|
Manuswini
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:17 am: |
| 
|
पूनम काय romantic लिहिले आहेस.... मजा आली वाचताना trek ला जाम मजा येते पण....
|
Psg
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:46 am: |
| 
|
.३. नंतरचे ८ दिवस मात्र वेड्यासारखे fast गेले.. दिवसभर ऑफिसात कसंतरी काम करायचं.. संध्याकाळी जवळजवळ उडतच ऋजुताकडे जायचं, काकू चहा, खायला द्यायच्या, त्यानंतर गाणी.. मस्त romantic गाणी शोधून काढली होती ऋजुनी.. मग प्रॅक्टीस.. गाण्याबरोबर ऋजु harmonium पण घ्यायची बरोबर सूर लावायला.. काय सुंदर दिसायची तेव्हा.. तल्लीन होऊन गाणं म्हणायची अगदी.. अजिंक्य बरेचदा नुसतं पहातच रहायचा तिच्याकडे. त्याचा आवाज चांगलाच होता.. आणि मनापासून मेहनत घेतही होता तो.. गाणी मस्त बसली त्यांची.. त्याच बरोबर नवीन रोल आणले होते, कॅमेरा साफ़सूफ़ करून ठेवला त्याने.. सलवार कुडता ड्रायक्लीन केला होता.. आधी नेहेमीची शर्ट-पँट घालणार होता.. पण शर्ट-पँट म्हणल्यावर ऋजूनी इतक्या जोरात 'ईऽऽऽ' केलं की अजिनी लग्गेच कॅन्सल केला तो ड्रेस.. ती म्हणली traditional घाल.. तो म्हणला बरं! तिचं सगळच ऐकत होता ना सध्या.. मग उजाडला साखरपुड्याचा दिवस. मनू हायपर झाली होती. सकाळपासून फोन चालू होते. समारंभ ६ ला सुरु होता, पण मनूनी अजिला ४ पासूनच बोलावले होते.. 'तू झोपा काढशील, फोटोंचं विसरशील, माझे फोटो यायचेच नाहीत' असलं काही बडबडत होती आणि त्याला छळत होती..एरवी अजि बोरच झाला असता, पण ऋजुताही तिथेच असणार होती, त्यामुळे तो खुश होता.. धडपडत बरोब्बर ४ला मनूकडे पोचला तो, तर मनू कुठे तयार होती? घरभर लोकच लोक होते. ऋजुही आली नव्हती.. अजिंक्यला काय करावे कळेचना एकदम. मनूनी त्याला लांबूनच 'आलास का, थांब रे, आलेच' केले. तो मग गॅलरीत जाऊन उभा राहिला. कॅमेरा ठीकठाक आहे ना पाहिलं आणि संध्याकाळची गाणी गुणगुणायला लागला. इतक्यात ऋजुता आली. तिला पाहिल्याबरोबर अजि खुलला.. पण तिनी चक्क जीन्स घातली होती. मला traditional dress चा आग्रह आणि ही चक्क जीन्स मधे??? नॉट फ़ेअर यार!! ती वर आल्या आल्याच अजिनी तिला गाठलं.. "हाय! तू अशी येणार आहेस?" "अशी? हां.. जीन्स मधे? नाही रे.. ही भली मोठी बॅग पाहिलीस ना? साडी नेसणार आहे, पण नंतर.. आधी मनूची तयारी करायची आहे ना, म्हणून आत्ता जरा सुटसुटीत.. तुला काय वाटलं, तुला traditional dress घालायला सांगून मी अशी येईन? आपण गायला बसू तेव्हा किती विचित्र दिसेल ते? बरं पुन्हा गाऊन पाहिलस ना सगळं? मी तर तेच गुणगुणतिये सारखं! आणि हे कागद ठेव.. २ कॉपीज आहेत.." अजिंक्य impressed .. family function साठी इतकी तयारी? त्याने मान डोलावली फ़क्त. थोड्या वेळानी झाली एकदाची मनू तयार! मेकप, साडी.. पन्नास वेळा 'सगळं ठीक आहे ना?', 'मी कशी दिसतीये?' विचारत होती. अजिनी तिचे फोटो काढले.. मग कार्यालयात जायचा गोंधळ.. कोण, कोणाबरोबर, आधी