|
दिनेश, तुम्ही मनातलं बोललात... काल जेव्हा मी नंदिनी यांची पोस्ट वाचली होती, तेव्हा खूप दुःखी झाले होते. पण त्यावर लिहीण्यापूर्वी खूप विचार केला, आणि शक्यतो (निट) लिहीण्याचा प्रयत्न केला. (त्यात कोणालाही दुखावणे, किंवा प्रत्युत्तर देणे हा हेतू नव्हता.) तो दिसू नये यासाठी विशेष प्रयत्न केले. एकदा वाटले होते, की मनात जसे विचार आले तस्सेच्या तसे इथे मांडावेत, पण मी इथे त्याकरीता आलेली नाही हे माझ्या मनाने मला सांगितलं. मग विचार केला की सगळं एक्सप्लेन करावं. पण परत त्याच जखमा खरवडणं नको वाटलं. अर्थात या सगळ्या अगोदर मनात विचार आला तो हाच की इथे लिखाण बंद करावे. प्रामाणिकपणे सांगते की मनात हा ही विचार आला की मायबोलीवर मी दुःख हलकं करण्यासाठी लिहीले, आणि लोक मला असे का बोलले? (नाही म्हटलं तरी नंदिनी यांची पोस्ट माझ्या मनाला कुठेतरी लागली होती.) मग मायबोलीवर सगळे असलेच लोक आहेत का? पण म्हटलं उगाच अख्ख्या फ़ोरमला कशाला दोष द्या? just move on जगात सर्व प्रकारचे लोक भेटणारच. नाही का? तुमच्या सर्वांच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना ही खूप खूप शुभेच्छा! 
|
सर्वाना सुखी आंनदी जग्ण्यासाठी हार्दीक सुभेछा. एक छान लेख कुणी तरी पाठ्वलेला मेल... 
|
Dakshina
| |
| Friday, May 02, 2008 - 4:53 am: |
| 
|
तुषार, सुंदर आहे लेख. राजकुमारीच काय, पण सर्वांनाच खूप उपयोगी पडेल असे वाटते. राजकुमारी तुम्ही लिहीणे थांबवले ते बरे केले. मलाही असेच वाटत होते, पण सांगायचे धाडस झाले नाही. तुम्हाला पुढील सुखी जीवनासाठी सुभेच्छा! 
|
मस्तच लेख आहे. खूप आवडला. लगेच मित्रमन्डळीना फ़ाॅरवर्ड केला.
|
Ajjuka
| |
| Friday, May 02, 2008 - 6:57 am: |
| 
|
माझी खरी खरी व्यथा.. गेल्या ३ दिवसातली... मान वाकडी करून खांदा आणि कान यांच्यामधे मोबाइल दाबून किंवा एका हाताने कानाशी मोबाइल पकडून दुसर्या हाताने गाडी सांभाळायची कसरत करत ड्राइव्ह करणारे दुचाकीवीर!! अगदी खरी खरी व्यथा.. काल एका चौकात एक मोठे काका आणि एक माजलेला बड्या बापाचा दिवटा यांची टक्कर होता होता वाचली. त्या काकांनी प्रसंगावधान दाखवले म्हणून वाचले सगळे. आणि दिवटा मोबाइलवर बोलतोच आहे. परत त्या काकांनाच माज करून दमदाटी करायला लागला. फोन काही बंद करीना. त्या काकांनी चार शब्द त्याला सुनावले तर ह्याने काकांना शिव्या घातल्या. असं वाटलं ना की त्या काकांनी सरळ खणखणीत कानाखाली वाजवायला हवी होती. म्हणजे मोबाइल जोरात पडला असता आणि तुटला असता. चांगली अद्दल घडली असती. असे लोक दिसले की मी तर मुद्दामून त्यांच्या मागे जाउन जोरजोरात हॉर्न वाजवते. आशा ही की कधीतरी एखाद्याच्या हातून दचकून मोबाइल पडेल आणि मी शांतपणे माझ्या गाडीचे चाक त्यावरून नेईन. चूकून असं दाखवून (असुरी समाधान आहे. पण मोबाइल वर बोलत रहाण्यासाठी स्वतःचा आणि दुसर्याचा जीव धोक्यात घालणार्या माजोरी दिवट्यांबद्दल कुठलीच सहानूभूती असायची गरज नाही!) त.टी.: कुठल्या माजलेल्या बड्या बापाच्या दिवट्याच्या तेही टूव्हीलरवरून जाताना मोबाइलवर ब्नोलत जाणार्या दिवट्याचा अपमान झाला या पोस्टमुळे तर तो बु. दो. मुळीच नाही. अश्या लोकांचा अपमान व्हावा हाच हेतू आहे.
