- पुलस्ति.
|
Jayavi
| |
| Friday, March 23, 2007 - 2:29 pm: |
| 
|
नचिकेत..... तुझ्या गझलेतल्या कल्पना थोड्या डॊक्यावरुन गेल्यात रे..... पण ज्या कळल्या त्या मनापासून आवडल्या. सूर्याच्या शेराचं आणखी थोडं स्पष्टीकरअण द्या ना कोणीतरी...!
|
पुलस्ति सूर्याच्या शेराचा 'मनातून उतरण्याआधी' तुम्हाला जो काही अर्थ लागला तो इथे द्या ना..
|
Mankya
| |
| Friday, March 23, 2007 - 3:32 pm: |
| 
|
नचिकेता .. जेवढं कळलं ते खूप सुंदर वाटलं ! पण कोणीतरी रसग्रहण लिहायला हवय ( स्वाती ... तूच लिहून टाक ना ) ! ईथे एक शंका येते .... कुठे सत्य सारे उजेडात होते? इथे मीटरमध्ये गडबड वाटते मला, चु.भु.दे.घे. ! माणिक !
|
Gajanan1
| |
| Friday, March 23, 2007 - 3:48 pm: |
| 
|
मीटर बरोबर आहे असे वाटते, सत्य शब्दात स नन्तर त्य हे जोडाक्शर आहे. त्यामुळे स हे अक्शर गुरु उच्चारले जाते. its an assumption, not expert comment.
|
Mankya
| |
| Friday, March 23, 2007 - 3:58 pm: |
| 
|
ग़जानना .. असे असेल तर बरोबर आहे ! ( शेवटी माझ्या डोक्यात घोळ झालाच म्हणायचा ! ) पण रसग्रहणचा आग्रह अजून तसाच आहे माझ्या बाजूने ! नचिकेत .. तू स्वतःच रसग्रहण लिहि ना मित्रा ! माणिक !
|
Pulasti
| |
| Saturday, March 24, 2007 - 4:57 am: |
| 
|
मयुर, मला "सूर्याचा" असा अर्थ वाटला होता की - जरी मी सूर्य झालो (मला नभाच्या उराशी चा अर्थ लागला नव्हता) तरी सगळे सत्य उजेडात थोडेच येणार आहे.. अटळ वास्तव हेच आहे की अर्धे सत्य नेहेमीच अंधारात असते, अगदी सूर्यासाठीही! थोडा निराशावादी, पण मला असा काहिसा अर्थ वाटला होता.. -- पुलस्ति.
|
Saavat
| |
| Saturday, March 24, 2007 - 1:24 pm: |
| 
|
नचिकेत, माणिकला अनुमोदन. रसग्रहण, शेवटच्या शेराच तर नक्कीच लिही.
|
माणिक, पुलस्ति, जयावी, सावट.. सर्वांना धन्यवाद... घरी नेट नसल्यामुळे आणि शनिवार्-रविवार सुट्टी असल्यामुळे तुम्हाला प्रतिसाद द्यायला उशीर लागला... माणिक, जयावी मलाही स्वातीकडून रसग्रहण हवंय, म्हणून मी ही वाट पाहतोय.. नाहीतर मी स्पष्टीकरण देईनच... स्वातीची अजून थोडी वाट पाहायची का?.. कार्यशाळेतले विद्यार्थी आहोत, तर गुरुंच्या मर्गदर्शनाची वाट पहावी असं वाटतंय. नाहीतर उद्या मी सांगेनच... चुभूद्याघ्या.
