सुमतिताई वानखेडे ऋतू येत होते , ऋतू जात होते गुपित वादळाचे कुणा ज्ञात होते तुलाही कळेना मलाही कळेना कळेना कशी धुंद बरसात होते शिकू दे मलाही गणित ह्या जगाचे कधी हार होते , कधी मात होते अश्या सांजवेळी तिमिर दाटताना दिव्यातील सोशीक फुलवात होते कसा उन्मळूनी सख्या तूच गेला अता सावराया तुझे हात होते जगाची कशाला तमा बाळगू मी ? खरे पाप त्यांच्याच नेत्रात होते
|
Mankya
| |
| Friday, March 16, 2007 - 6:18 am: |
| 
|
ताई ... जश्या कविता अप्रतिम तशी गजलही ...! मतला .. वेगळेपणा वाटला ! तिमिर दाटताना .. सावराया ... आतपर्यंत उतरले हे शेर ! शिकू दे .. साधेपणा भावला ! मक्ता .. शेवट भीषण सत्य .. भावलं अन पटलं ! खूप विचार करायला लावणारी पण समजायला सोपी ( ह्यातच यश असतं नाहि लिखाणाचं ! ) अशी वाटली ! माणिक !
|
Meenu
| |
| Friday, March 16, 2007 - 6:34 am: |
| 
|
जगाची कशाला तमा बाळगू मी ? खरे पाप त्यांच्याच नेत्रात होते >> हं !! खरय ..
|
सुमती मस्त उतरलीय. पुन्हा एकदा वाचते.
|
Bee
| |
| Friday, March 16, 2007 - 7:42 am: |
| 
|
सुमती गझल छान आहे.
|
जगाची कशाला तमा बाळगू मी ? खरे पाप त्यांच्याच नेत्रात होते best one
|
सुमतिताई, गज़ल आवडली! १)तुलाही कळेना मलाही कळेना कळेना कशी धुंद बरसात होते क्या बात है!
|
अश्या सांजवेळी तिमिर दाटताना दिव्यातील सोशीक फुलवात होते खूप आवडला..
|
Chinnu
| |
| Friday, March 16, 2007 - 1:23 pm: |
| 
|
आनंदयात्रींना अनुमोदन. सुमती, सुंदर गझल.
|
Pulasti
| |
| Saturday, March 17, 2007 - 2:20 am: |
| 
|
सुमतिताई, गझल आवडली. मतला कळला नाही. (मला बहुतेक कार्यशाळेतले मतले न कळण्याचा रोग जडला आहे.. तेव्हा राग नसावा ) फुलवात आणि हात शेर विशेष भावले. -- पुलस्ति.
|
Meenu
| |
| Saturday, March 17, 2007 - 3:26 am: |
| 
|
कधी हार होते , कधी मात होते >>> मला वाटतय की इथे द्विरुक्ती होतीये .. हार आणि मात दोन्हीचा अर्थ हरणे असाच होतोय ना ..? पुलस्ति मतला कळला नाही की connected नाही असं वाटलं. अर्थ मला वाटतं की स्पष्ट आहे. दिवस सरकत होते, बदल होत होते पण ते बदल वादळ घेउन येणार आहेत हे ठाऊक नव्हतं. किंवा वादळाच्या येण्याची गुप्त पणे तयारी चालु होती आणि आपल्याला कळलच नाही .. कसा उन्मळूनी सख्या तूच गेला अता सावराया तुझे हात होते >> इथे 'अता' लिहीण्याऐवजी मला चालेल असं वाटलं
|
Pendhya
| |
| Saturday, March 17, 2007 - 4:14 am: |
| 
|
अगदी साध्या शब्दातली एक सुंदर गजल.
|
Nachikets
| |
| Saturday, March 17, 2007 - 5:31 am: |
| 
|
"कधी हार होते , कधी मात होते" -- वा!!! सोशीक फुलवात आणि जगाची तमा .... खूप आवडले. दुसर्या शेरातल्या सानी मिसर्यात "कळेना" repeate झाल्यासारखा वाटला. त्या ऐवजी अजून काही शब्दांसाठी जागा करता आली असती असे वाटते.
|
Jayavi
| |
| Saturday, March 17, 2007 - 9:24 am: |
| 
|
अहा.....सुमति...खूप छान उतरलीये गं! पण हार होते आणि मात होते...ह्या द्विरुक्तीचं प्रयोजन कळलं नाही. अजून एक..... कसा उन्मळूनी सख्या तूच गेला अता सावराया तुझे हात होते हे पण कळलं नाही. कारण सखा उन्मळून गेलाय तर सावरायला त्याचेच हात कसे असणार. माझा हा कदाचित बालिश प्रश्न असेल. चू.भू.पदरात घ्यावी. कळेना चं repeatation मला पण थोडं जाणावलं. अश्या सांजवेळी तिमिर दाटताना दिव्यातील सोशीक फुलवात होते हा शेर सगळ्यात जास्त आवडला.
|
Meenu
| |
| Saturday, March 17, 2007 - 1:00 pm: |
| 
|
कसा उन्मळूनी सख्या तूच गेला अता सावराया तुझे हात होते >>> जयावी हा प्रश्न मलाही पडला होता त्याचा मी उलगडलेला अर्थ असा निघाला ... आत्ता तर तुझे हात मला सावरायला होते आणि तोच तु उन्मळुन गेलास ... पण तो काढलेला अर्थच म्हणावा लागेल म्हणुनच मला तिथे मला जास्त चांगलं वाटेल असं वाटलं
|
खूप दिवसांनी मायबोलीवर येत आहे.. सर्वप्रथम वैभवचे आभार मानते. आणि इथल्या सार्याच ज़ाणकार रसिकांचेही... आता काही खुलासे... 'अता सावराया तुझा हात होते' अशी ती ओळ आहे. उन्मळून पडणार्या सख्याला हात देणारी सखी.. असा अर्थ माझ्या लिखाणाचा आहे. "मात करणे' म्हणजे दुसर्यांवर विजय मिळविणे.('मराटी शब्दरत्नाकर' मध्ये दिलेल्या अर्थानुसार) त्या मुळे मला वाटतं... हार आणि मात दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. जया, 'कळेना' शब्दाचं पुन्: पुन्हा येणं... मला तरी वावगं वाटत नाही. आणि काही चुका झाल्याच असतील तर.. क्षमस्व.. कारण मी ही सद्ध्या विद्यार्थीच आहे.
|
अश्या सांजवेळी तिमिर दाटताना दिव्यातील सोशीक फुलवात होते शेर आवडला...!
|
Meenu
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:17 am: |
| 
|
"मात करणे' म्हणजे दुसर्यांवर विजय मिळविणे.('मराटी शब्दरत्नाकर' मध्ये दिलेल्या अर्थानुसार) बरोबर पण मात होणे म्हणजे हार होणे. एक जण दुसर्यावर मात करतो आणि दुसर्याची मात होते .. यात मात करतो तो जिंकतो ज्याची मात होते तो हरतो .. असं मला वाटतय तरी अजुन कुणाला नक्की माहीत असेल तर सांगावं त्या मुळे मला वाटतं... हार आणि मात दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. हार या शब्दाला हरणे अर्थ आहे पण मात दोन्ही बाजुंनी वापरता येतो हरणे आणि जिंकणे दोन्ही अर्थ क्रियापदावर अवलंबुन आहे.
|
Imtushar
| |
| Thursday, March 22, 2007 - 8:52 am: |
| 
|
हार होते आणि मात होते या दोन्हींचा अर्थ एकच आहे (असे मला वाटते). मीनूशी सहमत. गझल सुंदरच... 'तुलाही कळेना...' अप्रतिम! -तुषार
|
बंर बाबा... 'कधी जीत होते, कधी मात होते' आता ठीक आहे
|
Meenu
| |
| Thursday, March 22, 2007 - 2:23 pm: |
| 
|
बंर बाबा... 'कधी जीत होते, कधी मात होते' आता ठीक आहे >> जी मॅडमजी !!!
|
Pulasti
| |
| Thursday, March 22, 2007 - 2:38 pm: |
| 
|
ह्म्म.. काय पण चिकचिक करतात हे कार्यशाळेतले विद्यार्थी. जीत काय हार काय - काय फरक आहे.. हाच तर शेराचा point आहे!!  -- पुलस्ति.
|