|
Sumedhap
| |
| Tuesday, March 20, 2007 - 4:38 am: |
| 
|
हल्ली कुणास ठाऊक काय होतं एक करायला गेलं की भलतंच होतं हल्ली मन थार्यावरच नसतं जागेपणीसुद्धा डोळ्यात स्वप्न असतं हल्ली प्रत्येक ऋतुत पाऊस पडतो एक अनामिक नात्याचा आकार मनी घडतो हल्ली माझ्या मनातही मोर नाचतो अमृतमयी आनंद मनाच्या तृप्तीपर्यंत पाजतो हल्ली प्रत्येक गोष्ट सप्तरंगी दिसते हृदयातली हिरवळ जणु ठिकठिकाणी वसते हल्ली सतत ओठांवर गाणं असतं दाटलेल्या आभाळातुनही मग सुख बरसतं प्रेमात एवढं सगळं होतं, हे कधी ठाऊक नव्हतं पण शपथेवर सांगते आयुष्य, इतकं छान कधीच नव्हतं......
|
सुमेधा खरचं हल्ली असं का होतं? मलापण हा प्रश्न पडला आहे. असो. कविता छान आहे.
|
Mankya
| |
| Tuesday, March 20, 2007 - 7:11 am: |
| 
|
सुमेधा .. असं वाटल जस रात्री रातराणीला बघून वाटतं, पहिलं प्रेम असेच असेल ना ! भावना छानच उतरल्यात गं ! अजूनहि बहर येऊ शकेल या कवितेत, मला वाटलं ! माणिक !
|
Mankya
| |
| Tuesday, March 20, 2007 - 8:53 am: |
| 
|
तशी सुरुवात तर प्रेमाने झकास झाली या वर्षाची पण ... निशिगंध विसावली निरोपापुर्वी पानाफुलावर क्षणिक उन्हं सांजवेळ तशी लेवून आली संधिप्रकाशाचं लेणं हळूहळू भोवताली अंधाराचं साम्राज्य फोफावलं मनी नसता मनाने गतकाळाच्या भुयारात डोकावलं आठवांची अधाशी गिधाडे फडफड करत आली क्रूरपणे नखे खुपसून काळजात तृप्त झाली स्मरता तुझा चेहरा, हसणं पुन्हा स्वतःला हरवलं कळलं, तुला हिरावून काळाने काय मिळवलं सरावलोय सर्वास, वेडं चांदणही सलगीणं वागतं रात्री आकाशही आपलेपणानं जागरणाचं देणं मागतं रातराणीला पाहून जीव अजूनही वेडावतो तुझा श्वास रोमारोमात निशिगंध होऊन जागतो ! माणिक !
|
Sumedhap
| |
| Tuesday, March 20, 2007 - 9:26 am: |
| 
|
श्री आणि माणिक...फ़ार फ़ार आभारी आहे.... माणिक, तुमची कविता फ़ार सुरेख आहे...शब्दरचना....मस्तच... तुझा श्वास रोमारोमात निशीगंध होऊन जागतो. Superb!!
|
Mankya
| |
| Tuesday, March 20, 2007 - 4:36 pm: |
| 
|
मनःपुर्वक आभार सुमेधा ! माणिक !
|
Gargi
| |
| Tuesday, March 20, 2007 - 4:55 pm: |
| 
|
अशा सायंकाळी अशा सायंकाळी..... दिशांच आर्तपण माझ्यात परावर्तित...... आरपार मी मनमोर मनाच्या विसरसीमेवर बरसणारा पाउस....... आणि पावसळा नसतानाही मी भिजटभोर......
|
स्वाती... कविता खूप आवडली... शब्दांचा वापर अगदी चपखल पणे केलाय. मी भिजटभोर.... अप्रतिम माणिक निशिगंध वर आम्ही जाम फिदा!! रातराणीला पाहून जीव अजूनही वेडावतो तुझा श्वास रोमारोमात निशिगंध होऊन जागतो ! हे फारच विशेष आणि सुंदर
|
क्या बात है.. >>हल्ली सतत ओठांवर गाणं असतं दाटलेल्या आभाळातुनही मग सुख बरसतं ओहोहो, खल्लास... >>प्रेमात एवढं सगळं होतं, हे कधी ठाऊक नव्हतं पण शपथेवर सांगते आयुष्य, इतकं छान कधीच नव्हतं...... मस्तच लिहिलं आहे! आपला, (गाण्यातला आणि सतत कुणाच्या तरी प्रेमात पडलेला!) तात्या.
|
Jayavi
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:01 am: |
| 
|
सुमेधा.....अगदी ताज्या ताज्या प्रेमात पडलेली दिसते आहेस खूप छान! अहा गार्गी....... किती तरल कविता उतरलीये गं....! आणि पावसळा नसतानाही मी भिजटभोर...... एकदम कातिल....! माणिक, कवितेतली वेदना भिडते आतपर्यंत.....मस्तच!
|
Jayavi
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:04 am: |
| 
|
एक प्रेम असंही.... द्वैत रातीचा शृंगार सोवळा दाहक प्रीती मध्यान्हीची प्रियकर दोघे जरी भिन्न ते तृप्ती आगळी ह्या अवनीची हळूवार रात्रीचे फ़ुलणे चांदण्यातले उत्कट भिजणे संमोहन त्या निशाकराचे मंत्रमुग्ध मग तिचे लाजणे केशरातली ओली चाहुल आसूसल्या किरणांची मखमल धसमुसळा अंगार रवीचा वरुन रांगडा आतून कोमल द्वैतातील हे प्रणयाराधन युगे युगे चालते निरंतर सृष्टी बहरते ह्या इष्काने फ़ुलते धरती हसते अंबर जयश्री
|
Smi_dod
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:28 am: |
| 
|
व्वा...खुप दिवसानी आले ईथे..सुंदर...माणिक,जया,सुमेधा,अ..खुपच छान
|
Mankya
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:52 am: |
| 
|
जया ... Too much यार, तू तर मूडच बदलून टाकलास की ! एक एक कल्पना वाचून उर्ध्व लागला गं ( तू ना प्रत्येक गोष्टीला ह्या म्हणजे Romantic मूड मध्ये आणू शकतेस खरंच )! शेवटच्या दोन ओळींनी तर कब्जा केलाय मनावर, सारखं तेच गुणगुणतोय ! गार्गी .. ID सार्थ केलायेस गं, ५ ते ६ ओळीत हे काय काय मांडलस अन तेही किती सुरेख शब्दात ( हि खासीयत मीनुचीपण आहे बरं ) , मान गये ! मयुर, जया, स्मि मनःपुर्वक आभार ! माणिक !
|
केशरातली ओली चाहुल आसूसल्या किरणांची मखमल धसमुसळा अंगार रवीचा वरुन रांगडा आतून कोमल वाह!! द्वैतातील हे प्रणयाराधन युगे युगे चालते निरंतर सृष्टी बहरते ह्या इष्काने फ़ुलते धरती हसते अंबर पुन्हा एकदा वाह!!
|
Mrunatul
| |
| Wednesday, March 21, 2007 - 9:03 am: |
| 
|
भेटायचे आहे एकदा तुला, तुझ्याशी बोलायला खूप काही सांगायला तुझेही काही ऐकायला कितीतरी काळ गेला लोटून, एकमेकांशी संवाद साधून एकमेकांना मनातले सांगून काही क्षण असेच गप्प एकत्र बसून. दरम्यान, खूप काही घडून गेलयं, मनात घर करुन बसलयं ते सगळ मोकळं करायचयं तुझ्या मिठीत रडायचयं म्हणूनच.....
|
Manogat
| |
| Wednesday, March 21, 2007 - 9:17 am: |
| 
|
Mrunatul सुरेख, किती सहज पणे भावनांना शब्दात गुंफलस.....
|
Jo_s
| |
| Wednesday, March 21, 2007 - 9:21 am: |
| 
|
जयावी, अप्रतीम झाल्ये ही कविता, अशाच अजून येउदेत
|
Mankya
| |
| Wednesday, March 21, 2007 - 9:35 am: |
| 
|
मृणाल .. आंधी सिनेमातलं " तेरे बाहो में सर .. रोते रहे !" ह्यासारखं वाटलं बघ ! काही क्षण असेच गप्प एकत्र बसून .. अगं हेच तर खर बोलणं असत दोघातलं ..!! माणिक !
|
Sumedhap
| |
| Wednesday, March 21, 2007 - 10:30 am: |
| 
|
धन्यवाद तात्या!!!!! ज़यवी...तुझेही मनपुर्वक आभार!!! तुझी कविता आप्रतीम आहे....एक असंही प्रेम...फ़ार सुरेख!!!
|
माणिक, >>विसावली निरोपापुर्वी पानाफुलावर क्षणिक उन्हं सांजवेळ तशी लेवून आली संधिप्रकाशाचं लेणं वा! या ओळी आवडल्या. छान लिहिल्या आहेत.. जयू, >>केशरातली ओली चाहुल आसूसल्या किरणांची मखमल धसमुसळा अंगार रवीचा वरुन रांगडा आतून कोमल क्या बात है जयू! जियो...! मृणातुल, >>दरम्यान, खूप काही घडून गेलयं, मनात घर करुन बसलयं ते सगळ मोकळं करायचयं तुझ्या मिठीत रडायचयं मार डाला..! --तात्या.
|
|
|