|
दोस्त्स, कार्यशाळेतल्या पहिल्या गज़लनंतर ' रसग्रहण' लिहायचं नाही असा निर्णय आम्ही नियामक मंडळाने घेतला होता. तो अश्यासाठी, की ( गुरुजींच्या शब्दांत - ) एक रचना दहा वाचकांना हाताला धरून शंभर गावांना नेऊ शकते. एकाने त्याला लागलेला अर्थ लिहीला म्हणून मग इतरांनी बाकी अर्थ आजमावायची शक्यताच नाहीशी झाली असं होवू नये, त्यामुळे त्या रचनेवर अन्याय होवू नये असं वाटलं. पण आता इथे already बरीच चर्चा झालेली दिसते, तेव्हा मला माझे 2 cents add करायला हरकत नाही असं वाटतंय. ऋतू येत होते ऋतू जात होते भरावे स्वत:ला मला ज्ञात होते सरत्या काळाने दिलेल्या बर्या किंवा वाईट अनुभवांतूनही शिकणं, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात ' भर' घालत जाणं, ( नचिकेत, तू म्हटल्याप्रमाणे) परिपूर्णतेकडे वाटचाल सुरू ठेवणं.. हे मी जाणीवपूर्वक करत गेलो. जरी धावलो भूवरी वास्तवाच्या ठसे पावलांचे खगोलात होते वा! वास्तवात धावणं अपरिहार्य होतं. पण मनाने इथे नव्हतो. पावलांचे ठसे इथे उमटलेच नाहीत. ते उमटले अंतराळात.. स्वप्नांच्या, शक्यतांच्या, अज्ञाताच्या प्रदेशात. ' व्यवहारी' जगात मी वावरलो याचा मागमूस नाही उरणार कदाचित, पण कल्पनेच्या जगात जी वाटचाल केली त्याचे ठसे ( कविता..?) रहातील मागे. मला इथे नचिकेतने ' चाललो' न लिहीता ' धावलो' लिहीलं हे आवडलं. त्यामुळे ती अपरिहार्यता अधोरेखित होते असं वाटलं. सले वेदना काळजाशी तरीही हसू लोचनी, गीत ओठात होते ह्या शेराचा सरळ अर्थ दृष्य आहेच. तमाची तमा मी न केली कधीही सडे तारकांचे प्रवासात होते यात तारका म्हणजे कवीची प्रतिभा, स्वप्न(आशा / आकांक्षा / ध्येय), जिवलग, मार्गदर्शक ( तार्यांवरून दिशादर्शन होतं) असा कुठलाही अर्थ घेतला तर शेराचे विविध पदर लक्षात येतात. उभा सूर्य झालो नभाच्या उराशी कुठे सत्य सारे उजेडात होते? मला इथे ' उराशी' याचा अर्थ थोडासा ' रात्रीच्या गर्भातील उषःकालासारखा' वाटला होता. अजून उजाडायचं आहे, उजाडायला हवंच आहे, त्याशिवाय स्वप्न सत्यात उतरायची नाहीत, किंवा सत्य पूर्णपणे जगासमोर यायचं नाही. आणि ते घडवून आणण्यासाठी स्वतः जळून नभात उजाळा करायला मी सिद्ध झालो आहे. ( उभा ठाकलो आहे.) नचिकेत, तू माध्यान्हीचा तळपता सूर्य म्हणतो आहेस तो मला तसा नभाच्या ' माथ्यावर' असता तर वाटला असता. ' उराशी' म्हटल्यावर ' उराशी जपलेल्या स्वप्नाप्रमाणे' आहे असा भाव येतो. कधीतरी नक्की तळपणार याची आशा, नव्हे विश्वास दिसतो त्यात. न मी भेटलो कोणत्याही गुरूला हरी सावळे रूप ध्यानात होते देवाला भेटण्यासाठी मला कधी ' मध्यस्थाची' गरज वाटली नाही. इथे ' ध्यानात' शब्द फार छान आलाय. ' मी त्याचंच ध्यान करत होतो' आणि ' त्याचं खरं स्वरुप माझ्या सदैव स्मरणात होतं' असा दुपदरी अर्थ मला लागला. ' त्या'ची शोधाशोध, ' त्या'च्या आणि आपल्याही - खर्या स्वरुपाचं विस्मरण झालं की सुरू होते, नाही का?
|
Mankya
| |
| Monday, March 26, 2007 - 3:36 pm: |
| 
|
अखेर प्रतिक्षा संपली रसग्रहणाची .....! नचिकेता ... रसग्रहणानंतर आता एक वेगळ्या दृष्टिकोनातून वाचला मक्ता आणि गजल ... मक्त्याचा आशय अप्रतिम आहे ...! स्वाती ... 2 cents?? (2 cents... इतक सहज मोजता येणार नाही असं ! ) धन्यवाद स्वाती for 2 cents ! माणिक !
|
वा! रसग्रहण वाचून गझल आणखी interesting वाटली.
|
Pulasti
| |
| Tuesday, March 27, 2007 - 3:10 am: |
| 
|
नचिकेत, स्वाती, सूर्याबद्दल.. १. मी सूर्य झालो - "त्याशिवाय" - संपूर्ण सत्य जगासमोर यायचं नाही २. मी सूर्य झालो - "तरीही" - संपूर्ण सत्य जगासमोर आलं नाही उला मिसर्यातल्या "कुठे" आणि प्रश्नचिन्हामुळे मला तरी हा दुसरा अर्थच प्रकर्षाने जाणवतोय. -- पुलस्ति.
|
|
|