|
मित्रांनो.. ही आणखी एक आली तेव्हाच तांत्रिकदृष्ट्या जवळपास निर्दोष असलेली गज़ल. हेमांगी(हेम्स) ऋतू येत होते, ऋतू जात होते गती घेत कोणी जसे गात होते कळावे कसे हे बहाणे मनाचे वसंतात ते की शिशीरात होते कधी स्वैर झाल्या दिशांच्या मशाली मनाचे सुकाणू न हातात होते तमातून होत्या उन्हाच्या लकेरी दवाचे उसासे उमलण्यात होते फुलावे,झुरावे,सरावे,उरावे ऋतू भोवताली नि जगण्यात होते
|
Meenu
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:32 am: |
| 
|
कधी स्वैर झाल्या दिशांच्या मशाली मनाचे सुकाणू न हातात होते >>> वा !! मस्त ..!!
|
तमातून होत्या उन्हाच्या लकेरी दवाचे उसासे उमलण्यात होते perfect ! लाजवाब कल्पना!!
|
कधी स्वैर झाल्या दिशांच्या मशाली मनाचे सुकाणू न हातात होते फुलावे,झुरावे,सरावे,उरावे ऋतू भोवताली नि जगण्यात होते वा.... खूप आवडले हे दोन...
|
Mankya
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:39 am: |
| 
|
हेम्स ... सहजता दिसली या गजलेत ! दवाचे उसासे .... सहि वाटलं ! फुलावे,झुरावे,सरावे,उरावे .... आवडलं ! माणिक !
|
Zaad
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:45 am: |
| 
|
ऋतू भोवताली नि जगण्यात होते व्वा!!! सुंदर!!!!
|
कधी स्वैर झाल्या दिशांच्या मशाली मनाचे सुकाणू न हातात होते इथे मनाला ज्या अर्थी 'सुकाणू' म्हटले आहे त्यानुसार जर पहिल्या ओळीत समुद्र,लाट अथवा जहाजाची प्रतिमा वापरल्यास शेर आणखी बहारदार होईल असे वाटते. म्हणजे असे काही तरी-- 'कश्या स्वैर झाल्या तुफानात लाटा मनाचे सुकाणू न हातात होते ' अर्थात ह्या बदलापेक्षाही मूळ शेर आहे तसाच छान आहे.
|
हेम्स, फुलावे,झुरावे,सरावे,उरावे ऋतू भोवताली नि जगण्यात होते खुप छान गज़ल!
|
Bairagee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 7:37 am: |
| 
|
सुटेसुटे मिसरे चांगले आहेत, तरल आहेत. उदाहरणार्थ, 'दवाचे उसासे उमलण्यात होते' (सुंदर!!!) किंवा 'मनाचे सुकाणू न हातात होते'. मतला सोडल्यास इतर द्विपदींत बरेच प्रॉमिस आहे. कळावे कसे हे बहाणे मनाचे वसंतात ते की शिशीरात होते वा! छान! 'वसंतात होते कि शिशिरात होते?' असे अधिक योग्य वाटू शकेल काय? 'ते की' मध्ये ताणाताण आहे. फुलावे,झुरावे,सरावे,उरावे ऋतू भोवताली नि जगण्यात होते ह्यात खालची ओळ फुलावे,झुरावे,सरावे,उरावे ऋतू भोवतीचेच जगण्यात होते अशी केल्यास किंवा ती ओळ फिरवून फुलावे,झुरावे,सरावे,उरावे मनाचे ऋतू भोवतालात होते असे काहीसे केल्यास शेर अधिक खुलेल काय? 'सुकाणू'च्या शेराबाबत मयूरशी सहमत. वर शीड हवे होते. तमातून होत्या उन्हाच्या लकेरी दवाचे उसासे उमलण्यात होते ह्या शेरात 'उन्हाच्या लकेरी'ऐवजी 'झळा' यायला हव्या होत्या असे वाटून गेले. वरची ओळ बदलावीशी वाटली. कळ्यांच्या सुगंधी झळा येत होत्या दवाचे उसासे उमलण्यात होते असा काहीसा बदल सुचवावासा वाटतो.
|
मक्ता सगळ्यात जास्त आवडला. गझलेचा एकूण प्रभाव तसा कमी वाटतो आहे मला. बैरागीबुवांनी सांगितलेल्या युक्तीच्या गोष्टी उत्तम. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
|
Meghdhara
| |
| Wednesday, March 14, 2007 - 10:08 am: |
| 
|
हेम्स, मनाचे सुकाणू न हातात होते.. व्वा सुंदर! मेघा
|
Jayavi
| |
| Wednesday, March 14, 2007 - 10:10 am: |
| 
|
हेम्स.... छानच झालीये.... तमातून होत्या उन्हाच्या लकेरी दवाचे उसासे उमलण्यात होते हा शेर सगळ्यात जास्त आवडला.
|
Ashwini
| |
| Wednesday, March 14, 2007 - 1:52 pm: |
| 
|
हेम्स, सुंदर आहे...तुझ्या कवितांसारखीच. दवाचे उसासे...सुरेख!
|
Maitreyee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 1:59 pm: |
| 
|
हेम्स, तुझं नाव वाचूनच काहीतरी सुंदर तरल वाचायला मिळणार अशी खात्री होती आणि तशीच आहे तुझी गझल! मनाचे सुकाणु दवाचे उसाअसे.. .. खूप सुरेख!
|
बैरागी... 'उन्हाच्या झळा' अशी रचना जर केली तर संपूर्ण शेरातील सौम्यपणा नाहीसा होतो असे मला वाटते.आणि मग सानी-मिस-यात 'दवाचे उसासे उमलण्यात होते' हे एकांगी वाटायला लागेल. सानी-मिस-यातही जर त्याच प्रवृत्तीने बदल केला तर शेर अचानक गुलाबाच्या फुलातून भडकत्या निखा-यात ट्रान्सफर होईल अर्थात हे माझे वैयक्तीक मत हं चु.भू.दे.घे. असं केलं तर चालू शकेल का?-- तमातून होते उन्हाचे कवडसे दवाचे उसासे उमलण्यात होते' इथे गझलकाराला अभिप्रेत असणारे कोवळे सौंदर्य टिकून राहू शकते. तरीही 'उन्हाच्या लकेरी'च छान आहेत असे वाटते.
|
Pulasti
| |
| Wednesday, March 14, 2007 - 3:37 pm: |
| 
|
हेम्स, शेवटच्या दोन शेर भिडले आणि मनात रेंगाळलेही! मयुरचे "कवडसे" चांगली सूचना आहे, पण ... "लकेरी"च असू दे पुढील लिखाणांस शुभेच्छा ! -- पुलस्ति.
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:42 pm: |
| 
|
हेमांगी, शेवटचा शेर मला खुपच आवडला. आणि ॠतु या माझ्या संकल्पनेशी जुळणारा वाटला.
|
Chinnu
| |
| Thursday, March 15, 2007 - 2:50 am: |
| 
|
दिनेशदा, मी हेच लिहीणार होते! ऋतू इथेच 'दिसले'! हेम्स, तुझ्या गती घेत गाणार्या ऋतुंनी मैफ़ील सजवून टाकली बघ! उन्हाच्या लकेरी, अहा! दवांचे उसासे! क्या बात है!! मक्ता समर्पक झालाय. वाचल्यावर एक सुंदर गाणं लवकर संपुन गेल्याची कुणकुण राहुन गेली मनात.
|
Bee
| |
| Thursday, March 15, 2007 - 4:06 am: |
| 
|
हेम्स, इथे काही जण म्हणतात त्याप्रमाणे गझलमधे बदल आवश्यक आहेत. सगळे शेर मग वाचायला आणखी छान वाटतील. तशी तू गझलप्रांतामधे नवीन आहे तेंव्हा पहिला प्रयत्न खरच स्तुतीजनक आहे.
|
हेम्स उत्तम झालीय गज़ल. अगदी तरल. "तमातून होत्या.." हे तर डोळ्यासमोर उभे रहातेय. "ऋतू भोवताली नि जगण्यात होते." वा! जवाब नही!
|
|
|