मेघधारा.... खुप छान! "मनाच्या तळी आर्त जागी विराणी सुखाचा जरी जोजवा गात होते!
|
Milya
| |
| Tuesday, March 13, 2007 - 5:17 pm: |
| 
|
मेघधारा <:> वा खूप छान... विराणी आणि मक्ता आवडला अरुपी बाबत संघमित्राने काढलेला अर्थ जास्त आवडला... सैन्य शब्द बघुन मला 'वो जाते हुए लम्हो' ह्या बॊर्डरच्या गाण्याची आठवण झाली आणि मी वेगळाच अर्थ घेतला... तुला पाहिजे तो अर्थ सैन्य शब्द नीट स्पष्ट करत नाहीये असे वाटले अर्थात एकापेक्षा अनेक अर्थ निघत असतिल तरी काही बिघडत नाहीये म्हणा!!!
|
मेघधारा..पुलस्तिला अनुमोदन... मतला थोडासा पंचलाईन असायला हवा होता. आनंदयात्री... 'परी पूरलोट माझ्याच डोळ्यात होते' असं केलं तर शेराच्या उला-मिस-याला तितकासा न्याय मिळणार नाही असे वाटते. शिवाय इथे तुम्ही सुचविलेल्या सानी मिस-यात येणारा 'माझ्याच' ह्या शब्दात 'च' हा शब्द कदाचित भरीचा वाटू शकेल. हे मी का म्हणतोय कारण्-- माझ्या गझलेत हा 'च' मला मतल्याच्या सानी-मिस-यात खटकला होता.पण तरीही ते तसेच continue करावे लागले. शिवाय ' फितुरी ' म्हटल्यावर त्याच अनुषंगाने काही तरी पुढे लिहावे लागते. अन्यथा 'फितुरी' सारखा ज्वलंत शब्द वाया जायचाच संभव जास्त! इथे अश्रुंना सैन्य का म्हटले आहे ही एक कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारीच म्हणायला हवी. चु,.भू.दे.घे. धन्यवाद!
|
Shyamli
| |
| Wednesday, March 14, 2007 - 3:59 am: |
| 
|
मनाच्या तळी आर्त जागी विराणी सुखाचा जरी जोजवा गात होते>>>व्वा! उघड पापण्यांचीच फितुरी असे ही कसे थोपवू , सैन्य दारात होते>>> कातील आहे १ली ओळ, अभिनंदन मस्त जमलीये गझल.
|
Meghdhara
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:26 am: |
| 
|
पुलस्ति, मयुर.. हो. मतल्यात अजुन उतरता आलं असतं.. इथे कबुल करते, फितुर शब्दाला पुर्ण सरेंडर झाले.प्रयत्न केला पण बाहेर पडता आले नाही किंवा अगदी प्रामाणीकपणे यायचे नव्हते.. पण वैभव म्हणतो त्याप्रमाणे यामागे त्या भावनेचंही स्ट्रॉंग प्रयोजन असेल. सगळ्यांना पुन्हा धन्यवाद. मेघा
|
Bairagee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:34 am: |
| 
|
मेघधारा, गझल छानच झाली आहे. माझे मत सादर- ऋतू येत होते ऋतू जात होते तुझ्या आठवांना कुठे ज्ञात होते मतला छान निभावला आहे. मनाच्या तळी आर्त जागी विराणी सुखाचा जरी जोजवा गात होते वा! वा! वा! 'तळी' काढता येईल काय? कधी गुंफली सांग वचनात नाती तरी मी तुझ्या मुग्ध पाशात होते वा!छान. रुपाची जरी नोंद अंधारलेली अरुपी पुरावे दिमाखात होते शेर धूसर आहे. मला तरी प्रथमदर्शनी फारसे काही हशील झाले नाही. उघड पापण्यांचीच फितुरी असे ही कसे थोपवू , सैन्य दारात होते कल्पना फार चांगली आहे. 'कसे थोपवू' आणि 'सैन्य दारात होते' ह्या दोन्हींत काहीतरी गडबड वाटते. 'कसे थोपवू' असे म्हटल्यावर सैन्याचे अजूनही दारात असणे अपेक्षित आहे, असे वाटते. चूभूद्याघ्या. चढे वेदनेला नवा कैफ आता इरादे जुने धुंद बंडात होते वा! छान!
|
Meenu
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:39 am: |
| 
|
मनाच्या तळी आर्त जागी विराणी सुखाचा जरी जोजवा गात होते चढे वेदनेला नवा कैफ आता इरादे जुने धुंद बंडात होते >>> मस्तच !!
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:46 pm: |
| 
|
मेघधारा, खुप वेगळे शब्द आणि कल्पनाही. मला जोजवा हा शब्द कळला नाही. जोगवा असायला हवा होता का ? जोजवा म्हणजे ( बाळाला ) झोपवा असा अर्थ आहे ना ?
|
Meghdhara
| |
| Thursday, March 15, 2007 - 8:22 am: |
| 
|
बैरागी सैन्य दारात आलेच आहेत त्यांचं डोळ्यांतुन वहाणं कसं रोकू? दिनेश, हो. जोजवा म्हणजे अंगाईगीत. संसारात रमलेली आई सुखाने जोजवा गातेय.. किंवा मी स्वताला सुखाने जोजवण्याचा प्रयत्न करतेय.. मेघा
|
मेघधारा मक्ता सुंदर चढे वेदनेला नवा कैफ आता इरादे जुने धुंद बंडात होते शेर आवडला..!
|