|
असले अनुभव आल्यावर मी हादरूनच गेले, आणि आता तर कोणी लग्नाच्या बाबतीत सिरियस (म्हणजे मॅरेज प्रपोजल्स) आली तरी मला त्यांच्या डोळ्यात असं दिसतं की ते गम्मत म्हणून भेटतायत... आणि त्यांना लग्नात काडीमत्रं इंटरेस्ट नाहीए. आणि सारखा असा निगेटिव्ह विचार करून मी माझा इतर गोष्टींमधला रसही पूरता घालवला आहे. तो परत मिळवण्यासाठी असं वाटतं की काहीतरी मोटीव्हेटींग घडलं पाहीजे, पण नक्की काय घडलं तर मोराल बूस्ट होईल ते कळत नाहीए. म्हणून तुम्हा लोकांशी बोलण्याचा (अनेको दिवसांपासूनचा) विचार अंमलात आणायचा ठरवला. समूपदेशनही पुन्हा सुरू करणार आहे. म्हणजे निदान सेटलमेंट होईपर्यन्त तरी मनःस्वास्थ्य ठिक राहील.
|
Dineshvs
| |
| Saturday, April 12, 2008 - 3:06 am: |
| 
|
राजकुमारी, मी परत लिहितो कि झाले त्यात आपला काहिच दोष नव्हता, हि भावना जोपासणे खुपच महत्वाचे आहे. ज्यानी तूमच्याशी प्रतारणा केली, त्यांचा उल्लेख करणे इतकेच नव्हे तर आठवणी काढणेही सोडून द्या. त्यांची लायकीच नव्हती. ज्या व्यक्तिचा निर्णय, आईच्या मतावर अवलंबून आहे, तो इतराना काय आधार देणार ? जर समजा एखादी व्यक्ति आवडलीच तर स्वतःहून त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधा. थोडा अंदाज घेऊन सत्य परिस्थिती सांगून टाका. जे कुटुंबीय खरोखरीच सुसंस्कृत आहेत, ते अश्या घटनांकडे डोळसपणे बघु शकतात, आणि सर्व कुटुंबाने सत्याचा स्वीकार केल्यावर, पुढे अडचणी येत नाहीत. आता असे कुटुंबीय असतात का ? असे विचाराल तर हो नक्कीच असतात. माझ्या ओळखीत आहेत. पण तरिही, लग्न, जोडीदार हे फ़ार महत्वाचे प्रश्न आहेत, त्याशिवाय जीवनाला अर्थच नाही, हे सुद्धा खरे नाही. संपूर्ण आयुष्यातला तो एक छोटासा घटक असतो. आपल्या मनासारखे आणि आपल्यासाठीच जगणे असावे. कुणी आपला स्वीकार करावा वा करु नये हे आपल्या हातात नसते, पण आपण जसे आहोत तसे, आपण आपल्यालाच स्वीकारणे महत्वाचे. मनातील वेदना चेहर्यावर न दाखवण्याचे अवघड काम करता आहातच, मग त्यापेक्षा अगदी थोडासा जास्त प्रयत्न केलात तर मनातीलही नकारात्मक भावना, सहज दूर करु शकाल. प्रत्येक ओळख वा मैत्री एका नात्यात परिवर्तित व्हावी, असा आग्रह धरु नका, त्याचाच ताण घेताय तुम्ही. लोकात मिसळा, मैत्री करा, जोडीदार मिळेलच, आणि नाहीच मिळाला, तर मैत्री राहिलच ना.
|
धन्यवाद दिनेश, मी तुमची खूप आभारी आहे, वेळात वेळ काढून तुम्ही मला वेळोवेळी धीराचे शब्द सांगत आलेले आहत. तुम्ही सांगताय त्यप्रमाणे मी जरूर प्रयत्न करीन. 
