मित्रांनो ,.... पहिल्याच प्रयत्नात जवळपास निर्दोष आणि काही खास कल्पना असलेली ही गज़ल . मला ह्यातील शेरांमधून तीव्रपणे येणारी खिन्नता , बेदरकारी फार आवडून गेली . अभिजीत दाते ..... ( mi_abhijit ) ऋतू येत होते ऋतू जात होते... मला जे हवे तेच अज्ञात होते... जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे... असे काय आव्हान स्पर्शात होते... प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली जशी वीज उध्वस्त दर्यात होते... झुरावे कशाला तुझ्या आठवाने... उगा आसवांचे बळी जात होते... तुला का न माझे इरादे कळाले... इशा-यात होते ,शहा-यात होते... नको आणखी घाव देऊस आता... जुन्याचेच देणे मला खात होते...
|
मित्रा अभिजीत तुला का न माझे इरादे कळाले... इशा-यात होते ,शहा-यात होते... आह !!!
|
Shyamli
| |
| Tuesday, March 06, 2007 - 5:54 am: |
| 
|
प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली जशी वीज ऊध्वस्त दर्यात होते... >>> वाह!! सगळीच गझल खरचच छान
|
Psg
| |
| Tuesday, March 06, 2007 - 6:09 am: |
| 
|
mi_abhijit ! वा! काय सुरेख गजल.. सर्वच शेर सुंदर आहेत.. प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली जशी वीज ऊध्वस्त दर्यात होते... .. किती सुरेख कल्पना.. झुरावे कशाला तुझ्या आठवाने... उगा आसवांचे बळी जात होते... .. आसवांचे बळी!! वा! तुला का न माझे इरादे कळाले... इशा-यात होते ,शहा-यात होते... .. अगदी 'हाय' असा शेर आहे हा! मस्त. इतक्य सुरेख कल्पना मांडल्या आहेत की त्यामानानी मतलाच थोऽऽऽडा ineffective वाटतोय. अजून सशक्त करता आला असता का? सॉरी मला अजिबातच कळत नाही गजलमधलं, चुभुदेघे.. शोनू, चिन्नु भापो!
|
Mankya
| |
| Tuesday, March 06, 2007 - 6:13 am: |
| 
|
जिंकलं दोस्ता ... अभिजित खरच जिंकलस ! इरादे, जुनी वादळे, घाव, वीज .... कुर्बान यार कुर्बान या शेरांवर !! पहिल्या शेरांत तर प्रत्येक मनाचा ठाव घेतलायेस ... खरच अज्ञात असतं ते म्हणून तर सगळा शोधप्रपंच .... जीवनभर चालतो तो ! माणिक !
|
wanna post comment, but i m getting "aceess denied" message while posting in window after clicking devnagari button.. Anyways, Abhijeet... APRATIM.....
|
Meenu
| |
| Tuesday, March 06, 2007 - 6:16 am: |
| 
|
ऋतू येत होते ऋतू जात होते... मला जे हवे तेच अज्ञात होते... जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे... असे काय आव्हान स्पर्शात होते... प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली जशी वीज ऊध्वस्त दर्यात होते... तुला का न माझे इरादे कळाले... इशा-यात होते ,शहा-यात होते... वा हे चार शेर मस्त !!! आवडले एकदम
|
Jayavi
| |
| Tuesday, March 06, 2007 - 6:19 am: |
| 
|
अभिजित, क्या बात है.....! प्रत्येक शेर अगदी ताकदीचा आहे. जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे... असे काय आव्हान स्पर्शात होते... तुला का न माझे इरादे कळाले... इशा-यात होते ,शहा-यात होते... हे शेर एकदम खतरनाक.... शोनू चक्रपाणी, तुझ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
|
Desh_ks
| |
| Tuesday, March 06, 2007 - 6:29 am: |
| 
|
अभिजीत, कल्पनेचं सौन्दर्य, रचनेचा डौल आणि गज़लच व्याकरण सारंच छान जमून आलंय. अभिनंदन
|
प्रिय अभिजीत, इशारे-शहारे, आसवांचे बळी निव्वळ अप्रतिम!!! खूपच छान! मक्तासुद्धा छान आहे. निराशा आणि बेदरकारीबाबत वैभवरावांच्या मताशी मी सहमत आहे. गझलेतील कल्पना आवडल्या आणि शब्दयोजनाही अगदी निर्दोष. मला घों'घ'वावे मात्र खटकलं अभिजीत. 'घोंघावणे' असा शब्द आहे. त्यामुळे ती ओळ बदलता आली तर पहा. मला 'ज़ुन्या वादळांना पुन्हा बोलवावे' असे काहीसे सुचले. अर्थछटा यामुळे बदलते आहे, हे नक्कीच, पण कदाचित त्यामुळेसुद्धा शेराला एक नवीन गंमत किंवा सौंदर्य येईल का, याचा विचार करतो आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते? ऊध्वस्त असे न लिहिता उध्वस्त लिहिले तरी वज़नात बसतेच आहे. त्यामुळे कृपया तो बदल करू शकाल का?
|
चक्रपाणि उध्वस्त चा बदल केलाय . माझ्याकडून टायपो होती ती . धन्यवाद .
|
अभिजीत सही.. पण मी पी एस जी शी सहमत.. प्रकाशून.... व्वा!
|
Jo_s
| |
| Tuesday, March 06, 2007 - 7:28 am: |
| 
|
अभिजीत छानच जमल्ये गझल, सगळेच शेर मस्त "मला जे हवे तेच अज्ञात होते... " ही कल्पना छान आहे.
|
जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे... असे काय आव्हान स्पर्शात होते... मस्तच आहे....
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 06, 2007 - 8:12 am: |
| 
|
प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली जशी वीज उध्वस्त दर्यात होते........ वा एकदम मस्तच रे.
|
अभिजीत.. निव्वळ अप्रतिम... आसवांचे बळी... फारच टचिंग! छान मित्रा... फक्त 'घोंघवावे' च्या जागी दुसरा शब्द बसतो का ते पाहा...
|
Princess
| |
| Tuesday, March 06, 2007 - 9:16 am: |
| 
|
अभिजीत, इशारे अन शहारे खुप्पच आवडुन गेले. सगळीच गझल छान पण या एका शेरामुळे नंबर वन झालायेस तू.
|
Zaad
| |
| Tuesday, March 06, 2007 - 10:43 am: |
| 
|
केवळ अप्रतिम!! मतला खूपच आवडला!!
|
मलाही खुपच आवडली विशेषत: इशारे-शहारे...छानच! आणि "मला जे हवे तेच अज्ञात होते...."
|
Nachikets
| |
| Tuesday, March 06, 2007 - 11:39 am: |
| 
|
अभिजीत, सुंदर गज़ल!! मजा आ गया. पण मला शेवटच्या शेरात काहीतरी खटकते आहे. 'नको आणखी घाव देऊस आता' ह्या वर्तमान किंवा भविष्यात असलेल्या मिसर्यानंतर सानी-मिसर्यातले भूतकाळातले 'खात होते' येत आहे. त्यामुळे मला तिथे थोडा disconnect झाल्यसारखा वाटतो आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते? कदाचित माझ्या वाचण्यात / समजण्यात काहीतरी घोळ होत असेल तर चू. भू. दे. घे.
|