कोण, नंतर कोण, घराला कुलुप कोण लावणार इत्यादी.. शेवटी असं ठरलं की ऋजुता आणि मनूचा भाऊ शेवटी येतील.. बाकी सगळ्यांनी पुढे जायचं, अजिनी सर्वात आधी.. hall चे फोटो, 'ते लोक' येतील तेव्हाचे फोटो.. मनू आणि तिच्या नवर्याचे एकत्र फोटो.. अजिंक्य बिझी झाला.. तो पुढे गेला हॅलवर.. हळुहळू साखरपुड्याला सुरुवात झाली.. मग तर त्याला इकडे तिकडे बघायला वेळच नाही मिळाला.. अचानक त्याला ऋजुता दिसाली.. Oh my God!! केवळ सुरेख! मरून रंगाची साडी, त्यावर सोनेरी embroidery , तसेच दागिने, भरपूर बांगड्या, केस मोकळे.. simply beautiful ! अजिंक्यचं लक्ष पुन्हा उडालं.. तिचा फोटो काढायचाच, पण या वेळी तिला सांगून! every free moment त्याचे डोळे ऋजुताला शोधत होते.. ती कशी मनूला मदत करत होती, हसत होती, लोकांना भेटत होती, त्यांच्याशी बोलत होती.. actual साखरपुडा झाला, अंगठ्या घातल्या, पेढा भरवला.. अजिचं काम संपलं. तो तसा मोकळा झाला.. त्याने ऋजुला हाक मारली.. "छान दिसत आहेस." " Thanks.. तुलाही सलवार कुडता चांगला दिसतोय.. बरं झालं माझं ऐकलस.. " "तुझा फोटो काढू?" "अं?" "नाही, आज साडीत छान दिसत आहेस.. पहिल्यांदाच पाहिली तुला. आता माझं काम पण संपलं आहे, रोल शिल्लक आहे अजून, म्हणून विचारलं" "बरं काढ की.. actually मला जरा complex च येतो फ़ोटोबीटो म्हणजे.." " complex ?? बरी आहेस ना? इथे उभी रहा, आणि be natural .. उगाच खोटं हसू नकोस, just camera कडे पहा.. ओके, perfect ! झाला. अजून एक? ही घे, या खुर्चीवर बस.. relax yaar.. tension नही लेनेका.. बास.. माझ्याकडे बघ, एक छोटं स्माईल प्लीज.. हं! झालं! छान आले फोटो.." "तुला काय माहित?" "अरे फोटोग्राफर आहे मी, मला कळतं कोणते फोटो चांगले येतील ते.." "त्यावरून आठवलं.. ट्रेकचे फोटो शेवटपर्यंत दाखवलेच नाहिस.." "अरे सॉरी.. आता हे आणि ते एकदमच दाखवीन, चालेल?" "बरं, तिकडचे लोक ओके आहेत आपल्या प्रोग्राम बद्दल.. मनूनी राजीवला विचारलं.. सगळे बाहेरचे लोक गेले की सुरू करू आपण.. मी harmonium पण आणला आहे.." "तू म्हणशील तसं.. मी तयार आहे..पण मला जरा tension च आहे.. मी असं कधी लोकांसमोर गायलो नाहिये गं.. आपल्या मित्र मैत्रीणींमधे ठीक आहे.. हे असं म्हणजे.." " tension कसलं घेतोस? छान गात आहेस.. आणि आपण प्रॅक्टीस केलीये ना.. छान होईल सगळं, be confident ! " ok, whatever you say !" प्रोग्रॅमला सुरुवात झाली.... ऋजुन्नी थोडंसं निवेदन केलं.. थीम अशी साधारणपणे होती की मनू आणि राजीव यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे, आणि आता राजीव पुन्हा US लाही जाणार आहे, तर या पार्श्वभूमीवर जर त्यांनी एकमेकांसाठी गाणी गायली तर ती कोणती असतील.. सुरुवातच ऋजुनी "जीवनात ही घडी अशीच राहुदे"नी केली.. मग अजिंक्यनी "धुंदी कळ्यांना, धुंदी फ़ुलांना, शब्दरूप आहे मुक्या भावनांना" गायलं.. दोन्ही आवडली सगळ्यांनाच. मग ऋजुनी गायलं "प्रतिमा उरी धरूनी मे प्रीति गीत गावे".. त्यावर अजिचं "लाजून हासणे अन हासून ते पहाणे" झालं.. मग दोघांचही "प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी गं/ प्रिया उगाच संशयात मी बुडाले रे" झालं.. हेही खूपच आवडलं.. मग थोडा खेळकर मूड अजून extend करण्यासाठी ऋजुनी "ये लडका हाये अल्ला कैसा है दीवाना" म्हणलं. यावर अजिनी एकदम "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" सादर केलं.. त्यांच्या लिस्ट मधलं शेवटचं गाणं ओतं "तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमाँ हुए पुरे दिलके.." दोघांचेही आवाज छान लागले होते, आणि एकमेकांना पूरक गात होते. सगळ्यांनाच यांची गाणी इतकी आवडली की 'अजून अजून' ची demand आली.. ऋजूताला अपेक्षित होतं आणि ती तयारही होतीच.. "चांदण्यात फ़िरताना माझा धरलास हात" गायली ती.. काय सूर लागला होता.. आवाज खरच छान होता तिचा.. पण कमाल केली ती अजिंक्यनी.. ऋजुता गायल्यावर तो गाईल असे कोणालाच वाटले नव्हते.. पण त्याने या क्षणासाठीच भरपूर मेहनत घेतलेले आणि बसवलेले "प्रथम तुज पाहता, जीव वेडावला.. उचलुनी घेतले निजरथी मी तुलाऽऽ.." सुरु केले.. सगळेच impressed !! आवाज मस्त लागला होता त्याचा.. जीव ओतून गायला तो.. एकदम perfect ! ऋजुता ऐकतच राहिली.. जेव्हा या गाण्याच्या कार्यक्रमाचं ठरलं तेव्हाच अजिंक्यनी ठरवलं होतं की संधी मिळाली तर हे गाणं नक्की गायचं! ऋजुला प्रथम त्याने पाहिले त्यावेळी हेच गाणे त्याला आठवले होते.. त्या आठवणीची आठवण म्हणून हे गाणं तरी तिला ऐकवायचच.. या नंतर उपस्थित लोकांनी दोघांचही भरपूर कौतुक केलं.. मनू-राजीव खुश झाले, मित्र मंडळींनी शिट्ट्या वाजवल्या.. एकूण त्यांचा कार्यक्रम successful झाला.. काही वेळानी त्या दोघांना थोडी उसंत मिळाली.. "छान गायलास.. खूपच छान.. आवाज सूट होतो तुझा या गाण्याला.." " thanks . खरंच आवडलं?" "अरे म्हणजे काय? खरंच.. एकदम surprise .. कधी बसवलंस? सांगीतलं नाहिस.." "अरे, surprise च द्यायचं होतं.. मग सांगणार कसं? " "हो? मस्त surprise होतं मग.. आपला कार्यक्रम पण hit झाला एकदम.." "पूर्ण श्रेय तुला.. आयडीया तुझीच होती.." "पण तू साथही दिलीस ना.. एकटीचं माझं गाणं बोर झालं असतं!" "छे, तुझं काहीच बोर होत नाही.." "अं?" "काही नाही.." मग आवरा आवरीला सुरुवात झाली.. मनू राजीवबरोबर बाहेर जाणार होती.. ऋजुच्या घरचे लोकही होतेच, ती त्यांच्या बरोबर जाणार होती.. अजिंक्यही घरी पोचला.. आजची संध्याकाळ अगदी त्याच्या मनासारखी गेली होती.. ऋजुचा अधिकृत फोटो होता त्याच्याकडे, मेहनत घेऊन बसवलेलं गाणं तिला आवडलं होतं, त्यांचा joint program appreciate झाला होता.. आज शांत झोप नक्की लागणार होती त्याला! क्रमश:
|
Kashi
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:47 am: |
| 
|
जबरदस्त... आमची झोप उडवू नकोस......पुढचा भाग कधी ?
|
Abhija
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:25 am: |
| 
|
व्वा! छान आहे की कथा! छोटीछोटी वाक्य वापरल्यामुळे वेग चांगला पकडलाय कथेनं!
|
Manuswini
| |
| Thursday, March 22, 2007 - 7:55 am: |
| 
|
काय मस्त गोष्ट आहे ही... असेच काहेसे काही कधीचे आठवयला लावणारी.. असाच एका मैत्रिणीचा साखरपुडा ते लग्न आठवले पण यार अपने मे हिम्मत कम थी.. मन ई मन मे रह गयी.. म्हणुन अपुर्ण तु तुझी गोष्ट पुर्ण कर हो लवकर मात्र. मी अगदी झोपेतुन उठुन check केला पुढचा भाग मस्त डोळ्यासमोर उभे करतेस ते प्रसंग.... जसेच्या तसे...
|
Psg
| |
| Thursday, March 22, 2007 - 11:37 am: |
| 
|
.४. अजिंक्यचा मूड पार गेला होता, ऑफिसमधल्या colleagues बरोबर बोलायचीही लाज वाटत होती त्याला.. मनूचा साखरपुडा होऊन ४ दिवस झाले होते, तरीही तो त्या आठवणींतून बाहेर येत नव्हता.. सतत तेच विचार डोक्यात..काय मस्त गायले होते ते.. duets मधे तर perfect understanding होतं दोघांमधे.. जबरदस्त chemistry होती त्यांची.. त्याचं कामात अजिबात लक्ष नव्हतं.. त्याच हरवलेल्या मूडमधे त्याने एक अत्यंत क्षुल्लक चूक केली होती, आणि त्यामुळे निष्कारण penalty भरायला लागणार होती त्यांना.. त्याच्या लक्षातच आली नव्हती ती चूक.. आधी penalty ची demand पाहून चक्रावलाच तो, पण नंतर त्याचं कारण लक्षात आलं त्याच्या आणि शरमिंदं वाटलं! सरांनी त्याला केबिनमधे बोलावून घेतलं होतं आणि त्याच्याशी one to one बोलले होते ते.. "अजिंक्य काय झालंय? is everything ok? या अश्या चूका तुझ्याकडून कधीच झाल्या नाहित. You have a spark in you . घरी काही problem आहे का, का अभ्यासाचं टेन्शन घेतलं आहेस? हे बघ, जास्त टेन्शन घेऊ नकोस. अभ्यासाला काही मदत हवी असेल तर सांग, काही reference books हवी असतील तरी सांग. Afterall, I look to you as my future partner! .. अलिकडे कामात लक्षं नाहिये तुझं. असं करू नकोस, just concentrate, ok? मान खाली घालून अजिंक्य बाहेर आला.. मेल्याहून मेल्यासारखं होत होतं त्याला.. असं कसं झालं आपल्या हातून? शी! कुठे होतं लक्षं आपलं काम करताना? ऋजुता!! ऋजुच्याच विचारात आहोत आपण गेले कित्येक दिवस.. तिच्याशिवाय दुसरं काही सुचत नाहिये.. आधी तो ट्रेक आणि नंतर गाण्याची तयारी, आणि त्या नंतर ती engagement ceremony ! त्यानंतर रोज फोन, sms चालू आहेतच.. काय दिवास्वप्नं पाहिली आहेत आत्तापर्यंत तिला समोर imagine करून.. त्यातूनच अश्या फ़ालतू mistakes होताहेत.. पण ऋजुताचा विचार का करतोय आपण इतका? का? बास. आता ऋजुताचा विचार करायचा नाही, ती किती सुंदर दिसते, ती किती अप्रतिम गाते, ती कशी आपल्याशी बोलते, ती कशी चिडते, ती कशी फ़ार चांगली मुलगी आहे, तिच्याबरोबर कसं सतत बोलावसं वाटत., ती कशी photogenic आहे, ती कशी........ तिचा विचार करायचा नाही असं ठरवताना इतकं आठवतय, मग विचार करायचा असं ठरवल्यावर तर... ... ... विचार करायचा ऋजुचा? असा वेगळा, मुद्दामहून करता येतो तिचा विचार? ती आहेच ना मनात.. पण मग त्यामुळे अश्या गोच्या होतात ना.. आजची चूक.. definitely not acceptable!! आणि अभ्यास?? किती मागे पडलाय? june attempt मधे पास व्हायचय की नाही? माहिते ना एकदा एखादा रखडला की रखडला.. असं नकोय व्हायला आपल्याला आपल्याबद्दल.. सर चक्क junior partner करायला तयार आहेत, पण मोठ्या कंपनीत जॉब मिळाला तर ते काही नाही म्हणणार नाहित.. आणि बाबा म्हणत होते की CA कर पूरक म्हणून, तेही पटलं होतं, लगेच काही जॉबची गरज नाहिये.. CS + CA झालो तर लाईफ़ बन जायेगी.. पण त्यासाठी अभ्यास करायला हवा ना? तोही पूर्ण जोर देऊन.. हे असे ऋजुचे विचार सारखे मनात असतील तर अभ्यास कसा होणार? पण ऋजुचे विचार येतातच मनात.. का? तिलाही असं होतं का? इतकी खळबळ फ़क्त माझ्याच मनात आहे का? ऋजु, हम यहाँ तडप रहे है और क्या आप चैनसे दिन गुजार रही हो? नॉट फ़ेअर यार.. पण तुला मी विचारूही शकत नाही ना की ऋजुता, माझ्या मनात सतत तुझे विचार असतात, तसेच तुझ्याही मनात माझे विचार असतात का? अजिचं डोकं बधीर झालं. काहीच सुचेना त्याला.. रोग सापडलाय पण इलाज नाही असं झालं त्याचं.. आपल्या मनात ऋजु आहे, पण तिच्या मनात आपण आहोत का हे कळवून घेणं जमणार नाही आपल्याला.. त्यापेक्षा आपण अभ्यास करावा हे उत्तम. सध्याचा अभ्यासाचा बॅकलॉग पूर्णं केला की पुन्हा यावर विचार करू. आणि ऋजु काही लांब नाहिये.. बोलतोय की आपण तिच्याशी रोजच! हे इतकं ठरवल्यानंतर अजिला बरं वाटलं थोडं.. मनातल्या मनात त्याने सरांना पुन्हा सॉरी म्हणलं. अशी चूक पुन्हा करणार नव्हता तो. मग रूटीन सुरू झालं अजिंक्यचं.. सकाळी- रात्री अभ्यास, reference books, case laws वाचणं, पेपर्स बघणं, मधल्या काळात ऑफिसातली कामं, संध्याकाळी मित्रांशी गप्पा, फोन.. ऋजुचे विचार प्रयत्नपूर्वक कमी केले होते त्याने. पण जमत नव्हतं ते नीट.. त्रास व्हायचा फ़ार.. तिच्याशी आता अगदी रोज बोलणही व्हायचं नाही.. एक्-दोन दिवसांनी फोन व्हायचे.. पण कितीही नाही म्हणलं तरी तिच्याशी बोलल्यावर खूप छान वाटायचं अजिंक्यला.. असं वाटायचं की काय वेडेपणा आहे हा आपला, वेडेपणा कसला, चक्क पळपुटेपणा आहे.. तीपण नाराज वाटायची.. 'अलिकडे बोलत नाहीस माझ्याशी' असं म्हणाली होती.. पण त्याने अभ्यासाचे कारण सांगितल्याबरोबर तिला पटलं होतं. तिलाही अभ्यास होताच तिचा.. किती mature होती ना ऋजु.. किती चांगली होती ती.. तोच मूर्ख होता.. त्यालाच अभ्यास आणि तिची मैत्री balance करता येत नव्हती.. अजिच्या मनातले उलट सुलट विचार काही कमी झाले नव्हते, पण तरी अभ्यासाची आठवण झाली की सगळं मागे ठेवावं लागत होतंच. कसेबसे १५-२० दिवस गेले. अजिंक्यचा अभ्यास मार्गाला लागला, ऑफिसचं कामही ठीक सुरु होतं, पण मनाला चैन पडत नव्हतं.. नक्की काय होत होतं त्यालाच समजत नव्हतं.. सारखी कसलीतरी अस्वस्थता जाणवत होती.. शेवटी त्याने ऋजुताला भेटायचं ठरवलं.. तिला फोन करून वैशाली मधे बोलवलं. तिही लगेच हो म्हणाली.. संध्याकाळी तिच्या आधी पोचला तो वैशालीपाशी.. थोड्या वेळानी आली ती. तिला पाहूनच त्याला खूप बरं वाटलं.. "हाय!" "हाय! कसा आहेस?" "ठीक, तू कशी आहेस? अभ्यास कसा चालू आहे?" "अभ्यास काय, ओके.. मला काही तुझ्याइतका अभ्यास नसतो काही.. चालू आहे थोडा थोडा.. तुझा अभ्यास कसा चालू आहे?" "चालू आहे. आता गाडी मार्गाला लागली असं वाटतय. टफ़ आहे गं, आत्तापासून अभ्यास केला नाही तर खरं नाही, वाट लागेल.." "हो, माहिते. कसा इतका अभ्यास करवतो तुम्हाला कोण जाणे.. मला तर बोर होतं.. " "असं कसं? हेच करीयर आहे म्हणल्यावर करायला लागणारच ना.. आणि मला आवडतात पण सगळे विषय.. आता गाण्याचा अभ्यास करताना तुला बोर होतं का कधी?" "हं, तेही आहेच. तुला माहित्ये मला कधी कधी वाटतं की मी गाण्याच्या मागे इतकी मेहनत घेते ती बरोबर आहे की नाही?" "म्हणजे?" "म्हणजे मला गाण्यातच interest आहे. M.Com करत्ये मी, पण मला ते करून काही accounts किंवा taxation मधली नोकरी नाही करायची.. मी गाण्यातच रमते जास्त. रागांची ओळख, त्यांचा रियाझ, वेगवेगळ्या बंदिशी.. गुरुजींकडे तर अक्षरश्: खजिना आहे माहितीचा, ज्ञानाचा.. तर माझं बरोबर आहे ना की चूक? स्टेज शोज, competitions मधे भाग घेणं नाही आवडत मला.. गाण्याचं commercialisation च पटत नाही मुळात.. आपल्या आनंदासाठी गावं आणि दुसर्यांना गाणं शिकवावं हेच आवडतं मला.. पण अजिंक्य am I having a wrong attitude? " wrong attitude? what about? अजिबात नाही.. चकचकाटाला न भुलता केवळ गाणं शिकणं किती जणांना जमतं ऋजुता? आपल्या कलेचा निखळ आनंद घेणं किती जणांना शक्य होतं? I am proud ऋजुता की तू असा विचार करतेस.. आणि नुसता विचारच नाही करत, तर कृतिही करतेस.. तुझं काहीच चुकत नाहिये, be assured about it .." " oh thanks अजि.. किती बरं वाटलं तुझ्याशी बोलून. नाहितर अश्या मनातल्या insecurities generally मी सांगत नाही कोणाला.. पण तुझ्याशी share करायला काही हरकत नाही असं वाटतं मला कायमच!" " The pleasure is all mine ma'm ! आता मागे नाही का मी तुला पकवलं होतं मला सर बोलले आणि माझा अभ्यास मागे पडला होता तेव्हा.." "ए, पकवलं कुठे? तेव्हा तर तू फ़ारच अपसेट झाला होतास.." "पण तू नीटपणे ऐकून घेतलस माझं गं.. it was so important for me at that time !! अजि एकदम गंभीर झाला.. "ऋजुता even I feel very comfortable talking to you .. असं वाटतं की मी काहीही बोलु शकतो तुझ्याशी.. अगदी तुला पाहिल्यापासूनच त्या ट्रेकला.. नाहितर आपली ओळख अशी कितीशी आहे? १-२ महिने? आत्ता अभ्यास म्हणून आपण गेले काही दिवस बोलत नव्हतो तर मला कसंतरीच व्हायचं, माहिते? वाटायचं की सगळं टेन्शन तुझ्याबरोबर शेअर करायला हरकत नाही.. I dont think मी माझ्या करीयर विषयी अजून कोणाशी बोललो असेन.. म्हणजे मित्र आहेत, पण त्यातल्या insecurities मी सांगायला लागलो त्यांना तर खिल्लीच उडवतील माझी.. आणि कधीकधी हे pressure unbearable होतं गं.. आई-बाबा पण relate करू शकत नाहित त्याच्याशी.. उलट ते काळजीत पडतात.. मग मी त्यांना काही सांगतच नाही.." "सेम अजि.." ऋजुता हसली.. "सेम. मलाही असच होतं.. हे मी गाण्याविषयी बोलले ना तुला आत्ता ते कधीच कोणाशी बोलू नव्हते शकले.. माझ्या आईबाबांना तर वाटतं की हा छंद आहे आणि मी तो छंदापुरताच ठेवावा.. हे असं full time गाणं करणं त्यांना नाही आवडणार. मग असं वाटलं होतं की माझे विचार बरोबर आहेत ना की चुकीचे, कोणी समजून घेऊ शकेल का माझी बाजूही? पण असही वाटलं होतं की तुला कळेल.. somehow never had a doubt about you !" "आयला.. गंमतच आहे!" दोघही एकमेकांकडे पाहून हसले.. आणि दोघांनाही काहीतरी जाणवलं.. "ऋजु, I don't know.. पण तू असशील का अशी नेहेमीच माझं सगळं ऐकून घ्यायला? can I hope that you'll be always around ?" "अजि, मला आवडेल, खूप आवडेल.. कारण मलाही कोणीतरी हवं आहेच ना माझं मन मोकळं करायला.. an Agony Uncle!! " दोघही पुन्हा हसले.. "अजि, पण आपण काही conclude करायला नको आत्ताच आणि इतक्या घाईघाईनी.. प्लीज! let's not take anything for granted . समजतय तुला मला काय म्हणायचय ते? आपली मैत्री अगदी नवी आहे, आणि सध्या आपल्या करीयर्समधेही मोठे decisions घ्यायला लागत आहेत आपल्याला.. सगळंच कन्फ़्यूजन आहे.. सो ते sort out करायलाच महत्त्व देऊया सध्या.. आपले सूर एकमेकांशी perfect जुळतात, पण त्या पलिकडे जाऊन आत्ता लगेचच काही विचार करूया नको.. इतक्या लगेच, इतक्या झटपट तर नकोच.." अजिंक्य एक मिनिट गप्प झाला. त्याला पटलं ऋजुताचं बोलणं.. " agreed ऋजु! you are such a good thinker ! खरंच, इतकी टेन्शन्स आहेत आसपास की ती clear करणं ही priority आहे. maybe, in the coming few months पुष्कळ गोष्टी आपोआप क्लीयर होत जातील.. सगळं काही आत्ताच, याच वेळी ठरवलं पाहिजे असं नाही.. पण या सर्व काळात I hope आपण एकमेकांशी सगळं काही बोलायला, शेअर करायला असू, राहू. मी खूप जास्त expect करतोय का?" "नाही अजि.. तुला कळलं, पटलं.. you got the point , अजून काय हवं?" "मग? लगेच कळलं की नाही? आहेच मी हुशार.. अगदी लहानपणापासूनच!" "हो? खरं की काय?" "आणि मला माहिते की तू खूप खूप चांगली आहेस.." "हो का? हे आणि कधी समजलं म्हणे आपल्याला?" "अर्रे! बस क्या.. लग्गेच कळलं मला.. अगदी प्रथम तुज पाहता.." "अं?" दोघंही खळखळून हसले! समाप्त!
|
पूनम,मांडणी छान आहे गं कथेची.. शेवट आवडला गं
|
Abhija
| |
| Thursday, March 22, 2007 - 11:59 am: |
| 
|
छान! :-) पुन्हा एकदा पहिल्या पासून संपूर्ण कथा वाचाविशी वाटते. ही कथा सुचते म्हणजे नेमकी काय प्रोसीजर असते? कथानक संपूर्ण काल्पनिक असतं, की अश्या सत्य घटना आजूबाजूला घडलेल्या असतात आणि त्यातंच कथेच जर्म सापडतो? होतकरू वाचकांना गैडन्स द्यावा ही विनंती! कथा छान प्रवाही झाल्येय!
|
Manogat
| |
| Thursday, March 22, 2007 - 12:14 pm: |
| 
|
छान वटलि कथा, keep it up poonam
|
Kashi
| |
| Thursday, March 22, 2007 - 12:32 pm: |
| 
|
khoooop avadli..!!!! 20 yrs back ..kahi ghatana athavlya...
|
Jayavi
| |
| Thursday, March 22, 2007 - 12:33 pm: |
| 
|
पूनम........ अगं कसली Romantic गोष्ट लिहिली आहेस गं..... अपुन तो फ़िदा जानेमन ऋजुता आणि अजिंक्य ची जोडी अगदी मनापासून आवडली.... किती सुरेख वर्णन केलं आहेस....! प्रेमात पडल्यावर काय होतं त्याचं वर्णन तर लाजवाब..... अनुभवाचे बोल आहेत की काय.... ट्रेकींगचे details पण एकदम सही. करतेय की काय तू सुद्धा? तुझ्या कथा खूप आवडतात....... खूप छान प्रवाही आणि उत्सुकता वाढवणार्या, खिळवून ठेवणार्या असतात. तुझ्या कथेच्या मालिकेतला हा टप्पोरा मोती खूप आवडला 
|
पूनम छानच झालिये. सत्यकथा वाटतेय अगदी, आजूबाजूला घडलेली. पुढचे काय घडेल ते सांग आम्हाला पण
|
Princess
| |
| Thursday, March 22, 2007 - 1:57 pm: |
| 
|
वॉव पूनम, मजा आ गया... खुप आवडली. कित्ती दिवसानी अशी छान रोमॅंटिक कथा वाचायला मिळाली.
|
Meenu
| |
| Thursday, March 22, 2007 - 3:56 pm: |
| 
|
हं अगदी पूनम कथा आहे ही, very sound minded people.. and realistic too!! तुझ्या कथेची खरी मजा यात असते सगळे कसे जमिनीवर पाय ठेवुन उभे असतात मग ते आपलेसे वाटतात. कथेतील पात्रांचं भावनांचं संयमित प्रदर्शन ..! हे सगळ्यांनाच इतक्या सहजपणे जमत नाही हं ..! मस्तच ही कथा सुद्धा .. पैकीच्या पैकी मार्क्स गं ! बापरे एवढी मोठ्ठी प्रतिक्रीया आणि मी ....???
|
Divya
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:25 pm: |
| 
|
मस्त लिहीली आहे कथा. काहीतरी मिसल्यासारख वाटायला लावणारी...
|
Kranti
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:47 pm: |
| 
|
wow, khoopach masta jamali aahe Goshta aataparyant...pudhachya goshtichi aturtene vaat pahat aahe 
|
poonam.....really enjoyed the whole story...
|
Sunidhee
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:56 pm: |
| 
|
मस्त लिहिले आहेस गं.. अगदी खरंखरं वाटते. कुठेही अती रोमॅंटीक नाही. रडुगोडु नाही.. छाऽन.
|
Abcd
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:25 pm: |
| 
|
पुनम, अग मस्त लिहिल आहेस एकदम फ़िदा २६. अगदी खर पण आहे २६..१० वर्ष पुर्वी २६.. मी माझ्या नवर्याला गाण्याच्या प्रोग्राम मधेच भेटले आणि आम्ही वैषालितच भेटायचो other details too...like engagement...there love for music (I dont sing though...-))) there carrier thoughts...God ...felt as if someone is writing our story
|
मी सांगायला लागलो त्यांना तर खिल्लीच उडवतील माझी.. आणि कधीकधी हे pressure unbearable होतं गं>>>> क्या बात है. तू ca/icwa/cs केलेस का की करत आहेस / होतीस. एकदम तीच फिलींग मला यायची दर नोव्हे. डिसे नी मे जून ला. ( परत रिझल्ट लागताना ) कथा खूपच मस्त होती. शेवट मात्र आवरता घेतला असे वाटले. लिहीन्याची ईस्टाईल मस्त आहे.
|
|
|