|
Rimzim
| |
| Wednesday, April 16, 2008 - 2:41 am: |
| 
|
कांदा कापताना शेजारी एक बाऊल भरुन पाणी ठेवल्यास डोळ्यातुन पाणी नाहि येत अजुन एक उपाय एका अमेरिकन मैत्रिणीचे म्हणणे आहे की कांदा चिरताना तोंडात ( दाता मधे) काडेपेटि ची काडि धरायची.
|
Dakshina
| |
| Wednesday, April 16, 2008 - 4:44 am: |
| 
|
आज सकाळी ब्रेकफ़ास्ट करताना मैत्रिणीला 'हे' कांदे पुराण सांगत होते, तिने पण एक उपाय सुचवलाय, म्हणे नाक बांधून कांदा चिरा... बघा हे ही करून.... 
|
Giriraj
| |
| Wednesday, April 16, 2008 - 10:13 am: |
| 
|
नाक कसे बांधावे? सर्दी झाल्यास कांदा चिरताना किंवा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही का? बी,ते 'पपई काप' म्हणण्यामागे अनुप्रास घडवण्याचा उद्देश्य असेल रे! हे माझे वेगळे मत बरंका..
|
Dakshina
| |
| Friday, April 18, 2008 - 9:39 am: |
| 
|
नाक कसे बांधावे? सर्दी झाल्यास कांदा चिरताना किंवा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही का? >>>>> हो ऽऽऽऽऽ येईल ना..... पण नाकातले आणी डोळ्यातले पाणि मिक्स होऊ नये म्हणून नाकाला रूमाल बांधायचा 
|
Rajya
| |
| Thursday, May 22, 2008 - 6:40 am: |
| 
|
टोमॅटो सुप करताना त्यात एक गाजर चिरुन घाला आणि बघा कशी बेष्ट चव येते ते
|
Dineshvs
| |
| Friday, May 23, 2008 - 2:36 am: |
| 
|
राज्या, अभिनंदन. कशाबद्दल ते विचारू नकोस.
|
Lajo
| |
| Friday, May 23, 2008 - 3:47 am: |
| 
|
कांदे पुराण आवरते घेतले म्हणून ना दिनेशदा... टोमॅटो सूप करताना साध्या बटर ऐवजी गार्लिक बटर मधे करा, चव आणखीनच बेष्ट लागते...
|
Dakshina
| |
| Friday, May 23, 2008 - 4:45 am: |
| 
|
बहुतेक,स्वयंपाक शिकला म्हणून असेल
|
Dakshina
| |
| Friday, May 23, 2008 - 5:01 am: |
| 
|
* दही जर खूप आंबट असेल तर त्यात ४ कप पाणी घाला. अर्ध्या तासाने, वरचं पाणी काढून टाका, दह्याचा अंबटपणा कमी होईल. * लोणी काढून झाल्यावर उरलेल्या ताकात अर्धी वाटी दूध घालून उकळा... झटपट पनीर तयार... * पालेभाज्या स्टोअर करताना न्यूज पेपर मध्ये गुंडाळून फ़्रिज मध्ये ठेवल्यास जास्त टिकतील.
|
Dakshina
| |
| Friday, May 23, 2008 - 5:54 am: |
| 
|
पावसाळ्यात कपड्यांवर चिखलाचे डाग पडतात, असे कपडे बटाटे शिजवलेल्या पाण्यात भिजवून धूतल्यास, डाग जातील. शिवाय लाईट जाण्याचे दिवस आलेत, मेणबत्या लागतीलंच घरात, तर मेणबत्या जास्ती दिवस टिकण्यासाठी स्टॅन्ड मध्ये फ़िक्स केल्यावर त्यात अर्धं पाणी भरा, वाहून आलेलं मेण काढायला ही सोप्पं जातं, आणि स्टॅन्ड पण नीट साफ़ करता येतं...
|
Dineshvs
| |
| Friday, May 23, 2008 - 12:36 pm: |
| 
|
हं दक्षिणा, अभिनंदन करायचे तेच कारण, आता मला एकटेपणा नाही जाणवणार ना इथे.
|
लोणच्यासाठी मिरच्या चिरतांना, किंवा बटाटावडा-आलू परांठा ह्यांचा लगदा कुस्करतांना मिरच्यांची जळजळ हातांना होते. अशावेळी हात गॅसच्या आचेवर शेकल्यास ती जळजळ खूपच कमी होते. (मिरचीचं झोंबणारं तेल ह्या उष्णतेने उडून जातं. Capsicin oils असतात हे).
|
Dakshina
| |
| Monday, May 26, 2008 - 7:08 am: |
| 
|
मला तर ढब्बू मिरची चिरल्यावरही हातांची जळजळ होते, असं केल्याने ती ही कमी होईल का?
|
Dineshvs
| |
| Monday, May 26, 2008 - 7:33 am: |
| 
|
काहि ढब्बू मिरच्या अश्या असतात, पण साधारण मोठ्या बघून घेतल्या, तर हाताची आग आग होत नाही. जर सगळ्याच मिरच्या चिरल्यावर असे होत असेल, तर कदाचित हाताची त्वचा, खुप नाजूक असल्यामूळे होत असेल. अश्यावेळी, हाताला प्लॅस्टिकचे किंवा रबराचे ग्लोव्ज घालून काम करणे योग्य. हे ग्लोव्ज, केमिष्टकडे मिळतात. धुवुन परतपरत वापरता येतात.
|
Dakshina
| |
| Monday, May 26, 2008 - 8:34 am: |
| 
|
दिनेश, ही ग्लोव्हज वापरण्याची कल्पना खरंच खूप छान आहे, आधी कशी काय सुचली नाहि कोण जाणे..
|
ढब्बू मिरचीने हाताची जळजळ?? ऐकावे ते नवलच... योगेश, तुझेया सल्ल्याबद्दल धन्यवाद. बरं मिरचीचा हात असताना कॉंटॅक्ट लेन्स घाल्लून कुणी पाहिलय दिवसभर सर्व विचारतील,,, काय झाल.लं, बरं वाटत नाही का? घरी सर्व ठीक आहेत ना!!!!!!!
|
Zakki
| |
| Monday, May 26, 2008 - 11:59 am: |
| 
|
ढब्बू मिरचीने हाताची जळजळ?? मी मिरच्या चिरत नाही, पण कधी खाल्ली तर पोटात मात्र जाम जळजळते. त्यामुळे अनेक पदार्थ खाणे बंद केले आहे, जसे चायनीज पदार्थ.
|
Ajjuka
| |
| Monday, May 26, 2008 - 7:09 pm: |
| 
|
ढब्बू मिरचीच्या आतल्या बियांना हात न लावता चिरता आलं तर बघ. मिरचीची टोपी चिरली की की खालचा कप असतो त्यतल्य बिया छोट्या सुरीने हात न लावता काढून टाक आणि मग तो कप आतून पाण्याने विसळून काढ. हाताची आग होणार नाही.
|
Ajjuka
| |
| Monday, May 26, 2008 - 7:13 pm: |
| 
|
उष्णता, पित्त वाढलेलं असेल तर मिरच्यांनी, सुरणाने हात जळजळणे/ खाजणे हे जास्त होते. गारवा देणार्या, पित्तशामक गोष्टींचा आहारात अंतर्भाव केल्यास फरक पडतो असा माझा अनुभव आहे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 27, 2008 - 3:00 am: |
| 
|
हात वा भांडी धुण्यासाठी जर एखादा खास तीव्र स्वरुपाचा साबण वापरत असाल, तरिही हाताची आग होते. ज्या ढब्बू मिरच्यांची टोके मोदकाप्रमाणे बाहेर आलेली असतात, ज्यांच्या सालीवर जास्तच सुरकुत्या असतात, ज्यांचा रंग थोडा पोपटी असतो, त्या जरा जास्तच तिखट असतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|