|
Mbhure
| |
| Friday, May 02, 2008 - 3:11 pm: |
| 
|
अज्जुका, गेल्याच महिन्यात माझे मुंबईचे शेजारी अश्याच एका अपघातात गेले. मुलगा Underage Driver होता. ते पुण्याला रहायचे आणि दोन दिवसांनी नातवाच्या मुंजीसाठी मुंबईला येणार होते. त्या आधी बिल भरण्यासाठी म्हणुन खाली जाऊन येतो सांगुन निघाले होते. अज्जुका, तुझ्या त.टी. मधील भावना अजीबात चुकीच्या नाहीत. हे ईथे लिहायला हवे होते की नाही माहित नाही पण वरील पोस्टला धरुन हे लिहीले आहे.
|
Uday123
| |
| Friday, May 02, 2008 - 4:47 pm: |
| 
|
अजुक्क्का तुमची व्यथा तिच माझी पण (थोड्या व्यापक प्रमाणात) व्यथा आहे. मला गेल्या डिसेंबर मधे पुणे-मुंबई प्रवास करण्याचा योग आला, मोबाईल असो वा नसो पण लोक खुप बेदरकार पणे, 'जिवावर उदार' होऊन गाड्या चालवतात याची प्रचिती आली. एवढी कसली घाई असते यांना? हे सर्व पाहुन, अपघात (असल्या 'घाताला' अपघात पण म्हणता येणार नाही) हा होणारच आहे, पण तो कुठे होणार आणि कोण बळी जाणार हाच प्रश्न आहे. माझा डॉक्टर मित्र, असल्या लोकांची पुढे कुठे सिग्नल, नाका, धाबा येथे गाठ पडली तर मग स्वत:चे visiting card देतो, भविष्यात कामात येईल म्हणुन. माजलेल्या बड्या बापाचा दिवटा यापेक्षा बड्या बापाचा माजलेला दिवटा हे जास्त योग्य ठरेल, असले दिवटे कुठल्याही सहानभुतीच्या लायकीचे नाही आहेत.
|
Amitad
| |
| Monday, May 05, 2008 - 8:47 am: |
| 
|
तुषार, एकदम मस्त आहे लेख. अज्जुका, खर आहे तुज़ म्हणण, मला आणखी एक गोष्टीचा मनापासुन राग येतो तो म्हणजे लोक रस्त्यात थुन्कतात त्याचा. काहि बघत नाहित लोक पुढे मागे आणि घाणेरडे पचकन पानची पिन्क टाकतात. एकच ठेवून द्याविशी वाटते त्या मोमेन्ट ला.
|
Dakshina
| |
| Tuesday, June 03, 2008 - 10:50 am: |
| 
|
माझी लेटेस्ट व्यथा.... जानेवारीपासून कंपनीच्या बसने येतेय, पहील्यांदा बसमध्ये खिडकीच्या साईडला मी, मध्ये एक मुलगी, मग एक मुलगा असे (थोडी थोडी ओळख झाल्यावर) ठरवून नाही; पण आपसूक बसू लागलो २/३ आठवड्यांपुर्वी मुलगी ऑनसाईट गेली. मग मी हवी तिथे बसू लागले, शक्यतो २ सिटर वर... पण हा मुलगा मला शोढून काढून माझ्याच जवळ येऊन बसतो... तर माझी व्यथा ही आहे की त्याच्या अंगाला घामाचा खूप वास येतो... आणि मी ते त्याला सांगू शकत नाही. आणि प्रवास थोडा - थोडका असेल तर ठिक.... दिड तास कोण सहन करणार?
|
त्याला मायबोलीवर register करायला सांगा ;) . मझ्या ऑफ़ीस मधे पण एका मुलाचा असाच problem होता. मला pregnancy मधे तर खुप त्रास व्हायचा. मी त्याला एक दिवस सांगितले कि माझ्या डेस्कपाशी येत नको जाउस. काय असेल ते मेल करत जा. काय करणार ?
|
Uday123
| |
| Tuesday, June 03, 2008 - 4:45 pm: |
| 
|
मराठी येत नसेल तर तो मायबोलीवर कशाला येणार? दक्षिणा, तुम्ही डोक्याला 'भयंकर' सुवास (जे मराठी लोक फ़ार कमी वापरतात) येईल असे तेल लावा, म्हणजे प्रवास तेवढा त्रासदायक नाही वाटणार (तो दर्वळ पळुन देखील जाईल), किंवा छानसा pefume (पर्याय?) तुमच्या बसायच्या जागेवर आसपास मारा.
|
उत्तम म्हणजे सरळ सांगा. नाहीतर परत ३ शिटांच्या बाकड्यावर बसायला सुरवात करा
|
Ajjuka
| |
| Wednesday, June 04, 2008 - 2:02 am: |
| 
|
सरळ सांगणे शक्य नसेल तर थोडे पैसे खर्च कर आणि त्याला एक अंघोळीचा सुवासिक साबण, कपडे धुण्याचा सुवासिक साबण (रिन किंवा तत्सम पैसेवाल्या वर्गातले!), कपडे धुवायच्या पावडरीचा छोटा पॅक (हा सुद्धा सुवासिक.. टाइड वगैरेच्या कुळातला), एक सुवासिक टाल्क, एक मंद वासाचा डिओ, एक सहन करणेबल वासाचा पर्फ्युम असा सगळा किट सॅंपल साइझ मधे आणि हे सगळं कुठे मिळू शकेल त्या दुकानांची दरासकट यादी भेट दे. एवढ्यावरून शक्यतो कळावं. नाही कळलं तर मग तो बसायला आला की नाकाला रूमाल लावून उठून दुसरीकडे जा.
|
Dakshina
| |
| Wednesday, June 04, 2008 - 4:52 am: |
| 
|
सव्यसाची, मी ३ लोकांच्या बाकड्यावर बसायला सुद्धा सुरवात केली होती, पण तो तिथे ही मला मैत्रिण समजून माझ्याशी 'हितगूज' करायला येतोच. तसा तो मी डायरेक्ट सांगितल्यावर राग मानायचा नाही, आणि मानला तर मानला... मी काही करू शकत नाही. आणि मी असं डायरेक्ट बोलायला काही भिड - भाड बाळगत नाही, पण यालाच सांगणे मला जमत नाही. आता मी नविन आयडीया काढलेय, २ सिटरवर आगोदर कोणितरी बसलेलं असलं की मी तिथे जाऊन बसते. पण अशाने मला खिडकी नाही मिळत ना.. अज्जुके, तु दिलेला सल्ला मला खूप जणांनी दिला, पण मी इतका भोचकपणा नाही गं करू शकत.
|
Shraddhak
| |
| Wednesday, June 04, 2008 - 5:07 am: |
| 
|
ईईईईईईईईईईईई, लोक तारतम्य न बाळगता काय वाट्टेल त्या व्यथा मांडायला लागलेत HG वर. आयुष्यात एवढ्यातेवढ्याही गोष्टी स्वतःच्या स्वतः tackle करता येत नाहीत म्हणजे कहर आहे. की मायबोलीवर नियमितपणे फुटकळ का होईना व्यथेचा / प्रश्नाचा रतीब घातलाच पाहिजे, असा नेम केलाय?
|
Giriraj
| |
| Wednesday, June 04, 2008 - 5:56 am: |
| 
|
श्र,हीपण व्यथा म्हणायची का??
|
Dakshina
| |
| Wednesday, June 04, 2008 - 6:08 am: |
| 
|
श्रद्धा, तुम्ही इथे काय लिहावं आणि काय लिहू नये याची एक नियमावली मला पाठवाल का? म्हणजे पुढच्यावेळी तारतम्य बाळगायला बरं.
|
Shraddhak
| |
| Wednesday, June 04, 2008 - 6:42 am: |
| 
|
दक्षिणा, ती नियमावली मी कशाला सांगायला पाहिजे? आपलं आपल्यालाच कळत नाही का? घर विकायचे आहे / विकत घ्यायचे आहे, काय पद्धत असते, व्हिसासंबंधी प्रश्न, एखादी पाककृती वगैरे गोष्टी ठीक विचारायला. पण आता एकतर वाचणार्याला किळस येईल असे प्रश्न आणि त्यावर ' जे पटत नाही / सहन होत नाही ते सरळ त्या व्यक्तीला सांगणे ' हा साधा, प्रभावी उपाय सुचवला आहे वर काहीजणांनी तर त्यावर ' त्या व्यक्तीला असे सांगायला जमत नाहीये ' हे तुमचे उत्तर! काय करायचे मग? कशा प्रकारचा सल्ला यावर अपेक्षित आहे? यावर कुणीही काय करणार? मायबोलीवर लोक प्रश्नांवर यथाशक्ती उत्तरे देतात, तोडगे सांगतात पण म्हणून आपण आपली विचारशक्ती वापरू नये असे थोडेच आहे? श्र,हीपण व्यथा म्हणायची का<<<<<< हो ना गिरी, ही पण एक खरीखुरी व्यथा. 
|
Dakshina
| |
| Wednesday, June 04, 2008 - 12:07 pm: |
| 
|
श्रद्धा, या छोट्याश्या गोष्टीसाठी इतका ऊहापोह करण्याची काही गरज आहे असं मला नाही वाटत, हा पब्लिक फ़ोरम आहे. लोकांना जे लिहावंसं वाटतं ते लिहीतात. आपण कोणावरही कोणत्याही प्रकारची बंधनं घालू शकत नाही हे मी स्वतः पूर्ण जाणून आहे, तुम्हीही असाल. मला ही इथे लिहीलेल्या बर्याच गोष्टी रुचत नाहीत, पण मी त्यावर भाष्य करीत नाही, त्यामूळे चर्चेला वेगळे वळण लागते. तुम्हीही सरळ दुर्लक्ष का नाही करत माझ्यासारखं? 
|
Shraddhak
| |
| Wednesday, June 04, 2008 - 12:21 pm: |
| 
|
मला ही इथे लिहीलेल्या बर्याच गोष्टी रुचत नाहीत, पण मी त्यावर भाष्य करीत नाही, त्यामूळे चर्चेला वेगळे वळण लागते. तुम्हीही सरळ दुर्लक्ष का नाही करत माझ्यासारखं? <<<<<<< वेल, यावर मी उत्तर देऊ शकते. पण जाऊ दे, मला आता कंटाळा आला. 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|