|
Shraddhak
| |
| Wednesday, May 14, 2008 - 12:51 pm: |
| 
|
आदित्य पांचोली, सोनू निगम, यादें मध्ये रशियन नावाच्या मुलीचे काम केलेली नटी, सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, मनिषा कोईराला हे लोक समवयस्क आणि समकॉलेजियन्स दाखवल्यानेच ह्या सिनेमाला आपसूक अचाट नि अतर्क्य ग्रेड A+++ प्राप्त होते. पण निर्माता दिग्दर्शक मंडळींना तेवढेच अ नि अ मान्य नसावे. त्यामुळे ' इस्सेभी ज्यादा ' अ अ गोष्टी त्यात आहेत. मनिषा कोईराला कॉलेजातली सर्वांत सुंदर मुलगी असणे हेही त्यापैकीच! तिने चांगला नवरा बघून ठेवलेला असतो. ( सन्नी देओल.) आणि कॉलेजमध्ये मन लावून ती अभ्यास करत असते. आता रीतीप्रमाणे कॉलेजात दोन गुंड मुले पण असतात. ते मनिषा कोईरालावर अतिप्रसंग करू पाहतात. तेव्हा एकदा ती वाचते. आता यावरून तरी तिने विशेष खबरदारी घ्यावी की नाही? पण छे. एकदा पिकनिकला जायचा प्लॅन ठरलेला असताना दोन गुंडांपैकी एक गुंड जो अव्वल दर्जाचा जॉनी लिव्हर असतो ( त्याला सगळ्या सज्जन विद्यार्थ्यांचे म्हणजे अक्षय कुमार, सोनू निगम, सुनील शेट्टी, इ. चे आवाज काढता येत असतात.) तो तिला फसवून किल्ल्यावर बोलवतो. पुढे काय होणार? ती मरते, आणि भूत होते. एकटीने बदला घ्यायला ती भूत बनूनही असमर्थ असते वाटतं! म्हणून एक नाग तिच्या मदतीला येतो. अर्थात तो तिचा हजारो वर्षांपूर्वीचा प्रेमिकच असतो आणि तिला एकदा भेटलेलाही असतो पण ती तेव्हा विश्वास ठेवत नाही. मग काय मेल्यावर नाईलाजाने त्याच्याकडे यावेच लागते. आता बदलासत्र सुरु होते. एका गुंडाशी रीतसर लग्न करून ती सुहागरात्रीला त्याचा बदला घेते. म्हणजे तो घुंगट उचलतो तो हाडाचा सापळा बसलेला.... ( इथे: ' तरी मी सांगत होतो क्रॅश डायट करू नकोस. ' असा डायलॉग साजून दिसला असता.) मग गुंडाने तिला सज्जन लोकांचे आवाज काढून फ़सवलेले असते त्यामुळे त्यांचेही बळी जायला लागतात. बर्याच लोकांना मारायचे असल्याने ती आणि नाग मीटिंग करून लोक वाटून घेतात. राज बब्बर हा एक सज्जन मुख्याध्यापक असतो त्या कॉलेजचा. तो या सज्जन विद्यार्थ्यांना मदत करायचे ठरवतो. तो डोळे मिटून प्रार्थना करतो तेव्हा समोरच्या टेबलावर ओम, क्रॉस आणि चंद्र येऊन एक होतात आणि ताईत तयार होतात. तो प्रत्येकाला एकेक देतो गळ्यात घालायला. भूत आणि नाग एकेकाला युक्तीप्रयुक्तीने ते ताईत काढायला लावतात नि मारतात. ( रीना रॉयचा नागिन ढापला.) नागाकडे जास्त पॉवर्स असतात. तो अक्षय कुमारला टीव्हीतून त्याच्या घरात येऊन मारतो. शरद कपूरचा पाठलाग करताना मोटरसायकल बनून पाठलाग करतो. मग भूतपण शक्ती दाखवायचे ठरवते आणि सुनील शेट्टीला उंच बिल्डिंगवरून थेट खाली फ़ेकून देते. शेवटी सोनू निगम उरतो. जेव्हा भूत जिवंत होती तेव्हा तो तिचा दीर होता. पण मेल्यावर नाती संपतात. मग त्याच्या मागे नाग लागतो. सोनू फोन करून सन्नी देओलला परदेशातून बोलावतो. तो येण्याआधीच नाग त्याचे रूप घेऊन सोनू निगमला चाकू मारतो. पोलिसांचा सुपरनॅचरल गोष्टींवर फारसा विश्वास नसल्याने ते खर्या सन्नी देओलला पकडतात. तो तुरुंगात असताना तिथे पारदर्शक भूत येते. ती इतकी चमकदार दिसत असते की बिनडोक माणसाला देखील कळेल. पण याला कळत नाही. तो तिला ' बघ ना माझ्या भावाचं काय झालं. अच्छा हुआ तू आ गई ' वगैरे म्हणतो. मग ती नाईलाजाने थेट गजांतून आत येते. तेव्हा त्याला खरे काय ते कळते. नाग रुपे बदलण्यात पटाईत असतो. तो मध्येच राज बब्बरचे, मध्येच त्या आफताबच्या प्रेयसीचे, मध्येच अमन वर्माचे, मध्ये मोटरसायकलचे, मध्येच पोलिस इन्स्पेक्टरचे रूप फ़टाफ़ट घेत असतो. बहुधा एखादा मूळ रूपातला फोटो जवळ बाळगत असावा, कारण इतक्या वेगाने रूपे बदलल्यावर ओरिजिनल चेहरा लक्षात राहणे कठीण आहे. नाग अर्नोल्डचा फ़ॅन असावा कारण त्यात तो टर्मिनेटर मधल्यासारखा वितळून पुन्हा जोडला जात असतो. शेवटी सन्नी देओल त्याचे दोन तुकडे करून त्याला मारतो. ( जरासंध इष्टाईल!) भुताने नागाच्या शरिरात फायनल फाईटसाठी आश्रय घेतलेला असतो. भूत आणि नाग मुक्त होतात नि नागलोकात जाऊन गाणे गायला लागतात. पण सज्जन लोकांनी भुताला फ़सवले नव्हते हे तिला सांगायचे शेवटी राहूनच जाते. ( नवा जानी दुश्मन पार्ट टू काढतील काय अं?) चिनूक्सचा प्रश्न : एवढे सगळे सज्जन लोक का मेले? माझा तर्क: सिनेमा बिग बजेट झाला. एवढ्या लोकांना द्यायला पैसे उरले नाहीत. म्हणून जो स्टार पैसे मागेल त्याला भूत किंवा नागाच्या हातून मुक्ती दिली गेली. यात शक्यतो जोडीतले सज्जन लोक निवडले गेले म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या जोडीदारणीचाही रोल आपसूक संपला. नागाचा यातला अभिनय नैसर्गिक होता कारण तो प्रोड्यूसरचा मुलगा आहे.
|
Zelam
| |
| Wednesday, May 14, 2008 - 1:44 pm: |
| 
|
तो नाग म्हणजे अर्मान कोहली नं? अचाट आणि अतर्क्य शब्द लाजतील अशा तोडीचा सिनेमा आहे हा.
|
Lalu
| |
| Wednesday, May 14, 2008 - 1:47 pm: |
| 
|
श्र.. पण यात तुझे श्रेय कमी आहे. श्टोरीच अशी आहे, की नुसती तेवढीच सांगितली तरी पुरे आहे.
|
आई गं!! मनिषा, अक्षय, सनी, सुनिल शेट्टी? एवढ्या "बड्या"(?) स्टार्स्ना इतकी पण अक्कल नव्हती का! कसला बिनडोक शिनुमा आहे!!
|
श्र पुढच्या gtg ला ही CD घेउन ये गं !
|
कारण इतक्या वेगाने रूपे बदलल्यावर ओरिजिनल चेहरा लक्षात राहणे कठीण आहे. >>>

|
Zakasrao
| |
| Thursday, May 15, 2008 - 4:30 am: |
| 
|
गुंडांपैकी एक गुंड जो अव्वल दर्जाचा जॉनी लिव्हर असतो ( त्याला सगळ्या सज्जन विद्यार्थ्यांचे म्हणजे अक्षय कुमार, सोनू निगम, सुनील शेट्टी, इ. चे आवाज काढता येत असतात.)>>>>> ( इथे: ' तरी मी सांगत होतो क्रॅश डायट करू नकोस. ' असा डायलॉग साजून दिसला असता.)>>>>>>.
खरच अचाट आहे. मी पाहिलाय. भरपुर करमणुक होते. सोबत हा सीन कोणत्या पिक्चर मधुन ढापला आहे असा एक चित्रपट ओळखा हा खेळ खेळता येतो. मी त्या खेळात (समोर एवढी करमणुक असुनदेखील ) टर्मिनेटर,मिशन इम्पॉसिबल,जुना नागिन (रीना रॉय) हे चित्रपट ओळखले. ह्या शिनेमात सगळ्या अलाण्या फ़लाण्या नायिकाना तेवढा स्कोप मिळाला नाही अस माझ प्रामाणिक मत आहे. त्यामुळे पार्ट टु मध्ये त्या सगळ्यांवर एक आयटेम सॉन्ग चित्रित व्हाव अशी माझी इच्छा आहे BTW सोनु निगमच्या अचाट अभिनयाविषयी लिहिल नाहीस श्रद्धा?? त्याचा लहान मुलाने प्राथमिक शाळेतल्या गॅदरिंगच्या नाटकात करावा तसा अभिनय पाहुन डोक सटकत. }
|
Deepurza
| |
| Thursday, May 15, 2008 - 6:11 am: |
| 
|
बहुधा एखादा मूळ रूपातला फोटो जवळ बाळगत असावा, कारण इतक्या वेगाने रूपे बदलल्यावर ओरिजिनल चेहरा लक्षात राहणे कठीण आहे. :हहगलो: जबरी लिहिता तुम्ही
|
हहगलो: <<<<या short form चा अर्थ भलताच होतोय !!   
|
Deemdu
| |
| Thursday, May 15, 2008 - 9:58 am: |
| 
|
dj     .. .. .. ..
|
Akhi
| |
| Thursday, May 15, 2008 - 10:13 am: |
| 
|
हहपुवा. मस्तच असा कुठला सिनेमा आहे हेच मुळी महिति नव्हते. आता मात्र आवर्जुन बघेन
|
>>मग ती नाईलाजाने थेट गजांतून आत येते. >>भूत आणि नाग मुक्त होतात नि नागलोकात जाऊन गाणे गायला लागतात. hahaha... masta lihilay...
|
Farend
| |
| Thursday, May 15, 2008 - 7:14 pm: |
| 
|
हे लोक समवयस्क आणि समकॉलेजियन्स दाखवल्यानेच ह्या सिनेमाला आपसूक अचाट नि अतर्क्य ग्रेड आ+++ प्राप्त होते... ती आणि नाग मीटिंग करून लोक वाटून घेतात... ओम, क्रॉस आणि चंद्र येऊन एक होतात ... मग ज्यू भूत असते तर काय झाले असते? सोनू फोन करून सन्नी देओलला परदेशातून बोलावतो. तो येण्याआधीच नाग त्याचे रूप घेऊन सोनू निगमला चाकू मारतो. ... हे कोठेतरी पाहिल्यासारखे वाटते. कदाचित हा पीस मी पाहिला आहे, किंवा असाच इंग्रजीत कोणतातरी. पण सज्जन लोकांनी भुताला फ़सवले नव्हते हे तिला सांगायचे शेवटी राहूनच जाते. ( नवा जानी दुश्मन पार्ट टू काढतील काय अं?) ...या लोकांना अजून ते सुचले नाही बहुतेक. माणसांनी अन्याय केला तर भुते किंवा नाग होऊन ते बदला घेतात. पण भुतांनी अन्याय केला तर त्याचा बदला घ्यायला यांना त्याच्या सवाई काही तरी व्हायला पाहिजे महान आहे हे. पाहायलाच पाहिजे हा पिक्चर. दोन्ही जानी दुश्मन मध अरमान कोहली आहे काय?
|
आजच झी ला हा सिनेमा पुन्हा लागला होता. अहाहा! काही रम्य गोष्टी पुन्हा ताज्या झाल्या. कपिल हा इच्छाधारी नाग आणि वसुंधरा ही इच्छाधारी नागीण यांची ताटातूट कशी होते? तर ते दोघे गाणे म्हणत नाच करत असतात. ते ज्याला सपाट पृष्ठभाग समजून नाचत असतात ते ऍक्चुअली एका गुहेचे छत असते आणि त्या गुहेत अमरिश पुरी हा साधू तप करत असतो. तो तपात ' टाईम प्लीज ' घालू शकत नसतो. त्यादिवशी पूरणमासी असते आणि त्यादिवशी त्याची इश्वराशी भेट निश्चित असते. तर नाचता नाचता ते छत कोसळते. ( कारण: मनिषाचे बेसुमार वाढलेले वजन!) तर तो साधू चिडून मरण्याचा शाप देतो. पण त्या वसुंधरेला एकटीलाच आणि नागाला तिची वाट बघत वडाच्या झाडाच्या खोडात राहण्याची शिक्षा देतो. फ़ारेंडा, नाही. नव्या जानी दुश्मन मधे आहे अरमान कोहली. पण दोन्ही सिनेमे त्याच्या वडलांनी, राजकुमार कोहलीनेच काढले आहेत.
|
Dakshina
| |
| Monday, May 19, 2008 - 5:27 am: |
| 
|
>>>तर नाचता नाचता ते छत कोसळते. ( कारण: मनिषाचे बेसुमार वाढलेले वजन!) >>> श्रद्धा....
|
Farend
| |
| Tuesday, May 20, 2008 - 12:33 am: |
| 
|
श्रद्धा, तू बरेच काही लिहीलेले नाहीस. आता पुन्हा एकदा बघून डीटेल्स लिही बरं! मी आणखी भर घालणार होतो, पण हा भाग तुम्ही बघाच सगळ्यांना अरमान कोहलीच मारतो असे दिसते, मनिषा कोणाला मारते?
|
मनिषा, एका गुंडाशी लग्न करून त्याला आणि सज्जन सुनील शेट्टीला मारते. :-P फ़ारेंडा, किती लिहू नि किती नको असं होतं. त्यापेक्षा लोकांना सिनेमाच पहा सांगणे सोपे.
|
Tonaga
| |
| Tuesday, May 20, 2008 - 5:21 am: |
| 
|
हहगलो: <<<<या short form चा अर्थ भलताच होतोय !! >>>>>मीही जरा ठेचकाळलोच होतो वाचल्यावाचल्या....
|
Ramani
| |
| Wednesday, May 21, 2008 - 5:05 am: |
| 
|
श्र काय अ. आणि अ. आहे.
                  लालुला अनुमोदक मात्र.
|
Psg
| |
| Wednesday, May 21, 2008 - 5:38 am: |
| 
|
फ़ारेंडा, जबरी लिंक आहे.. जवलजवळ आख्खा सिनेमाच आहे क्लिप्स मधे.. रोज एक पाहीन म्हणते
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|