मनिषा लिमये ऋतू येत होते ऋतू जात होते तुझ्या संगतीने सुखे न्हात होते जरी वादळे , ऊन , पाऊस वारा मला सावराया तुझे हात होते असे काय अंधारले भर उन्हाचे मळभ दाटले का उजेडात होते कळेना असे हे कसे काय झाले कशी भंगले मीच स्वप्नात होते तुझी प्रीत स्वार्थी मला रे कळाली कसे सावरू ? मीच धोक्यात होते पुन्हा तू उठावे , नव्याने लढावे तुझ्या फक्त इतकेच हातात होते
|
Jayavi
| |
| Wednesday, March 28, 2007 - 12:36 pm: |
| 
|
अहा....... तो आपकी गझल आ ही गई.....! छान झालीये. तुझी प्रीत स्वार्थी मला रे कळाली कसे सावरू ? मीच धोक्यात होते छानच! पुन्हा तू उठावे , नव्याने लढावे तुझ्या फक्त इतकेच हातात होते मक्ता आवडला....!
|
Mankya
| |
| Wednesday, March 28, 2007 - 12:49 pm: |
| 
|
मनिषा ... छाने ! वातावरणमिर्मिती उत्तम ! जसे " मळभ दाटले उजेडात "... लगेच दृष्यही डोळ्यासमोर उभे रहाते अन अर्थही मनात तत्काळ उमटतो ! अर्थात सहजताही आहे अन बरीच बोलकीही आहे ग़जल ! परीश्रम कारणी लागले तुमचे असे मी तरी म्हणेन ! माणिक !
|
Chinnu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 2:01 pm: |
| 
|
मनिषा 'कशी भंगले मीच स्वप्नात' छान डेप्थ create झालीये. मक्ता छान.
|
Chyayla
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:46 pm: |
| 
|
जरी वादळे , ऊन , पाऊस वारा मला सावराया तुझे हात होते तुझी प्रीत स्वार्थी मला रे कळाली कसे सावरू ? मीच धोक्यात होते खरच एकिकडे हात देउन सावरणारा लगेच स्वार्थी झाला... वा वा उत्तम "राग" निर्मिती केलीस... मजा आली...
|
ख़ुपच छान. आधि निट समजल नाही, पण मंगेश ने समजावून सांगितल्यावर कळली. यमक छान जुळल आहे.
|
Bairagee
| |
| Friday, March 30, 2007 - 2:04 pm: |
| 
|
माझे मत- ह्या गझलेतला साधेपणा-सोपेपणा फार आवडला. पुन्हा तू उठावे , नव्याने लढावे तुझ्या फक्त इतकेच हातात होते फारच आवडला! नेहमीची कल्पना छानच आली आहे. जरी वादळे , ऊन , पाऊस वारा मला सावराया तुझे हात होते वाव्वा! एकंदर छान. कळेना असे हे कसे काय झाले कशी भंगले मीच स्वप्नात होते वरची ओळ मस्त प्रवाही आहे. शेर छान.
|
छान आहे गझल. 'स्वप्नात भंगण्या'चा शेर आवडला. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
|
बैरागीबुवांशी सहमत आहे. गझलेतला साधेसोपेपणा आणि नेहमीच्या कल्पना प्रवाहीपणे मांडणे चांगले झाले आहे.
|