|
Ashbaby
| |
| Monday, April 28, 2008 - 8:45 am: |
| 
|
टशन एकदम बकवास आहे. आणि साईज झिरो करिनाचे काय कौतुक चाललेय पेज थ्री पेपर्समध्ये. तिच्या बरगड्या मोजाव्यात असे सिन्स आणि कपडे आहेत पिक्चरमध्ये. पण एकाही दृश्यात ती छान वाटत नाही. लहानपणीची करीना जास्त चान्गली वाटते तिच्यापेक्षा. अक्षय कुमार एकमेव सुसह्य भाग आहे अख्ख्या पिक्चरमधला. अर्थात ते क्रिश स्टाईल सिन्स सोडुन. (सुरवातीच आॅनिमेशनचा ट्रेलर जास्त लक्षात राहिलाय टशनपेक्षा) (मुलीच्या हट्टापाई ५०० रुपये फ़ुकट गेले) साधना.
|
काल इन टू द वाइल्ड हा अतिशय सुंदर चित्रपट पाहिला. शॉन पेन दिग्दर्शित. हा एका ख्रिस्तोफर मॅकंड्लास नावाच्या तरुणाच्या सत्य घटनेवर आधारीत आहे. विस वर्षाचा हा ख्रिस्तोफर ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याची तोपर्यंतची सर्व बचत दान करतो. सगळी ओळखपत्रे जाळुन, नष्ट करुन टाकतो. आणि लिफ्ट मागत, हिचहायकिंग, वॉटर राफ़्टिंग, माउंटेनीअरींग करत मेक्सिको ते अलास्का असा जवळपास सर्व अमेरिका पिंजुन काढतो. त्याने असे का केले, त्यामागची पार्श्वभुमी, त्याला प्रवसात भेटलेले लोक, आणि त्याची 'द ग्रेट अलास्कन जर्नी' हे सर्वच अतिशय सुंदर रित्या दाखविले आहे. सर्व पात्रांचा अभिनय उत्कृष्ट. त.टी.: मुळ पुस्तक जॉन क्रॉकर ह्याने लिहिले आहे. मी अजुन वाचले नाहिये (लवकरच वाचेन ). परंतु ह्याच लेखकाचे 'इन्टू थिन एअर' हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. ९६च्या मे मधील एव्हरेस्ट वरील भीषण अपघाताचे वर्णन आणि विश्लेषण आहे.
|
Maanus
| |
| Monday, April 28, 2008 - 1:20 pm: |
| 
|
Juno good movie, I heard U, me aur hum is also good, any reviews?
|
राकेश रोशन ला वाटतय की एक र्हीतिक च गाणं टाकलं की झाला पिक्चर हिट...... रिक्स नको म्हणुन भरिला शाहरुख आणी राखी बाईंनाही नाचवलय... पण गोळाबेरिज शुन्य..
|
krazy 4 इतका टुकार ना. मला वाटलेच होते पण माझ्या फ़्रेंडसचा चॉईस काय करणार. तो दुसरा कोण तो मुका त्याला फुकट घालवलय. सगळेच डोक्यात जातात. यु मी और हम ठीकाय. हा picture बघितल्यानंतर सर्वांना वाटेल की त्यांना काही प्रमाणात Alzheimer झालाय म्हणून. आणि ह्या भीतीने पछाडतील. ज्या level वर काजोलचा Alzheimer असून ते बाकीचे प्रकार बघून बराच अचाट आहे हा मूवी. माझ्या बॉसला हा हिंदी सीनेमातला Alzheimer दाखवला तर तो चक्कर येवून पडेल नी काम सोडून देइल ह्याच्यावर संशोधन करण्याचे.
|
यु, मी ओर हम, १ दोन तिन आणि क्रेझी फोर हे अनुक्रमे बकवास, रद्दड आणि टुकार आहेत. टशन पण बकवास आहे. (पुरुषांचे दु:ख या बीबी वर लिहीनार होतो पण ईथेच लिहीतो. लग्न झाल्यामुळे केवळ लग्न झाल्यामुळे असे बकवास पिक्चर पाहायला लागतात). तरी त्या एक दोन तिन च्या वेळेस बाजुला चांगली (नव्हे सुंदर) मुलगी असल्यामुळे थोडा वेळ ईकडे तिकडे ( जास्त करुन तिकडेच) बघन्यात घातला.
|
Mansmi18
| |
| Monday, May 05, 2008 - 3:58 pm: |
| 
|
टशन सगळ्याना आवडलेला(!!!!!) दिसतोय. आम्हाला पाहण्याची दुर्बुद्धी झाली आणी बायकोच्या प्रचंड शिव्या खाल्या. त्या आदित्य चोप्रा ला म्हणावे थोडे राणी तुन लक्ष बाहेर काढुन script नीट वाचण्यात घालव.
|
Suyog
| |
| Wednesday, May 07, 2008 - 5:43 am: |
| 
|
I just watched a wonderful chinese movie with english subtitles, name is "I Not Stupid Too". A must watch for all parents. It looks like "tare jamin par" is taken from this movie, but this movie is faar better than tare jamin par.
|
Aashu29
| |
| Saturday, May 10, 2008 - 6:21 am: |
| 
|
काल पैलतीर पाहिला, हा जुनाय कि नवा? अभिनय अरुण नलावडेंचा नैसर्गिकच, रमा जोशींचा पण! पण त्यांचा मुलगा अगदिच फ़ालतु घेतलाय, अभिनयाची पण बोंबच. खूप रडु आले पण मला.
|
Maanus
| |
| Sunday, May 11, 2008 - 6:18 am: |
| 
|
Just now finished watching the most illogical cinema of bollywood cinema industry. (well its not finished yet, SRK is still speaking...) I had not seen this movie before, after getting netflix thought of ordering it to see what was this movie about. Yash Raj banner, Lata Mangeshkar voice, SRK, Amitabh blah blah blah. A girl visits india from pakistan for someones final wish, meets the king khan. After two happy days when miss dimple smile was about to step into train to pakistan, her fiance shows up and as usual king khan after seeing 3rd person eying a girl, king khans obsession starts. (remember in all SRK movies, he doesnt like the girl until some 3rd person shows up) eventually zinta falls in love with khan in the land of pak while khan is not there. her girlfriend updates srk with this latest information. then all the stupidity, illogicality starts. an army person leaves army in one day. (my friend filed his resignation 2 years back, and its still not accepted. ) goes to pakistan, and asks zinta to marry the 3rd person. 3rd person still not happy, so puts king khan in jail. stupid veer keeps his mouth shut for 22 years, thinking this way zaara will be safe (this veer person hasn't even got a single kiss from this zaara and he has decided to spend his whole life in jail for her) struggling with her first case, rani finds out zaara is in india. she hasnt married to the 3rd person. and still wears one ankle bracelet in one leg. why am i writing this, why . good nite.
|
Slarti
| |
| Sunday, May 11, 2008 - 6:51 am: |
| 
|
माणसा, हे काय ??? या एका पानावरच्या तुझ्या दोन्ही पोष्ट इंग्रजीत आहेत. मराठीत लिही हे तुला सांगावं लागण्याची खरं तर गरज नसावी. सुयोग, तुम्हीसुद्धा जुने सदस्य दिसता. आतापर्यंत मराठीत लिहीता येणे नक्कीच जमत असेल तुम्हाला.
|
Kedar123
| |
| Sunday, May 11, 2008 - 11:19 am: |
| 
|
काल भूतनाथ बघीतला हा मैने जूर्म किया है मै कबूल करता हू) श्री रवी चोप्रांना नविन कथेच वावड असाव या कथेवर आता पर्यंत अगणीत चित्रपट येऊन गेलेत. 'भूतनाथ' ही अगदी एक धारावाहीक सीरीयल (द्वीरुक्ती) सारखी वाटते (मला वाटत अशाच एका सिरीयल मध्ये श्री नाना पाटेकरांनी भूताची भूमिका केलेली) त्यात भूतनाथ (पूर्वजन्मीचे कैलाश नाथ) जिन्या वरुन पडतात. छोटा मुलगा बंकू जिन्यावरून पडतो. चित्रपट बघताना प्रश्न पडतो की अरे बाबा जिना हा पडण्यासाठीच असतो का? कोणी जिन्याजवळ आल की पहिल्यांदा पडेलच अशीच भिती वाटते. मी माझ्या घरात जिना न बांधता लिफ्ट बांधायच म्हणतोय शेवटी भूतनाथला मूक्ती मिळण्यासाठी श्राध्द घालतात (चित्रपट संपायला आल्यावर प्रेक्षकांनाही मुक्ती मिळते हा भाग अलहीदा) त्यात छोट्या बंकूला म्हणे आत्मा नाहीसा होताना दिसतो . (ह्या छोट्या मुलाच्या 'काक'द्रुष्टीच चोप्रांच्या दिग्दर्शकांनी अगदी सुंदर स्पष्टीकरण मांडलय. बच्चे तो भगवान (पालव नव्हे) का रुप होते है. उनकी मन्नत भगवान (पुन्हा दादा नव्हेत) को सुननीही पडती है ) चोप्रांनी कावळ्याचा रोल फुकट घालवलाय (सुनील शेट्टी एका पायावर तयार झाला असता. फक्त विचारून बघायच. एक मोठ्ठा रोल फुकट घालवला उगाचच्या उगीच) चित्रपतात दोन गाणी पण आहेत अस कुठ तरी वाचल्याच स्मरत 'फकस्त मोठे कलाकार घेतल की चित्रपट चांगला चालतो अस नसत ' हे चोप्रांना कुणीतरी समजाऊन सांगायला हवय . ' बी आर फिल्म्स ' ह्या नावाखाली धूडगूस नका रे घालू
|
भूतनाथ अतिशय गंडलेला movie आहे . ना धड लहनां साठी ना धड मोठ्यां साठी ! भूत भेटल्या नंतरची कॉमेडी (! ) ही इयत्ता दुसरीच्या पोरां च्या level ची ( म्हणाजे मास्तरांना त्रास देणे , त्यांनी डबा खाताना त्यांची फ़जिती करणॅ etc..) पण लहान पोरांना तेवढ्या साठी न्यावे तर सुरवातीला बिचारी पोरं भयंकर घाबरत होती , त्यातून बी . आर . चोप्राला शेवटी भूथ नाथ मधे ' बागबान ' मधून उचललेला ड्रामा पण टाकायचा मोह आवरलेला नाही , तिथे पण लहान मुलं खूप bore होतात ! अतिशय फ़ालतु घेतलाय , अमिताभ कडून पुन्हा एकदा निराशा ! लहान पोरगा मात्र cute आहे ! SRK मस्त दिसतो ! Navy च्या ड्रेस मधला शाह रुख पाहून फ़ौजी चे दिवस आठवले . जुही पण ok बाकी चित्रपट बकवास !
