Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 15, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » हे करून पहा... » Archive through April 15, 2008 « Previous Next »

Maanus
Wednesday, April 09, 2008 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोडणी देत असताना, गॅस च्या जवळ कांदा कापल्यास डोळ्यातुन कमी पाणी येते असते.

किंवा गॉगल घालायचा :-)


Jadoo
Wednesday, April 09, 2008 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यापेक्शा कांदे अर्धे कापुन फ़्रिज मधे ziploc मधे ठेवा. लागतिल तेंव्हा फ़्रिज मधुन काढुन कापा.. अजिबात डोळ्यातुन पाणी येणार नाहि.

Dineshvs
Thursday, April 10, 2008 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदे कापण्यासाठी खास उपकरणे मिळतात. त्याने कांदा छान बारिक कापुन होतो. अगदीच नाही तर सुपर स्लाईसर सारखे जे प्रकार मिळतात त्यानेही कांदा छान कापून होतो.
अख्खे कांदे फ़्रीजमधे ठेवले तरी ते कापताना त्रास होत नाही.
कांद्यात गंधक असते. कांदा कापल्यावर ते हवेच्या संपर्कात आले कि त्याची वाफ़ होते ती डोळ्यात गेल्याने, डोळ्यातून पाणी येते. फ़्रीजमधल्या कांद्याचे तपमान कमी झाल्याने, गंधकाची वाफ़ व्हायचे प्रमाण कमी होते.
स्लाईसरसारख्या उपकरणातील पात्याना चांगली धार असल्याने तसेच कापलेला कांदा एका बंद डब्यात पडत असल्याने, हा त्रास कमी होतो.


Aas
Thursday, April 10, 2008 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कान्दा चिरण्यापुर्वी अर्धा कापुन २ मिनीटे पाण्यात ठेवावा आणि मग कापावा डोळ्यातुन कमी पाणी येते.


Itsme
Thursday, April 10, 2008 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खिडकी उघडी ठेउन कांदा कापला तर अजिबात झोंबत नाही ...

Dakshina
Thursday, April 10, 2008 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेस्ट वे.. कांदा नवर्‍याला चिरायला सांगा...


Cosmo
Thursday, April 10, 2008 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यासाठी आधी लग्न करुन पहा...

Aktta
Thursday, April 10, 2008 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


---कांदा नवर्‍याला चिरायला सांगा...
कुनाच्या... :-)

बबल्गम खात कांदा काप्ला तर डोळ्यातुन पानी येत नाहे..... कदाचीत....
एकटा.....


Bee
Thursday, April 10, 2008 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक म्हणजे कांदा कापत नसून तो चिरत असतात :-)

वेल, मी तरी कांदा डोळे बंद करून चिरतो. म्हणजे मुद्दाम मी तसा सरावच केला आहे. खास करून लाल कांदे फ़ार रडवतात. कांदा जर पाण्यात बुडवून काढला तर फ़ोडणी तळतळते. मी दोन्ही करतो.. म्हणजे तो बुडवून तर काढतोच शिवाय चिरताना डोळे बंद करून सुरी जपून चालवितो आणि हे करायला मला बायकोची गरज भासत नाही :-)


Zakasrao
Thursday, April 10, 2008 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेस्ट वे.. कांदा नवर्‍याला चिरायला सांगा... >>>>>..
हम्म दक्षिणे हे तु सांगायला माझ्या घरी आली होतीस की काय???


Zakki
Thursday, April 10, 2008 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदा नवर्‍याला चिरायला सांगा...
हे तुम्ही आत्ता सांगताय्! अहो, ही मायबोलीच काय, प्रत्यक्ष वैयक्तिक संगणक जन्मण्यापूर्वीपासून माझ्या सौ. ला हे माहित आहे.

Dakshina
Friday, April 11, 2008 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की, हे इतर समस्त भोळसट बायकांसाठी होते ज्यांना"(आपल्या नवर्‍याला कामाला कसे लाववे)"हे माहीती नव्हते.

Sms
Friday, April 11, 2008 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tyapeksha onion cutter vapara.te sagalyat sope.

Mrinmayee
Friday, April 11, 2008 - 11:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदा खाणं सोडून द्या!

Uday123
Saturday, April 12, 2008 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त भोळसट बायकांसाठी होते ज्यांना"(आपल्या नवर्‍याला कामाला कसे लाववे)"हे माहीती नव्हते
--- भोळ्सट, बायका... (हे एकाच व्यक्तीमधे असु शकते कां?) दक्षिणा तुमच्या विनोदाला दाद द्यायला हवी.

कांदा खाणं सोडून द्या!
--- कांदा खाणं पुरुष सोडेलही, पण जर त्याच्या बायकोचीच कांदा खायची ईच्छा झाली आणि तिने कांदा चिरुन आणण्याचा आदेश दिला तर?

बी यांचे म्हणणे पटले, डोळे बंद करुन कांदा चिरा... मी पण हाच मार्ग वापरतो.


Dakshina
Tuesday, April 15, 2008 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळेजणं; चिरण्याऐवजी, नाकाने कांदे सोलण्यात मग्न आहेत....
मंडळी, गाडी जाऊ द्या आता पुढे...


Ladtushar
Tuesday, April 15, 2008 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>कांदा नवर्‍याला चिरायला सांगा...
पुन्हा..पुरुषजन्मा ही तुझी कहाणी (हलकेच!)

Jadoo
Tuesday, April 15, 2008 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी कापणे आणि चिरणे या मधे फ़रक काय?

Aktta
Tuesday, April 15, 2008 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोकड कापतात...
आनी कांदा चीरतात.... :-)
एकटा...


Bee
Wednesday, April 16, 2008 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू आहे फ़रक पण नक्की सांगता येत नाही. तरी प्रयत्न करून सांगतो, माझ्या घरी 'पपई' काप असा शब्द वापरतात आणि कांदा चिर असा दुसरा शब्द. माझ्या मते कापणे म्हणजे मोठे तुकडे आणि चिरणे म्हणजे बारिक छोटे छोटे तुकडे. शिवाय चिरण्याच्या क्रियेत, आपण विळीला कांदा मागे पुढे करून घर्षण देऊन तो चिरतो. कापण्याच्या क्रियेत, जिणे कापतो तिचा भार त्या वस्तुवर पडतो. असे नि माझे मत आहे. इतरांचे कदाचित वेगळे असेल.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators