|
ख़रच माणुसकी शिल्लक आहे का? तुम्हाला आलेत माणसाच्या माणुसकी चे अनुभव? देशावर, राज्यावर मोठं संकट आलं की तेव्हढ्यापुरत धावून जाणं याला माणुसकी म्हणत नाहीत. इतर वेळेलाही तितक्याच तत्परतेनी धावून येणारा सर्वसामान्य, अनोळखी "माणुस" कधी भेटला असेल तर द्या ना तुमचे अनुभव...."माणसातला माणुस"मधुन माणुसकी जागी करायला!!
|
हो अजुनही माणसातला माणुस जिवंत आहे याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि प्रत्येकवर्षी घेते आहे. जेव्हा कधीही मुंबईवर संकट कोसळत एव्हा सगळे मुंबईकर त्याल धीराने तोंड देतात. त्यासाठी सरकारच्य मदतीची, आपल्या वस्तीतल्या नेत्याची वाट बघत नाहीत. सुरुची, मुंबईवर कित्तिहि अस्मानी संकट कोसळली, अतिरेकी हल्ले किंवा दंगल झाली तरी या "माणसातल्या माणसाची" मला प्रचिती प्रत्येक वेळी आलेली आहे. माझ्याबरोबर झालेला किस्सा मी लिहेनच पण आज वेळ नाहीय तेव्हानंतर कधीतरी...
|
Chaffa
| |
| Saturday, September 23, 2006 - 9:15 pm: |
| 
|
माणुस, माणुसकी यांच्या वरचा आलेला हा अनुभव. त्या वेळेस मी शिकत होतो. परीक्षा चालु होती. माझा शेवटचा पेपर आणी आधल्या दिवशी रात्री जोरदार ताप, घरी आई एकटीच सांगितलं असतं तर आईची काळजी दुप्पट झाली असती म्हणुन सापडतिल त्या गोळ्या घेउन वेळ मारुन नेली. पेपर द्यायला निघालो आणी रात्री घेतलेल्या चुकिच्या गोळ्यांनी प्रताप दाखवायला सुरुवात केली. डोळ्यावर अंधेरी येता येता वाटेतच चक्कर येउन कोसळलो. थंड पाण्याचा सपकारा चेहर्यावर बसला आणी थोडा फार सावध झालो, डोळे उघडल्यावर समोर खाकी कपड्यातला रिक्षावाला दिसला. माझी चौकशी वगैरे केल्यावर त्याने सरळ रिक्षेत घालुन दवाखान्यात नेलं. डॉक्टर बहुदा त्याच्या ओळखीतले होते, बाकी पेशंट बाजुला करुन त्यांनी प्रथम मला तपासले, ईंजेक्शन वगैरे दिले आणी घेउन जायला सांगितले. निटसं आठवत नाही पण पेपर आहे वगैरे असं काहिसं मी बरळत होतो. माझी समजुत काढून तो भला रिक्षावाला मला hall पर्यंत सोडायला आला तो पर्यंत मला बर्यापैकी हुशारी वाटायला लागली होती. यथावकाश व्यवस्थित पेपर लिहुन मी बाहेर आलो तर तोच रिक्षावाला माझी वाट पहात होता. मला रिक्षात बसवुन घरचा पत्ता विचारुन घरी सोडायला आला. तो भाडं वसुल करायला आला आसावा असा मतलबी विचार मनात आल्याखेरीज राहिला नाही पण मदतिला धावला हिच भावना मनात धरुन घराकडे वळलो आणी बाहेर रिक्षा चालु झाल्याचा आवाज आला बाहेर येईस्तोवर तो देवमाणुस नाहीसा झाला होता. त्या नंतर त्या डॉक्टरकडून माहिती मिळवुन त्या रिक्षावाल्याला शोधुन काढेस्तोवर बरेच दिवस गेले तो भेटल्यावर त्याचे आभार मानुन पैसे देउ केले त्यावर त्याने दिलेले उत्तर आजही आठवते म्हणाला बेटा परिक्षेत पास होशील तेंव्हा पहिला पेढा मलाच दे तेवढंच माझं भाडं. पण दुर्दैवाने मी त्याचं भाडं देउ शकलो नाही म्हणजे परिक्षेत मी पास झालो पण त्या आधिच एका अपघातात तो रिक्षावाला हे जग सोडून गेला. एखाद्या कथे सारखा वाटणारा प्रसंग पण माझ्या आयुष्यात राहिलेली त्या देवमाणसाची की माणसातल्या देवपणाची एक जबरदस्त आठवण.
|
Sonchafa
| |
| Monday, September 25, 2006 - 4:24 pm: |
| 
|
चाफ़्फ़ा खरच रे बाबा.. कधी विसरता येणार नाही असा अनुभव आहे तुझा.. अशी माणसं भेटायला नशीबसुद्धा जोरदार असाव लागतं!
|
Priyab
| |
| Monday, September 25, 2006 - 8:25 pm: |
| 
|
माणसातल्या माणुसकिचा मला आलेला अनुभव... सुमारे १० वर्षा पुर्वी चा प्रसंग आहे ३१ डिसेंम्बर रात्री ७-८ वाजे चा आम्ही त्यावेळी औंध (पुणे) च्या बाहेर रहायचो माझ्या वडीलान्चा ब्लड रिपोर्ट घेण्यासाठि मी आणि माझे वडील दुचाकिवर औंध मधे चाललो होतो रात्री ७-७:३० ची वेळ आसावी औंध चा नविन पूलावरुन त्यावेळि जास्त लोक जात नसत... पूल ओलान्डुन आमची गाडि पुढे जातच होति कि मागुन एक भरधाव येनार्या टेम्पो ट्रक्स ने जोरात धडक दिलि..मी गाडि चलवत होते आणि माझे वडिल मागे होते... आम्हि दोघे खालि पडलो...तो टेम्पो ट्रक्स वाला तसाच निघुन गेला...माज़े वडिल रक्ताच्या थारोळ्यात होते..मि कसेबसे उठले आणि तिथुन येणार्या जाणर्या लोकना थांबवायचा प्रयन्त करु लागले सगळे लोक गाड्या थांबुन बघुन निघुन जाउ लागले कोणिहि मदत करायला तयार नव्ह्ते बर्याच वेळाने एक तरुण मुलगा आणि त्याचि बहिण दुचाकिवर जात असताना थांबले त्या मुलाने माझ्या वडिलाना बघितले... अचानक त्याला त्या बाजुने जाणरि टेल्को ची बस दिसलि..त्याने हात दखवुन बस ला थांबवले आणि ते आम्हाला घेउन जवळ्च्याच इनामदार हाॅस्पिटल मधे घेउन गेले.. तिथे त्यानि घेण्यास नकार दिला...एवढेच काय पण फ़र्स्ट एड देण्यास सुद्धा नकार दिला तो मुलगा तिथेच थांबुन काय मदत मिळते का बघायला लागला.. बस वाल्या लोकांनि मग आम्हाला कोटबागि हाॅस्पिटल मधे नेले.... तिथल्या डाॅक्टरानी लगेच आम्च्यावर उपचार करायला सुरु केले.. माझ्य वडिलांन्चे खूप रक्त वहुन गेल्यामुळे त्याना तिथुन हर्डिकर हाॅस्पिटल मधे नेले गेले.. माझ्यावर मात्र तिथेच उपचार केले गेले तिथल्या डाॅक्टरानी आम्हाला लगेच मदत केली..त्या मुलाने माझ्या बग मधिल नंबर वर फोन करुन माझ्या घरी कळवले आणि पोलिसांना सुद्धा कळवले...माझे वडिल तर ४ दिवसात वारले पण मी मात्र जगले... आज मला तो मुलगा आणि त्याचि बहिण यांनी आम्हाला मदत केली नसति तर मी सुद्धा वाचले नसते..त्या दोघांचे टेल्को च्या बसवाल्याचे आणि कोटबागि मधिल डाॅक्टरांचे मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यान्च्या मुळे मला आयुष्य मिळाले आणि माझे वडील आम्हाला ४ दिवस का होइना लाभले
|
Chaffa
| |
| Monday, September 25, 2006 - 8:50 pm: |
| 
|
खरंय प्रिया, खरंतर डॉक्टर हे लोकांना मदत करण्याची शपथ घेतात पण नंतर काहीजण ती सोईस्कररीत्या विसरुन जातात. नशिब काही डॉक्टर ती विसरत नाहित. नाहितर तुला आज काही हा अनुभव लिहिता आला नसता.
|
Arch
| |
| Monday, September 25, 2006 - 9:06 pm: |
| 
|
प्रिया, बापरे! काय हा अनुभव. पण तरी मदत करणारे लोक अजून आहेत ह्यावर विश्वास बसतो.
|
Bee
| |
| Tuesday, September 26, 2006 - 4:45 am: |
| 
|
आई गं.. काय करुण प्रसंग उद्भवला प्रिया तुझ्यावर. पण त्या धडक देणार्या ऍटोवाल्याला शेवटी काही शिक्षा झाली की नाही? असाच एक दुर्दैवी क्षण माझ्या चुलत भावाच्या मुलावर ओढवला. तो फ़क्त २१ वर्षांचा होता. एकदा तो आणि त्याचे मित्र scooter वर बायपास रोडनी चालले होते. त्यांना मागून एका ट्रकची धडक बसली. माझ्या चुलत भावाचा मुलाला जखम वगैरे काही झाली पण त्यांच्या डोक्याला मुकामार बसला. त्याचा मित्र सुखरुप घरी परतला आणि ह्याला रस्त्यावर असेच सोडून दिले. सकाळी ८ वाजता माहिती पडले की भावाचा मुलगा serious आहे. मग त्याला कारंजाहून अकोल्याला आणले. पण तो काही क्षणाताच हे जग सोडून गेला. त्याच्या मित्रानी जर वेळेवर घरी येऊन वहिनींना आणि भावाला कल्पना दिली असती तर तो आज जिवंत असता. पण काही लोक डरपोक आणि अक्कलशून्य असतात. नंतर माझ्या भावानी त्यांच्या घराचे नाव जे पुर्वीची त्यांच्या आईचे होते 'शेवंता' ते खोडून तिथे 'नरेन्द्र' हे नाव दिले. मी त्यांना भेटायला गेलो तेंव्हा तरुण मुलगा गेल्याचे दुःख काय असते हे कळले. आजच्या धावळपळीच्या जीवनात असे कितीतरी प्रसंग आपल्याला बघायला मिळतात.
|
बापरे, तुमचे सगळ्यांचे अनुभव वाचुन परत एकदा माणसातला माणुस जिवंत आहे याची खात्री पटली...
|
हा मला "माणसातला माणुस" जिवंत आहे याची खात्री करुन देणारी घटना जी माझ्यबरोबर घडली होती. दिवस होता २४ ऑगस्ट,१९९७. त्यादिवशी पतेतीची सुट्टी होती. पण त्या दिवसापासुन मल २४ ऑगस्ट म्हंटल की अंगावर भयानक शहारे येतात. "माणासातल्या माणुसचा" प्रत्यक्ष अनुभव मल माझ्या कॉलेजच्या पहिल्याच वर्षात आला. तेव्हा नुकतच आमच कॉलेज सुरु झाल होत. लहानपणापासुन प्रवासाचि सवय होती पण एकट्याने मी कधीही अंधेरिच्या पुढे गेली नव्हते. कॉलेजमधे नुकतेच रुळत होते. तेव्ह सगळ्या मैत्रिणींनी शॉपिंगसाठी एफ़. एसला जायचे ठरविले होते. मला काही शॉपींग करायची नव्हती म्हणुन मी जाणार नव्हते. सुट्टिचा रविवार मस्तपैकी झोपुन काढायच्या मुडमधे होते. तर सकाळिसकाळीच आईने मला उठवुन सांगितले शेजारची स्वाती जात आहे तर तु पण जा तिथे. जरा फ़िरुन येशील, घरात बसुन काय फ़क्त झोपा काढणार आणि टी.व्ही बघणार. मी कित्तिही निक्षुन सांगितले तरीही ती ऐकलीच नाही आणि नाईलाजास्तव मला तिच्याबरोबर बाहेर जावे लागले. आम्ही निघालो ती भाईंदरवरुन सुटणारी ११.५६ ची चर्चगेट लोकल होती. पण जसेजसे बोरीवली स्टेशन गेले तसे तसे हळुहळु पावसाला सुरुवात झाली. बांद्रा आल्यावर मी सगाळ्यांना सुचविले की पावसाचा जोर खुप वाढत आहे आपण परत घरीच जाउया म्हणुन. पण त्यातल्या दोघीजणी (स्वाती आणी प्रणिता) ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांचे म्हणणे होते की पाउस तिहे पडत आहे चर्चगेटला असेलच असे नाही आणि आपण काढलेले तिकिटही फ़ुकट जाईल. मला ते मान्य नव्हते पण बाकी सगळ्यांच्या आग्रहास्तव मी त्यांच्याबरोबर गेले. बरे तिथे गेलो तर तिथेही मुसळधार पाउस कोसळतच होता तेव्हा माझ्य मनात परत एकदा शंकेची पाल चुकचुकली आणि मी परत एकदा त्यांना म्हणले, "आपण मागे फ़िरलेलेच बरे". पण त्यांचे म्हणणे होते "आत्ता आपण इथपर्यांत आलोच आहोत तर शॉपिंग करुनच परत जाउया". परत बळेबळेच मी त्यांच्याबरोबर शॉपिंग केली. मधेच थोडेसे काही खाउनही घेतले आणि चर्चगेटस्टेशनवर गेलो दुपारी ३.४५ च्या दरम्यान तर बराच मोट्ठ लोंढा गाडि परत कधी चालु होणार ह्याची वाट पहात थंबला होता. तिथे जमलेल्या बायकांना विचारले तर कळले की गाड्या बंद झाल्या अहेत. हे ऐकुन तर आमच्या सगळ्यांची भितीने गाळणच उडाली. पण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी घरी फोन करुन कळवुया असे ठरले. स्टेशनवर फोन करायला बघतो तर भली मोट्ठी रांग लागली होती. त्या रांगेत उभे राहुन सगळ्यांनी घरी फोन केला. त्यावेळि एवढे कळले नाही की पाउस कित्ति पडला आहे? करण घरी सांगितले तर तिथे चक्क उन पड्ले होते. ट्रेन परत चालु होतील थोड्यावेळातच या वेड्या आशेवर आम्ही अजुन होतो. परत एकदा भुक लागेल म्हणुन बिस्किटे आणि पाणि वैगरे घेतल. ट्रेनमधे परत जाउन ती सुरु व्हायची वाट बघु लागलो. ४ वाजले, ४.३० वाजले, ५ वाजले ट्रेन काही सुरु होतानही हे बघुन हळुहळु प्रत्येकाचा धीर खचु लागला. शेवटी ट्रेनच्या डब्यातील काही बायकाही उतरुन चालत जायचा निर्णय घेउन बाहेर जाउ लागल्या. ट्रेनमधे कोणिच थांबत नाहीय हे बघितल्यावर आम्हीपणा एका बाईबरोबर ती कुठे जाणार हे विचारुन तिच्याबरोबर चालत जायचा विचार करुन स्टेशनबाहेर पडलो. रस्ता काय कुणाच्याही माहितिचा नव्ह्ता जिकडे सगळे लोक जात होते आम्ही तिकडेच चालत जात होतो. क्रमश:
|
त्या बाईने आम्हाला ती महालक्ष्मीला जात आहे असे सांगितले होते पण नंतर मधेच आम्हाला सोडून जाउ लागली. एव्हाना काळोख झाल होत आणि आम्ही मेन रोडापासुन भरकटले होतो. तिथे बर्याच गल्लिबोळ्यातुन फ़िरत होतो, कोणलाच कशाचा पत्ता नव्हता. शेवटी एकदा आम्हाला महालक्ष्मी की कोणते स्टेशन दिसले ब्रिजवरुन पण एव्हाना त्या स्टेशनच्या प्लॅटफ़ॉर्मला पणि लाग्ले होते आणि रुळांचा कुठेही पत्ता नव्हता. आत्ता तर आम्हा सगळ्यांचा धीर पुर्णपणे खचला होता. घरी परतायची चिन्ह काही दिसत नव्हती आणि पाउस बरसतच होता. त्याचीही थांबायची काही एक लक्षण नव्हती. चहुकडे पाणीच पाणी आणि त्या अनोळखी रस्त्यावर भेदरलेल्या आम्ही ५ जणी. आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालुन एकत्र चालणे सुरुच ठेवले होते. एव्हाना थंडी वाजुन पुरती वाट लागली होटी. कुठुनशी एक बाई आली आणि माझ्या मैत्रिणिचा हात धरुन तिला ओढुन न्यायचा प्रयत्न करु लागली. तिला बघताक्षणिच आम्ची ट्युआब पेटली की ही कोण असणार तिचा एकुण वेशाच बोलत होता. लालभडक रंगाची झगझगीट साडी, तशाच लाल रांगाने रंगविलेले ओठ आणि पाणच तोबरा. ती माझ्य मैत्रिणिल म्हणात होती," चल मी तुला तुझ्या घरी पोहोचवते". आम्ही सगळे निकराने तिला आमच्याबरोबरच ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. पण शेवटी हाट सुटालाच आणि तिने तिला ओढात दुसरीकडे नेले तसे माझ्य मैत्रिणिने तिचा हात झटकुन त्या गुडाघ्यापेक्षा जास्त पाण्यात धावत येउन परत आमचे हात परत पकडले. आत्त तर मनाशी सगाळ्यांनी निर्णय पक्का केला की कुठेही गेलो तरी एकत्रच जाउ. बस कसेतरि वाट काढत एक चौकात पोहोचलो. तिथे उभ्या असलेल्या वाहतुक हवालदाराला विचारले की हा कोणता एरिया आहे. त्याने म्हंटले ते त्या कोलाहलात ऐकुच आले नाही. परत कसेतरि जिथे पाणी कमी आहे तिथे चालायचा प्रयत्न करत होतो. मुंबईतली लोक खली उतरुन रस्त्यावरची मॅनहोल्स उघडून पाणी घालवायचा प्रयत्न करत होती. पण त्यांनी त्य मॅनहोल्सच्या जवळ एक साख़ाळी तयार केली होती. स्वताच्या घरात, दुकानात पाणि असतानाही लोक दुसर्यांना मदत करत होते.
|
Maudee
| |
| Thursday, October 26, 2006 - 11:36 am: |
| 
|
बापरे रुप्स... हादरवून टाकणारा अनुभव आहे तुझा...
|
बाजुने जाणार्या बसनेदेखील रस्त्यावरच्या पाण्याचा लोट आंगावर येत होता. शेवटी एक मद्राश्याचे हॉटेल बघितले. तिथुन मैत्रिणिच्या घरी फोन लावला. त्या हॉटेलातुन प्रत्येकाने घरी फोन करुन आपआपली खुशाली दिली. ती देत असतानाच एक साधारण ३५-४० चा माणुस जवळ आला आणि म्हणाला की मी तुमच्या रहाण्याची व्यवस्था करतो. माझ्या दुकानात रहायला जागा देतो रात्रभर आणि एका मैत्रिणिल तो त्याचे म्हणणे पटावुन द्यायचा प्रयत्न करु लागला. आम्ही सगळ्यांनी अनेकवेळ नकार देउनही त्याची आपली भुणभुण चालुच होती. शेवटी एकीने(प्राणिताने) घरी फोन लावुन तिच्या पप्पांषीच त्याल बोलायला लवले. त्यांनी त्याला असा दम दिला की बस रे बस, नंतर त्यांनी त्या हॉटेलच्या मालकाला लाईनवर घेतले आणि सांगितले की मी सीबीआय इन्स्पेक्टर आहे जर या मुलींना काहीही झाले तर तुझी धडगत नाही. हे ऐकल्यावर त्या हॉटेल मालकाची भितीने गाळणच उडाली. त्यांचे इथे बोलणे चालु असताना त्याने त्याच्या वेटर्सना आम्हाल चहा, कॉफ़ी, खायल जे काही हवॅ ते देण्याचे फ़र्मान सोडले. सगाळे वेटर आमच्या दिमतीला हजर झाले. तेवढ्यात काकंनी( मैत्रिणिच्य वडीलांनी) त्यला त्या हॉटेलचा संपुर्ण पत्ता, नंबर सगळी माहिती विचारली आणि थोड्या वेळातच तिथे मी गाडी घेउन येतोय असे संगितले. तेपर्यंत त्या वेटर्सनी आंहाला सगळ्यांना गरमागरम कॉफ़ी दिली होटी. थोड्याश्या अनिच्छेनेच आम्ही सगळ्यांनी ती कॉफ़ी पिली. फोन ठेवल्यावर तो मालक आम्हाला काही खा म्हणुन अगदी विनवु लागला. पण एवढ मोट्ठ संकट डोक्यावर असतान भुकेची अजिबात जाणीवाच नव्हती. अशीच १५-२० मिनिटे गेल्यावर एक उंचपुरा, गोरा, २३-२४ वर्षाचा मुलगा तिथे आला आणि प्रणिता नावाने चौकशी करु लागला. प्रथम आम्हाला वाटले की असेच कोणितरी आमचे बोलणे ऐकुन नाव वैगरे समजले असेल म्हणुन त्याच्याकडे दुर्लक्ष करु लागलो. पण त्याने प्रणिता आणि अमची सगाळ्यांची नावे सांगितली, काकांबरोबर तो फ़ोनवर बोलला आणि मी निलिमाचा मित्र धनंजय आहे हे संगितल्यावर आणि काकांकडुन खात्री करुन घेतल्यावरच त्याच्यावर विश्वास ठेवला. शेवटी त्या हॉटेलवाल्याने खात्री करुन आम्ह ५ जणींना त्याच्याकडे सुपुर्द करुन सुटकेचा निश्वास टाकला. चहा,कॉफ़ीचे पैसेही घेतले नाहीत. तो सगळी स्वताबद्द्लची माहिती देउ लागला. मधेच एक छान वातानुकुलीत हॉतेलात जेवायचा आग्रह केला. तिथे गेल्यावर आम्हा सगळ्यांना जेवण घ्यायच आग्रह केला पण कोणचेही खाण्यात लक्ष नव्हते. शेह्वटी स्नॅक्समागवुन आम्ही निघायची खुण केली तर परत आईस्क्रिमच आग्रह केला पाण नम्रपणे आम्ही ती विनंती धुडकावुन लावली आणि लवकरात लवकर घरी पोचायचे आहे अशी ईच्छा व्यक्त केली. तेव्ह त्याने सांगितले की ,'आज घरी पोहोचणे अशक्य आहे. सगळिकडे पावसाने थैमान घालुन पाणि साचले आहे. आज आपण माझ्य मित्राच्या घरी रहाणर आहोत. कारण माझ्या घरी(ताडदेवला) माझ्य छातीपर्यंत पणि साचले आहे. तिथे आपण जाउच शकत नाही". आम्ही परत नाराज झालो पण त्याने मधे मधे जोक सांगत आंम्हाल त्याच्या मित्राच्या घरी आणले सुद्धा...
|
अग माउडी अजुन लिहायचे बाकी अहे ग... त्या दिवसाची आठवण आजुनही आंगावर काटा येतो ग...
