मित्रांनो .... काहीच बदल न करावी लागलेली आणखी एक गज़ल तुषार ऋतू येत होते ऋतू जात होते कसे हे दुरावे नशीबात होते सख्या मीलनाची किती वाट पाहू सरेना तुझ्याविण सुनी रात होते तसे संपले जीवघेणे उन्हाळे अता आसवांचीच बरसात होते किती दूर लोटू, कसे पाश तोडू खुळे दु:ख माझ्याच प्रेमात होते तुझा दोष नाही, सुखांशी तसेही जणू वैर माझे पिढीजात होते मला सागरांची नको लाच आता खरे प्रेम एका तुषारात होते
|
Nachikets
| |
| Wednesday, March 28, 2007 - 11:57 am: |
| 
|
छान गज़ल आहे, तुषार!! खुळे दुःख आणि मक्ता विशेष आवडले.
|
Jayavi
| |
| Wednesday, March 28, 2007 - 12:33 pm: |
| 
|
तसे संपले जीवघेणे उन्हाळे अता आसवांचीच बरसात होते.... सुरेख! तुझा दोष नाही, सुखांशी तसेही जणू वैर माझे पिढीजात होते....... वा.....! मला सागरांची नको लाच आता खरे प्रेम एका तुषारात होते ....क्या बात है....! आवडेश
|
Mankya
| |
| Wednesday, March 28, 2007 - 12:37 pm: |
| 
|
तुषार ... सहि है ! खुळे दुःख ... जमून गेला रे अगदि ! सुखांशी पिढिजात वैर .. कल्पना आवडली मित्रा ! मक्ता ... या रचनेचा मुकुटमणि म्हणेन मी ! अजूनहि खुलेल हि गजल काहि प्रयत्नांनी ! माणिक !
|
तुषार, खूऽऽऽप छान आहे गझल.. सगळे शेर आवडले.. "सरेना तुझ्याविण सुनी रात होते" इथे फ़क्त पहिल्या वाचनात "सरेना" हा शब्द अतिरिक्त वाटतोय.. त्याला संदर्भ नाहिये असं वाटतंय.. कारण "सरेना" चा कर्ता असलेला "रात" शब्द "सुनी" शी अधिक जवळचा वाटतोय.. चुभूद्याघ्या.. पण गझल खरंच छान आहे.. "तुषार" चा सदुपयोग केला गेलाय..
|
Chinnu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:41 pm: |
| 
|
तुझा दोष नाही, सुखांशी तसेही जणू वैर माझे पिढीजात होते! अतिशय सुंदर तुषार. मक्त्यामध्ये हुशारीने नाव गोवलत! छान.
|
तसे संपले जीवघेणे उन्हाळे अता आसवांचीच बरसात होते हे खूप आवडलं!!
|
Paragkan
| |
| Wednesday, March 28, 2007 - 3:25 pm: |
| 
|
kya baat hai ... shewatacha she khaasach!
|
Desh_ks
| |
| Thursday, March 29, 2007 - 3:47 am: |
| 
|
तुषार, मक्ता छान आला आहे. -सतीश
|
Meenu
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:00 am: |
| 
|
मस्त जमलीये गज़ल तुषार, त्यातही हे तीन शेर जास्त आवडले, वेगळे आहेत म्हणुन किती दूर लोटू, कसे पाश तोडू खुळे दु:ख माझ्याच प्रेमात होते तुझा दोष नाही, सुखांशी तसेही जणू वैर माझे पिढीजात होते मला सागरांची नको लाच आता खरे प्रेम एका तुषारात होते
|
>> तुझा दोष नाही, सुखांशी तसेही जणू वैर माझे पिढीजात होते सही! मक्ताही छान जमवलाय. बाकी ठीकठाक आहेत.
|
Zaad
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:39 am: |
| 
|
तुझा दोष नाही, सुखांशी तसेही जणू वैर माझे पिढीजात होते व्वा!!! मस्त जमलाय! गज़ल छानच!!!
|
Daad
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:55 am: |
| 
|
तुषार, आवडली गजल. खुळे दु:ख कल्पना मस्तय. तुझा दोष नाही. - ह्या शेराची मांडणी मजेशीर (छान) आहे. दुसरा शेर पहिल्यातच सुरू झाल्यासारखा........ एक प्रश्न आहे तुजविण हा शब्द तुज'वी'ण असा हवा का? र्हस्व 'वि' हा तुजविणा मध्ये वापरता येतो (म्हणजे तसं वाचलय). चू.भू.द्या.घ्या.
|
Giriraj
| |
| Thursday, March 29, 2007 - 7:57 am: |
| 
|
मक्ता ज़बरी रे! -- -- --
|
तूषार, नाद खुळा भावा!!!!!
|
Imtushar
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:14 pm: |
| 
|
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार. या कवितेबद्दल माझी भूमिका मांडावी असे वाटले... "प्रियकर परतून येणार नाही (अता आसवांचीच बरसात होते)" ही अपरिहार्यता या कवितेत अधोरेखित करणं आवश्यक वाटलं (आणि ते थोडफार जमलंय असे वाटते). तू येणार नाही हे नक्की असून सुद्धा माझे तुझ्यावर प्रेम कायम आहे अणि ते तसेच राहील (जे मक्त्यातून दिसते), आणि माझ्या नशिबी जे दु:ख आहे ते मी तुला दोष न देता स्वीकारते (खुळे दु:ख... आणि सुखांशी पिढीजात वैर) या भावना त्या अपरिहार्यतेच्य पार्श्वभूमीवर अधिकच उठून दिसतील असे वाटले. आनंदयात्री, सरेना हा शब्द मला अतिरिक्त नाही वाटला.. तुझ्याविण सुनी रात सरेना(शी) होते या अर्थाने ती ओळ होती. शलाका, तुझ्याविण बद्दल - वृत्तामध्ये 'वि'च बसतो म्हणून तो तिथे आहे व्याकरणदृष्ट्या 'वी' असावा असे वाटते. ( same with 'अता') पण एकंदरीत हा शेरच मला अतिरिक्त वाटतो कधीकधी. गझल उशीरा पाठवल्यामुळे (आणि कदाचित तांत्रिक फ़ेरबदल करण्याची गरज नसल्याने) वैभव आणि इतर गुरुजनांशी संवाद होऊ शकला नाही, परंतु या कार्यशाळेत खूप शिकायला मिळाले. याबद्दल सर्वांचेच आणि खासकरुन वैभवचे मन:पुर्वक आभार. -तुषार
|