Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 02, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्या मित्रांच्या मला आवडणार्‍या / नावडणार्‍या सवई » Archive through May 02, 2008 « Previous Next »

Maanus
Wednesday, April 30, 2008 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Roommate's stupid girlfriend.

She is spinning the mixer at this hour (11:45 PM) to make idli mix. She sleeps for the whole day and now she is doing this.


Maitreyee
Wednesday, April 30, 2008 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा आयती इडली खायला हवी ना तुला, मग असल्या तक्रारी करू नकोस बरं :-O

Ajjuka
Wednesday, April 30, 2008 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाफाळती इडली आली हातात म्हणजे बोलशील का असं? :-)

Ajjuka
Wednesday, April 30, 2008 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मैत्रिण होती तिला आवराआवरी करायचा नाद होता. १० वी कसंतरी पूर्ण करून तिने शिक्षणाला रामराम ठोकलेला असल्याने संदर्भाची पुस्तके, नोटस काढणे इत्यादी गोष्टींची तिचा काही संबंध नव्हता. मनाने अतिशय चांगली आणि माझी अत्यंत जवळची मैत्रिण होती. माझ्या घरी अनेकदा रहायलाही असायची. आली की माझं टेबल आवरून ठेवायची. आणि ती गेल्यावर माझं डोकं फिरलेलं असायचं.
बॉटनीची स्केचेस केमिस्ट्रीच्या फाइलमधे, नाट्यप्रशिक्षणाच्या अर्धवट झालेल्या नोटस जेनेटिक्सच्या गठ्ठ्यात, एनसीसीच्या एयरक्राफ्टच्या नोटस नवीन नाटकाच्या स्क्रिप्टमधे असा सगळा सर्वधर्मसमभाव झालेला असायचा. संदर्भाच्या पुस्तकांच्यात घातलेल्या खुणा गायब झालेल्या असायच्या... इत्यादी इत्यादी!!
आकारानुसार वस्तू लावणे हे एकच तत्व ती पाळायची त्यामुळे दिसताना मात्र टेबल आवरलेलं टकाटक दिसायचं..
राग यायचा पण ती मला मदत म्हणूनच करायची त्यामुळे काही म्हणता यायचं नाही.


Maanus
Wednesday, April 30, 2008 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो कुठे काय, सकाळी सकाळी तिने ईडल्या बनवल्या.

पण दोघांनीच खाल्या, तो गेला ऑफीसला, आणि ही परत रुम मधे.
म्हणजे माझ्या वाट्याला फक्त मिक्सरचा आवाज. :-(


Maitreyee
Wednesday, April 30, 2008 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घे आता.तिने इथले तुझे पोस्ट पाहिले असणार माणसा. :-O

Farend
Wednesday, April 30, 2008 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिने इथले तुझे पोस्ट पाहिले असणार माणसा
नाही ते आज ११:४५ किंवा आणखी उशीरा मिक्सर लावला की ला कळेल :-)


Itgirl
Wednesday, April 30, 2008 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि जर इतक्या उशीरा आज रात्री मिक्सर लावून उद्या जर का पुन्हा इडल्या नाहीच मिळाल्या माणसा तुला, तर नक्कीच तिने वाचली इथली चर्चा!! :D :P

Maanus
Wednesday, April 30, 2008 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही, नाही ते शक्य नाही. तो तमीळ आणि ती गुजराथी (north & south pole) , त्यामुळे दोघांनाही मायबोली माहीत नाही. :-)

हीच्या पुर्वी आधी दोन मुली रुममेट होत्या, पण ही सगळ्यात जास्त किचन मधे रहाते. दिवसभर काहीतरी ना काहीतरी कुकींग. तीन महीने झाले ती जॉब शोधतेय, अस दिवसभर स्वयंपाक घरात बसल्यावर कसा जॉब मिळनार?


Cinderella
Wednesday, April 30, 2008 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण तुला मुली रुममेट कशा मिळतात ??? मी तर कधीच मुलांबरोबर घर शेअर केले नाही. एका प्रोजेक्ट वर असताना तशी वेळ आली तर manager's manager's manager and so on शी भांडुन हट्टाने देशात परत गेले. मला मिळालेल्या माहितिप्रमाणे १. मुले हॉल मधे खुप पसारा करतात २. सोफ़्यावर झोपुन टी. व्ही. बघत मेगी नुडल्सकिंवा तत्सम खातात ३. खरकट्या हातांनी दार उघडणे, रीमोट चालवणे, वाढुन घेणे इ. कामे करतात ४. रात्रि उशिरा घरी येउन खुड्बुड करतात. ५. आपण संपुर्ण आठवड्यासाठी केलेला स्वयंपाक हे "खुपच छान झाले आहे" म्हणुन २ दिवसांत संपवतात. ६. पोस्टात जाणे इ. न आवडणारी कामे आपल्यावर ढकलतात. इ. इ.

Kedarjoshi
Wednesday, April 30, 2008 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण तुला मुली रुममेट कशा मिळतात >>>>>

माणूस कृष्णाचा अवतार आहे. ~D

Maanus
Wednesday, April 30, 2008 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन अडीच हजाराच्या पुढे रेंट असल्यावर सगळे करावे लागते :-) उगाच कुठल्याही तेलगु लोकांबरोबर रहाण्यापेक्षा मराठी लोक बरी.

