|
Mandarp
| |
| Friday, March 23, 2007 - 5:16 am: |
| 
|
राम नवमीची खुप गडबड उडाली होती मन्दीरामधे. गेल्या ७-८ वर्षात ह्या मन्दीराचे स्वरुप बरंच पाल्टुन गेले होते. पुण्या जवळ धायरी ह्या ठिकाणाच्या जवळ जेव्हा हे मन्दिर बान्धले तेव्हा आसपास थोडी शेतकर्यान्ची वस्ती सोडली तर बाकी काहीच नव्हते. धायरीत जायला सुद्धा काही सोय नव्हती, स्वतचे वाहन, किंवा मग धायरी गावापसुन चालत येणे हेच पर्याय होते. पन नन्तर कच्चा का होइना, छोटा रस्ता झाल्या पासुन रिक्शा यायला लागल्या, आणी मग भक्तान्ची गर्दी वाढतच राहिली. मराठे घराण्यातच श्री रामाची उपासना चालत आली होती, त्यामुळे मध्यम वर्गीय स्थिती असुन सुद्धा त्यान्नी पदर ची सर्व पुन्जी खर्च करुन हे मन्दीर बांधले होते. अणी मग निव्रुत्त झाल्या नन्तर ते दाम्पत्य तेथेच रहायला आले होते. मन्दिराचे सर्व काम करावे, सकाळ, सन्ध्याकाळ आरती करावी, आलेल्या भक्तान्ना प्रसाद द्यावा, नामस्मरण करावे अस कर्यक्रम चालु होता. आता मन्दीर हेच त्यान्चे जीवन झाले होते. राम नवमी च उत्सव सुद्धा आता जोरात होत होता. काकड आरती, रामाचा पाळणा, जन्म, दुपारी सर्वान्ना महा-प्रसाद, मग नाम, सन्ध्याकाळी आरती, आणि रात्री कोणाचे तरी किर्तन, प्रवचन... असा राम नवमी चा कर्यक्रम असायचा. ओळखी पाळखी चे, मित्र, मैत्रिणी, औफ़िस मधील असे खुप जण यायचे राम नवमी ला. काकूंना आणी काकांना पण सगळे लोक परम राम भक्त म्हणून ओळखत होते. अशी ओळख झाल्यामुळे काका, काकू पण मनोमन सुखावुन जात असत. माधव ची आत्या म्हणजे ह्या मराठे काकून्ची औफ़िस मधील मैत्रिण, म्हणून माधव सुद्धा बर्याच वेळेस ह्या मन्दीरात येउन गेला होता. धायरीतच रहात असल्या मुळे त्याला हे मन्दीर खुप जवळ होते. माधव च्या घरी जरी अध्यात्मीक वातावरण नसले तरी माधव च स्वभाव मात्र थोडा वेगळा होता. ग़रीबी काय असते हे त्यानी जवळून पहिले असल्यमुळे त्याच्या स्वभावा मधे कन्वाळू पणा, गरीबांन बद्दल दया द्रुश्टी होती. आता तो एक बांधकाम व्यवसायिक जरी असला तरी त्याच्या व्यवसायाच्या विरुद्ध अस तो वागायचा. उदा. त्याच्या कडे काम करणारया कामगारान्शी तो नीट वागायचा.. त्यान्ना सणा सुदी ला स्वताहा कपडे, गोड धोड खायला द्यायचा... त्याच्या क्षेत्रातील इतर लोक त्याला हसायचे, पण तो त्याकडे दुर्लक्श करायचा. ह्या वर्शी सुद्धा तो आपल्या कामातून वेळ काढुन राम नवमी च्या उत्सवात मदत करायला सकाळ पासुनच हजर होता. सकाळपासुन सर्व अगदी व्यवस्थित चालू होते, कुठे हि गडबड, गोन्धळ नव्हता खूप उत्साहात राम जन्म पार पडला. आणी आता महा प्रसादा ची लगबग चालू झाली... पाने वाढली गेली, ...वदनी कवल घेता झाले, आणी भक्त मन्डळीनीं जेवयल सुरुवात केली माधव आणी काही उत्साही तरूण वाढायचे काम करत होते... पंगत संपत आली, आणी इतक्यात तो प्रसन्ग घडला........
|
R_joshi
| |
| Friday, March 23, 2007 - 8:33 am: |
| 
|
मंदार कथेची सुरवात खुपच सुबक आणि रेखीव केली आहेस. खरच छान
|
Wow, मी पण जायचे लहानपणी.. आमच्या इकडे "हनुमान जयंती"ला फ़ार मोठा कार्यक्रम असायचा अगदी तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं बघ..............
|
Mandarp
| |
| Monday, March 26, 2007 - 2:33 pm: |
| 
|
उत्सवाची गडबड पाहून ४-५ जणांचे एक अतिशय गरीब कुटूंब तिथे आले होते, आणी ते प्रसाद मागू लागले.. आजी, आजोबा, आई, वडील आणी २ छोत्य मुली, अनि आई च्या कडे वर एक छोटा मुलगा असे ते कुटूंब होते.. अतिशय दीनवाणे दिसत होते ते... त्यान्ना मन्दीराच्या दारवरच १-२ जणान्नी अडवले.. इतक्यात काका काकू तिथे पोचले.. ते प्रसाद मागत होते, पन त्यान्चे कहीही ऐकुन न घेता, त्यान्ना घलवुन दिले गेले... ते बिचारे एवढेसे चेहेरे करुन तिथून बाहेर गेले व कोणितरी अपल्याला काहीतरी खायला देतील ह्या आशे ने थोड्या अन्तरावर जावुन थाम्बले. पण बाकीचे भक्त गण जणू काही घडलेच नाही अश्या अविर्भावात परत मन्दिरात आले व पुढचे काम करु लागले. पण माधवला मात्र हे सर्व पहुन वाइट वाटले... त्याच्या डोळ्यात अश्रु आले... मनात विचार आला 'काय हे ?' कसे वागतात लोक मग हे रामाच्या भक्तिच्या नावाखाली नुसते प्रदर्शनच करताहेत का ही लोकं ह्रुदयात प्रेमाचे, भक्ति चे काहीच भाव कसे काय नाहीत प्रत्यक्श राम जन्माच्या वेळीच कोणी याचक आला आहे रामाच्या दारी प्रसाद मागायला, त्याला तुम्ही काहीच कसे काय देत नाही?
|
Mandarp
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:24 am: |
| 
|
त्याने एकवार रामाच्या मुर्ती कडे पाहिले.... त्याला रामाच्या चेहेरयावर दुख्हाची छटा दिसली.. खरच दिसली का भास होता ते त्याला कळाले नाही... पण झट्क्यात मनाशी काही ठरवत, तो निघाला.... तसेच एकाला सान्गीतले कि मी जरा जावून येतो, आणी तो तेथून बाहेर पडला. झर, झर चालत त्या कुटूंबाजवळ पोचला, आणी त्यान्ची विचारपूस केली. ते कुटूंब, थोड दूर रानाच्या जवळ झोपडीत रहात होते. जे मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करीत होते. पण पोटाला धड २ घास सुद्धा रोज मिळायची मारामार होती. त्यान्ना कळाले होते की आज मन्दिरा मधे राम नवमीचा उत्सव आहे, आणी म्हणून देवाच्या दारी प्रसाद तरी मिळेल ह्या आशेने ते तिथे आले होते. माधव ने त्यान्ना त्याचि एक साईट (बान्धकाम) चालू होती, तेथे बोलावले. कसे यायचे ते सान्गून तो तेथुन निघाला. घरी येताच तडक त्याने देवघरातुन श्रीरामाची मूर्ती आणी ग़ोन्दवलेकर महाराजान्ची तस्बीर घेतली. निघता निघता त्याने योगेशला फोन करुन तान्दुळ, डाळिचे पीठ, भाकरीचे पीठ ईत्यादी साहित्य घेउन यायला सान्गीतले.... थोड्याच वेळात तो साईट वर पोचला. तिथे ते कुटूंब पोचले होते, आणी अंग चोरुन उभे राहीले होते. माधवने त्यान्ना पाणी प्यायला दिले, आणी म्हणाला आपण इथेच राम नवमी साजरी करु या... माधवने मग त्या साईट वर काम करणारया सगळ्यांना गोळा केले. काहींना स्वयंपाकाची तयारी करायला सान्गितले. तेवढ्यात सर्व सामान घेउन योगेश आलाच तिथे.... स्वयंपाक सुरु झाला. माधवने श्रीरामचि मुर्ती आणि महरजन्चि तसबीर ठेवली आणी फुले वाहून पूजा केली, आणि मग भजन चालू केले.. सर्व जण आनन्दानी त्यात सहभागी झाले. रामाची आरती झाली, समर्थान्ची करुणाश्टके झाली, हनुमानाची आरती झाली.. महाराजान्ची ५-६ भजने झाली........ स्वयंपाक तयार झाला, पिठले, भाकरी भात जिलेबी, असा नैवेद्य दखवला माधवने, आणी सर्व जणान्नी पोट भर भोजन केले... त्या कुटूंबातील मुलींच्या चेहेरयावर तर आनन्द ओसंडून जात होता. आजी आजोबांच्या डोळ्यतील अश्रु थांबत नव्हते...आई आणी वडील आपल्या मुलान्चा आनन्द बघुन खुश झाले होते.... इतर कामगार सुद्धा मनोमन माधव ला दुवा देत होते.... आणी अतिशय समाधानाने माधव आणी योगेश घरी परतले. हे सर्व व्हायला जवळ जवळ ७-७.१५ वाजले होते. घरी आल्या आल्या थोडि विश्रान्ति घ्यावी म्हणुन माधव आईला म्हणाला की मी पडतो थोड्यावेळ, मला उठव अर्ध्या तासानी... पाठ टेकल्या टेकल्या माधवला गाढ झोप लागली... आणी अचानक खूप गडबड ऐकु आल्यामुळे त्याला जाग आली.. त्याची आई कोणाला तरी सान्गत होती की रामाच्या देवळात गर्दी लोटली आहे, कारण रामाची मुर्ती हसते आहे, आणी ते पहायला जो तो तिकडे जातोय............ माधवला ते पहाणयासाठी तिकडे जायची गरज वाटली नाही..............
|
Kashi
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:38 am: |
| 
|
khoop sundar katha..ani tyat mandlela vichar dekhil lahan astana asach ek prasang zalela athavto.....mazi aai gele kititari varsha barech san kinva amche vadhdiwas asech sajre karte..
|
Psg
| |
| Tuesday, March 27, 2007 - 7:19 am: |
| 
|
छान! वेगळी गोष्ट! तेही रामनवमीचं औचित्य साधून! 
|
छान गोष्ट आहे मंदार. सुरूवातीला फारशी पकड घेत नाही पण शेवट मस्त झालाय. फक्त जरा preview mode मधे editing करताना शुद्धलेखनाकडे लक्ष दिलं पाहिजे.
|
Princess
| |
| Tuesday, March 27, 2007 - 9:14 am: |
| 
|
छान गोष्ट आहे. रामनवमीच्या दिवशीच पुर्ण झाल्यामुळे अजुनच छान वाटले. सन्मी सारखच वाटले मला, preview केले असते तर छोट्या चुका दुरुस्त करता आल्या असत्या.
|
Sunidhee
| |
| Tuesday, March 27, 2007 - 9:25 pm: |
| 
|
सुरेख... गोष्टीतला विचार (आणि त्याप्रमाणे कृती पण) आवडला.
|
Disha013
| |
| Tuesday, March 27, 2007 - 10:43 pm: |
| 
|
सुंदर! सगळेच असे माधव सारखे झाले तर.....
|
Sunidhee
| |
| Tuesday, March 27, 2007 - 11:14 pm: |
| 
|
दिशा, हो गं माधव सारखे थोडेच लोक असतात. काशी सांग ना तुझी आई काय काय करायची ते.
|
Mandarp
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:38 am: |
| 
|
रुपल, धूमशान, पूनम, सन्घमित्रा, प्रिन्सेस, सुनिधी, काशी, दिशा तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मन्:पुर्वक धन्यवाद. खरेतर मी ही कथा थोडी छोटी करून लिहीली आहे, कारण देवनागरी मधे लिहायला खूप वेळ लागतो. पण तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांमुळे प्रोत्साहन नक्कीच मिळाले आहे, आणी चूका पण कळल्या. त्या मी पुढच्या वेळी नक्की सुधारीन. ही कथा सत्यघटनेवर आधारीत आहे. २ वर्शांपूर्वी रामनवमीला ही गोष्ट घडली होती, त्यावरून मी ही कथा लिहीली. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. मंदार
|
मंदार, सत्य कथा छानच आहे! आत्माराम भावला आणि हसला सुध्दा.. व्वा!
|
Chinnu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:22 pm: |
| 
|
मंदार छान वाटलं वाचुन. शेवट वाचता वाचता चेहेर्यावर समाधानी स्मित पसरलं.
|
Snehu
| |
| Tuesday, April 03, 2007 - 12:43 pm: |
| 
|
खुप छान. वाचुन खुप बरे वातले
|
R_joshi
| |
| Wednesday, April 04, 2007 - 4:29 am: |
| 
|
मंदार कथा खुपच छान लिहिलीस. माधव सारखे वर्तन काही अंशी का होइना आपणही केले तर एखाद्याला क्षणिक आनंद नक्किच मिळवुन देऊ शकतो. पुढची कथा कधी?
|
Mandarp
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:39 am: |
| 
|
प्रशांत, चिन्नू, स्नेहल, रुपल तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण लिहिलेले कोणी वाचले आणी कौतूक केले की खूप बरे वाटते. पुन्हा एकदा धन्यवाद. रुपल, तु म्हणतेस ते खरे आहे. मी सुद्धा जास्तीत जास्त माधव सारखे वागण्याचा प्रयत्न करतो. मनामध्ये तर खूप कथाबिजे आहेत, पण कथेमधे रुपांतरित करण्याइतका वेळ सध्या नाही. सध्या घरी इन्टरनेट नाही आहे, आणी ऑफ़ीस मधे जास्त वेळ मिळत नाही. तरी सुद्धा मी नवीन कथा लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. लोभ आहेच, तो वाढावा....... मंदार
|
|
|