|
Farend
| |
| Monday, May 12, 2008 - 1:59 am: |
| 
|
'शौर्य' अतिशय जबरदस्त चित्रपट आहे. एका नावाजलेल्या (येथे काही दिवसांपूर्वीच उल्लेख झालेल्या) इंग्रजी चित्रपटावरून घेतलेला आहे, पण संवाद आणि अभिनय एकदम मस्त. कथानकातील गंभीरपणा आणि राहुल बोस ची विनोदी स्टाईल याचे मिश्रण चांगले जमलेय. आणि संवाद आणि विनोद सुद्धा सहसा हिंदीत असे बघितले नाहीत.
|
Mansmi18
| |
| Monday, May 12, 2008 - 5:33 pm: |
| 
|
मी नुकताच iron man पाहिला. अतिशय आवडला. मेटल सुट आणि robert downing Jr चे काम लई झकास.
|
Ankyno1
| |
| Tuesday, May 13, 2008 - 7:39 am: |
| 
|
हॉर्टन हिअर्स अ हू... एनिमेटेड सिनेमा... खूप छान... तुमच्यासाठी कस्पटासमान गोष्टीवरही जीवसृष्टी असू शकते... जर समजा त्यांचं आणि तुमचा संवाद झाला तर....? ही थीम घेऊन काढलाय सिनेमा... नक्की पहा... लहान मुलांना 'भूतनाथ' वगैरे फालतू सिनेमे दाखवण्यापेक्षा हा नक्की दाखवा...
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 13, 2008 - 3:22 pm: |
| 
|
काल झी स्टुडिओ वर, सेंटर स्टेज दाखवला. मी चारपाच वेळा बघितला आहे, तरी रात्री जागून परत बघितला, अप्रतिम आणि सेन्सुअल, बॅले आहेत यात.
|
Mansmi18
| |
| Tuesday, May 13, 2008 - 8:01 pm: |
| 
|
साडे माडे तीन पाहिला. त्यात superhit होण्यासारखे काय होते?(ते किमान मला कळले नाही). ती मुख्य गोड नायिका केस पिंजारलेल्या भरत जाधव च्या (इतक्या) प्रेमात पडते हेच आधी पचले नाही.(म्हणून प्रेम आंधळे असते म्हणतात काय? निर्मीतीमुल्ये मात्र खुप चांगली वाटली. विशेशत्: piano चा पार्श्व संगीतासाठी केलेला उपयोग आवडला.
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 14, 2008 - 5:55 am: |
| 
|
त्यात superhit होण्यासारखे काय होते?(ते किमान मला कळले नाही). >>>>>>>> ZEE Talkies चा चित्रपट आहे तो. खच्चुन जाहीरात केली होती. मग का नाही होणार??
|
Avikumar
| |
| Thursday, May 15, 2008 - 9:31 pm: |
| 
|
भुतनाथ मध्ये Bruce Almighty मधली कॉमेडी ढापलीय सरळ सरळ. बिलकुल हसु नाही येत ते पाहुन. अतिशय रद्दड आणी रटाळ चित्रपट आहे भुतनाथ. 'अनामिका' पाहीला. दिनो मोरया (गणपती बाप्पा मोरया आठवतं )खुप बोर करतो. रहस्यपट आहे पण खुपच प्रेडिक्टेबल आहे. कशाला बनवतात असले चित्रपट काय माहीत..पैसे तरी वसुल होत असतील का नाही काय माहीत. त्यापेक्षा 'ती फुलराणी' नाटक लाउन बसतो मी आजकाल. एकदम मस्त आहे. अम्रुता सुभाष नी एकदम झोकदार काम केलंय. त्यातली छोटी छोटी गाणी अगदी ठेका धरायला लावतात. विषेषत: 'मला फ्लोरिष्टाच्या शापामधल्या बाईगत हुयाचं हे' आणी 'कंडम माणुस... हे..कंडमच रहानार...' आणि 'श्रावण मासी हर्ष मानसी' या कवितेचे गाण्यातले रुपांतरण ' खुपच आवडते मला. ज्यांनी अजुन पाहीलं नाही त्यानी अवश्य पहा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|