Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 25, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मायबोलिकर उखाणे » Archive through April 25, 2008 « Previous Next »

Chaffa
Sunday, April 13, 2008 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोरदार सुटलेत सगळे!

हा स्पेशल!

लांबसडक वेणीवर बांधला
लालचुटूक गोंडा,
पोस्ट मधल्या चुका शोधणं
हा ' आर्च ' चा हातखंडा!

झकास बंब सेवा सध्या उपलब्ध नाही, कृपया गिरीराज बादल्या बोलवाव्यात.


Arch
Monday, April 14, 2008 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा ' आर्च ' चा हातखंडा! >>

' हा ' नाही रे. ' ह्यात '




Chaffa
Tuesday, April 15, 2008 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघा जागलात की नाही उखाण्याला!

Chyayla
Tuesday, April 15, 2008 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला ला बडविते
बडव्यन्चि मेनका

निलिमा काय भयंकर स्वप्न होत ते बापरे म्हणजे असे की.. आजकाल मेनका नाच, गाणे, प्रणय, साज, श्रुंगार हे असल सोडुन चक्क बडवायला लागल्यात
आणी काय हे ऐकाव ते नवलच.. मेनकेच आडणाव "बडवे" होत.. हा खरे तर व्ही ऍंड सी चा विषय आहे.

लाजो तुझ्या म्हशी ईकडेही घेउन आली वाटत

सध्या उखाण्यांमधे मेनका, रंभा, उर्वशी आणी म्हशी यांचिच चलती दिसते.


Arun
Tuesday, April 15, 2008 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंभा असो, उर्वशी असो किंवा असो मेनका
ज्यांच्या त्यांच्या दृष्टीचा हा सगळा भ्रम सारा
च्यायला, चाफ्फा अन् टोणगा यांचा
मात्र नाहीच कुणाला भरवसा


तिघांनीही दिवे घ्या रे. नाहीतर झकास बंब सेवा आहेच .......... :-)




Chaffa
Tuesday, April 15, 2008 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंभा मेनका अप्सरा
सगळेच की हो भ्रामक
पण अरुणराव तुम्हाला मात्र
अजुन सापडले नाहीये 'यमक'

हा बदला नव्हे हो!

इजा,बिजा,तिजा म्हणा
नाहीतर म्हणा एक दोन तीन
विचारपुसवर दावतोय वाकुल्या
च्यायला बनुन 'मिस्टर बिन'



Chaffa
Tuesday, April 15, 2008 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री लाजो यांज कडून

सौभाग्यवतीने सांगीतले काम
ते माझी होईना छाती
या वयात कुठे जाउ
करायला 'म्हशींची' शिरगणती


Chinya1985
Tuesday, April 15, 2008 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काम कराव म्हणुन
गाढवाला दाखवतात गाजर
काही केल की फ़िसकटतय
दक्षिणाच बहुरंगी मांजर....

येSSSSSSSSSSSस!!!!!!!!!!जुळल शेवटी यमक!!!

वरील पोस्टमधुन दक्षिणा अथवा इतर स्त्रीया अथवा ऍनिमल राईट्स वाल्या कुणालाही दुखवायचा हेतु नाही.दुखावले गेल्यास क्षमस्व!!


Arun
Wednesday, April 16, 2008 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यमकाचं गणित सांभाळता सांभाळता
निसटून गेल्या रंभा अप्सरा मेनका
चाफ्फ्याच्या लेखणीतून उतरल्या
चाफ्फीसाठी प्रेमकविता

दिवे दिवे दिवे :-)


Chinya1985
Thursday, April 17, 2008 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पणजोबांच्या वडीलांना
म्हणतात खापरपणजोबा
आणि मराठीचा आवाज
घुमवतात झक्की आजोबा!!!

मायबोलिवर लोक लिहितात
चित्रपटाचा रिव्ह्यु
आणि वादग्रस्त ठरतो
दिनेशदांचा इंटरव्ह्यु



Chinya1985
Tuesday, April 22, 2008 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंडाचे झेंडे गाडत आहेत
राणे,भुजबळ मुंडे
आणि प्रागच्या टॉयलेटचे फ़ोटो
टाकतात आपले किशोर मुंढे!!!!


Dakshina
Wednesday, April 23, 2008 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या१९८५.... टू मच.....
तूमचा सेन्स ऑफ़ ह्युमर.... जबरदस्त....


Chinya1985
Wednesday, April 23, 2008 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, हे खरच लिहिलय की उपहासानी????

Dineshvs
Thursday, April 24, 2008 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान उखाणा, चिन्या. ( लोक उगाचच मला घाबरुन असतात, हा हा हा !!! )
आणि दक्षिणा कधीही उपहासाने लिहिणार नाही. मी ग्वाही देतो.


Dakshina
Thursday, April 24, 2008 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, माझ्यावर इतका विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद.
चिन्या1985... मी उपहासाने लिहीणं शक्यतो टाळते. तुम्हाला दिलेली दाद ही मनापासून आहे.
be assured.


Chinya1985
Thursday, April 24, 2008 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दक्षिणा आणि दिनेशदा!!!!

कॅंपात जाउन मुले
पहातात विहंगम दृश्य
आणि उखाण्यांच्या बाफ़वरुन
चाफ़ा होतो अदृश्य!!!!



Dakshina
Friday, April 25, 2008 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्मीतले जवान कायम सुरक्षेसाठी दक्ष
या चिन्याचे मात्रं असते भलतीकडेच लक्षं....




Chinya1985
Friday, April 25, 2008 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,हा हा हा!!!!!

चालता चालता मधेच
बंद पडतो आमचा टिव्ही बिपिएल
क्रिकेटपेक्षा चिअरगर्ल्सद्वारेच मनोरंजन
करत नन्दिनीच आयपीएल!!!

उशिर झाला म्हणुन वेळ
नाही मिळाला खाकी शिवायला
अन शाखेत बर्मुडात गेलो म्हणुन
चांगलाच भडकला च्यायला!!!

दिवे घे रे!!!!


Tanyabedekar
Friday, April 25, 2008 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटचा खाकी चड्डीवाला लै भारी चिन्या... :-)

Chyayla
Friday, April 25, 2008 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या..

चिन्याने हाणला च्यायल्याला उखाणा.
बर्मुडा सोडुन खाकी (चड्डी) घालुन ये
नाहीतर करेल तुला उताणा.


बाकी चिन्या मस्तच.. झक्की आजोबा आणी ईतरही छान जमलेत.. सोबत दिवा घे रे बाबा.


आर्मीतले जवान कायम सुरक्षेसाठी दक्ष
या चिन्याचे मात्रं असते भलतीकडेच लक्षं

दक्षिणा छान जमलाय हो.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators