|
Slarti
| |
| Friday, May 23, 2008 - 5:49 pm: |
| 
|
दर शुक्रवारी 'सकाळ'मध्ये फमिली डॉक्टर अशी एक डॉ. श्री TM बालाजी तांबे यांना वाहिलेली पुरवणी येते. आजच्या पुरवणीचा उपमुख्य (मुख्य विषय म्हणजे ते डॉ. श्री TM ) विषय आहे पाणी व त्याची शुद्धता. त्यांच्या लेखातला काही भाग -- ....आता तर हेही सिद्ध झाले आहे की पाणी फक्त जंतूंमुळे व घाणीमुळे प्रदूषित होत नाही तर विचारांमुळेही पाण्याचे प्रदूषण होते. शुद्ध पाण्यावर वाईट विचारांचे प्रदूषण कमी होते पण त्यावर चांगल्या विचारांचे प्रक्षेपण केल्यास पाणी अत्यंत शक्तिमान होते व असे पाणी केवळ शरीराचीच नव्हे तर आत्म्याची तृषाही भागवू शकते. जेवढे पाणी वाईट, दूषित वा विषारी असेल तेवढा त्यावर वाईट शक्तींचा व वाईट विचारांचा प्रभाव जास्ती पडतो व ते अधिकच दूषित होऊन मनुष्यमात्राच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते, हे आता सप्रयोग सिद्ध झालेले आहे....... .....गंगा, नर्मदा वगैरे नद्यांचे पाणी जोरात वाहत असल्याने त्यात विद्युतचुंबकीय शक्ती असण्याची शक्यता अधिक असल्याने या नद्यांचे पाणी अधिक पवित्र समजले जाते...... चांगल्या विचारांचे प्रक्षेपण करण्यासाठी PSLV, GSLV सारखा एखादा घरगुती प्रक्षेपक मिळतो का हे तुळशीबागेत बघायला पाहिजे. आमच्याकडे कधी कधी नळाला जोरात पाणी येते, तेव्हा त्यात विद्युतचुंबकीय शक्ती ( ???? ) जास्त असल्याने ते पवित्र समजावे का ?
|
आमच्याकडे कधी कधी नळाला जोरात पाणी येते, तेव्हा त्यात विद्युतचुंबकीय शक्ती ( ???? ) जास्त असल्याने ते पवित्र समजावे का ? <<< 
|
आमच्या पुर्वजांना (म्हणजे ज्यांनी पुराणे वगैरे लिहिली... वेद लिहिले त्यांना नाही कारण वेद हे अ-पौरुषिय आहेत) हे सगळे माहिती होते म्हणुनच त्यांनी गंगा, नर्मदा वगैरे नद्यांना आदराचे स्थान दिले.. (जसे महाभारतात नाहीका टीव्ही होता जो बघुन संजयने युद्धाचा वृत्तांत धृतराष्ट्राला दिला...) बाकी च्यायला, चिन्या वगैरे जाणकार मंडळी आपले मते मांडतीलच.
|
Bee
| |
| Saturday, May 24, 2008 - 6:43 am: |
| 
|
मनुस्विनी, शिरा पुरी आपणही खातो ना.. आय मीन, मराठी लोक खातात ना.. विदर्भात, वडा भात किंवा आमरस आणि भात किंवा शेवया आमरस किंवा आमरस कुरडई असेही प्रकार आहेत खाण्याचे.
|
Tonaga
| |
| Saturday, May 24, 2008 - 10:30 am: |
| 
|
हे बालाजी ताम्बे म्हणजे एक कहर गृहस्थ आहेत. शरद पवार त्यांचेकडे ट्रीटमेन्टला गेल्यापासून सकाळने त्याना दत्तकच घेतले आहे. हा माणूस स्वत्:ला डॉक्टर म्हणवून घेतो हाच मोठा विनोद आहे. मी तर सकाळ आल्यावर पहिली त्यांची पुरवणी काढून फेकून देतो अन नन्तर सकाळ वाचतो...
|
बाळाजी ताम्बेंच्या वेब साईट जा.तिथे कसे यू एस डी मध्ये कसे लुटतात हे कळेल. www.balajitambe.com
|
Zakki
| |
| Saturday, May 24, 2008 - 4:56 pm: |
| 
|
शिरा पुरी आपणही खातो ना.. पण नागपुरातला शिरा वेगळा, नि पुण्यातला वेगळा. नागपुरातल्या शिर्यात विद्युच्चुंबकीय शक्तीबरोबर गुरुत्वाकर्षण शक्ति पण असते! त्यात भरपूर केशर, वेलदोडा व साजूक तूप असते. त्यामुळे विचारपण पवित्र होतात. म्हणून नागपूरची माणसे फुक्कटचा वाद घालत बसत नाहीत, तत्वाचा प्रश्न करून.
गमतीत लिहीले आहे हे न समजल्यास आ. बु. दो. स.! इ. इ.
|
Slarti
| |
| Monday, May 26, 2008 - 4:12 am: |
| 
|
नागपुरी लोक शिर्यात केशर, तूप वगैरे घालतात हे खुद्द तुम्हीच 'गंमतीत लिहीले आहे' हे बरंय... मलाही वाचून गंमतच वाटली बाकी ते गुरुत्वाकर्षण शक्ती असते हे मात्र अगदी खरं. ढिम्म ते ढिम्म, हलत नाहीत चटचट. अहो, घरच्या कार्याला मदत वगैरे जाऊच दे, साडेसातच्या समारंभाला आरामात साडेनऊ दहापर्यंत येतात. आधी जेवून घ्या मग सावकाश गप्पा मारा अशी विनंती केली तरी ढिम्मपणे गप्पाच मारत राहतात, तिकडे केटरर बोंबलतोय. शेवटी हाताला धरून जेवायला न्याव लागतं किंवा हातात ताट आणून द्यावं लागतं. मोठेपणाच्या कल्पना !!! त्यात वर गप्पा तर लंब्याचवड्या... हा अनुभव प्रातिनिधीक म्हणावा इतक्या वेळा आला. अचंबा, वैताग, चिडचिड आणि शेवटी यात विनोद शोधून (हताशपणे) हसणे असा माझा प्रवास आहे म्हणून इथे लिहीले
|
स्लार्टी व टोणगा, तांब्यांबाबत १००% सहमत.
|
Dakshina
| |
| Monday, May 26, 2008 - 7:30 am: |
| 
|
शुद्ध पाण्यावर वाईट विचारांचे प्रदूषण कमी होते पण त्यावर चांगल्या विचारांचे प्रक्षेपण केल्यास पाणी अत्यंत शक्तिमान होते व असे पाणी केवळ शरीराचीच नव्हे तर आत्म्याची तृषाही भागवू शकते.>>>> बालाजी तांबे...फ़ेकाड्या नं १....
|
Uday123
| |
| Monday, May 26, 2008 - 7:59 am: |
| 
|
त्या साईट वर मी तर युरो मधेच (?) फ़ी बघीतली, खुपच महागडे आहेत. भारतात रुपये चालत नाहीत? भोळी जनता, भोळे लोक, मग धंदा चांगला चालणारच.
|
Ashbaby
| |
| Monday, May 26, 2008 - 8:43 am: |
| 
|
माझे ऑफ़िस वरळीला होते तेव्हा रोज संध्याकाळी एल्फ़िन्स्टन स्टेशन वर जायला टॅक्सि आणि तीन पसेण्जर्स (शेअर करायला) शोधायला लागायचे. एकदा मी ऑफ़िसातुन खाली येताना सोबत दोन सख्यांना आणले. खाली आल्याआल्याच टॅक्सी मिळाली, अजुन एका सखीच्या शोधात आजुबाजुला नजर फ़िरवली तर ऑफ़िसातल्याच अजुन दोघीजणी दिसल्या. आम्ही पाचहीजणींनी टॅक्सिवर आक्रमण केले. मी जराशी (जराशीच बरे..) हेल्दी असल्यामुळे पुढे बसले, मागे एक बारकुंडि दुसरीच्या मांडीवर बसली. अशी सगळी बसवाबसवी चालली असताना टॅक्सी ड्रायवर आमच्याकडे रागारागाने बघत होता. आम्ही सगळे बसल्यावर तो भय्या मला म्हणाला, " एक टॅक्सीमे ५ आदमी नही जायेगा". मी मागे वळून पाहिले आणि मग त्याला म्हणाले, " आदमी कहा है? सब औरते बैठी है". त्या भैय्याने माझ्याकडे एकवार रागाने पाहिले आणि भस्कन टॅक्सी सुरु केली. मागे बसलेले सगळे हहपुबे. साधना.
|
Swa_26
| |
| Monday, May 26, 2008 - 9:41 am: |
| 
|
आईशप्पथ.. भस्कन हसले इथे हपिसात, हे वाचुन!! 
|
बालाजी ताम्बेन्ची साइट आजच पाहिली. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहियी या म्हणीचा प्रत्यय येतो. जाता जाता, इकडे अमेरिकेत झी वर अजमेरी बाबान्सारख्या भोन्दू लोकान्च्या जाहिरातीन्चा मारा होत असतो. असल्या भोन्दू जाहिराती भारतातल्या टीवी वर दाखवत नाहीत. एन आर आय चा आय क्यु जरा कमीच असतो हा निष्कर्श काढावा का?
|
Dakshina
| |
| Tuesday, May 27, 2008 - 4:36 am: |
| 
|
साधना... टॅक्सी वाला गार झाला असेल..
|
Tonaga
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:30 pm: |
| 
|
भय्या मला म्हणाला, " एक टॅक्सीमे ५ आदमी नही जायेगा". >>>>>>हा किस्सा राज ठाकरेना सांगितला पाहिजे. तेवढाच भाषणात मुद्दा वाढला अन भाषणही मसाले दार!!
|
Dakshina
| |
| Wednesday, May 28, 2008 - 4:43 am: |
| 
|
टोणगा, लगेच म. न. से च्या लोकांनी भैय्या ला धू धू धुतले असते आणि टॅक्सी बिचार्या साधनाला चालवावी लागली असती...
|
Ashbaby
| |
| Wednesday, May 28, 2008 - 5:41 am: |
| 
|
भय्याची टॅक्सी चालवायची?? बापरे, काय हालत असते त्या टॅक्शांची?? मी कितीतरी वेळा दरवाजा हाताने धरून बसले आहे. चुकून रस्त्यातच उघडेल म्हणून. all parts except the horn honks हे अगदी खरे आहे त्यांच्या टक्सीबद्दल. साधना
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 28, 2008 - 8:40 am: |
| 
|
साधना, मस्कतमधे तर बायकांचा उल्लेख पण तिथले बस ड्रायव्हर, आदमी म्हणूनच करतात. अर्थात त्या बर्यापैकी हेल्दी, असल्याने मनावर घेत नाहीत.
|
माझा उल्लेख झालाय म्हणुन लिहितो. बालाजी तांबेंकडून उपचार करुन घेतलाय का कोणी???त्यांच्या उपचाराने गुण येतो का नाही हे माहीतिय का कुणाला??का नुसताच त्यांच्या लेखांवरुन त्यांना शिव्या देत आहात???बुध्दीप्रामाण्यवाद्यांनी अशा चुका करु नयेत. नाहीतर मग आमच्यासारख्या अंधश्रध्दावाद्यांमधे आणि त्यांच्यामधे फ़रक काय राहीला??? संजयला दिव्यदृष्टी असल्याने त्याला सर्व दिसत होते.टि.व्ही. होता वगैरे तुमच्यासारख्या लोकांना खरे वाटायला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|