|
त्याने आणलेलेया क्वार्टर्स म्हणाजे गव्हरमेंट क्वार्टर्स आहेत तेपण अगदी वीवीआयपी लोकांचे हे त्या बिल्दींगच्या आवारत शिरतानाच समजले. मग तिथे दोन माळे चढुन गेल्यावर त्या घरी दोन अजुन मुलांनी आमचे स्वागत केले. सगळ्यात मोठा मुलगा (दिसायला एकदम चिकना होता). त्याचे नाव पंकज आणि छोट्याचे नाव प्रसाद. मोठ्याने तर आल्याआल्याच एक बॉंब टाकल," अरे या मुलीबद्दल तु बोलत होतास यांच्या चेहर्यावर भीतीचा तर लवलेशही नाहीय. घरीच त्यांच्या हसण्याचे आवाज येत होते आम्हाला," हे ऐकल्यावर अजुन एक हास्याचे कारंजे उधळले. थोड्या गप्पा मारुन झाल्यावर त्याने फ़्रेश होवुन झोपायला सांगितले. आम्ही फ़्रेश होईपर्यंत त्यांनी एका खोलीत आमच्यासाठी बिछाने तयार ठेवले होते आणि एक निरोपही," सकाळी लवकर उठायची घाई करु नका. आरामशीर रहा काही हवे असेल तर संकोचा बाळगु नका बिंधास्त आपलच घर आहे अशारीतीने वागा." हे बोलुन ते तिघे गेले आणि अम्ही सगळ्यांनी ती रात्र कित्तितरी वेळ बडबडत घालवली. सकाळी जाग आली तेव्हा ८ वाजले होते. लवकर सगळ्यांनी फ़्रेश होवुन घेतले आणि कसे काय ठाउक ते सगळे उठले आणि परत सगळ्यांच्या घरी फोन लावले. फोनवर बोलुन झाल्यावर आंम्हा सगळ्यांना धनंजय आणि प्रसाद टेरेसवर घेउन गेला. काय मस्त बेभान वार आणि कालचा मळभ गेलेल पांढर, निळसर निरभ्र आकाश... कित्ति फ़रक पडला होता त्या काही तासांमधेच..." त्यांच्य टेरेसवरुन महालक्ष्मी रेसकोर्स मस्त दिसत होता. दुसर्या बाजुला मस्त नेहरु तारांगण... आहाहा काय सुंदर नजारा होता. तेपर्यंत परत खाली बोलावण आल आणि सगळे खाली गेलो. तर पंकजने मस्त आल्याचा चहा आणि बिस्किट तयार ठेवली होती आणि त्याबरोबर एक बातमीही की प्रणीताचे बाबा, बहीण,कामनाचे बाबा, तिची बहिण तुम्हाला घ्यायला येत आहे. अगदी १ तासांतच ते आले आणि एवध्यावेळचे थोपवलेले अश्रु ओसंडुन वाहु लागले. सगळ्यांनी एकदम गंभीर केलेले वातवरणात पंकज म्हणला," अरे आत्ता सगळे भेटले तरी रडत आहात? काल तर चान हसत होतात सगळे???" आणि परत एकदा हास्याचे फ़वारे उडाले. त्यांचा सगळ्यांचा निरोप घेउन आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. घरी पोहोचेपर्यंत धीर नव्ह्ता. पण एका सर्प्राईजसाठी दादरला गाडी थांबली आणि काकांनी छाबीलदासचे गरमागरम बटाटेवडे आणले आणि देताना ते म्हणले," माझ्या सगळ्या धैर्यशील मुलींसाठी एक छोटीशी पार्टी..." सगळ्यांनी हसत हसत बटाटेवडे खाली आणि घरच्या प्रवासाला निघालो. पण अजुनही एक प्रश्न नेहमी येतो मनात, कोण होते ते? काय नात होत त्यांचा आणि आमच? कशासाह्ती त्यांनी एवढ सगळ केल? कुठुन रूण फ़ेडायाचे त्यांचे??? कशाचीच काहीएक उत्तर मला कधीच मिळत नाहीत. त्या देवाचे आभार नेहमी मानते मी या गोष्टीसाठी. ज्याने भरपुर क्रुर माणसे बनवली असली तरी काही अशी माणुसकी असणारी माणसेही बनवली आहेत या जगात... ते देवदुत जर भेटले नस्ते तर खरच आज आम्ही कुठे असतो याचा पत्ता आंच्या आईवडीलांनाही लागला नसता २६ पण ३ वर्षापुर्वी एक छान गोष्ट घडली आणि "चांगल्यामाणसांबरोबर चांगलेच होते याची खात्री पटली." तो पंकज ज्याने आमची इतकी सेवा केली त्याला ऍक्टींगमधे करियर करायचे आहे हे त्याने त्यावेळेलाच आंम्हाल सांगितले होते. तेव्हा त्याची ईच्छा पुर्ण होवो अशी प्रार्थना केली होती देवाकडे, ती त्याने पुर्ण केली. हा तोच पांकज आहे,"चार दिवस सासुचे " मधला "पंकज विष्णु" म्हणजेच "पंकज विष्णुपुरिकर..." समाप्त.
|
माझा अनुभव पुर्ण करायला एवढे दिवस लावल्याबद्दल क्षमस्व...
|
Maudee
| |
| Thursday, October 26, 2006 - 12:44 pm: |
| 
|
gr8 dear तू ख़रच ख़ूप धैर्यवान आहेस... आणि तुमचे नशिबही चांगले होते... नशिबानेच तुम्हाला चांगली माणसे भेटली. देवाचे लाख़ लाख़ आभार मानले पाहिजेत यासाठी....
|
धन्स ग माउडी , खरच जर ते लोक भेटले नसते तर आमची काही धडगत नव्हती... धैर्यवान म्हणशील तर सगळे एकत्र होतो म्हणुन वाचलो एकएकटे पडलो असतो तर मग काही खर नव्ह्त...
|
Maanus
| |
| Wednesday, March 07, 2007 - 2:25 am: |
| 
|
अरे बापरे... माझ्यावर येवढा मोठा BB होवुन गेला... हो हो माणसातला माणुस अजुन जिवंत आहे
|
Supermom
| |
| Wednesday, March 07, 2007 - 3:03 am: |
| 
|
मी लग्न होऊन नुकतीच मुंबईला आले होते. मूळची नागपूरची असल्याने मुंबईची विशेष माहिती नव्हती. माझ्या नवर्याला थोड्याच दिवसात परदेशी जावे लागले.माझी लहान बहीण काही दिवसांसाठी माझ्याकडे सोबत म्हणून आली.योगायोगाने तिलाही चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. मी नोकरीसाठी चर्चगेट ला जात असे व ती वरळीला. एकदा मला बरे नसल्याने मी दोन तीन दिवस सुट्टीवर होते. बहीण ऑफ़िसला गेली आणि मुंबईच्या पावसाने आपले रूप दाखवले. गाड्या बंद, बरेच ठिकाणी फ़ोन बंद. मला तिचा काहीच पत्ता लागेना. दिवसभर वाट बघितली. रात्री उशिरा बहिणीचा फ़ोन आला. ती दादर पर्यंत कशीबशी पोचली होती. पण पुढे सगळ्या रस्त्यांवर, रुळांवर पाणी होते. तिची मैत्रीणही तिच्याबरोबर होती. तिला ताप चढत होता. मला काय करावे ते कळेना. मग एकदम आठवले की माझ्या ऑफ़िसचे एक कर्मचारी, त्यांना आम्ही अण्णा म्हणत असू, दादरलाच राहतात. जरा संकोचतच त्यांना फ़ोन केला. त्यांनी ताबडतोब पत्ता देऊन तिला घरी यायला सांगितले. सुदैवाने त्यांचे घर फ़ार दूर नव्हते. बहीण व तिची मैत्रीण तिथे पोचताच त्यांच्या घरच्या माणसांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले. त्यांना कोरडे कपडे, जेवण, तापावर औषध सारे दिले. उत्तम सोय केली. पाणी ओसरल्यावर बहीण घरी पोचली. अगदी थोड्याशा ओळखीवर अण्णांनी केलेली मदत आमच्या आजही स्मरणात आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|