|
Anaghavn
| |
| Tuesday, April 15, 2008 - 9:44 am: |
| 
|
राजकुमारी, "माझी लढाई ही आतल्या आत माझ्याशिच सुरु आहे."--अगदी खरं आहे. आपली लढाई आपल्याशी सुरु असते, बर्याचदा. तेव्हा आपण थोडे सैरभैर झाल्यासारखे होतो. itgirl म्हणते त्या प्रमाणे,तु सारासार विचार करते आहेस. निर्णय विचरपुर्वक घेत आहेस. पण तुझा अजुनही स्वत:वर विश्वास नाहिये ना?तु कमकुवत झाली आहेस अस वाटतय तुला. पण ही एक stage आहे. let it go . नुसता द्यायचा म्हणुन सल्ला देत नाहिये. आपण जेव्हा काहीच करु शकत नाहि तेव्हा एक मात्र करु शकतो-- जे होतय त्याकडे काहीही विचार न करता, काहीही प्रतिक्रिया न देता, (अगदी मनातल्या मनातही) बघायचे. लोक काय म्हणतायेत? आपण तोंड नाही धरु शकत ना, मग फक्त बघुयात. काय म्हणायच आहे ते म्हणा. लक्शात ठेव. लोक म्हणतात कारण तो त्यांचा स्वभाव असतो. आपल्या जागी दुसरी कोणीही असती तरी लोक तसच बोलले असते. म्हणजे आपल्यावर ओढवुन घेण्याची गरजच नाही. कदाचीत तुला माझं म्हणन पटणार नाही. पण आपण जेव्हा याकडे तटस्थ पणे पहायला लागतो, त्या गोष्टी आपल्या पासुन दुर जायला लागतात. हे वादळ आहे, let it go. अनघा
|
Rajkumari
| |
| Tuesday, April 15, 2008 - 11:11 am: |
| 
|
अनघा, तुम्ही म्हणता, ते पटणार नाही कसं? पटलंच... मी ही लोकांची जर पर्वा करत असते तर कदाचित आज इथे, नसतेच. झूरून झूरून माझं काय झालं असतं ते माझं मलाच माहीती. मलाही कुठेतरी सुखी आयुष्य जगवंसं वाटतयंच, पण अवती भवती घडणार्या सगळ्या नकारात्मक गोष्टींमुळे काही पॉझिटीव्ह होऊ शकेल असा विश्वास ढळून गेलाय. पण तुम्हा सर्वांशी बोलून खूप बरं वाटतं. 
|
Maanus
| |
| Thursday, April 17, 2008 - 2:56 am: |
| 
|
http://en.wikipedia.org/wiki/Loneliness#Typology Common Types & Symptoms of Loneliness.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 17, 2008 - 3:18 am: |
| 
|
आणखी एक महत्वाचे. जशी यशाच्या बाबतीत आपली तूलना नेहमी जास्त यशस्वी माणसांशी करावी तसेच दुःखाच्या बाबतीत, जास्त दुःखी माणसाशी. आपल्यापेक्षा दुःखी माणसे आहेत, असे एकदा जाणवले कि आपले दुःख क्षुद्र वाटू लागते. आणि पुढची पायरी येते, कि त्या दुःखी माणसांचे अश्रु पुसण्याची. त्या पायरीवर आलो, कि सगळेच कसे आनंदमय होत जाते.
|
Rajkumari
| |
| Thursday, April 17, 2008 - 8:42 am: |
| 
|
धन्यवाद माणूस आणि दिनेश, तुम्हा सर्वांच्या पोस्ट्स मुळे मनाला खरोखरीच उभारी मिळतेय. एकटेपणा हळू हळू दूर जातोय असं वाटतंय. आणि त्यातूनच मी सावरण्याचा प्रयत्नं करतेय. जेव्हा पासून इथे लिहीलं तेव्हापासून (नुसतं लिहील्यापासूनच) बरं वाटायला लागलंय. ( हे अगदी मनापासून सांगतेय) वरच्या एका पोस्ट्मध्ये कोणितरी मला डायरी लिही असं सांगितलं होतं. पण खरंतर डायरीत फ़क्त एक पान असतं, मला वाटतं ते पुरणार नाही, आणि दुसरी गोष्टं मला ती डायरी चुकूनही कुणा दुसर्या माणसाच्या हातात पडावयास नकोय. Unknown faces are better to discuss such things, than known faces. Thanks once again.
|
Yashwant
| |
| Thursday, April 17, 2008 - 9:29 am: |
| 
|
डायरी लिहिन्यात धोका तोच असतो. काही जण चोरुन डायरी वाचतात आणि चार चौघात त्याची वाच्यता करतात. त्यापेक्शा मायबोली एक्दम छान. कुणी कुणाची वैयक्तिक माहिती काढायचा प्रयत्न करत नाही. कामाच्या बाबतीतला एक प्रोब्लेम खुप घुस्मट झाल्यावर मी इथे लिहीला होता. लिम्बुटिम्बुने त्याला इतके समर्पक उत्तर दिले होते कि मी खरच त्यातुन चान्गला सावरलो.we have really nice people on maayboli
|
>>पण खरंतर डायरीत फ़क्त एक पान असतं, मला वाटतं ते पुरणार नाही मजा वाटली हे वाचून डायरी लिहीणे म्हणजे अगदी त्या तारखेचे त्याच तारखेच्या पानावर अस नाही. तुमचा उद्देश रोजनिशी लिहीणे हा नसून मनातील भावना लिहून मोकळ्या करणे हा आहे. तारखा नसलेल्या डायर्या पण मिळतात. सुरक्षेचा प्रश्ण म्हणून माझे २ ३ मित्र अस करतात. सुट्या कागदांचा ताव असतो. त्यावर लिहीत सुटतात. सगळ लिहून झाल की परत परत वाचून पहातात. २ ३ वाचनातच आपण काहिच्याकाही लिहीले आहे हे पटते. मग फाडून केरात टाकतात. नाहीतर आपल्याच ईमेल अकाऊंटमधे ड्राफ्टमधे लिहीतात आणि सेव्ह करून ठेवत जातात. तर उपाय बरेच आहेत सुरक्षीत 'डायरी' लिहीण्याचे
|
Sayonara
| |
| Friday, April 18, 2008 - 3:00 am: |
| 
|
इकडे पासवर्ड असणार्या डायर्या पण मिळतात. आणि पासवर्ड पण फक्त मालकाच्या आवाजाचाच ऍक्सेप्ट केला जातो.
|
सव्यसाची म्हणतो तिच डायरी लिहीण्याची खरी पद्धत आहे. माझा आजतागायतचा डायरी लिहीण्याचा अनुभव म्हणजे, लिहायला सुरूवात केली, की हळू हळू डोक्यात विचारांची गर्दी होत जाते. आणि जशी जशी गर्दी होते, तस तसा हाताचा लिहीण्याचा वेगच कमी पडतो, मग पान कमी पडतं. तशी मी मागे एका वर्षी पेशन्स ठेवून डायरी लिहीली होती, पण ती नष्ट करताना फ़ार त्रास झाला होता मला...
|
Divya
| |
| Friday, April 18, 2008 - 1:46 pm: |
| 
|
माझ तरी अस मत आहे कि डायरी बियरी काही लिहु नये. उगाच त्या गोष्टी चघळल्या जातात जर त्रासदायक असतील तर. चांगल्या घटनांची जरुर नोंद करावी. एखाद्या वाईट नकोश्या फ़ेज मधुन बाहेर पडल्यावर त्या प्रसंगावर, परिस्तितीवर कशी मात केली हे लिहावे पण नैराश्य असताना कही लिहु नये. त्याने मन अजुन खचु शकते किंवा त्याच त्याच गोष्टीं मधे फ़िरत रहाते. मनाचे श्लोकांचा पण फ़ायदा होतो मनाला थार्यावर आणण्यासाठी.
|
Mansmi18
| |
| Monday, April 21, 2008 - 7:28 pm: |
| 
|
राजकुमारी, नुकतेच मी "कुसुम मनोहर लेले" हे नाटक पाहिले. ते पाहुन shocking याशिवाय दुसरी प्रतिक्रिया सुचली नाही. अर्थात हे नाटक तसे जुने आहे त्यामुळे हे प्रकार आताही होत असतील का? असा विचार आला. एका सुशिक्षित नोकरदार स्त्रीला असे कसे फ़सवु शकले हा विचार मनात आला पण त्याचे उत्तर पात्र "सुजाता देशमुख" देते कि "त्यावेळेस पाय जमिनिवर कुठे असतात". तुम्ही कसल्या phase मधून जात असाल त्याची कल्पना इतर कोणालाही करता येणार नाही त्यामुळे उगाच सल्ला वगैरे देत नाही पण "मनोहर लेले" सारख्या माणसांपासून सावध राहिलात तर बरे. देवाला मानत असाल तर नियमित प्रार्थना करा नक्की फ़रक दिसेल. शुभेच्छा!
|
मला फ़ारसा अनुभव नाही व माझे वयही फ़ार नाही पण माझ्या माहीतीप्रमाणे तुमची परिस्थिती आध्यात्मिक प्रगतीसाठी ideal आहे. फ़क्त थोडीफ़ार ध्यानधारणा करण्यापेक्षा आपल्याबरोबरच हे का होतेय,आपल्या आजुबाजुला घडणार्या गोष्टी का घडत आहेत???यातुन काय सुचित होते आहे याचा विचार करा. पुस्तक वाचा त्यातील philosophy वर विचार करा. आपल्याला जे दिसते तसेच असते का???का जे असते ते आपल्याला दिसतच नाही याचा विचार करा.खालिल गोष्टी करा- १) आत्ता या क्षणाला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे???१ मिनिटानंतर नाही,१ मिनिटापुर्वीही नाही,१ वर्षानंतर नाही १ वर्षापुर्वीही नाही आत्ता या क्षणी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे???तुमच्या भावना विटनेस करा. खरच या क्षणी काही प्रॉब्लेम आहे??? २)एक दिवशी एकट्याच कुठेतरी जा जिथे तुम्हाला कोणी डीस्टर्ब करणार नाही. आणि अगदी लहानपणापासुन तुम्हाला आठवणारा प्रत्येक माणुस आठवा ज्याने तुम्हाला दुखावले आहे. अगदी छोटीशी गोष्ट जरी असेल तरी हरकत नाही. पण त्याला आठवा,यात तुमचे आईवडील,भाउ-बहीण,मुले,मित्रमैत्रीणी सगळेच येतील. एकालाही सोडू नका. आणि या सर्वांना अगदी मनापासुन शिव्या द्या. अगदी मनसोक्त शिव्या द्या. प्रत्येकाला आठवुन त्याने तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल शिव्या द्या. पुर्ण राग शिव्या देण्यासाठी वापरा. अस केल्याने तुमच्या मनाच्या अगदी आतल्या कप्प्यात असलेला राग बाहेर येईल व तुम्हाला बरे वाटेल. हे करताना विचार करु नका की या माणसाने माझ्यासाठी इतके काही केले तरी मी त्याला इतक्या शिव्या कशा काय देउ वगैरे. मनात त्या माणसाबद्दल आठवताना जितक्या शिव्या देता येतील तितक्या मनसोक्त द्या.
|
तूंचि अनाथाचा दाता| दु:ख मोह नासावया चिंता| शरण आलो तुज आतां| तारी कृपावंता मायबापा|| संतसंगति देईं चरणसेवा| जेणें तुझा विसर न पडावा| हाच भाव माझिया जीवा| पुरवीं देवा मनोरथ्|| मज भाव प्रेम देई किर्ती| गुण नाम वर्णावया स्तुती| विघ्नां सोडवूनि हातीं| विनंती माझी परिसावी हे|| आणीक कांहीं नाहीं मागणे| सुखसंपत्तिराज्यचाड धन्| सांकडे न पडे तुज जेणें| दुजे भक्तिविण मायबाप्|| जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा| तुका विनवी पंढरिनाथा| रंगीं वोडवावी रंगकथा| पुरवी व्यथा मायबापा||
|
मनस्मी, तुमची पोस्ट खूप काही सांगू गेली. सुदैवाने, देवाने इतके तरी शहाणपण दिलेय असं मी धरून चलतेय. माझ्या घरच्यांपर्यंत माझ्याबद्दल अशी काही वेडीवाकडी तक्रार अजूनी तरी गेली नाहीए. पण मला वाटते, जर मी केलेल्या गोष्टींची जबाबदारी घेण्यास तयार असेन तर मला कोणालाही एक्सप्लेनेशन देण्याची गरज लागू नये. तुमचे काय मत आहे यावर? उलटपक्षी याचा अर्थ असाही होत नाही की माझ्या स्वातंत्र्याचा गैरफ़ायदा घ्यावा. आधीच्या २ अनुभावांमध्ये मला समजून चुकले की, आजच्या जगात इतकं इमोशनल असून चालत नाही. थोडं...... थोडं..? खरंतर बरंच व्यवहारी रहावं लागतं. पण मला ते जमत नाहीए. त्यामूळेच कदाचित मला छोट्या छोट्या गोष्टींचा खूप त्रास होतो. मी कुसूम मनोहर लेले हे नाटक पाहीलेलं नाही, पण तुम्ही सांगितल्यानूसार, निदान जगात कसले अनुभव येऊ शकतात, आणि आपण त्याला तोंड कसं देऊ शकतो हे शिकण्यासाठी तरी मला ते पाहीलंच पाहीजे.
|
चिन्मय, तुम्ही म्हणता, तुम्ही खूप लहान आहात, असालही, पण तुम्हाला खूप जाण आहे. तुम्ही सांगितलेल्या शिव्यांचा उपाय हा थोडा बालिश असला तरिही तो कधी कधी उपयुक्त ठरू शकतो. मेट्रो सिनेमात आपण पाहीलेलंच आहे, की इरफ़ान खान, कोंकणाला घेऊन बिल्डिंग वर जोरात ओरडायला लावतो. त्यातलाच हा प्रकार आहे. माझ्या जवळच्या मित्र मैत्रिणिंशी मी खूप बोलते. सुदैवाने मी अंतर्मुख नाही त्यामूळे माझ्या भावना दबून वगैरे रहात नाहीत. तुम्ही म्हणता तसे ज्यांनी मला दुखावले अशा लोकांना सोडायचे नाही म्हणजे नक्की काय करू? त्यांनी काही वर्षांपुर्वी केलेल्या गोष्टी मी आता उकरून काढून माझ्या मनातली सगळी गरळ त्यांच्यासमोर काढू? मग ते मला काय म्हणतील? कि मध्ये इतकी वर्षं गेली आणि आता याबद्दल बोलून काय उपयोग आहे? आताचं काय ते बोल. पुढे, तुम्ही म्हणालात की एकांतात जाऊन शिव्या द्या.... मान्य आहे अगदी... पण त्यातूनही मला खरंच मनःशांती लाभेल का? कारण कुठेतरी मला माहीती आहे, की त्या शिव्या या हवेत विरून गेल्या आहेत, ज्यांच्यापर्यंत पोचायला हव्यात त्यांच्यापर्यंत पोचल्या नाहीयेत. हे मी जे काही करतेय ते फ़क्त मनाची समजून घालण्यासाठी... नाही का?
|
मला जे काही अनुभव आले, त्यामूळे माझी मेंटॅलिटी एक प्रकारे फ़ॉर्म होत गेली, त्यातून मी खूप लोकांपासून दूर गेले. काही वर्षांपुर्वीच्या माझ्या मित्र-मैत्रिणिंच्या संख्येत आणि आजच्या संख्येत जमिन आसमानाचा फ़रक आहे. यातून माझे नातेवाईक सुटले नाहीत. तर काही मोजके लोक जे माझ्या डिव्होर्से च्या काळात माझ्या बरोबर होते ते ही आता हळू हळू दूर जावू लागलेत. म्हणजे माझेच त्यांना भेटणे, बोलणे कमी होऊ लागले आहे. त्यांनी त्यावेळी मला मदत केली, मी त्यांची त्यासाठी आयुष्यभर ॠणी राहीनच. पण त्यांना ही आजकाल असे वाटू लागलेय, की मला त्यांची गरज राहीलेली नाही. जेव्हापर्यंत मी त्यांचा उपयोग करून घेऊ शकले तोपर्यंत घेतला. (असं त्यांना वाटतं) सतत मी त्यांच्याकडे जावं, त्यांना फोन करावेत, भेटावं, माझी दुःख सांगावीत आणि त्यांना मला त्यावर उपदेशाचा डोस पाजाता यावा.... अशी एक त्यांची अपेक्षा असते. जी मी आजकाल पूर्ण करत नाही. अजून एक गोष्टं म्हणजे, या मोजक्या लोकांनी मला कोर्टाच्या केसच्या वेळी कोणत्याही प्रकारची (एक रुपयाची सुद्धा) आर्थिक मदत केली नाही. (तेव्हा मला गरज होती) आज नाही हे माझं नशिब. या उलट, मीच वेळोवेळी त्यांच्या दुखण्या-खुपण्याला धावून गेले. अर्थिक हातभारही लावला. 'कशाला लागतात तुला पैसे? तुला काय संसार आहे?' हे वाक्य मी अगणित वेळेला ऐकलेलं आहे. तूच आमच्याकडे ये, तूला भरपूर वेळ असतो... इत्यादी. मी म्हणजे एक मोकळी व्यक्ती आहे, जिला फ़क्त नोकरी आहे, बाकी काही काम नाही अशी जी माझी इमेज केली आहे त्याची मला चिड आहे.
|
Yashwant
| |
| Tuesday, April 22, 2008 - 11:30 am: |
| 
|
चिन्मय, सही, थोडक्यात उतारा I mean solution दिलय. राजकुमारी च नाही पण बर्याच जनान्ना याचा उपयोग होइल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|