Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 15, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती » Archive through May 15, 2008 « Previous Next »

Giriraj
Thursday, January 24, 2008 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ibibo.com च्या जाहिराती अतिशय टुकार आहेत!

सध्याची माझी आवडती जाहिरात्:

ये है मिस्टर शर्मा, MA,LLB और ये है इनका बेटा बिल्लु!

मोटोयुवा ची ही जाहिरात अतिशयोक्ती चा भन्नाट नमुना तर आहे आणि तरिही खूपच catchy आहे


Anaghavn
Thursday, January 24, 2008 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अविकुमार, sorry पण जरा व्याकरणात दुरुस्ती करते,
"इयम आकाशवाणी. सम्प्रतिवार्ता: श्रुयंताम. प्रवाचका: बलदेवानंद सागर:" इति वार्ता: .
मला ती माकडाने mobile पळवण्याची आणि वैतागुन पुन्हा परत आणुन ठेवण्याची जाहिरात खुप आवडते.
कालच एका business channel वर एक छान जाहिरात पाहिल्याचं आठवतय. पण आता जाहिरातच आठवत नाहिए.


Amruta
Thursday, January 24, 2008 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती एक पत्र्याची जाहिरात होती.
'कसला विचार करतोयस रामण्णा??
घराचा की गोठ्याचा??'

आम्ही अजुनही कुणी गपचुप बसल असेल की त्याला विचारतो
'कसला विचार करतोयस रामण्णा??' :-)


Sonalisl
Thursday, January 24, 2008 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता,
मी सुध्दा तेच विचारते...:-)


Vinaydesai
Thursday, January 24, 2008 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कसला विचारकरतोस रामण्णा..'

'घराला आणि गोठ्याला कोणती कौले घालावीत कळत नाही....'

'माझं ऐक, आणि चारमिनार छाप पत्रे विकत घे. माझा आजोबानी घातलेले हे पत्रे अजुनही शाबूत आहेत...

मी त्याला घराला आणि गोठ्याला... असंच म्हणतो अजूनही..


Farend
Thursday, January 24, 2008 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तो रामय्या होता ना?

Runi
Thursday, January 24, 2008 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ते, कसला विचार करतोस रामंग्या असे ऐकु यायचे.
आणि अजुनही कुणी शांत बसलेल दिसले की आम्ही असेच विचारतो


Zakasrao
Friday, January 25, 2008 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसला विचार करतोस रामंग्या असे ऐकु यायचे. >>
मला ते नीट रामण्णा असच ऐकु येत होत.
पण इकडे म्हणजे मायबोलीवर आल्यापसुन ते वाक्य "कसला विचार करतोस लिम्ब्या" अस असाव अशी दाट शंका येत होती कारण लिम्बु प्रत्येक पावसाळ्याच्या आधी पत्रे लावायची आहेत अशी एक तरी पोस्ट टाकतोच


Ankyno1
Friday, January 25, 2008 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रमण्णा ची जाहिरात खुपच हिट आहे....

असंख लोक
"कसला विचार करतोस रमण्णा..." असच विचारतात....

मूळ जाहिरातीपेक्षा त्या वाक्याचाच लोकांच्या मनवर जास्ती ठसा उमटलाय....


Vinaydesai
Friday, January 25, 2008 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण तो रामैय्याच वाटत होता. पण म्हटलं मी विसरलो असेन.. रामण्णा तर रामण्णा..


Zelam
Friday, January 25, 2008 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामण्णा नाही रामैय्याच आहे.

Karadkar
Friday, January 25, 2008 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामंग्या खिखिखि!

मंग्या म्हणजे माकड कानडीमधे!


Shanky
Tuesday, April 29, 2008 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुणी प्रश्न विचारला 'कुठला विचार करतो आहेस?'
मी म्हणतो 'घराला आणि गोठ्याला पत्रे कुठले लावायचे..." :-)


Dineshvs
Wednesday, April 30, 2008 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Cisco ह्युमन नेटवर्क ची जाहिरात छान आहे. दोन खंडातील मूले, पापणी न हलवता एकमेकांकडे बघण्याचा खेळ खेळतात. मला अजून हि जाहिरात नेमकी कशाची आहे ते कळले नाही, पण हि चालु झाली कि, नकळत आपल्याही पापण्या ताणल्या जातात.

व्होडाफ़ोनच्या जाहिरातीत कुत्रा तोच आहे पण मुलाच्या जागी एक मुलगा आलाय. पोरगी गोड असली तरी बरीच वेंधळी दिसतेय. एक वस्तू जागेवर सापडत नाही हिला. सगळे त्या कुत्र्याने आणून द्यायचे.
हा कुत्रा गोव्यातला आहे, आणि त्या कुत्र्याने मालकाला बराच पैसा मिळवून दिला आहे.

हृतिकने एका बिस्किटाची जाहिरात केली म्हणून शाहरुखनेही केली. पण कुछ जम्या नही.
हृतिकची सिंथॉलची जाहिरात पण मस्त आहे.
दिपिका मात्र कुठल्याही जाहिरातीत कळकट दिसते. जाहिराती पण चंपी तेलाच्या वगैरेच करते.


Dakshina
Wednesday, April 30, 2008 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, व्होडाफ़ोन ची फ़क्त ती तुम्ही उल्लेख केलेली जाहीरात छान आहे. बाकी फ़िल्मी रिचार्ज करे और एक व्ही. सी. डी. घर ले जाये.... काय आणि ती कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है... दोन्ही जाहीराती एकदम टूकार....

आजकाल अजून एक ती पिझ्झ्याची जाहीरात दाखवतात. इनकम टॅक्स ची रेट पडत असताना तो माणूस फोन करून पिझ्झा मागवतो आणि ऑफ़िसरला म्हणतो.... खाईए ना सर.... सब खाते हैं.... या जाहीरातीवर ताबडतोब बंदी आणली पाहीजे. भ्रष्टाचार रोखायचा की वाढवायचा?

आता तर असे वाटते की एखादा चित्रपट रिलिज होताना त्याला सेन्सॉर बोर्डाच्या थ्रू यावं लागतं तसं काहीतरी जाहीरातींसाठी सुद्धा करायला लागेल. म्हणजे अमूल माचो, आणि वर सांगितलेल्यां सारख्या जाहीराती आपल्याला पहाव्या लागणार नाहीत.


Dineshvs
Wednesday, April 30, 2008 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती पित्झाची जाहिरात, इनकम टॅक्स डिपार्टमेंटला चपराक आहे ! नैतिकतेच्या दृष्टीतून ती गैर असली तरी ती अगदीच असत्य आहे असेही नाही.

जाहिरातीवर जनमताचे दडपण येऊ शकते. जर त्या जाहिरातीच्या विरोधात अनेकानी आवाज उठवला तर काहि बंधन येऊ शकते. पण जाहिरात करणारे, चला इतक्या लोकानी जाहिरात बघितली ना, असा भलताच अर्थ काढू शकतात.
जाहिरातीत दाखवलेली साहसदृष्ये, हि प्रशिक्षित व्यक्तीनी सादर केलेली आहेत, त्यांचे अनुकरण करु नये, अशी पाटी झळकते ती या जनरेट्यामुळेच. पण तरिही बजाज च्या बाईकची जाहिरात छान आहे.


Ashbaby
Wednesday, April 30, 2008 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती वोडाफ़ोनची जाहिरात एवढी छान आहे की माझी मुलगी तसाच कुत्रा पाहिजे म्हणून हट्ट घरुन बसलिय.
साधना


Dchetan
Wednesday, May 14, 2008 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नशीब त्यांचा जाहीराती मधे हत्ती नाही...
दीवे घ्या...


Dchetan
Wednesday, May 14, 2008 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुनी रसानाची जाहीरात
आठवते कुणाला
ती छोटी मुलगी गोड होती..
एकलय की ती आता पीक्चर मधे पन येतेय..


Dakshina
Thursday, May 15, 2008 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, खाज, खुजलीवाल्या रिंगगार्डच्या सगळ्या जाहीराती किळसवाण्या आहेत...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators