|
Usha2008
| |
| Monday, April 28, 2008 - 5:22 am: |
| 
|
Namaskar! Mi mayybolivar navin ahe, mala ek changla mitra hawa ahe, khup khup gappa marayla,yla , chatting karayla. Mi punnyahun ahe.
|
Maanus
| |
| Monday, April 28, 2008 - 1:17 pm: |
| 
|
ही ही ही ही
|
Ss_sandip
| |
| Wednesday, April 30, 2008 - 8:31 pm: |
| 
|
माणूस, हसतात का हो असे मैत्रीच मागीतली आहे ना काही गुन्हा तर नाही केल ना काय तुम्ही पण ना, मिळेल हो तुम्हाला काही काळ्जी करु नये, दिवे घ्या दिवे, तुम्ही नाही हो, माणसासाठी
|
मी तुझा मित्र होण्यास तयार आहे. पण त्यासाठी तुला माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. जर तू हे उत्तर समाधानकारकपणे देऊ शकलास, तर आपण मित्र झालो असे तू समज. प्रश्न : तुला मित्र हवा आहे, गप्पा मारायच्या आहेत, हे तू लोकांना विचारलेस, पण तुझा प्रश्न पूर्ण झाल्यावर, ’मी पुण्याहून आहे’ हे सांगावे असे तुला का वाटले ? कृपया या प्रश्नाचे उत्तर तुझ्या मनापासून देण्याचा प्रयत्न कर. धन्यवाद !
|
Zakki
| |
| Sunday, May 25, 2008 - 4:45 pm: |
| 
|
व्वा:! असे कसे? त्या गावच्या लोकांची स्वत:बद्दल एकदम वेगळीच कल्पना असते. आपण एकदम बुद्धिमान, सुस्वरुप, नि थोर लोक आहोत. आम्ही नेहेमीच गंभीर, खोल विचार करून बोलतो, बाकीचे नुसते उथळ नि पांचट. मी होतो ना पुण्यात पाच वर्षे. तेंव्हा मी पण तसाच होतो. मग पुणे सोडले नि सर्वसाधारण माणसात आलो. म्हणून ’मी पुण्याहून आहे’ हे सांगणे आवश्यक आहे. नाहीतर माझ्यासारखा नागपुरी (ई:ऽऽ) येईल 'मी होतो मित्र' म्हणत!
, 
|
झक्किंना, अनुमोदन . म्हणुनच आम्ही पुण्यात घर घेताना आधीच मैत्री झालेल्यांशेजारी घेतले. काय सांगावे पुण्यातले पुणेकर आमच्याशी मैत्री करतिल न करतिल 
|
Uday123
| |
| Monday, May 26, 2008 - 7:44 pm: |
| 
|
काही लोकांना पुणेकरांची, त्यांच्या विचारांची प्रचंड बाधा आहे आणि मैत्री करुन पुढे ताप होण्यापेक्षा आधीच आपली कमजोर बाजु सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न पण असु शकतो.
|
Farend
| |
| Monday, May 26, 2008 - 9:24 pm: |
| 
|
बहुतेक असे बरेच अ-पुणेकर एकमेकांकडे संशयाने बघत पुण्यात एकमेकांशेजारीच घरे घेतात आणि एकमेकांचेच अनुभव पुणेकरांचे म्हणून ज्या त्या बीबीवर खपवतात
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:09 am: |
| 
|
आणि नाही आले अनुभव तर पुलंच्या लिखाणातले विनोद थोडेसे फिरवून पुणेकरांचे अनुभव म्हणून ओरडतात.
|
Dakshina
| |
| Tuesday, May 27, 2008 - 4:27 am: |
| 
|
अज्जुका..... ही ही ही ही...
|
Itsme
| |
| Tuesday, May 27, 2008 - 6:08 am: |
| 
|
असे राहीलेत तरी किती (खरे) पुणेकर आता पुण्यात .....
|
Slarti
| |
| Tuesday, May 27, 2008 - 6:29 am: |
| 
|
फारेंडा, अज्जुका, अगदी अगदी तर उषा, तुम्हाला मित्र मिळाला की नाही अजून ? इथे येत रहा, मायबोलीवर भरपूर फिरा. हळूहळू ओळखी होतील. इथे मॅगीमित्र मिळणे अवघड आहे.
|
Zakki
| |
| Tuesday, May 27, 2008 - 11:59 am: |
| 
|
किती (खरे) पुणेकर खरे आहे. माझ्या पहाण्यात नागपूर विदर्भातलेच बरेचसे लोक पुण्यात घरे घेऊन राहिली आहेत, कित्येक वर्षे. पण आमच्या बाग राज्यात मात्र माझे दोन तीन 'खरे' पुणेकर मित्र आहेत. माझ्या वयाचे आहेत, नि चाळीस वर्षांपूर्वी पुणे सोडून इथे आलेले. अस्सल पुणेकर! पु. लं च्या लिखाणातून घ्यायची गरज नाही. आपला आपल्यालाच प्रत्यय येतो.
|
Dakshina
| |
| Tuesday, May 27, 2008 - 1:35 pm: |
| 
|
इथे जिला मित्र हवा आहे तिचा काही पत्ता नाही.. आणि बाकीचे लोक V&C खेळण्यात दंग आहेत.
|
Zakki
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:36 pm: |
| 
|
त्या घाबरून पळून गेल्या!
|
Tonaga
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:38 pm: |
| 
|
दक्षिणा हीच तर मायबोलीची गम्मत आहे.इथे दुसर्याचा मुद्दा हायज्याक करून स्वताच्याच बाह्या सावरीत दुसर्यावर तुटून पडावे हा तर इथला शिरस्ताच आहे. मग मूळ मुद्दा काय ह्याचा तपास करायची गरज काय अन तो सुरू करणारा आद्य पुरुष अथवा पुरुषी कोण हे तर बघायलाच नको. तात्पर्य काय भान्डणेवालोको भांडनेका बहाना चाहिये....
|
Tonaga
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:39 pm: |
| 
|
झक्कीसाहेब आपण नागपूरचे काय? वा वा आनन्द वाटला.
|
बाकी, काही सतत टोमणे मारणारे नागपुरकर न चुकता पुणेकरांच्या टोमणे मारण्याला विरोध करतात आणि हे करताना आपण टोमणे मारण्यात पुणेकरांच्या बरेच मैल पुढे आहोत हे सोयिस्कर विसरतात.
|
Zakki
| |
| Wednesday, May 28, 2008 - 11:41 pm: |
| 
|
सतत टोमणे मारणारे नागपुरकर अहो, तुम्ही हे माझ्याबद्दल बोलत असाल तर लक्षात घ्या की मी आठवी ते कॉलेजच्या पहिल्या वर्षापर्यंत पुण्यात होतो. तिथेच हे असले शिकलो!
|
Slarti
| |
| Thursday, May 29, 2008 - 3:00 am: |
| 
|
जाऊ दे रे चिन्या. काय शिकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न, नाही का ? कुंभाराच्या गाढवाकडे बघून कोणी दुगाण्या झाडायला शिकतं, तर कोणी कष्ट करायला... चालायचंच.
|
Uday123
| |
| Thursday, May 29, 2008 - 4:59 am: |
| 
|
नागपुरकर, पुणेकर, कुंभार, गाढव... एव्हाना एका मित्राची अपेक्षा (मायबोलीवर) करून खुप मोठी चुक केली असे झाले असेल Usha2008 यांना.
|
अरे, ती उषा का उशी परत फ़िरकलीच नाहिये इकडे!!शिवाय पुणेकर असल्याने तिला याची सवय असेलच. स्लार्ती,बाकी पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान असणार्याला कुठल्याशा नागपुरकराने केलेल्या निरर्थक टिकेची फ़ारशी पर्वा नसतेच.पण पुण्याचा व पुणेकरांचा अपमान सहन करण्याचीही तयारी नसल्याने बोलणे अपरिहार्य होते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|