Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 8:29 am: |
| 
|
दारू पोटात जाते पण चढते मेन्दूत्- कसेंSSSSSS तस्सेSSS>>>> अच्छा! तर आंबट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट दही दारूसारखे चढते असे म्हणायचेय तुम्हांस काय? मग स्वस्ताचे दही पिण्यापेक्षा महागाची दार्रर्रर्रर्रू का पितात लोक? ए. भा. प्र.
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 8:30 am: |
| 
|
पण ती पुरण पोळी पुण्यातल्या सारखी नसते. >>>>पुण्यापेक्षा चांगली असेल. पुण्यात काय धड मिळतेय?
|
>> गरम गुलाब जामुन व व्हेनिल्ला आईस क्रीम्- यू पी व पन्जाब दहिभातात साखर्-बंगाली-विशेषत्: उन्हाळ्यात -रबडी व जिलबी- यू पी व बिहार,एम.पी हे सगळे कॉंबो उत्तम लागतात. रबडी आवडणार्यांना ती कुठल्याही गोड पदार्थावर ओतली तरी वाईट कशाला लागेल? तूप, खवा हे कुठल्याही गोडातिखटाबरोबर जमून जाणरे आहेत. त्यामुळं ठीक आहे. च. च. म्हणजे चहा चपाती तर वावा. पण पुपो आणि आमरस बाप रे. भात आणि आमरस हे तर ऐकूनच कस्तरीहुतंय. कुणी आंब्याचं लोणचं आणि तूप एकत्र करून पोळीशी खाल्लंय का? मला आवडतं. हो मासे आणि दुधाचा पदार्थ हे कॉंबो बरोबर नाही. त्याची रीऍक्शन येते हे मी पाहिलंय. मटनाचे पण ऐकलेय. माझ्या एका मैत्रिणीकडं शिळ्या चपातीची फोडणी देऊन भाजी करायचे आणि ती ताज्या पोळीशी खायचे पांढरा भात पोळीशी खाणारे लोकही आहेत. या बीबीच्या नावात शेवटी खाणे हा शब्द ऍड करावा का?
|
Alpana
| |
| Sunday, March 30, 2008 - 10:00 am: |
| 
|
काही भागात बोटव्याचा भात आणी आमरस असा खास बेत असतो....मला ते बघताना कसंतरी झाले होते
|
बाप रे उचापती आणि केदारचे किस्से वाचून जाम हसले.
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 11:56 am: |
| 
|
अल्पना बोटव्याचा भात म्हणजे काय याची मला कल्पना नाही पण शेवयाचा भात, आम्बरस, तूप आणि क्वचित साखर हा फॉर्म्युला टेरिफिक आहे. खेड्यातल्या लग्नाला नवरदेव जाताना त्याला भावकी कडून शेवयाच्या भाताचे जेवण देण्याचा विधी असतो. शेवयाचा भात म्हणजे उकडलेल्या शेवयाच्या नूडल्स. तसा भाताचा त्याचा संबंध नाही.
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 11:59 am: |
| 
|
पोतराजाच्या नृत्यात एका गाण्यात राजाच्या मेजवानीचे वर्णन करताना 'तुपामंदी आम्बरस' अशी एक ओळ आठवते. ती ऐकून अजूनही तोंडला पाणी सुटते...
|
पुपो आणि आमरस बाप रे. >> >>>पुपो आणी आमरस चांगल लागत.. (मी ट्राय केलेय) सोलापुरी extreme गोडाचे नमुने पुरणपोळीवर पिठिसाखर + तुप बुंदीच्या लाडवावर पिठी साखार + तुप (मी ट्राय करु शकणारही नाही.ऽबब एवढ गोड???)
|
Alpana
| |
| Sunday, March 30, 2008 - 12:33 pm: |
| 
|
अरे बोटव्याचा भात म्हणजे शेवयाच्या भातासारखाच प्रकार ह्यालाच बहुतेक गव्हले पण म्हणतात... आमच्याकडे तुप आणी साखर घालुन खातात..पण माझ्या काकीच्या माहेरी त्यात आमरस पण घालतात... ते मात्र मी पहिल्यान्दाच बघितले होते..
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 1:40 pm: |
| 
|
जर ते शेवयाच्या भातासारखे असेल तर तू ट्राय कर. फारच अल्टीमेट विथ तूप.....
|
Zakasrao
| |
| Sunday, March 30, 2008 - 3:10 pm: |
| 
|
अरे बोटव्याचा भात म्हणजे शेवयाच्या भातासारखाच प्रकार ह्यालाच बहुतेक गव्हले पण म्हणतात>>>>. शेवया ह्या हल्ली मशीनवर करतात. पुर्वी घरीच करत असत. अशा शेवया करताना त्याचा अखंड धागा करुन तो ताटात किंवा परातीत गोल गोल पसरवत जातात. हे करण्यासाठी बराच मोठा सेट अप असे. म्हणजे शेवया बनवण्याचा तो लाकडी पाट (मला प्रफ़ेक्ट शब्द आठवत नाहिये ), त्याखाली ठेवण्यासाठी अंथरुणं, डबे वै वै. आणि शेवया करणार्याच कौशल्य असणार्या मुली बायका बोटवे हा तसाच एक प्रकार पण तो फ़क्त बोटाने करतात. त्यात अखंड धागा (मला हा शेब्द देखील आठवत नाहिये ) न काढता छोटे छोटे २५ ते ३० मीमी चे तुकडे असतात. मला हा प्रकार ऐकडेच कळाला. खास सोलापुरी दिसतोय हा प्रकार. चव शेवयासारखीच असते. खेड्यातल्या लग्नाला नवरदेव जाताना त्याला भावकी कडून शेवयाच्या भाताचे जेवण देण्याचा विधी असतो>>>>>>> टोनगा हा प्रकार मी कधी कोल्हापुरात नाही पाहिला. सोलापुरात लग्नाच्या आदल्या दिवशी नवर्यामुलाला भात न देता शेवयाचा भात देतात हे पाहिलय. तु सोलापुरी दिसतोयस
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 4:47 pm: |
| 
|
लग्नाच्या आदल्या दिवशी म्हनण्यापेक्षा आधी ३-४ दिवस भाऊबन्द नवर्या मुलाला शेवया खायचे आमन्त्रण देतात. मग तो करवल्यांचा घोळका अन मुंडावळ्या बांधलेला नवरदेव प्रत्येक घरी जाऊन शेवया खातात... आता हे सर्व बन्दच झालेय
|
कोणी कोणी तर श्रीखंड नी भात खातात, दही भात खातात ना तसा. लहानपणी शेजारी रहाणारा एक मुलग लगेच रडे थांबवायचा जर त्याच्या आईन श्रीखंड नी भात केलाय सांगीतले तर....... पंजाबी तर शीरा(त्यांच्या भाषेत सुजी का हलवा ) नी पुरी खातात. तर माझी मैत्रीण दूधी हलवा नी दही खायची त्यात भरपूर साखर दह्यात. आमटी भात नी आमरस??????? अजीब प्रकार आहे. (राग नसावा पण कशी चव येत असेल.. आई ग.). एकाकडे मी पाहीले गुळाचा चहा नी पुरी आदल्या दिवशीची. Actually चपाती ने चहा तसेच हा विरुद्ध आहार आहे बर्यापैकी. मला ज्वारीची भाकरी नी गुळाचा चहा आवडलाय, असाच एकदा Try केला एका मैत्रीणीच्या घरी. पण भाकरी न बुडवता एक bite घेवून त्यावर चहाचा एक घोट. बरा लागला. मी रबडी नी जीलेबी खाल्लीय,छान लागते. तसेच मी गोड दही नी जिलेबी खाल्लीय.(हे सगळे असेच friends बरोबर गम्मत म्हणून try केले.) पण ती शीरा पुरी खूप dry लागली खाताना.
|
Zakki
| |
| Sunday, March 30, 2008 - 10:16 pm: |
| 
|
पण ती शीरा पुरी खूप dry लागली खाताना. काही ठिकाणी, म्हणे, शिर्यात तूप जास्त घालत नाहीत. साखर कमी नि केशर वेलदोडा इ. काही घालत नाहीत. जवळपास नुसता भाजलेला रवा, नि पाणीहि थोडेच घालून मग घरी आलेल्यांना खायला देतात! म्हणजे मग जास्त करावा लागत नाही, नि पैसे वाचतात. तिथे म्हणे मटारची उसळ नि केळ्याची शिक्रण (कमी दूध, नि साखर घालून) पक्वान्ने म्हणून पाहुण्यांना देतात. कुठले बरे ते गाव? मी राहिलो आहे तिथे. तसे प्रसिद्ध आहे ते गाव.
|
शिरा व लिंबाचे लोणचे चहा पोळी वा पुरी चहा-बुडवून >> हे माझेपण आवडते प्रकार आहेत... शिरा आनि 'Hot n Sweet' टोमॅटो सॉस हे combination पण मस्त लागते... पु. पो. आणि आमरस, भात आणि आमरस हे पण मस्त लागतात
|
Tonaga
| |
| Monday, March 31, 2008 - 2:54 am: |
| 
|
आमटी भात नी आमरस??????? अजीब प्रकार आहे. (राग नसावा पण कशी चव येत असेल.. आई ग.)>>>>आधीच आइ गं करायला काय झाले?आधी एकदा खाऊन तर पहा ना.कदाचित तुम्हालाही ते आवडेल. संदीप साहेब याना आवडल्या शिवाय ते सेवन करतात का? हा तुमचा mental barrier आहे...
|
Tonaga
| |
| Monday, March 31, 2008 - 2:59 am: |
| 
|
कुठले बरे ते गाव? मी राहिलो आहे तिथे. तसे प्रसिद्ध आहे ते गाव. >>>>>झक्कीसाहेब धन्य आहे हो तुमची. अगदी हह.पु.वा. वेड घेऊन पेडगावला जायला तुमचा पाय कोणी धरणार नाही. त्या विशिष्ठ(ष्ट नव्हे)गावातले लोकही. न ने सुरू होते का ते गाव?
|
Tonaga
| |
| Monday, March 31, 2008 - 3:04 am: |
| 
|
अरे विषय काय तुम्ही लिहिताय काय? मला विनोदी वाटलेले. यात काय विनोदी आहे? यात तर सगळा आवडीचा मामला आहे.त्या दिनेश सरानी आपली वात लावून दिली अन सगळे लागले पळायला... तिकदे मला आवडलेले पदार्थ मला असे आवडतात की काय बी बी आहे तिकडे न्या हे सगळे. स्पेस क्रंच आहे माहीत आहे ना?
|
Dineshvs
| |
| Monday, March 31, 2008 - 6:59 am: |
| 
|
टोणगा, अरे मी सर नाही रे. पण मला जे विनोदी वाटले ते लिहिले. आता या बातमीफ़लकाच्या शीर्षकातला " मला " हा शब्द महत्वाचा, त्यात फ़क्त माझा साडेतीन हाताचा देह आणि मोहरीपेक्षा बारिक मेंदू येतो. पण तमाम मायबोलीकर नक्कीच येत नाहीत. छे, इथली लोकशाही कुठे आणि कधी लयाला गेली, ते कळलच नाही. पण माझे नाव इतके खाण्याशी ( आणि पिण्याशी ) निगडित झालेय कि लोकाना वाटते इथे हेच लिहायचे. दिवे, गॅसबत्त्या, पेट्रोमॅक्स,दिवट्या, मशाली, फ़ानुस किंवा अख्खा सूर्य घ्या.
|
Ekrasik
| |
| Monday, March 31, 2008 - 8:51 pm: |
| 
|
आमच्या कडे गेली अनेक वर्ष बासुन्दी आणि पुरण पोळी असा बेत असतो नवरात्राच्या पहिल्या दिवशी. पुरणपोळीवर पिठिसाखर + तुप ( गरमा गरम तर काय लागते पुपो ) बुंदीच्या लाडवावर पिठी साखार + तुप ( २-४ लाडु कुस्करुन मग त्यावर तुप ) हे तर फ़ार आवडीचे पदर्थ आहेत
|