नमस्कार मित्रांनो , मीटर मध्ये पहिल्यांदाच लिहीण्याचा विनायकचा प्रयत्न झाड ऋतू येत होते ऋतू जात होते फुलाचे समाधान गळण्यात होते कळ्यांचे कुठे फूल सगळ्याच होते कळीचे खरे दु:ख खुडण्यात होते कुणा मी भुलावे कुणा आठवावे कुणी येत होते कुणी जात होते सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते कुणी गीत अर्ध्यात टाकून गेले कुणी राहिले त्याच मुखड्यात होते कुणी वासनेच्या बुडाले तळाशी कुणी मोह सोडूनही गात होते
|
Nachikets
| |
| Wednesday, March 21, 2007 - 5:55 am: |
| 
|
सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते वा!!!!
|
>> सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते क्या बात है. छानच आहे प. प्र. कुणी हा शब्द जरा जास्त वेळा वापरलाय असे वाटतेय नाही का? पण एकूण छानच.
|
सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते वा... खूप आवडला... कुणी गीत अर्ध्यात टाकून गेले कुणी राहिले त्याच मुखड्यात होते हे रत्न ही भारीच! जियो...
|
Desh_ks
| |
| Wednesday, March 21, 2007 - 6:29 am: |
| 
|
चांगलं आहेच पण एक विचार आला तो मांडतो आहे. 'भुलावे' हे 'भूल जाना' या अर्थी म्हटलं आहे असं समजून हे लिहितो आहे. 'भुलावे' याचा मराठी अर्थ 'मोहात पडावे' असा काहीसा आहे ना? तुमच्या शेरात 'विसरावे' असं म्हणायचं असेल तर हे क्सं वाटतं ते पाहा कुणा मी स्मरावे कुणा विस्मरावे किती येत होते, किती जात होते जर हे तुम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थाशी सुसंगत नसेल तर हा एक निराळाच शेर झाला म्हणायचा
|
Jo_s
| |
| Wednesday, March 21, 2007 - 7:06 am: |
| 
|
छानच गझल सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते हा शेर ..... काय बोलू? एकदम टचींग.
|
Meenu
| |
| Wednesday, March 21, 2007 - 7:11 am: |
| 
|
झाड छान गज़ल रे ..
|
याहू........... झाडा एकदम झकास रे!! कुणा मी भुलावे कुणा आठवावे कुणी येत होते कुणी जात होते सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते जान कुर्बान रे भावा ह्या शेरांवर... 'कधी याच जागी तुझे हात होते ' हे आधी तुझ्या मेल स्टेटस वर वाचलेलं होतं त्याचा आज संदर्भ लागला देशपांडे तुम्ही सुचविलेला शेर छान आहे. 'कुणी वासनेच्या बुडाले तळाशी कुणी मोह सोडूनही गात होते' इथे 'मोह सोडूनही गात' ह्या ऐवजी एखादी दुसरी शब्द रचना वापरता येईल काय? म्हणजे मक्ता अजुनही प्रभावी करता येईल असे मला वाटते. मोह सोडून 'गात' असतील तर 'मोह सुटला' असे म्हणता येईल काय? किंवा विरक्तीचे गाणे जर गात असतील तर त्या अर्थाने एखादा शब्द बसविता येतो का हे पाहा. 'कुणी' ह्या शब्दाने गझलेत एकूणच जास्त जागा व्यापली आहे असे वाटते. चु.भू.दे.घे. एकूणच झकास गझल
|
Jayavi
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:20 am: |
| 
|
झाडा........पहिलाच प्रयत्न झकास जमलाय कुणा मी भुलावे कुणा आठवावे कुणी येत होते कुणी जात होते....... मस्त! सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते माशाल्लाह........!
|
Mankya
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:41 am: |
| 
|
झाडा ... फक्कड जमलीये रे ! सलावी कशी फुले ... फिदा आपण तर ! माणिक !
|
सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते...! जबरदस्त शेर...!
|
Vshaal78
| |
| Wednesday, March 21, 2007 - 11:06 am: |
| 
|
झाद, चन्गले लिहिलय. पण ... सर्वच्य सर्व शेर भारि अशि एकच गजल दिसलि. बकि गजलांमधे एक तरी दुबळा शेर आहेच. असे क ? की पाच शेर हवेतच या हट्टपायी तसे होते ?
|
Zaad
| |
| Wednesday, March 21, 2007 - 1:38 pm: |
| 
|
धन्यवाद मंडळी!!! सतीश, तुमचा शेर छानच आहे. भुलावे हे विस्मरण या अर्थीच वापरलंय. मयूर, मोह सोडून गाणं हे मोह सोडल्यामुळे मिळालेल्या खर्या आनंदाचे प्रतिक आहे. वासनेच्या खूप आहारी जाउनही अंती कसलेच समाधान न मिळणे आणि आता कसलाच मोह न उरल्यामुळे खरेखुरे समाधान मिळणे यातला फरक सांगायचा आहे. तसे म्हटले तर मोह सोडण्याची एक आस असते.... पण त्याला मोह म्हणता येणार नाही. मोह, इच्छा, वासना, कामना, जुगुप्षा हे सगळे सारखे वाटणारे शब्द असले तरी प्रत्येक शब्द कुठे वापरायचा याचे काही अध्याहृत संकेत असतात. इथे दुसर्या मिसर्यात आलेला मोह हा शब्द, भौतिक, ऐहिक सुख़ासीनता या अर्थी येतो, शिवाय पहिल्या मिसर्यात वासनेवर जोर दिलाय म्हणजे दुसर्या मिसर्यातील मोह म्हणजे नक्की कशाचा मोह हे अजून स्पष्ट होते. दिग्गज्जांकडून यावर ऐकायला आवडेल!
|
झाड.. भावना पोहोचल्या actually पहिला मिसरा वाचल्यानंतर मी असा विचार केला की-- दुस-या मिस-यातही 'वासनेच्या तळाशी बुडलेल्या' लोकांबद्दल एखादा जहाल कटाक्ष असेल(माझी जहाल शब्दांची ओढ कधी कधी अतीच होते हा खरा तर अपराध मला मान्य करावाच लागेल ) पण पुन्हा एकदा गझल वाचल्यानंतर लक्षात आले की तशी खरेच काही आवश्यकता नाही. अर्थात मी आधी प्रतिक्रिया देताना 'मक्ता अजुनही प्रभावी करता येईल' असे जे म्हणालो होतो त्या 'प्रभावी'पणाचा अर्थ 'जहाल' हाच माझा गैरसमज होता. तो आता नाहीसा झाला आहे. दोन भिन्न प्रवृत्तींच्या मानसिकतेचेजगण्याचे नेमके चित्रण साध्य झाले आहे ह्या मक्त्यातून हे ग्रेट! लगे रहो...
|
Pulasti
| |
| Thursday, March 22, 2007 - 2:49 am: |
| 
|
झाडा, "भुलावे" - देशपांडेंच्या सूचनेस अनुमोदन. खुडणे, मुखडा आणि मक्ता आवडला. पण "ओंजळ" खरच अप्रतिम आहे! शुभेच्छा!! -- पुलस्ति.
|
Giriraj
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:18 am: |
| 
|
कळीचे खरे दु:ख खुडण्यात होते >> खूपच छान! सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते ...... आहा.. थोडी वेदना,थोडी आठवण,थोडा रोमांच... क्या बात है! याबद्दल दहा हापूस आंब्यांची झाडं बक्षीस रे झाडा!
|
गिरीराजजी आफताब नंतर इथेही बक्षीसांची खैरात!!... तुम्ही भलतेच मोठे वतनदार दिसता झाडा.. आता इतक्या आंब्यांच काय करणार
|
Gajanan1
| |
| Sunday, March 25, 2007 - 10:50 am: |
| 
|
झाडाला आम्बे लागतात.. पण गजल लागणार झाड आज पहायला मिळाले.
|
Vshaal78
| |
| Monday, March 26, 2007 - 9:39 am: |
| 
|
ओंजळीतल्या फुलांचा शेर हा सर्वोस्त्तम शेर आहे या गजलेतला. बाकिचे शेर ठीक आहेत. पण ती मजा नाही
|
Bairagee
| |
| Monday, March 26, 2007 - 12:35 pm: |
| 
|
सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते अतिशय सुंदर!
|
Ashwini
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:38 am: |
| 
|
सलावी कशी ही फुले ओंजळीला कधी याच जागी तुझे हात होते सुरेख.. अगदी हळूवार.
|
Chinnu
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:12 pm: |
| 
|
झाडा, छान झाली गझल. निर्मोही गळण्यात समाधानी फुले, समजुतदार कळीची खुडले जाण्याचे दु:ख, नाजुक आठवणींची सलणारी ओंजळ लयी भारी! कुणी गीत अर्ध्यात टाकून गेले कुणी राहिले त्याच मुखड्यात होते हा मला सर्वात जास्त आवडलेला शेर. मी पण अडकले आहे, पण मक्त्यात! मला नाही रे कळाला अर्थ.
|