|
Yog
| |
| Friday, January 18, 2008 - 8:27 pm: |
| 
|
माणसा... हे काय भलतेच मार्ग(प्र)दर्शन? (तू पुण्याचा चा का?) झक्की बुवा मुलीन्चे वय वर्ष अस उघडपणे लिहायच नसत (त्यान्च्या profile मधे असल तरी, तेही थोड कमी करूनच लिहीलेल असत..) हे कधी कळणार तुम्हाला..?हटकेश्वर हटकेश्वर! 
|
Zakki
| |
| Friday, January 18, 2008 - 9:54 pm: |
| 
|
अहो योग, वर दिनेश VS यांनीच ते लिहीले आहे. दिनेश माझ्या मते नक्कीच विश्वासार्ह आहेत. आता प्रोफाईल मधले वय जर कमी करून लिहीले असेल तर त्या नक्कीच कायदेशीरदृष्ट्या सज्ञान आहेत! असो. मायबोलीवरील इतर सदरांमधे जसे एका विषयातून भलत्याच दुसर्या विषयावर वादविवाद सुरु होतो तसे इथे व्हायला नको, म्हणून हा विषय बंद. Back to you, Yogita .
|
Dineshvs
| |
| Saturday, January 19, 2008 - 3:03 am: |
| 
|
कोर्ट मॅरेज आणि रजिष्टर्ड मॅरेज, वेगळे. कोर्ट मॅरेज मधे नोटिस वगैरे द्यावे लागते. वैदिक पद्धतीने विवाह करुन तो ताबडतोब रजिष्टर्ड केला तर ते लवकर होते. मुंबईत काहि संस्था असे लग्न लावुन नोंदणी करुन देतात. गरज असेल तर पत्ते देऊ शकेन. वयाचा दाखला आणि दोन्ही कडचे साक्षीदार लागतात. या पद्धतीच्या लग्नाची अद्यावत माहिती, या संस्थांकडेच उपलब्ध असते. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने, अपवादात्मक परिस्थितीमधे अल्पवयीन मुलीचा विवाह कायदेशीर ठरवला आहे. योगिता, अगदी कळकळीचा सल्ला, अजुनही विवाहाचा निर्णय घेण्यास तुम्ही दोघे समर्थ आहात असे मला वाटत नाही. आमच्यापैकी कुणाशीही, अर्थात ज्याच्यावर तुमचा सर्वात जास्त विश्वास असेल, त्याच्याशी खाजगी ईमेलद्वारे संपर्क साधा. हि चर्चा तुम्हा दोघानीही करावी, अशी अपेक्षा आहे. सार्वजनिक चर्चाच करायची असेल, तर दोघानीही स्वतंत्रपणे इथे लिहा. माझा मुद्दा परत एकदा लक्षात घ्या. स्त्री पुरुषात निखळ मैत्री अवश्य असू शकते. त्याला विवाहाच्या बंधनात परिवर्तीत करावे, हे अपरिहार्य नाही. खुपदा लोकं काय म्हणतील, आम्हाला सगळ्यानी एकत्र बघितले आहे, ही भिती असते. असे दडपण येत असेल तर अजुनही निर्णय घ्यायची घाई करु नका.
|
धन्यवाद दिनेश.. अजुन तरी तसा काही विचार केला नाहीय इतक्यात लग्न करायचा पण तरीही माहीती असलेली बरी म्हणुन हा सगळा खटाटोप... आणि माणुस तुम्हाला खास..एखाद्याला मार्गदर्शन करता येत नसेल तरी त्याला मागे ओढु नका कधीच. कारण तुम्ही जी पहिली post केली होती त्यावरुन देखील मला अस वाटल की तुम्ही discourage करताय.
|
माणुस एकदम बरोबर. कानाखाली द्यायालाच पाहिजे फुकटचे सल्ले देणार्यांना.... पण........................ 22 is not year to get married मला तर हा पण 'सल्ला" च वाटतोय... आता फुकटचा की कसला ते बाकिचे ठरवतिलच... आणि तुमचा हात इतरांच्या कानाखाली पोहचत नसला तरी स्वत: च्यातरी नक्की पोहचेल... दिवे घ्यालच..
|
Shyamli
| |
| Monday, January 21, 2008 - 6:59 am: |
| 
|
योगीता, माणुस जो सल्ला देतोय तो योग्यच आहे ग. २२ हे खरच लग्न करायच वय नाही. त्यातुनच घरच्यांचा विरोध, म्हणजे जागेपासुन तुम्हाला तयारी करावी लागणार. लग्न करायला कोणाचाच विरोध नाहिये इथे. आम्हाला काय कर लग्न आणि अडकवुन घे स्वत:ला असं म्हणणारे बरेच आहेत. पण त्यातुन निर्माण होणारे प्रश्न तु लक्षात घेत नाहियेस. आणि तो तुला डिसकरेज कशाला करेल. मनापासुन सल्ला देतोय तो, काहितरी विचार करुनच देत असेल. तेंव्हा तुला पटत नसेल तर दे सोडुन आणि तुला जे करायच ते कर. पण कोणताही निर्णय घेताना १०० वेळा विचार कर. एकदा घेतलेल्या निर्णयाचा भविश्यात पश्चाताप होणार नाही असे निर्णय घे. शुभेच्छा
|
श्यामली तु माझ्या सगळ्या post वाचल्यास तर कळेल की मी अजुन एकाही post मध्ये अस म्हटल नाहीय की मला इतक्यात लग्न करायच म्हणुन..मला खरच अजुन २ वर्ष तरी घाई नाहीय. आणि राहीली गोष्ट court marriage ची तर मी तेही स्पष्ट केलय की just info असावी म्हणुन विचारतेय.
|
Manjud
| |
| Monday, January 21, 2008 - 12:18 pm: |
| 
|
|कुणीतरी माझ्या वतीने दोन कानाखाली मारा ह्या योगीताच्या आणि तीला फुकटचे सल्ले देणार्यांच्या. | माणसा, तुझी ह्या भाषेतली कॉमेंट वाचून मला धक्का बसला. 'लहान वयात लग्न' ह्या विषयाचा तू जरा जास्तच खल करतो आहेस बर्याच बीबींवर.
|
Maanus
| |
| Monday, January 21, 2008 - 4:30 pm: |
| 
|
I have seen and faced aftermath of couple of divorce cases and suicides and so i was saying... No one can be right at the age of 30 also, but chances being wrong at age of 20 are higher. In your 20's, for guys 90% of the time its nothing but physical attraction. and as per i know in case of girls they are too tired of all the rules at home and want someone with whom they can feel free. (i may be wrong with girls case, but 100% sure with guys) When you grow little older, you realize its not just physical attraction, or freedom you care about. anyway i can only talk.
|
Sas
| |
| Monday, January 21, 2008 - 8:20 pm: |
| 
|
Yogita २२ हे वय लग्नाच नाही... निदान ह्या situation मध्ये ज्यात तुम्ही आहात. U should wait for atleast 4-5 years. त्याच्या शिवाय मी जगु/राहु शकत नाही>>>....पण एका व्यक्तिच्या जिवनात नसण्याने जिवन थांबु ही शकत नाही...जगात 'लाखो' लोक आहेत ज्यांनी प्रेम एकाशी केल आणी संसार मात्र त्यांना दुसर्या व्यक्तीशी सोबत करावा लागला. ते कसे जगले?? जगत आहेत??? जे जगु शकले नाही त्यांच काय झाल? ते तर गेले पण घरच्यांना, पालकांना जिवन भराच दु:ख देवुन गेले. शीक्षण, Financial Settlement, are very important issues. मुलगा मुलगी एका Cast चे असले तरी, मुलिला मुलाच्या घरात adjust व्हायला त्रास होतो due to life style diffrences मग तुम्हाला तर किति problem होवु शकतो. मुलाच्या आई-वडिलां बद्दल तुम्हाला माहीती आहे का? नुसत मुलासाठी ते 'हो' म्हणतिल नंतर तुम्हाला जर कधी Cast बद्दल टोमणा मारतील ते तुम्हाला आवडेल-सोसेल का?? जर त्यांच्या सोबत रहाव लागल तर जमेल काय??? ७-८ वर्षे तुमच्या मीत्राला तुम्ही भेटत आहात, अस भेटण आणी लग्नानंतर एकत्र, सोबत रहाण ह्यात खुप फरक आहे. नुसत भेटुन व्यक्ती चा स्वभाव, सवयी ... कळत नाही. आपण केवळ महत्वाच्या वाटणार्या काही गोष्टिंचा विचार करतो, पण, 'आज' महत्वाच्या 'न' वाटणार्या काही ग़ोष्टी भविष्यात महत्वाच्या वाटतात. u r only 22, and into Computers, you may grow in S/W, you may get chance to go out of India... explore n grow yourself financially n in other areas, why dont you think abt something which is 'Really', important, valuable at this age.
|
Yog
| |
| Monday, January 21, 2008 - 11:19 pm: |
| 
|
yogita, तुम्ही मार्गदर्शन करा असे आवाहन इथे केल्यावर बरे वाईट सर्वच ऐकायला मिळेल.. पण i dont think anyone here will discourage you, afterall noone can stop you from doing what you feel is right पण इथे एकन्दरीत तुम्हाला सावध सूचना मात्र नक्की मिळतील. तसे तर प्रत्त्येकाचे अनुभव वेग वेगळेच असतात पण तरिही मला वाटत खालील गोष्टी या कायम आहेत त्यावर विचार जरूर व्हावा: १. लग्न हे दोन कुटुम्बान्चे मिलन असते जरी वधू आणि वर हे मह्त्वाचे असले तरी.. पहिले दोन तीन वर्ष एकमेकाबरोबर सहज जगता येते पण जस जसे सामाजिक आणि मानसिक जबाब्दार्या वाढतात तस तसे सम्पूर्ण कुटुम्बाचा आधार अन गरज महत्वाची ठरते. २. आजकाल financial freedom स्वस्तात उपलब्ध आहे..पण पैसा कधीच पुरा पडत नसतो. विशेषता कुटुम्ब मोठ होत तस आपल्या मुलान्वर होणारे संस्कार, मानसिक जडण घडण यात दोन्ही कुटुम्बान्चा खूप महत्वाचा वाटा असतो.. ३. plan for worst hope for best हे ऐकून असलाच. तसच तुमच्या दोघान्च्या बाबतीत worst case scenario as in marriage that excludes both families काय होवू शकतात याचा पुन्हा विचार करून बघा आणि त्यातले आयुष्याच्या द्रूष्टीने नक्की महत्वाचे काय हे ठरवा.. ४. आजच्या झपाट्याच्या जगात सुख, शान्ती, समाधान यान्च्या व्याख्ख्या झपाट्याने बदलत आहेत, आपला निर्णय short sighted नाही याची खात्री करून घ्या.. श्रेयस आणि प्रेयस अशी दोन कर्मफ़ले असतात, long term happiness should be important! ५. शेवटी "जन पळभर म्हणतील हाय हाय"हे अगदी बोचरे सत्त्य आहे.. कुणाचेही कुणावाचूनही अडत नसते, तुमचे दोघान्चेही अडणार नाही पण ज्याने त्याने आपले नाणे पारखून घ्यायचे असते.. सात वर्ष तुमचे सम्बन्ध आहेत तेव्हा i am sure you are confident about your relationship पण आपल्याच प्रेमाची थोडी कठीण परिक्षा घेवून बघायला काय हरकत आहे? you have nothing to loose शेवटी इतकेच म्हणेन की लग्न, विवाह याकडे एक "संस्कार" म्हणून बघा (दुर्दैवाने तो दृष्टीकोन कालबाह्य होत आहे..), तुमचे बरेच प्रश्ण अन शन्का मग अपोआप दूर होतील..(विवाह एक संस्कार नावाच अतीशय उत्कृष्ट पुस्तक आहे, सर्वानी वाचण्या सारखे. त्यातून विवाह, लग्न याकडे बघण्याचा अतीशय शास्त्रीय, unbiased, healthy द्रूष्टीकोन मिळतो.. i am not preaching or not trying to sermonize.. पण फ़क्त मि आणि तो या पलिकडे विवाहात बर्याच गोष्टी आहेत ज्या समजावून घेतल्या तर सुख शान्ती समाधान निश्चीत आहे. लग्न या संस्कारातून आपण पुढची पिढी वाढवणार असतो, ती चान्गली होणे हे सर्वान्च्याच हिताचे असावे नाही का..? (विवाह का करावा, त्यातून पुढे साफ़ल्य काय, compatibility कशी असावी इत्यादी सर्व अन्गानी विचार करावा..)
|
Manuswini
| |
| Tuesday, January 22, 2008 - 1:16 am: |
| 
|
योग, दिव्या, इतकेच म्हणावेसे वाटले तुमची पोस्ट्स वाचून. interesting! goodone. comaprison केली नाही दोन्ही पोस्ट्सची पण Stimulating! काही गोष्टी विचार करायला लावण्यासारख्या आहेत. इथे बरोबर किंवा चुक ह्या नजरेने न बघता मी लिहिले आहे. कुठेतरी मनाला शिवल्या. BTW 'विवाह एक संस्कार' हे पुस्तक कुठे मिळेल(बहुधा योग्य वेळी वाचायला मिळेल.) योगीता, माझ्या personal experience वरून इथे 'मायबोलिवर' सर्व जण खुपच चारी बाजूने नी आपुलकीने लिहितात. नाहीतर कोणाला काय गरज आहे तु लग्न कर वा नको करु सांगायची. कोणी कशाला वेळ देइल इथे खरडत बसण्याचा. तुला बर्याच गोष्टी ज्या दिसल्या नाहीत त्या कळतील. शेवटी फक्त तुझा निर्णय असेल की त्यातील काय घ्यायचे ते आणि काय तुला सगळ्यात चांगले लागू पडेल तेव्हा उगीच एखादी पोस्टवरून खट्टू होवु नकोस. ( please हे माझे मत आहे).
|
Yog
| |
| Tuesday, January 22, 2008 - 2:21 am: |
| 
|
hhmmm... पुस्तकाबद्दल्: "विवाह संस्कार शोध व बोध" - संकलन राष्ट्र सेविका समिती, पुरोहित शाखा, नाशिक.(प्रथम आवृत्ती May 2005 ) मुम्बई, पुणे,नाशिक येथे हमखास उपलब्ध असेल.. US मधे माहित नाही. what i liked: १. संस्कृत मन्त्रान्चे हिन्दी आणि इन्ग्रजी स्पष्टीकरण आणि हिन्दू विवाह कायद्यासहीत २. अनेक मार्ग, क्षेत्रातील (जोतिष, education , विज्ञान, पुरोहीत, साहित्त्त्यिक, मान्सशास्त्रज्ञ, इत्यादी) मान्यवर लेखकानि मिळून सन्कलित केलेल्या या पुतकात अतीशय वस्तुनिष्ठ, विज्ञाननिष्ट व जोडीने वैदिक माहिती दिली आहे.. ३. शेवटचा सेक्शन, शन्का समाधान आणि विवाह कायदा..यात अगदी सर्व सामान्यान्च्या मनात "लग्न" यावर येणार्या शन्का, प्रशाण्न्ची objective उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
|
Shraddhak
| |
| Tuesday, January 22, 2008 - 5:34 am: |
| 
|
योगिता, मला ' माणूस ' चं म्हणणं पटतं. बोलताना भावनेच्या भरात त्याने भडक भाषा वापरली असेलही पण मुद्दा चुकीचा नाही. आपल्या देशात नोकरी, पगारवाढ, बढती सगळ्याच बाबतीत शिक्षण बघितलं जातं. या सगळ्या गोष्टींसाठी किमान पदवीची अट आता सर्वत्र आहे. गेले सात वर्षं या मुलाला भावी जबाबदार्यांची जाणीव असतानाही त्याने पूर्णवेळ शिक्षण घेणे शक्य नसेल तर बहिःस्थ शिक्षणाचा, रात्र महाविद्यालयाचा विचार केला नसावा, हे काहीसे खटकते. एकेकटे कमी पगारात राहणे वेगळे नि लग्न करून त्याच पगारात सगळ्या आर्थिक जबाबदार्या पेलणे वेगळे. किमान पुढे पगारवाढ, नोकरी बदल वगैरे गोष्टी सहजसाध्य असल्या तर या गोष्टी गौण होऊ शकतात नाहीतर नाही. पुढे मुलं झाली की आर्थिक चणचणही जाणवू शकते. आणि वय १५ ते २२ ही सात वर्षे सोबत होतात तर संभाव्य गोष्टींचा विचार केलात की नाही? केला असेल तर आजकालची नोकर्यांची स्थिती पाहता शैक्षणिक पात्रता वाढवावीशी का वाटली नाही? असो. इथे तुम्हाला जवळून वा वैयक्तिकरीत्या ओळखणारे लोक कदाचित नसतीलच. आणि अमुक गोष्ट कर वा करू नकोस असे सांगण्याइतपत अधिकार इथे कुणालाही नाही. तेव्हा तुम्ही तुमचा काय तो तारतम्याने निर्णय घ्या.
|
Manjud
| |
| Tuesday, January 22, 2008 - 5:36 am: |
| 
|
माणसा, तू लिहिलेला शब्दन शब्द मला पटतोय पण तुला जो अनुभव आलाय तो सगळ्याना येईलच असे नाही ना. आणि योगिताचा प्रश्न फक्त घरून परवानगी मिळण्याचा आहे. तुझ्या सगळ्याच पोस्ट्स विचार करण्याआरख्या असतात. पण तू ही अशी हिंसक भाषा वापरल्यावर मला खरंच धक्का बसला. असो.....
|
Dakshina
| |
| Tuesday, January 22, 2008 - 8:59 am: |
| 
|
Even I agree with whatever "Mannus" says about the marriage in 20's. Difference is really painful but true.
|
माझेहि Yog, Maanus, Manuswini dineshvs and Shradhhak ह्यांना अनुमोदन. योगिता मला वाटत तुझा घरापासुन दुर रहाण्याचा निर्णय योग्य आहे. घरात मुलि काहिश्या overprotected आणि emotionally supressed असतात त्यामुळे कधि कधि एखाद्या व्यक्तिवर प्रेम असण्यापेक्षा एखाद्या व्यक्तिवर प्रेम आहे या भावनेवर जास्त प्रेम असु शकत. बाहेर राहिल्याने येणारे बरे वाइट अनुभव तुला परिपक्व होण्यास मदत करतिल. तुझा २-३ वर्षे लग्न न करण्याचा निर्णय हि योग्य. शक्य झाल्यास ज्या मुलावर प्रेम करतेस त्याला ह्या काळात academically and financially पुढे जाण्यासाठि प्रोत्साहन दे आणि मदत कर. तु स्वत: देखिल degree पुर्ण करु शकतेस. यामुळे तुम्हाला पुढच्या वाटचालित मदत होइल. Best Luck to both of you .
|
खरच दुर राहिल्याने फायदा होतोय मला..मी २ च दिवसापुर्वी आत्येकडे आलिय रहायला..घरुन फोन वगैरे येतात विचारायला...पण एकुणच सगळ शांत आहे बर्यापैकी...
|
Deepurza
| |
| Thursday, April 10, 2008 - 10:02 am: |
| 
|
योगीता सध्या काय सिच्युएशन आहे
|
Arc
| |
| Tuesday, April 29, 2008 - 10:22 am: |
| 
|
http://www.slate.com/id/2189821/?GT1=38001 हे प्रकार आता अमेरीकेत पण पोहचले म्हणायचे!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|