मित्रांनो... ही आणखी एक ' जाणकार' गज़ल.. प्रसाद ऋतू येत होते, ऋतू जात होते कधी खिन्न होते, कधी गात होते! किनारे सुखाचे कुणाला मिळाले? कितीसे खलाशी समुद्रात होते... उगा शोधले तू नभी चंद्र तारे तुझे चांदणे तर तुझ्या आत होते! मनी काय होते ऋतूंच्या कळेना शिशिर जीवघेणे वसंतात होते... सदा आर्जवांची रिकामीच पोटे सदा याचनांचे रिते हात होते अता बोलतो मी मनाशीच माझ्या तुझे दूर जाणे अकस्मात होते... तशी मोहरायास बंदीच होती इथे चांदणेही तुरुंगात होते... अशा मुग्ध चाली तुझ्या लोचनांच्या किती टाळला शह, तरी मात होते! भुजंगप्रयाता तुझे तंत्र साध्या लगागा लगागा लगागात होते!
|
सलाम प्रसाद.. उगा शोधले तू नभी चंद्र तारे तुझे चांदणे तर तुझ्या आत होते --किती मोठी भावना आणि किती सहजपणे सांगून टाकलीत... अशा मुग्ध चाली तुझ्या लोचनांच्या किती टाळला शह, तरी मात होते! - कातिल शेर!!! किनारे सुखाचे कुणाला मिळाले? कितीसे खलाशी समुद्रात होते... - खूप अर्थपूर्ण शेर!! वा!! - जितके वेळा वाचेन, तितका जास्त व्यापक वाटतोय... ... हा तर गझलेचा "महाप्रसाद" आहे..
|
Mankya
| |
| Thursday, March 15, 2007 - 6:18 am: |
| 
|
वाह .... प्रसाद व्वाह ! सगळेच शेर आवडेश मित्रा ! याचनांचे रिते हात .. चांदणेही तुरूंगात .. टाळला शह .. अप्रतिम ! मक्ता ... किती वेगळा ! परत परत वाचावं अस काहितरी मिळालं ! माणिक !
|
Abhiyadav
| |
| Thursday, March 15, 2007 - 6:40 am: |
| 
|
अता बोलतो मी मनाशीच माझ्या तुझे दूर जाणे अकस्मात होते... perfect sher
|
प्रसाद सर, नमस्कार! सगळेच शेर आवडले! १) किनारे सुखाचे कुणाला मिळाले? कितीसे खलाशी समुद्रात होते... २)उगा शोधले तू नभी चंद्र तारे तुझे चांदणे तर तुझ्या आत होते! ३) अता बोलतो मी मनाशीच माझ्या तुझे दूर जाणे अकस्मात होते... क्या बात है!
|
Zaad
| |
| Thursday, March 15, 2007 - 6:48 am: |
| 
|
प्रसाद, अप्रतिम गज़ल! सगळेच शेर आवडले!!
|
Meghdhara
| |
| Thursday, March 15, 2007 - 7:58 am: |
| 
|
वाह.. ग्रेट! उगा शोधले तू.. मस्तच. मेघा
|
Shyamli
| |
| Thursday, March 15, 2007 - 8:02 am: |
| 
|
प्रसाद तुमच्या गझलेबद्दल आम्ही काय बोलावं सगळेच शेर अप्रतीम झालेत तशी मोहरायास बंदीच होती इथे चांदणेही तुरुंगात होते... >> हा जास्ती आवडला
|
Badbadi
| |
| Thursday, March 15, 2007 - 8:03 am: |
| 
|
उगा शोधले तू नभी चंद्र तारे तुझे चांदणे तर तुझ्या आत होते! हा एकदम खास प्रसाद टच आहे. नव्याने काय सांगणार?? म्हणून आवडली हे वेगळे सांगत नाहीये
|
साष्टांग प्रणिपात ह्या गझलेला... अजुन काय बोलायचे? प्रसादाचा आस्वाद घेतला की आम्हाला समाधी लागते
|
उगा शोधले तू नभी चंद्र तारे तुझे चांदणे तर तुझ्या आत होते! अता बोलतो मी मनाशीच माझ्या तुझे दूर जाणे अकस्मात होते... अप्रतिम शेर... सहजपणा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे
|
Psg
| |
| Thursday, March 15, 2007 - 9:57 am: |
| 
|
अता बोलतो मी मनाशीच माझ्या तुझे दूर जाणे अकस्मात होते... वा वा! आणि मतला.. आत्तापर्यंत आलेल्यांमधे बेष्ट! अर्थात तुम्ही काय मास्टर आहात! मस्त गजल!
|
Giriraj
| |
| Thursday, March 15, 2007 - 12:13 pm: |
| 
|
क्या बात है प्रसाद!! आधी प्रश्न पडला कोणता प्रसाद म्हणून पण चांदण्यांच्या शेतावरून शिरगावकर लगेच ओळखला! भुजंगप्रयाताचं लक्षण तर खूपच छान!
|
Chinnu
| |
| Thursday, March 15, 2007 - 1:08 pm: |
| 
|
प्रसाद लोचनांची शह, मात, खलाशी समुद्रात आणि 'आत'ले चांदणे सुंदर!
|
भुजंगप्रयाता तुझे तंत्र साध्या लगागा लगागा लगागात होते! एकदम मस्त.. लगागा ने कित्येक रात्रीची झोप उडवली होती.. (शेवटी पण आम्हाला तन्त्र जमले नाही ती भाग अलाहिदा)
|
Ashwini
| |
| Friday, March 16, 2007 - 1:03 am: |
| 
|
प्रसाद, मस्तच आहे नेहमीप्रमाणे.
|
Pulasti
| |
| Friday, March 16, 2007 - 2:43 am: |
| 
|
प्रसाद - नखशिखांत सुंदर गझल! मतल्यापासून मक्त्यापर्यंत सर्वच शेर दर्जेदार.. कशा-कशावर बोलायचं!! या कार्यशाळेतली मला सर्वात जास्त आवडलेली गझल. -- पुलस्ति.
|
Zakasrao
| |
| Friday, March 16, 2007 - 4:09 am: |
| 
|
अप्रतिम ह्याशिवाय दुसरा शब्दच नाही. तुझ्या नावाला साजेशी लिहिली आहे.
|
Jayavi
| |
| Friday, March 16, 2007 - 4:46 am: |
| 
|
प्रसाद..... वा.... मजा आ गया दोस्त! आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेला मतला. अता बोलतो मी मनाशीच माझ्या तुझे दूर जाणे अकस्मात होते... तशी मोहरायास बंदीच होती इथे चांदणेही तुरुंगात होते... हे सगळ्यात जास्त आवडलेले शेर. पण सर्वांगसुंदर गझल कशी असावी..... हे आता हळुहळु कळायला लागलंय
|
प्रसाद "किनारे कुणाला... " झकास.
|
Supermom
| |
| Friday, March 16, 2007 - 12:01 pm: |
| 
|
'तशी मोहरायास.......' केवळ अप्रतिम. लगे रहो.
|
वाह! मक्ता आवडला.क्या बात है
|
मंडळी www.marathigazal.com तयार करायच्या कामात अडकल्यामुळे इथे येऊन आपले प्रतिसाद पहाण्यास जरा उशीरच झाला.... अभिप्रायांबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार!
|
Asami
| |
| Friday, March 30, 2007 - 9:21 pm: |
| 
|
किनारे सुखाचे कुणाला मिळाले? कितीसे खलाशी समुद्रात होते... >> wow काय लिहितोस रे तू !!! बाकी कोणाचे त्यानंतर वाचले तर नाहक वाचतोय असे वाटते.
|