अरे पहील्या रुममेट ची GF तीचे graduation झाल्यावर आमच्या बरोबरच रहायला लागली.

दुसरी पुण्यातली ओळखीची मुलगी होती. हीच्यामुळे बरीच सुधारणा झाली, घर स्वच्छ ठेवणे वैगेरे.

आणि आता ही तीसरी काही महीन्यांपुर्वी london वरुन आलीय, व जॉब शोधतेय तोपर्यंत मित्राबरोबर रहातेय. (होप सो)


Giriraj
Thursday, May 01, 2008 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्राबरोबर रहातेय>>> मग तू काय करतोय कबाब मे हड्डी??

माझ्या एका मित्राला खूप वाईट खोड आहे... तो मी सांगितलेलं कधी ऐकतच नाही.. त्याला कधीपासून सांगतोय की BMW घे म्हणून!हा मायबोलीकर आहे त्यामुळे 'माझी व्यथा' मध्ये मांडले नाही!


Itsme
Friday, May 02, 2008 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राला एक सवय आहे ती मला अजिबात आवडत नाही ... हा दिवसभर वेगवेगळ्या site वचतो आणि मला फोन करुन इकडे हे वाच, तिकडे ते वाच, आणि प्रतिक्रीया दे असा आग्रह करत रहातो :-)

Giriraj
Friday, May 02, 2008 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NCT .. .. .. ..

Dakshina
Friday, May 02, 2008 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मैत्रिण रोज घरातल्या सगळ्या कुंड्या.... बाथरुमात आणून झाडांना अंघोळ घालते. रात्री तशाच ठेवते. बर एका कडेला ठेवेल, ते ही नाही.... मध्येच... शिवाय झाडाची वाहीलेली माती, वाळलेली पानं तशीच. एकदा तर ती पानं खाऊन एक भली मोठ्ठी पाल कुंडीत मरून पडली होती.... आई गं.... रोज सांगून थकते... तरी बदलत नाही.

Psg
Friday, May 02, 2008 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाथरुमात आणून झाडांना अंघोळ घालते.

बापरे! काहीही सवयी असतात का? मग रोज सकाळी स्वत:बरोबरच का नाही घालत आंघोळ? रात्रीच का? एनी स्पेसिफ़िक रीझन?
सॉरी, दक्षिणा, तू चिडचिड करत लिहिलं आहेस, पण भयंकर हसू आलं.. काहीतरी उपाय शोध बाई, शुभेच्छा तुला :-)


Dakshina
Friday, May 02, 2008 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवसभर आम्ही हापिसात असतो ना, त्यामूळे, आणि शिवाय झाडांना ऊन खाऊ घालावे लागते दिवसा.... कळ्ळं?
आता यावर काय उपाय शोधू? तुम्हीच सांगा....
तिच्या अजून फ़र गमतीशिर सवयी आहेत, सखरेच्या, बिस्किटाच्या, फ़ॉर दॅट मॅटर कोणत्याच बरणीतला कोणताही पदार्थ काढला, की झाकण फ़िरकवून लावत नाही, फ़क्त त्यावर ठेऊन देते. धुवायचे कपडे लॉँड्री बॅगेत कमी, बाहेर जास्ती लटकत असतात. इस्त्रीचे मांडून ठेवलेले कपडे, त्यातला मधला कपडा खसकन ओढून काढते, सकाळी दूधाच्या पिशवीची कॅरी बॅग घरात आणली कि त्यातली पिशवी काढून, जमिनीवर फ़ेकून देते, लसूण सोलला की फ़ोलकटं तिकडेच.... कांद्यांची तिच गत. कंगव्यातले केस...

पण तरिही आम्ही एकत्रंच आहोत गेली कित्येक वर्षं, मला या गोष्टींचं इरिटेशन होतं आणि मी रोज रोज बोलते, ती काही मनावर घेत नाही, या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देते..... ही आणखिन एक आवडणारी आणि / न आवडणारी गोष्ट.


Sonchafa
Friday, May 02, 2008 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा जबरदस्त हसू आलं तुझी दोन्ही पोस्ट्स वाचताना.. काय करू? मला वाटायचं, डब्याची झाकणं नीट न लावणं, धुवायचे कपडे अस्ताव्यस्त टाकणं ही फ़क्त मुलांचीच सवय असते असं.. (माझा भाऊ आणि नवरा बर्‍यापैकी ह्या गोष्टी करतात आणि मला ते अजिबात खपत नाही म्हणून म्हटलं हो हे..)
पण मुलीही असं करत असतील असे वाटलं नव्हतं.. पण ते झाडांना अंघोळ हे भारी प्रकरण आहे हो.. जपून बाई.. तिला विचार नाहीतर 'बाई गं.. झाडांना घाल बाथरूममध्ये अंघोळ, आपणच उद्यापासून बाहेर गॅलरीत अंघोळ करु..कसं?' :P बघ काय म्हणते त्यावर


Itgirl
Friday, May 02, 2008 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफा, तू पण ना!!
..
..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators