Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
प्रसाद

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » प्रसाद « Previous Next »

Vaibhav_joshi
Thursday, March 15, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो...

ही आणखी एक ' जाणकार' गज़ल..


प्रसाद

ऋतू येत होते, ऋतू जात होते
कधी खिन्न होते, कधी गात होते!

किनारे सुखाचे कुणाला मिळाले?
कितीसे खलाशी समुद्रात होते...

उगा शोधले तू नभी चंद्र तारे
तुझे चांदणे तर तुझ्या आत होते!

मनी काय होते ऋतूंच्या कळेना
शिशिर जीवघेणे वसंतात होते...

सदा आर्जवांची रिकामीच पोटे
सदा याचनांचे रिते हात होते

अता बोलतो मी मनाशीच माझ्या
तुझे दूर जाणे अकस्मात होते...

तशी मोहरायास बंदीच होती
इथे चांदणेही तुरुंगात होते...

अशा मुग्ध चाली तुझ्या लोचनांच्या
किती टाळला शह, तरी मात होते!

भुजंगप्रयाता तुझे तंत्र साध्या
लगागा लगागा लगागात होते!


Mi_anandyatri
Thursday, March 15, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलाम प्रसाद..

उगा शोधले तू नभी चंद्र तारे
तुझे चांदणे तर तुझ्या आत होते
--किती मोठी भावना आणि किती सहजपणे सांगून टाकलीत...

अशा मुग्ध चाली तुझ्या लोचनांच्या
किती टाळला शह, तरी मात होते! - कातिल शेर!!!

किनारे सुखाचे कुणाला मिळाले?
कितीसे खलाशी समुद्रात होते... - खूप अर्थपूर्ण शेर!! वा!! - जितके वेळा वाचेन, तितका जास्त व्यापक वाटतोय...

... हा तर गझलेचा "महाप्रसाद" आहे..:-)


Mankya
Thursday, March 15, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह .... प्रसाद व्वाह !
सगळेच शेर आवडेश मित्रा !
याचनांचे रिते हात .. चांदणेही तुरूंगात .. टाळला शह .. अप्रतिम !
मक्ता ... किती वेगळा !

परत परत वाचावं अस काहितरी मिळालं !

माणिक !


Abhiyadav
Thursday, March 15, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अता बोलतो मी मनाशीच माझ्या
तुझे दूर जाणे अकस्मात होते...

perfect sher

Ganesh_kulkarni
Thursday, March 15, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद सर,
नमस्कार!
सगळेच शेर आवडले!
१) किनारे सुखाचे कुणाला मिळाले?
कितीसे खलाशी समुद्रात होते...

२)उगा शोधले तू नभी चंद्र तारे
तुझे चांदणे तर तुझ्या आत होते!

३) अता बोलतो मी मनाशीच माझ्या
तुझे दूर जाणे अकस्मात होते...
क्या बात है!



Zaad
Thursday, March 15, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, अप्रतिम गज़ल! सगळेच शेर आवडले!!

Meghdhara
Thursday, March 15, 2007 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह.. ग्रेट!
उगा शोधले तू.. मस्तच.

मेघा


Shyamli
Thursday, March 15, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद तुमच्या गझलेबद्दल आम्ही काय बोलावं
सगळेच शेर अप्रतीम झालेत
तशी मोहरायास बंदीच होती
इथे चांदणेही तुरुंगात होते... >>
हा जास्ती आवडला

Badbadi
Thursday, March 15, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगा शोधले तू नभी चंद्र तारे
तुझे चांदणे तर तुझ्या आत होते!

हा एकदम खास प्रसाद टच आहे.
नव्याने काय सांगणार?? म्हणून आवडली हे वेगळे सांगत नाहीये :-)


Mayurlankeshwar
Thursday, March 15, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साष्टांग प्रणिपात ह्या गझलेला...
अजुन काय बोलायचे?
प्रसादाचा आस्वाद घेतला की आम्हाला समाधी लागते :-)


Mi_abhijeet
Thursday, March 15, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगा शोधले तू नभी चंद्र तारे
तुझे चांदणे तर तुझ्या आत होते!

अता बोलतो मी मनाशीच माझ्या
तुझे दूर जाणे अकस्मात होते...

अप्रतिम शेर...
सहजपणा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे



Psg
Thursday, March 15, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अता बोलतो मी मनाशीच माझ्या
तुझे दूर जाणे अकस्मात होते...
वा वा! आणि मतला.. आत्तापर्यंत आलेल्यांमधे बेष्ट! :-) अर्थात तुम्ही काय मास्टर आहात! मस्त गजल!

Giriraj
Thursday, March 15, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है प्रसाद!! आधी प्रश्न पडला कोणता प्रसाद म्हणून पण चांदण्यांच्या शेतावरून शिरगावकर लगेच ओळखला! :-)

भुजंगप्रयाताचं लक्षण तर खूपच छान!


Chinnu
Thursday, March 15, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद लोचनांची शह, मात, खलाशी समुद्रात आणि 'आत'ले चांदणे सुंदर!

Nandini2911
Thursday, March 15, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुजंगप्रयाता तुझे तंत्र साध्या
लगागा लगागा लगागात होते!



एकदम मस्त.. लगागा ने कित्येक रात्रीची झोप उडवली होती.. (शेवटी पण आम्हाला तन्त्र जमले नाही ती भाग अलाहिदा) :-)


Ashwini
Friday, March 16, 2007 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, मस्तच आहे नेहमीप्रमाणे.

Pulasti
Friday, March 16, 2007 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद - नखशिखांत सुंदर गझल! मतल्यापासून मक्त्यापर्यंत सर्वच शेर दर्जेदार.. कशा-कशावर बोलायचं!! या कार्यशाळेतली मला सर्वात जास्त आवडलेली गझल.
-- पुलस्ति.

Zakasrao
Friday, March 16, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम ह्याशिवाय दुसरा शब्दच नाही. तुझ्या नावाला साजेशी लिहिली आहे.

Jayavi
Friday, March 16, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद..... वा.... मजा आ गया दोस्त!
आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेला मतला.

अता बोलतो मी मनाशीच माझ्या
तुझे दूर जाणे अकस्मात होते...

तशी मोहरायास बंदीच होती
इथे चांदणेही तुरुंगात होते...

हे सगळ्यात जास्त आवडलेले शेर. पण सर्वांगसुंदर गझल कशी असावी..... हे आता हळुहळु कळायला लागलंय :-)


Sanghamitra
Friday, March 16, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद
"किनारे कुणाला... " झकास.


Supermom
Friday, March 16, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'तशी मोहरायास.......'
केवळ अप्रतिम. लगे रहो.


Vaijayantee
Tuesday, March 20, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह! मक्ता आवडला.क्या बात है


Prasad_shir
Friday, March 30, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी

www.marathigazal.com तयार करायच्या कामात अडकल्यामुळे इथे येऊन आपले प्रतिसाद पहाण्यास जरा उशीरच झाला....

अभिप्रायांबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार!

Asami
Friday, March 30, 2007 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किनारे सुखाचे कुणाला मिळाले?
कितीसे खलाशी समुद्रात होते...

>> wow काय लिहितोस रे तू !!! बाकी कोणाचे त्यानंतर वाचले तर नाहक वाचतोय असे वाटते.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators