Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 11, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » प्रिया(चिन्नू) » Archive through March 11, 2007 « Previous Next »

Moderator_10
Saturday, March 10, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

provided by Vaibhav_Joshi

मित्रांनो, पुढची गज़ल ' पेश-ए-खिदमत' आहे.
कार्यशाळेत सहभागी झालेल्यांपैकी अनेकांचा गज़लच काय पण वृत्तबद्ध लिहायचादेखील हा पहिलाच प्रयत्न आहे हे लक्षात घेता या रचनांचं अधिकच कौतुक वाटतं.

प्रिया(चिन्नू)

ऋतु येत होते, ऋतु जात होते
भुलावे मनाला कुठे ज्ञात होते

पुन्हा ना खुणावे नभांचे तराणे
अता चालणेही तिमीरात होते

मला काय सुचवू पहाती दिवाणे
विसरणे म्हणे ते क्षणार्धात होते!

तुझ्यावीण मजला कुणी ओळखेना
दिशाहीन " मी"पण निकालात होते!

तुला सोबतीला नवा सूर्य येतो
तुझ्या आठवांची इथे रात होते

तुला जाणिले मी जिण्याचा बहाणा
तुझ्यावीण काही न जगण्यात होते

उगा चालता चालता थांबते मी
अधाशी मनाची पुन्हा मात होते!



Shyamli
Saturday, March 10, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्यावीण मजला कुणी ओळखेना
दिशाहीन " मी"पण निकालात होते!>> वा वा..

उगा चालता चालता थांबते मी
अधाशी मनाची पुन्हा मात होते!>> क्या बात है रे!

अभ्यासपूर्वक विवेचन अभ्यासानंतर :-)
सध्या फक्त जे आवडलय त्याच कौतुक :-)



Sarang23
Saturday, March 10, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! चिन्नु... पहिला प्रयत्न छान! मला शेवटचा शेर आवडला. जोरदार आलाय...!!
आता पुढील लेखनासाठी शुभेच्छा!


Nandini2911
Saturday, March 10, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला सोबतीला नवा सूर्य येतो
तुझ्या आठवांची इथे रात होते

=========
प्रिया... चिन्नू, हे मस्त आहे.. सुंदर..


Athak
Saturday, March 10, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु , छान , प्रयत्न सुरु ठेव , चालता चालता अधुन मधुन विश्रांती घे थांबु नको :-)

Psg
Saturday, March 10, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु, छान आहे गजल.. पहिलीच आहे? वाटत नाही :-) मक्ता मस्त!

मला या शेराचा अर्थ जाणून घ्यायला आवडेल.. कारण एकापेक्षा जास्त अर्थ आहेत त्यात असे वाटते-

तुझ्यावीण मजला कुणी ओळखेना
दिशाहीन " मी"पण निकालात होते!



Jo_s
Saturday, March 10, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू, छान आहे पहीलाच प्रयत्न.

Chakrapani
Saturday, March 10, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. शेवटचे चार शेर मला विशेष आवडले. त्यांच्यातल्या कल्पना आवडल्या. मतला ठीक ठीक.
२. माझ्या ज्ञानाप्रमाणे, तराणे हे गायले ज़ातात. नभांचे तराणे मधून कुठले गाणे अगर कथन अपेक्षित आहे? ज़े काही अपेक्षित असेल, ते खुणावत नाहीये. कबूल! पण मग हे 'ज़े काही' आहे, त्याचा अंधारात चालण्याशी परस्परसंबंध अधिक स्पष्ट व्हायला हवा, असे वाटते. खरं तर पुन्हा न 'खुणावती' हवे नं? ते येत नसेल, तर पर्यायी शब्दयोजना करता येईल का, याचा विचार ज़रूर करावा, कारण तराणे 'खुणावे' नक्कीच खटकते आहे.
३. मक्त्यातला शेर सुंदर आहे, नक्कीच! पण कदाचित मला त्याचा अर्थ लागलाय म्हणून तो सुंदर वाटतोय. आहे त्यापेक्षा तो अधिक सहज़पणे पोचवता येईल.
४. दिशाहीन मीपणाच्या शेराबाबत असे सुचवावेसे वाटते, की त्यात निकालात 'निघणे' येत नाहीये. ही कल्पना छान आहे. तिला निकालात 'निघू'द्या किंवा 'काढा' :-) 'निघालेच "मी"पण निकालात होते' असे काहीसे केले, तर तुम्हाला अपेक्षित अर्थाला धक्का लागेलसे दिसत नाही. यातून खरं तर तुमचा 'तो' हाच तुमचे 'मी'पण होता, हे अधोरेखित होते आहे (मदतीला ओळीच्या शेवटीचे उद्गारचिन्ह आहेच!) दुसरे असे विचारावेसे वाटले, की मीपण किंवा अहंभाव दिशाहीन असतो का? आणि असलाच, तर तो तुमचा "तो" नसल्याने आहे, हे वाचकांच्या बाबतीत त्यांचे त्यांनाच कळू दे :-)
५. दोन ठिकाणी तुझ्या"वी"ण खटकते खरे! पोएटिक लायसन्सचा भाग म्हणून सूट घेण्यापूर्वी किंवा इन जनरल कोणत्याही प्रकारची सूट घेण्यापूर्वी इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाहीच, याची खातरज़मा करावी. 'तुझ्यावीण काही न ज़गण्यात होते' ऐवजी 'तुझ्यावाचुनी शून्य ज़गण्यात होते' असं काहीसं केलं तर चालू शकेल का?
पहिल्याच प्रयत्नाच्या मानाने गझल चांगली उतरली आहे. लिहीत रहा. मनापासून शुभेच्छा.


Princess
Saturday, March 10, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु, छान जमलीय. नवा सूर्य कल्पना आवडली.

Ashwini
Saturday, March 10, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू स्पष्ट करेलच. पण मला वाटते इथे 'मीपण', अहंभाव या अर्थाने अपेक्षित नसून 'मी' पण म्हणजे 'मी' सुद्धा असा अर्थ अपेक्षित असावा. CBDG

चिन्नू, मक्ता मस्त.


Chakrapani
Saturday, March 10, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मी"पण मधला मी हा अवतरणचिन्हात असल्यामुळे मला हे "मी"पण आपले संपूर्ण अस्तित्त्व किंवा माझे स्वत्:चे पूर्णत्त्व दशविणारे किंवा तू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तू असल्याचा सार्थ अभिमान, तोरा (अहंभाव हा तोरा किंवा ऐट या अर्थाने, घमेंड या अर्थाने नव्हे... अहंभाव हा गर्वाशी ज़वळीक करणारा शब्द वापरल्याबद्दल दिलगीर आहे) दर्शविणारे वाटले. मी सुद्धा या अर्थाने असेल, तर तो मी अवतरणचिन्हात ठळकावण्याचे प्रयोजन स्पष्ट झाले नाही. चूभूद्याघ्या.

Jayavi
Saturday, March 10, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु.... सुरेख झालीये गझल :-)
कल्पना फ़ारच सुंदर आहेत सगळ्याच शेरांमधल्या.

तुला सोबतीला नवा सूर्य येतो
तुझ्या आठवांची इथे रात होते

हा शेर खूपच आवडला.


Dineshvs
Saturday, March 10, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु, जया, माझे अडाणीपण लक्षात घेऊन,
तुला सोबतीला नवा सूर्य येतो
च्या जागी
तुझ्या सोबतीला नवा सूर्य येतो,
चालले असते का ? ते सांगा.

परत नेहमीप्रमाणेच मी वृताच्या नियमांपेक्षा, वाचनाच्या लयीचाच निकष लावला होता.


Milya
Saturday, March 10, 2007 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनु खरेच मस्त गज़ल..
सूर्याचा शेर आवडला...

पण मला मक्ता नीट कळला नाही.. :-(

वैभवा : तिमिर का तिमीर? तिमीरात खटकते आहे का?

दिनेश तुम्ही सुचवलेला बदल आवडला


Lopamudraa
Saturday, March 10, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला सोबतीला नवा सूर्य येतो
तुझ्या आठवांची इथे रात होते>>>.
सुरेख चिनु जबरदस्त.. काय एक एक शेर आहेत...!!!
मान गये.....!!!


Mayurlankeshwar
Sunday, March 11, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुंदर! २ रा,४ था आणि मक्ता अगदीच काळजाला भिडून जातो.
तरीही इथे मक्त्यामध्ये मनाला 'अधाशी' क म्हटले आहे ह्याचा संदर्भ लागला नाही.
म्हणज़े इथे मनाची पावलांवर मात होते असे म्हणायचे आहे काय? पावलांना पुढे जाण्याची गरज आहे पण मनाभोवतीचे पाश सुटत नाही असे असेल कदाचित :-)


Mankya
Sunday, March 11, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह .... चिन्नू वाह !
पहिल्याच चेंडूवर षटकार .....!!
सगळेच शेर ' सराऑंखोपर ....!!'
सुर्याचा शेर ...Something special बरं ! ( मलाहि जास्त कळला नाही तो पण दमदार वाटतो. )
मक्ता खूपच भिडला मनाला ....!!
( अधाशी शब्दाशी येवून थोडसं खटकल्यासारखं झालं, अर्थाचा विचार केला तर थोडासा odd वाटतोय ना ! )

माणिक !


Jayavi
Sunday, March 11, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश.... अडाणीपणा काय म्हणतोस रे...? अरे आपण सगळे एकाच जहाजाचे प्रवासी आहोत :-)
पण तू सुचवलेला बदल चांगला वाटतोय. आता चिन्नुला काय म्हणायचंय ते कळू दे.


Chinnu
Sunday, March 11, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा बदल एकदम पटेश! 'तुझ्या' ची द्विरुक्ती होईल काय म्हणुन ते टाळले होते, पण तो शेर बदल करुन छान वाटतोय मला. असा 'अडाणीपणा' चिन्नुसाठी परत परत करत रहा, धन्यवाद! :-)
वाचकहो, 'तू माझ्या जीवनातून निघून गेलास, आणि येणार्‍या जाणार्‍या ऋतूंनी किती रिझवू पाहीले, तरीही त्यातून मी बाहेर पडणे कसे अशक्य आहे', ह्या थीम वर आधारीत ही गजल! Connected असलेले शेर लिहायचे हे आधीपासुनच ठरविले होते. परंतू दमछाक फार झाली! ~D
चक्रपाणि, I think, you have astounding trait of reading poet's mind through their poems! तुमचे अंदाज बरेचसे बरोबर. अश्विनी, पूनम, मिल्या,जयु, मयूर, माणिक लवकरच सविस्तर लिहीते. श्यामलीताई, अथक, सुधीर, नंदिनी, प्रिंसेस आणि लोपा धन्यवाद. सारंग, जाणकारांना हा प्रयत्न आवडला, फार बरे वाटले! धन्यवाद. :-)


Dineshvs
Monday, March 12, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे सहा ॠतु मानले जातात. त्या प्रत्येक ॠतुचा एक भाव आहे.
साधारणपणे प्राचीन चित्रकलेत, संगीत रचनेत खुपदा हे दिसते. तसे त्या त्या ॠतुंचे खास रागहि आहेत. वीणा सहस्त्रबुद्धे, कुमार गंधर्व यानी असे खास कार्यक्रमहि केले होते.

मराठीत, आशाचे,
दिवसामागुन दिवस चालले
ॠतुमागुन ॠतु
जिवलगा कधी रे येशील तु

हे सुंदर गाणे आहेच.
असेच एक उदाहरण मी माझ्या बीबी वर दिले आहे. मला हे बदलणारे ॠतुरंग या गझलांमधे दिसले नाहीत.
हे एक विनम्र निरिक्षण बरं का !!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators